अस्तित्व भाग ६

श्रावणी लोखंडे



(महेश ला जेंव्हा हे समजत तेंव्हा तो या सगळ्यासाठी स्वतःला दोषी समजतो आणि खूप रडतो.शीतल मात्र निपचित त्या बेड वर पडलेली असते.महेश शीतल ला धीर द्यायला तिला समजवायला आत जातो आणि तिची हात जोडून माफी मागतो.) आता पुढे......



शीतलचं महेशच्या बोलण्याकडे लक्षच नसत ती फक्त बाळाचा विचार करत असते तिला फक्त बाळ हवं असत.सात महिने ज्या रक्तामासाच्या गोळ्याला उदरात वाढवलं स्वतापेक्षा जास्त जपलं तो जन्माच्या आधीच तिला सोडून गेला होता.तिच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा आटल होतं. महेश बोलत असतो पण ही ची नजर मात्र त्या बाळाला शोधत असते.शीतल ची माहेर ची माणसं सुद्धा असतात पण तीच तिकडेहि लक्ष नसतं. शीतल ला या सगळ्याचा इतका मोठा धक्का बसतो की ती स्वतःची मानसिकताच हरवून बसते. आपल्या आजूबाजूला कोण आहे काय चाललंय याची तिला अजिबात जाणीव नसते.अखेर तिला हॉस्पिटल मधून घरी सोडतात पण तिला खूप जपावं लागेल कुठली अशी गोष्ट घडू नये की ज्याने तिला त्रास होईल अस डॉक्टर सांगतात.

असेच पंधरा दिवस जातात आणि महेश तिला घ्यायला येतो.शीतल महेश सोबत घरी येते खरी पण तिला काही समजत नसत कारण ती स्वतःची विचार करण्याची क्षमता आणि स्वतःच *अस्तित्व* हरवून बसलेली असते.महेश च्या घरी येऊन तिला चार दिवस होतात आणि महेश मधला राक्षस पुन्हा जागा होतो.शीतल जेऊन तिची गोळ्या औषध घेऊन बेड वर झोपलेली असते तोच महेश दारू पिऊन येतो आणि तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण या वेळी प्रतिकार करणारी शीतल वेगळीच होती शक्तिशाली होती तिने महेश ला दोन्ही हातानी ढकलून दिल आणि रूम बाहेर पळायला लागली पण दरवाज्याची वरची कडी घट्ट असल्याने तिला ती खोलता येईना तरी तिने पूर्ण ताकदीनिशी ती खोलण्याचा प्रयत्न केला अर्ध्या पर्यंत कडी उघडली देखील पण राक्षसरूपी महेश पुन्हा उठला. या वेळी उठलेला महेश खूप रागात होता कारण त्याला हवं ते मिळत नव्हतं........ त्याला शीतल ला उपभोगायच होत पण शीतल त्याच्या तावडीत सापडत नव्हती.ती पण त्याला तितक्याच हिमतीने मात देत होती स्वतःला वाचवण्यासाठी झटत होती.जिवाच्या आकांताने ओरडत होती पण महेश ची आई आणि भाऊ गावी गेले होते त्यांच्या....... महेश च्या आजिची ची तब्बेत सिरीयस होती म्हणून.......त्यामुळे घरात शीतल आणि महेश शिवाय तिसरं कुणीचं नव्हत.अखेर शीतल हतबल होते आणि महेश तिच्यावर आडवा होतो........... तोच शीतल च्या हाताला टेबल लॅम्प लागतो ती तो लॅम्प कसा बसा उजव्या हाताने उचलते आणि महेश च्या डोक्यात घालते अचानक असा डोक्यात झाल्याने महेश जास्तच चवताळतो पण शीतल पुन्हा तो लॅम्प त्याच्या डोक्यात घालते त्याला स्वतःला सावरूच देत नाही आणि अखेर महेश खाली कोसळतो.शीतल डोळे पुसते,पदर नीट करते आणि थेट पोलीस स्टेशन ला जाऊन महेशवर जबरदस्ती केल्याची, मारहाणीची आणि तिच्या बाळाला गर्भातच मारून टाकल्याची केस करते.पोलीस महेश ला घरी जाऊन बेड्या ठोकतात आणि सहा महिन्यांची कोठडी आणि २५००० दंड  अशी शिक्षा सूनवतात.

शीतल घरी म्हणजे तिच्या माहेरी येते.पंधरा दिवस राहते पण नंतर घरात कुरबुर व्हायला लागते.खर्च वाढतो,रेशन महाग झालंय त्यात काय तर म्हणे एक तोंड फुकटच खायला वाढलं आहे काकीचे असे बोल ऐकून शीतल पार........कोलमडून जाते. घरचे असे बोलतायत म्हंटल्यावर तिला तिथे राहणे योग्य नाही वाटले.



रात्री जेऊन झाल्यावर शीतल खोलीत पडलेली असते आणि विचार करते.........लहानाची मोठी झाली या घरात,लग्न झालं या घरात पण आधी मी कधी यांना खाणार फुकटच तोंड नाही वाटले काय तर म्हणे आमची लेक आहे आणि आता लग्न झालं तशी मी फुकटी...........?????

जिथे आपली माणसचं असा विचार करतात तिथे परक्यांच बोलणं काय मनाला लावून घ्यायचं. आपली सोय आपणच करावी......असा विचार करून शीतल झोपते. आज कितीतरी दिवसांनी तिला निवांत झोप लागली होती.

(शीतल काय करेल....घरात राहील की नाही?? हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट द्वारे जरूर कळवा.)

क्रमशः



सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे....

 


🎭 Series Post

View all