अस्तित्व भाग ८

श्रावणी लोखंडे


(किती अजब आहे ना.... पैसे नाहीत,माझ्याच घरात माझी अडचण होते माझी आपली माणसं मला बाहेर काढायला मागे मागे बोलतात आणि तुम्ही......तुमची पण तीच अवस्था......पैसे तर आहेत पण आपली माणसं नाही...)हे बोलताच तिघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येत.) आता पुढे...





शीतल संध्याकाळी घरी येते.शितलची सासू म्हणजे महेश ची आई आणि भाऊ आधीच घरी आलेले असतात महेश ची आई शीतल ची समजूत काढन्याचा प्रयत्न करते.

"तडजोड करून संसार करावा लागतो काही गोष्टी या बाईने समजून घ्यायच्या असतात.आपला देश पुरुषप्रधान आहे, ते जे बोलणार,जस बोलणार तेच करावं लागतं अगं बायकांना...........असं पोलीसकेस वैगरे करून कसं चालेल.........हे बघ चल..... आपण  पोलीस स्टेशन ला जाऊ आणि मग तू तुझी तक्रार मागे घे आणि मग पुन्हा सुखाने संसार करा आणि तू नाही नांदलीस तर लोक तुझ्या आईवडिलांच्या तोंडात शेण घालतील आणि आपली पण चार लोकांमध्ये शिथु होईल त्या इज्जतीचा तरी विचार कर."महेश ची आई

"हो का........मग हे तुम्ही तुमच्या मुलाला समजावलत का?लग्न म्हणजे तडजोड नाही विश्वास असतो आणि तोच विश्वास तुमच्या मुलाने तोडला आहे आणि तुम्ही सांगताय मी केस मागे घेऊ.............छे...... हे कधीच होऊ शकत नाही.ज्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली,माझ्या पोटात इवलासा अंकुर फुलला होता त्याला माझ्या गर्भातच मारून टाकल त्याला......मी माफ करू...शक्यच नाही. एकवेळ फक्त मी एकटी असती आणि मला मारलं असत ना....तर केलं सुद्धा असत माफ पण माझ्या बाळाच्या खुन्याला कशी माफ करणार होते आणि हो पुरुषप्रधान देश तुमच्या साठी आहे माझ्यासाठी नाही आणि काय हो.........तुम्ही सगळं सहन केल असेल म्हणून मी ही तेच करावं असं वाटलं का तुम्हाला त्यापेक्षा "तू हे बरोबर केलंस अस म्हणाला असतात.... तर जास्त आवडलं असत मला,"आणि मला एक सांगा.......जर का मी अस बाहेर दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवले असते तर तुम्ही तुमच्या मुलाला तडजोड करून संसार कर हे सांगितलं असत का???????नाही ना.....उलट मी किती चारित्रहीन आहे हेच सांगितलं असत ना शिवाय माझ्या घरचा उद्धार केला असता तो वेगळा. हो ना..........पुरुष काहीही वावगं वागला तरी बाई ने माफ करायचं......का बरं...... पैसे कमवून घरात देतो म्हणून का???"शीतल



"हे बघ....मी तुला समजावून घेऊन जायला आले आहे तू उगाच नको तो विषय काढून भरकटत आहेस.तू चल आपल्या घरी मी समजवेन महेश ला".महेश ची आई

"नाही.......... मी पुन्हा त्या घरात पाऊल ठेवणार नाही..... जिथे एका बाई ला बाई च समजून घेत नाही म्हंटल्यावर काय बोलणार आणि काय भरोसा महेश पुन्हा अस काही वागणार नाहीत याचा"शीतल

"अगं मी शब्द देते तुला, मग तर झालं"महेश ची आई

तेवढ्यात शीतल ची काकू बोलते.........

अगं बाळा......त्या एवढं बोलतायत तर जा तू आणि असं हे मोठ्या माणसांनी सारखी गवसणी घालणं बरं वाटत का?शेवटी ते घर तुझंच आहे आणि प्रत्येक बाई ची वरात जरी माहेरून निघाली ना तरी तिचा शेवट मात्र सासरी तिच्या घरी च होतो कारण ते हक्काचं घर असत तिच्या माहेर हे फक्त चार दिवस पाहुणचारासाठी असतं..... जिथे मुलीने नवऱ्यासोबत यायचं चार दिवस छान आराम करायचं आणि जायचं."शीतल ची काकू

"त्यापेक्षा सरळ शब्दात सांगा ना.......मी तुम्हाला जड झाली आहे ते"(शीतल गालाच्या एका कोपऱ्यात च हसून बोलते पण डोळे मात्र डबडबले असतात)"

"हो तस समज हवं तर"शीतल ची काकू

"अगं काकू......समज कशाला मी तुझं आणि काकाच बोलणं ऐकलं आहे फुकट चं तोंड वाढलं आहे ना खायला..... आणि नको काळजी करू..... तुमच्यावर ओझं म्हणून नाही राहणार आहे मी या घरात. ज्यांना माझी गरज आहे आणि मला ज्याची गरज आहे अश्या ठिकाणी मी जाणार आहे. तुमच्या हट्टापुढे आणि निव्वळ तुमच्या इज्जतीसाठी मी माझं आयुष्य पुन्हा पणाला नाही लावणार.त्या महेश नावाच्या राक्षसाच्या तावडीतून कशी सुटले ते मलाच माहीत त्या मुळे आता मी काय करायचं याचे उपदेश नका देऊ(शीतल हात जोडून सांगते आणि आतल्या खोलीत निघून जाते. महेश ची आई पण नाक मुरडत निघून जाते.)

तसं काकू धुसपूस करत बोलत असते.

"जायचं सासू सोबत एवढी आली होती घ्यायला तर........कशाला ते एवढे नखरे हिचे,आम्ही पण राहतोच की नवऱ्यांसोबत....... कसे ही असले तरी. 

हे सगळे नको ते लाड अंगाशी येतायत आणखी काय".शीतल ची काकू

"हो का.......असं बोलू नये पण तुला सुद्धा दोन मुली आहेत देव न करो हीच गोष्ट उद्या त्यांच्या बाबतीत घडली तर तू तेंव्हा सुद्धा हेच बोलशील का?"शीतल

"शीतल.......तोंड सांभाळून बोल.जिभेला हाड नसत म्हणून"उचलली जीभ न लावली टाळ्याला" कोणाशी बोलतेस आणि काय याच भान ठेव जरा."शीतल ची काकू 

"हे बघ काकू मला कोणाशी वाद घालायचाच नाही मुळी समजलं ना...... तू बोलताना जरा विचार करून बोललीस तर बरं होईल आणि राहत राहिला प्रश्न माझ्या आयुष्याचा तर त्याची काळजी तू नको करू कारण मी तुम्हा सगळ्यांवर फुकटच खाणारी आणि ओझं म्हणून तर अजिबातच नाही राहणार समजलं.......!!!

शीतल पुन्हा खोलीत निघून जाते आणि तिची बॅग आवरायला घेते.बॅग भरून होते आणि शीतल घराबाहेर निघते तशी काकू लगेच बोलते......

"जाऊन जाऊन कुठे जाणार तू ......."सरड्याची धाव कुंपणपर्यंतच"येशील परत इथेच फक्त बाहेर काही विपरीत करून येऊ नको नाही तर आहे ती अब्रू पण घालवशील.

काकूंचे हे शब्द ऐकून तर शीतल चा पाराच चढतो पण तिला आणखी वाद घालायचा नसतो म्हणून ती फक्त एवढंच बोलते.

"मी कुठे जायचे आणि काय करायचं ते माझं मी बघून घेईन तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि राहता राहिला प्रश्न तो या घरात पुन्हा येण्याचा तर माझं प्रेत सुद्धा या घरात मी येऊ देणार नाही समजलं ना".......शीतल



शीतल निघून जाते तिची आई मात्र रडत असते तेंव्हा पण काकी बोलते "कशाला रडायचं असल्या मुलीसाठी जिला संसाराची तर काही चिंताच नाही पण माहेरच्यांचा इज्जतीची पण पर्वा नाही. तरी म्हंटल होत मी दादांना एवढं पण डोक्यावर चढवू नका लेकीला आता ते तर गेले पण भोगतोय आपण...... दादा असते आता...... तर लेकीच्या या असल्या कारनाम्यांनी कृतकृत्य झाले असते हो..........शीतल ची काकू टोमण्यातच बोलते.

शीतल ची आई डोळ्यातल पाणी पदराच्या टोकाने पुसते आणि खोलीत निघून जाते.

शीतल बॅग घेऊन आजीआजोबांच्या बंगल्याबाहेरच थांबते आणि अशी अचानक आत कशी जाऊ याचा विचार करत असते तेवढ्यात आजोबा मागून येतात आणि बराच वेळ शीतल ला बघत असतात आणि काही वेळाने तिला विचारतात.

"आतमध्ये कशी जाऊ याचा विचार करते आहेस का बाळा"आजोबा

शीतल आजोबांच्या प्रश्नाला होकारार्थी मान हलवते आणि बाजूला बघते तर आजोबा असतात.तशी शीतल बावचळते.

"नाही म्हणजे तस काही नाही ते मी आपलं सहजच .......काही नाही"(एवढं बोलून शितलचे डोळे भरून येतात.)

आजोबा शीतल च्या पाठीवरून हात फिरवतात आणि तिला आत चल म्हणून बोलतात.शीतल एकदम जड पावलांनी दारापर्यंत येते.आजी शीतल आणि आजोबांना गॅलरीतूनच येताना बघते तस लगेच आरतीच ताट आणते.शीतल आणि आजोबा दाराजवळ येताच आजी त्यांना थांबवते.शीतल च्या मनात बरेच प्रश्न येऊ लागतात.(का बरं थांबवलं असेल आजींनी). तशी आजी पटकन आरतीचा ताट घेऊन समोर उभी राहते. शीतल ला औक्षण करते तिच्यावरून घास काढते आणि मग तिला आत घेते हे सगळं बघून शीतल ला भरून येते आणि ती आजी च्या गळ्यात पडून रडू लागते.तेंव्हा आजोबा शीतल च्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला सांगतात. आम्हाला लेकीची भारी हौस पण दोन्ही मुलं च झाली आणि मग काय....त्यांना जीव लावला लहानपणापासून सगळं दिल त्यांना आणि आता आम्हाला........ एवढंच बोलून आजोबा डोळे पुसतात. आजी,शीतल आणि आजोबा तिघे मिळून छान पैकी जेवण करतात थोड्या गप्पागोष्टी करतात आणि झोपायला जातात आजी शीतल ला त्यांची मोठी खोली देते जिथे तिला आरामात राहत येईल.शीतल झोपायला म्हणून बेड वर आडवी होते, पण तिला काही केल्या झोप येईना, सारखी आपली कूस बदलत असते सरतेशेवटी ती उठुन किचन मध्ये येते थोडं पाणी पीते आणि हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन बसते. लग्न झाल्यापासून घडलेल्या सगळ्या घडामोडी तिला आठवू लागतात आणि डोळे मात्र भरून येतात शीतल आसवं टिपत तिथेच सोफ्यावर झोपते रात्री आजी कसल्याशा आवाजाने उठतात तेंव्हा शीतल ला तिथे सोफ्यावर झोपलेलं बघतात आणि पुन्हा खोलीत जाऊन एक चादर आणून  तिच्या अंगावर पांघरून घालतात.शीतल च्या पायाने खाली जमिनीवर लाकडाचा फ्लॉवरपॉट पडलेला असतो आणि त्याच आवाजाने आजी जाग्या होतात.शीतल च्या डोक्यावरून हात फिरवून आजी पुन्हा त्यांच्या खोलीत जाऊन निजतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल ला नेहमी सारखीच लवकर जाग येते. ती मस्त पैकी चहा आणि नाश्ता बनवून ठेवते.आंघोळ करून घरभर छान पैकी धुपारत करते त्या धुपाच्या आणि अगरबत्तीच्या सुगंधाने आजीआजोबा दोघेही उठतात.त्यांना आज घर कसं एकदम पवित्र आणि प्रसन्न वाटते.

 किती तरी वर्षांनी त्यांना आजची पहाट आनंदाने भरल्यासारखी वाटत होती दोघे ही शीतल कडे एकटक बघत असतात तशी शीतल त्यांच्या जवळ जाऊन दोघांना ही नमस्कार करते दोघेपण तिला तोंडभरून आशीर्वाद देतात.आजीआजोबा दोघेही आंघोळ करून जरा तरतरीत होतात आणि तिघेही एकत्रच डायनिंग टेबल वर नाष्टा करायला बसतात. शीतल ने उडदाची डाळ टाकून उपमा बनवलेला असतो, त्यासोबत फक्कड असा आलं घातलेला चहा अगदी आजी बनवतात तसाच झालेला असतो आणि त्यासोबत मिक्स फ्रुट ज्युस असते.कारण रात्री आजीआजोबांसोबत गप्पा मारताना तिला कळलं होतं की घरात नाष्टाच्या वेळेस ज्युस लागते म्हणून तिने आठवणीने ज्युस बनवलं होत. आजीआजोबा पण अगदी मन भरून नाश्ता करतात.

काही वेळाने शीतल तयार होऊन खाली हॉल मध्ये येते काही पेपर्स ची फाईल असते हातात. खाली येऊन ती आजीआजोबांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते कारण ती कामाच्या शोधात निघते आजी तिला त्यांच्या ओळखीवर बँकेत चांगल्या पदावर नोकरी मिळवून देण्याबाबत बोलतात.आणि शीतल ला उगाच काम शोधत फिरू नको असं सांगतात.



(शीतल काय करेल आजींच्या शिफारशी वर बँकेत नोकरी करेल की नाही???हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट द्वारे जरूर कळवा.) क्रमशः



सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......










🎭 Series Post

View all