अस्तित्व भाग ४

श्रावणी लोखंडे

(एक दिवस फोन मधला बॅलन्स संपला म्हणून शीतल ने महेश चा फोन घेतला आणि त्याच्यावर एक मेसेज होता तो वाचून तर शीतल च्या पायाखालची जमीनच सरकली..........)आता पुढे........



"अहो.........काय आहे हे? कोण आहे ही?आणि असे कसे मॅसेज पाठवते?"शीतल

"अगं......काही नाही..... आमच्या पक्षातल्या मॅडम आहेत. अगं त्या आल्या होत्या ना आपल्या लग्नाला.....मी ओळख करून दिली होती"मनीषा नाईक" त्याच नाव."महेश

"मॅडम आहेत ना.....मग त्यांना म्हणावं मर्यादेत राहा..स्त्री आहेत ना मग तिने तिची मर्यादा पाहून राहावं आणि बोलावं.आणि तुम्ही तरी असा मॅसेज कसा करू शकता......मी कुठे कमी पडते का? तस असेल तर सांगा......"शीतल (डोळ्यातलं पाणी पुसत म्हणते)

"अगं...... अस काही नाही.....तू चुकीचा विचार करतेस.... त्या खूप मनमिळाऊ आहेत म्हणून त्या तशाच बोलतात."महेश

"हो का? अस तर मी पण मनमिळाऊ आहे मग मी अस कोणत्याही परपुरुषासोबत  बोललेलं तुम्हाला चालेल का?"शीतल

"हे बघ......उगाच राई च पर्वत करू नको,समजलं ना.....त्यात एवढ काही नाही आणि एक मॅसेज तर आहे त्यात काय एवढं वाद घालण्यासारखं आणि तू उगाच संशय घेतेस."महेश

"हे बघा मी संशय घेत नाही विचारते तुम्हाला आणि ती बाई एवढ्या रात्री उशिरा मॅसेज करते तिचा नवरा काही बोलत नाही बरा......."शीतल

"अगं...... ती दोघे वेगळे राहतात......"महेश

"म्हणजे!!!!" शीतल

"अगं म्हणजे ते दोघे एकत्र नाही राहत.....मॅडम मुलीसोबत राहतात त्यांचं आणि नवऱ्याचं पटत नाही म्हणून."महेश

"हो का.....म्हणून रात्री दुसऱ्यांच्या नवऱ्याना असले अश्लील मॅसेज करायचे का? मूर्ख आहे का ती बाई एवढं कळत नाही"शीतल

"अरे सोड ना......जाऊदे कशाला तू एवढं लक्ष देते आणि हे बघ मी असाच आहे"महेश

"मी कुठे नाही म्हणते रहा की असेच पण मर्यादा राखून वागा आणि बोला एवढंच माझं मत आहे"शीतल

"ठीक आहे....."महेश

एवढंच बोलून महेश नाश्ता करून टिफिन घेऊन निघून जातो......तो आज शीतलचा निरोप न घेताच निघाला होता महेश जाईपर्यंत शीतल त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती आणि डोळ्यातलं पाणी पुसत होती.तो दिसेनासा झाला तेंव्हा घरात आली..

शीतल च मन आज कशातच रमत नव्हतं....तिने नाश्ता सुद्धा केला नव्हता आणि दुपारी डोकं दुखतंय अस सांगून जेवली पण नव्हती.

संध्याकाळी शीतल ने सगळी काम भरभर आवरली आणि महेश ची वाट बघू लागली पण आज घरी आलेला महेश वेगळाच होता.रोज आल्या आल्या शीतल ला जवळ घेणार महेश आज टीव्ही समोर जाऊन बसला आणि हातात फोन घेऊन बसला होता.मध्येच हसत होता आणि मध्येच चेहेरे बनवत होता. त्याचा अश्या वागण्यामुळे कधी नव्हे ते शीतल ला संशय येऊ लागला अर्थातच तिची काळजी आणि अति प्रेमाची जागा संशयानी घेतली.शीतलने जेवण वाढलं महेश जेवला हात धुतले आणि बेड वर जाऊन आडवा झाला,शीतल जेवली की नाही ते विचारलं सुद्धा नाही. शीतल ला फार वाईट वाटलं.शेवटी तिची भीती खरी ठरली रात्री उशिरापर्यंत महेश त्या मनीषा नाईक सोबतच गप्पा मारत होता आणि ती बाई सुद्धा अश्लील चाळे करत होती हे सगळे मॅसेज बघून शीतल चा पाराच चढला आणि सकाळी सगळ्यांसमोर बोलायचं आणि विचारायचं तीने ठरवलं पण का कोण जाणे तिला फार रडू येत होत .पण ती स्वतःला कसबस सावरत डोळे बंद करून घेते. दुसऱ्या दिवशी रविवार असतो सगळे उशिरा उठतात महेश कधी नव्हे ते लवकर उठून पुन्हा तो फोन घेऊन गप्पा मारत बसला होता हे सगळं बघून शीतल च्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि बघते तर महेश त्या बाईसोबतच बोलत होता.शीतल ने त्याला जाब विचारला तर तो उगाचच आवाज वाढवून तिच्याशी बोलू लागला.महेश च्या आवाजाने आई आणि दीर दोघेही उठले आणि काय झालं हे विचारलं असता महेशने सगळं सांगितलं पण त्याने शीतल ला संशय घेते सांगून तिला खाली पाडलं.ती सांगत होती की हे दोघे पण असेच बोलतात पण त्यांनी ऐकलं नाही उलट तिलाच सुनावलं ती बिचारी गप्प बसली दोन दिवस जेवली नाही पण कोणाला तिची पर्वाचा नव्हती सगळे छान मज्जा मस्ती करत होते शीतल मात्र एकटीच बाजूला उभं राहून सगळं बघत होती.....

महेश खोलीत आल्यावर......

"का अस वागलात?"शीतल

"असा.......म्हणजे कसा....?महेश

"हे बघा तुम्हाला चांगलंच माहीत आहे चूक तुमची आहे मग का सगळं माझ्यावर उलटवलात मी संशय घेते सांगून हा........"शीतल

"हे बघ जे आहे ते मी सांगितलं आणि उलटवल काय? घेतच आहेस तू संशय माझ्यावर जर मी सांगतोय अस काही नाही तरी तू तेच तेच परत उगळतेस"महेश

"ठीक आहे नाही बोलणार परत अस बोलून शीतल त्याला त्या बाई शी न बोलण्याचा आग्रह धरते आणि तो पण त्या बाई शी नाही बोलणार परत अस सांगतो.

महेश ने तीच ऐकलं म्हणून ती लन सुखावते पण म्हणतात ना.......नव्याचे नऊ दिवस तसच काही घडलं.....

महेश फक्त काही दिवस च नीट वागला आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न काय तर म्हणे पक्षात आहे कामानिमित्त बोलावं लागत अस सांगून त्यांच आपलं चालूच होत आणि त्यातच शीतल ला दिवस गेले.... तिला वाटलं आता तरी सगळं सुरळीत होईल पण महेश बाप होणार ही बातमी ऐकून इतका खुश झाला की दर दोन दिवसांनी दारू पिऊन यायचा. दारू च्या वासाने शीतल ला त्रास होऊ लागला जवळ जवळ तीन महिने असेच गेले आणि मग घरच्यांच्या ओरडण्याने तो पियाचा बंद झाला.

शीतल ला सातवा महिना लागला आणि लगबग सुरू झाली ती ओटीभरणीच्या कार्यक्रमाची  आणि सातवा महिना संपण्याच्या पाच दिवस आधी ओटीभरून शीतल माहेरी आली.

शीतल माहेरी आली खरी पण तीच मन काही लागत नव्हता घरी सगळ्यांना वाटत होतं शीतलला महेश ची आठवण येते पण खरी गोष्ट तर तिलाच माहीत होती कारण कुठल्या तोंडाने ती या सगळ्या गोष्टी घरी सांगणार होती.......

महेश रोज दिवसातून दहा वेळा फोन करायचा आणि रोज संध्याकाळी शीतल ला भेटून तिच्या घरी तिच्या सोबतच जेऊन मग उशिरा रात्री घरी यायचा.......घरी आला की पोचलो म्हणून एक फोन शीतल ला करायचा पण.......त्याच अस गोड वागणं शीतल ला कुठे तरी खटकत होत.

एक दिवस महेशने घरी पोचलो सांगायला फोन केला शीतल सोबत थोड्या गप्पा मारल्या आणि दहा ते पंधरा मिनिटांनी फोन ठेवला.त्यानंतर जवळ जवळ अर्ध्या तासांनी महेश च्या आई चा फोन आला..

"अगं...... महेश निघाला का तिकडून???अजून निघाला नसेल तर त्याला सांग माझ गुढगे दुःखी वरच औषध घेऊन ये...."महेश ची आई

"हो सांगते ,पण तुम्ही काळजी घ्या" शीतल

" हो बाळा.....तू पण आराम कर"महेश ची आई

दोघींचं बोलणं होत आणि शीतल फोन ठेवते.

(महेश जर का घरी गेला नाही तर मग गेला कुठे???

हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट द्वारे कळवत राहा.)

क्रमशः

सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे....



 


🎭 Series Post

View all