अस्तित्व भाग १२

श्रावणी लोखंडे

अस्तित्व भाग १२



(आजोबांना अर्धांगवायू चा झटका आल्याने ते अंथरुणालाचं खिळून असतात.आजींच्या सगळा वेळ आजोबांचं सगळं करण्यातच जातो.आजींचा त्रास कमी व्हावा म्हणून शीतल त्यांच्या हाताखाली एक बाई ठेवते.

अशातच पाच वर्षे होतात.आणि महेश पुन्हा शीतल ला भेटायला जातो. तिला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात येणासाठी तिची मनधरणी करायला जातो.)आता पुढे



स्वरा शाळेत जायला लागते.शीतल तिला चांगल्या मोठ्या शाळेत घालते.महेश ला पण स्वरा चा लळा लागलेला असतो.तो रोज स्वरा ला शाळेत भेटायला जात होता. स्वराचं आणि महेशचं नातं पण चांगलं घट्ट होत होतं. शीतल ला हे सगळं माहीत असत पण ती दुर्लक्ष करते.अशातच महेश ची आई काहीशा कारणांनी कालवश होते.महेश आणि त्याचा भाऊ दोघेच घरात असतात पण अचानक आई च्या जाण्याने ते घर त्या दोघांनाही खायला उठते, म्हणून महेश राहत घर भाड्याने देऊन त्यांच्या दुसऱ्या मोठ्या खोलीवर राहायला जायचा निर्णय घेतात. नवीन घर खूप मोठं असते.महेशने ते घर त्याच्या सेविंग मधून घेऊन ठेवलं होतं अजूनही चार हफ्ते बाकी होते त्या घराचे.महेश चा भाऊ कमावता झाला होता.त्याच्या बहिणीने तिच्या नात्यातली मुलगी बघितली होती.लता नाव होतं तीच. गरिब घरची होती. खायचे पण हाल होते.हातावरचं पोट होत. आई वडील रोज कुठे मोलमजुरी करून येत असत तेंव्हा त्यांच्या घरात चूल पेटत होती. लता पण बालवाडीच्या मुलांना जेवण करून द्यायची.तो महिन्याचा पगार भेटला की घरातला निम्मा खर्च भरून निघत होता. लता च्या आईवडिलांना लताच्या लग्नाची फार काळजी होती.दिसायला बरी होती पण फटकळ होती.तिघेच असल्यामुळे तिला एकटं राहायची सवय होती.बालवाडीत जेवण करायचं,भांडी घासायची आणि मग दिवसभर घरातचं त्यामुळे तिला जास्त माणसं पण आवडत नव्हती.

बघण्याचा कार्यक्रम होतो.मुला मुलीची पसंती होते. मोठा भाऊ या नात्याने महेश तिच्या हातात मिठाईचा पुडा देऊन होकार दर्शवतो.भावाची होणारी बायको म्हणून महेश लता व तिच्या आईवडिलांसाठी चांगल्या भेटवस्तू आणि घरात उपयोगी पडेल असे काही सामान घेऊन जातो.लग्न मंदिरात अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच माणसांमध्ये पार पडते.नवीन सून घरात येते.नव्याचे नऊ दिवस नवी नवरी चांगली वागते पण नंतर ती महेशला घरातून काढू पाहत होती.महेश राजकारणात असल्यामुळे ही गोष्ट पटकन त्याच्या लक्षात आली.महेश ने तिला एकदा विचारले.

"तुला काय हवं आहे......."महेश

"म्हणजे!!"लता

"हे बघ लता.....मी राजकारणात आहे त्यामुळे तुझं जे काही चाललंय ना ते सगळं समजतंय मला.तुला मी नको असेन या घरात तर तसं स्पष्ट सांग......भांडी आपटण्याची, माझ्या जेवणात कधी मीठ तर कधी मसाला टाकायची नाटकं करू नको."महेश

"मी अस का करेन....."लता 

"ते तुलाच माहीत,पण मी शेवटचं सांगतोय आणि विचारतोय सुद्धा  ......"महेश

लता काही बोलतच नाही ती गप्प आतमध्ये निघून जाते.लताच्या कपाळावरच्या आठ्या महेश च्या नजरेतून सुटत नाहीत पण महेश लक्ष देत नाही, तो तयार होतो आणि शाळेत जातो स्वराच्या शाळेची वेळ होणार असते.

शीतल स्वराला शाळेत सोडायला येते स्वरा महेश ला भेटते आणि शाळेत जाते.स्वराला पण महेश ची सवय झालेली असते.एक दिवस जरी महेश तिला भेटायला नाही आला की स्वरा रुसून बसायची.मग तिला फुगे घेऊन दे,चॉकलेट दे,कुठे खेळणी घेऊन दे अस करून बाईसाहेबांचा राग घालवायचा. अशातच स्वरा च्या शाळेत पालक सभा असते. आई वडील दोघेही हवे असतात पण शीतल एकटीच त्या मिटिंग ला जाते आणि शाळेच्या बाहेर महेश ला बघते. महेश पण स्वरा चा हात पकडून शाळेत जात होता तेवढ्यात शीतल त्याला हटकते.पण तरी महेश बाप म्हणून मिटिंग ला उपस्थिती दर्शवतो. शाळा सुटल्यावर शीतल महेशला बोलते.

"हे बघा.....तुम्ही स्वरा सोबत नातं जोडू पाहताय हे समजतंय मला पण ती हट्ट करते हल्ली की तुम्ही पण सोबत पाहिजे असं"शीतल

"मग काय चुकीचं आहे त्यात....तिला वडिलांची गरज आहे आणि ती लहान आहे तिच्या शाळेत पण आई वडील दोघेही आपल्या मुलांना सोडायला येतात तिला पण वाटत असेल ना तिच्या वडिलांनी पण तिच्या सोबत वेळ घालवावा........"महेश

" हे बघा वाटण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. मला माहिती आहे स्वराला पण तुमची सवय झाली आहे ते पण मला पुन्हा तुमच्या सोबत नाही राहता येणार.मी तेंव्हा पण हेच बोलले होते आणि आज पुन्हा तेच सांगेन आणि यापुढेही माझं उत्तर हे "नाही"च असणार आहे त्यामुळे परत परत तेच प्रश्न विचारू नका.मी माझ्या आयुष्यात खूप खुश आणि समाधानी आहे मला नसत्या नात्यात गुंतायचंच नाही"शीतल

" ठीक आहे....... पण......जाऊदे काय बोलू आता...माझ्या कर्माची फळं भोगतो....."महेश

(एवढंच बोलून महेश निघून जातो आणि आता तो कायमची आशा सोडून जातो की शीतल पुनःहा त्याची होईल)

 स्वरा हट्ट करून महेश सोबतच परस्पर फिरायला गेली असते शीतल पण मग तिच्या हट्टापुढे तयार होते आणि स्वरा ला महेश सोबत पाठवते.

शीतल घरी येते आजी आजोबांना पेज भरवत असतात.आजोबा शेवटचा चमचा शीतलच्या हातून खायचा आहे अस खुणेने सांगतात.शीतल त्यांना भरवते आणि गरम पाणी संपलं म्हणून जग घेऊन आतमध्ये जाते तोपर्यंतच आजोबांची प्राणज्योत मालवलेली असते.आजी शीतल ला सांगतात डॉक्टरांना बोलवायला पण आजोबा कायम साठी सोडून गेल्याच शीतल आजींना सांगते. शितलला वाटते आता आजी ना सांभाळणं शक्य नाही त्या बिथरतील पण.......पण आजी सुद्धा आजोबांच्या सोबतच गेल्या होत्या. शेवट पर्यंत दोघांनी एकमेकांची साथ सोडली नव्हती.

शीतल बाहेर गावी असणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या गेल्याची बातमी कळवते.दोघे ही आपल्या बायका पोरांसोबत येतात आजीआजोबांच्या देहाला अग्नी देतात आणि रात्री टेरेस वर दारूची पार्टी करत असतात.शीतल ला तर घरातील कामवाली असल्यासारखं वागवतात दारूची ग्लास भरण्यापासून ते अगदी चाकणा बनवून देण्यापर्यंत.एव्हाना रात्रीचे अडीच वाजलेले असतात. आजींच्या मुलांची पार्टी उरकलेली असते.दुसऱ्या दिवशी पहाटे शीतल आजीआजोबांच्या अस्थीकलशा जवळ दिवा लावते. एवढ्यात आजींची थोरली सून येऊन त्या दिव्याला लाथाडते आणि निघून जाते.संध्याकाळच्या चहानंतर वकिलसाहेब येणार असतात.आजोबांच्या मृत्यूपत्राच वाचन करण्यासाठी दोघे ही खूप खुश असतात.कारण गेली कित्येक वर्षे दोघेहि राहत घर बिल्डर ला देण्यासाठी आजोबांच्या पाठी लागले होते पण आजोबा तयार नव्हते. आजोबांच्या जाण्याने त्यांना रान मोकळच झालं होतं जणूं.

वकिल येतात दोन्ही मुलं त्यांच्या सुना तिथेच बसलेल्या असतात.मोठ्या मुलाला तर धीरच नसतो कारण आजीआजोबांची संपत्ती खूप असते.

शीतल चहा टेबल वर ठेऊन जातचं असते की...... वकील तिला थांबवून घेतात.

( वकील शीतल ला का?? आणि कशासाठी थांबवून घेतात??हे वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे जरूर कळवा.)

क्रमशः



(सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.)

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......


🎭 Series Post

View all