अस्तित्व भाग ७

श्रावणी लोखंडे


(जिथे आपली माणसचं असा विचार करतात तिथे परक्यांच बोलणं काय मनाला लावून घ्यायचं. आपली सोय आपणच करावी......असा विचार करून शीतल झोपते. आज कितीतरी दिवसांनी तिला निवांत झोप लागली होती.)आता पुढे.



 संध्याकाळपर्यंत येते अस सांगून पहाटेच शीतल घराबाहेर पडते.काय करायचं,कुठे जायचे काही माहीत नसतं.आपली माणसं पण अस परकं करतील,आपल्या मागे अस परखड बोलतील यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.तिला विचार करून करून खूप रडू येत होतं.शीतल एका मंदिराच्या अंगणात बेंच वर बसून डोळ्यातली आसवं टिपत होती तेवढ्यात तिथे एक आजी आजोबा येतात.

"काय झालं पोरी......अशी का रडतेस" आजी

"काही नाही...... कधी कधी आपली माणसं....... आपली रक्ताची माणसं किती तुसड्यासारखं वागतात ना आपल्याशी?"शीतल

"हो गं........ पोरी.....असचं असतं..... हे जग असचं आहे."गरज सरो,नी वैद्य मरो"आता आम्ही म्हातारी माणसं बघ....लेकरांना लहानाची मोठी करायची सगळ्या गोष्टी हातात द्यायच्या आणि त्यांना पंख फुटले की असे बोलतात जस काय आम्ही आयुष्य जगलो नाही आणि जगवल नाही......अगं पण त्यांना हातावर पोट घेऊन आम्ही मोठं केलं जग कस आहे...त्या जगात कस वावरावं आम्ही शिकवलं.......हे पण ते विसरावेत."आजी"

शीतल आणि आजी आजोबा एकाच नावेमधले सोबती होते.शीतल आणि आजी आजोबा तिघांनाही बर वाटल बोलून मग आजोबांनी विचारलं.

" अगं..... पण तू अशी रडत कुठे जातेस"आजोबा

"कुठे नाही...... जिथे काम भेटेल तिकडे जायचं.स्वतःच पोट भरता येईल एवढं शिक्षण आहे माझं.पण आता डिग्री घेऊन कुठे फिरणार त्यापेक्षा जिथे काम भेटेल तिथे थांबायचं,पण सुरवात कशी आणि कुठून करू समजत नव्हत म्हणून इकडे येऊन बसले.इकडे येऊन एकांत तर भेटला पण सगळं आठवून रडू येऊ लागलं"शीतल



आम्हाला दोन मुलं आणि तीन नातवंड मोठ्या ला दोन मुलं आणि धाकट्याला एक मुलगी दोन्ही मुलं आपापल्या बायकां-पोरांसोबत परदेशात असतात. हॉस्टेल वर मुलांना पैसे पाठवावेत तसे दोघेही आम्हा म्हातारा-म्हातारीला पैसे पाठवतात. पैसा चिक्कार आहे पण माया लावणार,प्रेम करणार जिवाभावाचा कोणी नाही. आम्ही दोन म्हातारी एकमेकांच्या सोबतीने स्वयंपाक करतो,ही कपडे धुते तर मी वाळत घालतो सगळीच काम सोबतीने करतो म्हणजे वेळ कसा चांगला जातो,तरी घर बघ कसं....... खायला उठते.पोरं बोलतात दोघे आराम करा काम करायला बाई ठेवा पण आम्हाला बाई नको सोबती पाहिजे हे कसं त्यांना पटवून देणार. या वयात आधाराला नातवंडांची काठी पाहिजे पण हे त्यांना कुठे कळत त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे........(एवढं बोलून आजोबा रडू लागतात आणि आजी त्यांना शांत करतात)



आजी शीतल ला त्यांच्या सोबत त्यांच्या घरी राहायला यायचा आग्रह धरतात त्यांना सोबत होईल आणि शीतल च्या घरी तिची अडचण होणार नाही शिवाय ती जर बाहेर जॉब करायला गेली तर आजी-आजोबा कोणाची तरी वाट बघतील दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या माणसासोबत आणखी वेळ चांगला जाईल ता उद्देशाने.

शीतल विचार करून सांगते अस म्हणते आणि आजी-आजोबांना सोडायला त्यांच्या घरी जाते.

घर कसलं ते...........बंगला असतो. आजोबा मिलीट्री मधून रिटायर असतात त्यामुळे त्यांना पेन्शन चिक्कार असते आणि आजी सुद्धा बँक मध्ये मॅनेजर होत्या त्या पण रिटायर असतात त्यांना पण पेन्शन चालू असते त्यात आजी आजोबांची दोन्ही मुलं परदेशात मोठ्या पदावर कामाला त्यामुळे तिथूनही पैश्यांची काही कमी नसते.शीतल घरात येते.आजोबा तिला पाणी देतात शीतल पाणी पिऊन आजीआजोबांचा बंगला न्याहाळत असते आणि मनातच विचार करते(एवढया मोठ्या घरात राहणाऱ्या माणसांना पण दुःख असतं तर मग आपण तर सामान्य माणूस आहोत.या दोघांकडे एवढा अमाप पैसा असून पण दोघेच असतात आणि मी एवढ्या माणसांमध्ये राहून पण एकटीच.........) 

एवढ्यात आजी आलं टाकलेला छान असा चहा घेऊन येतात. चहा पिता पिता चं शीतल म्हणते....

"किती अजब आहे ना.... पैसे नाहीत,माझ्याच घरात माझी अडचण होते माझी आपली माणसं मला बाहेर काढायला मागे मागे बोलतात आणि तुम्ही......तुमची पण तीच अवस्था......पैसे तर आहेत पण आपली माणसं नाही...)हे बोलताच तिघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येत.





(शीतल आजी-आजोबांकडे जाईल का ??आणि तिने आजीआजोबांकडे जावं का?????हे वाचण्यासाठी मला फॉलो रत रहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवत रहा.)

क्रमशः



सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......








🎭 Series Post

View all