अस्तित्व भाग २

श्रावणी लोखंडे

*२७ वर्षांपूर्वी*

शीतल आणि महेश च "लव कम अरेंज मॅरेज" आप्तांच्या लग्नसोहळ्यात हे दोघे भेटले. नजरा नजर झाली.शीतल दिसायला खूप सुंदर होती कमनीय बांधा,सरळ नाक,गोल चेहरा, आणि अगदी गोरीपान.......इतकी गोरी की दोन मिनिटाच्या उन्हाने सुद्धा लालबुंद व्हायची.

आणि महेश सुद्धा दिसायला हिरो पेक्षा काही कमी नव्हता कुठली ही मुलगी अगदी सहज त्याच्या प्रेमात पडावी असा. पण तरी महेश सारखा शीतल ला त्या समारंभात शोधत होता. शीतल च्या आत्याने ही गोष्ट हेरली.महेश दिसायला मोठ्या घरण्यातला दिसत होता म्हणून आत्याबाईंनी लागलीच त्याची चौकशी सुरू केली. एव्हाना तर शीतल च्या सुदधा ही गोष्ट लक्षात आली होती की महेश तिची एक झलक बघण्यासाठी तिच्या मागेमागे करतोय ते...... आणि मित्रपरिवाराला ????तर या गोष्टी न सांगता पटकन उमगतात. त्यात च रेखा म्हणून महेश ची जवळची "मैत्रीण" आता जवळची म्हंटल तर ती महेश वर एकतर्फी प्रेम करत होती पण महेश शीतल च्या मागे आहे हे लक्षात येताच तिने स्वतःला त्याक्षणी सावरायच ठरवलं कारण प्रेम मागून मिळत नाही ही गोष्ट तिला उमगली होती.रेखा पन दिसायला खूप सुंदर होती पण मैत्री च्या पलीकडे अस महेश च्या मनात कधीच आलं नाही तो तिला फक्त खूप चांगली मैत्रीण मानायचा.

महेश च्या घरी त्याची  आई, भाऊ आणि महेश असे तिघेच होते मोठ्या बहिणीच लग्न होऊन दोन मुलं होती तिला. महेश २२ वर्षांचा असतानाच वडील गेले. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. काम आणि पगार चांगला होता आणि राजकारणात रुची असल्यामुळे महेश सतत कुठल्या ना कुठल्या कर्यक्रमात व्यस्त असायचा त्यामुळे फार वेळ त्याला घरात देता येत नव्हता रादर तो जास्त घरात थांबतच नव्हता. त्याची आई या सगळ्याला खूप वैतागली होती. रोज उशिरा येणं, कार्यक्रम जोरदार झाला की पार्टी करणं थोडी दारू घेणं (थोडी म्हणजे आता समजूनच जावा. ????????)

पण त्या लग्न सोहळ्यातून आल्यापासून महेश घरातच होता जवळ जवळ महिना झाला महेश जास्त कुठे जात नव्हता कुठला राजकारणाचा कार्यक्रम जरी असला तरी सगळं लवकर आटपून घरी यायचा जास्तीत जास्त वेळ घरातल्या माणसांसोबत अर्थातच आई आणि भावासोबत घालवत होता.कारण तो शीतल च्या शोधत होता. चांगल्या ठिकाणी कामाला असल्यामुळे मोबाईल फोन पण होता त्याच्याकडे त्यामुळे जमेल तसं तो शीतल ची माहिती मिळते का ते बघत होता.

तिकडे शीतल च्या आत्याबाईंनी महेश ची आणि त्याच्या घरची सगळी माहिती काढली होती आणि त्यांच्या भटजी च्या मार्फत शीतल चा फोटो महेश च्या घरी पाठवला होता.पण महेश फोटो बघून घ्यायला काही तयार च नाही कारण त्याचा नजरेसमोर शीतल च ते सुंदर रूप च येत होतं म्हणून महेशने घरात सांगून टाकल "लग्न करेन तर माझ्या आवडीच्या मुलीशीच"???? एवढं बोलून तो निघून गेला.

हा सगळा प्रकार भटजींच्या डोळ्या देखत झाला म्हणून त्यांनी मुलाचा नकार असावा असं समजून शीतल च्या घरी सांगितलं.

शीतलने हे सगळं दारामागून ऐकलं आणि तिने भटजींना  घराबाहेर थांबवून त्यांनी फोटो बघून स्वतः नकार दिला का?? अस विचारलं असता भटजींनी सांगितलं

"त्या मुलाने तर फोटो पहिलाच नाही...... काय तर म्हणे मी माझ्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेन" भटजींच्या या उत्तरावर शीतल हसू लागली,तस भटजींनी तिला विचारलं.

"काय झालं......तुम्ही का हसता आहात!!"भटजी

अहो......जर त्यांनी फोटोच नाही बघितला तर तुम्ही नकार दिला अस का बरं सांगितलं" शीतल.

भटजी थोडा विचार करतात आणि........आता काय करायचं म्हणून विचारतात.

"महेश चा नंबर आहे का?" शीतल

"हो आहे" भटजी

"बरं..... मग द्या मला" शीतल

"अहो पण लग्ना आधी अस बोलणं बर दिसत नाही"भटजी

"मी काही फार बोलणार नाही आहे फक्त त्यांच्या कडे असणारा माझा फोटो बघायला सांगणार आहे बस्सस.........."शीतल

"बरं........."भटजी

शीतल घरातल्या लँडलाईन वरून च महेश ला फोन लावते फोन महेश च्या हातात असल्यामुळे तो पहिल्या रिंग ला च फोन उचलतो.

"हॅलो.........."शीतल

"हॅलो......."महेश

"महेश आहेत का??"शीतल

"हो बोलतोय......आपण कोण?"महेश

"मी शीतल देशमुख लग्नासाठी तुम्हाला माझं स्थळ गेलं आणि तुम्ही नकार दिला अस समजलं म्हणून तुम्हाला फोन केला......म्हंटल नकार देण्यामागच कारण तरी विचारू"शीतल

"हे बघा माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच "महेश

"बरं.......पण तुम्ही आता स्थळ आलं त्यातला त्या मुलीचा फोटो न बघताच नकार दिलात अस समजलं म्हणून फोन केला"शीतल

"हो कारण मला तुमच्याशी लग्न नाही करायचं.....मी लग्न करेन तर माझ्या आवडीच्या मुलीशीच करेन"महेश

"ठीक आहे......पण तरी तुम्ही एकदा घरी असलेला फोटो बघावा अस मला वाटते कारण फोटो बघून तुमचा नक्की च होकार असेल......माझी खात्री आहे"शीतल

"अहो पण मला नाही करायचं लग्न तुमच्याशी मग मी का बघू तुमचा फोटो" महेश (जरा चिडतच बोलतो)

"एकदा बघाच फोटो आणि मग या नंबर वर फोन करून कळवा......मी वाट बघते तुमच्या फोन ची" शीतल (एवढं बोलून शीतल फोन कट करते)

"काय मूर्ख मुलगी आहे.....मी नाही म्हणतोय तरी काय तर म्हणे फोटो बघा होकार द्याल........(महेश स्वतःशीच बडबड करत बसतो )

(पुढे काय होईल महेश फोटो बघेल का आणि बघून काय रिऍक्ट होईल हे वाचण्यासाठी मला फॉलो करा)

क्रमशः

सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे....


🎭 Series Post

View all