अस्तित्व भाग १०

श्रावणी लोखंडे


(काही दिवसांनी शितलला तीच लहान मुलगी रोड वर भीक मागताना दिसते. शीतल तशीच माघारी फिरते आणि आजोबांना सांगते तसे आजोबा शीतल सोबत त्या जागी जातात आणि त्या मुलीला जवळ घेऊन सगळ्या गोष्टीं नीट विचारून घेतात तेंव्हा त्यांना फक्त एवढंच कळत की तिची मामी तिला चार दिवसांपूर्वी इथे सोडून गेली आणि लगेच येते बोलली पण ती अजून आलीच नाही. इतके दिवस कोणी कधी काही दिल तर ते खात होती अस तिने आजोबा आणि शीतल ला सांगितलं आजोबा पुन्हा तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात.)आता पुढे



पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर आजोबा त्या मुलीच्या मामा मामी विषयी चौकशी करतात आणि त्यांना पुढील अर्ध्या तासात चौकीवर हजर होण्यासाठी दरडावतात.

मामा मामी दोघेही पोलीस स्टेशनला येतात. समोर त्यांच्या भाचीला पाहून त्यांना चांगलाच घाम फुटतो.पोलीस जेंव्हा त्यांना प्रश्न विचारतात तेंव्हा मामी ची तर त..त..प..प.. होते.मग शीतल त्या मुलीला जवळ घेऊन तीच नाव वैगरे विचारते पण तिला बोलता येत नसतं कारण ती मुकी असते.

पोलिसांच्या भीतीने तिचा मामा च बोलायची सुरवात करतो.

"किशोर ची म्हणजे च त्या मुलीच्या वडिलांची इस्टेट खूप होती पण सुलेखा ही अपंग होती आणि मानसी त्यांची एकुलती एक मुलगी ती पण मुकी असल्यामुळे तो फार चिंतेत असायचा.एक दिवस किशोर ने त्यांच्या मेहुण्याला सांगितलं की तो त्याच्या बायको मुलीला घेऊन पुण्यातील चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि दोघींचा पण इलाज करून घेईल.मामा यासाठी तयार झाला आणि मित्राची गाडी ठरवली, त्यांना पुण्याला जाण्यासाठी. किशोरला कॅन्सर असतो आणि लास्ट स्टेज ला असतो म्हणून तो त्यांची इस्टेट बायको च्या नावावर करतो आणि बायकोला वारसदार म्हणून मला ठेवतो." मानसी च मामा

"नवरा वारसदार आहे म्हंटल्यावर मला प्रॉपर्टी आणि पैशाचा मोह आवरता आला नाही आणि मी त्या तिघांनाही मारण्याचा कट केला आणि त्या कटात यांना सुद्धा सामील केलं. ज्या गाडीने ते जाणार असतात त्याचे ब्रेक फेल करायला सांगीतले..... त्यांचा अपघात तर होतो पण या दोघी वाचतात आणि हिचे वडील त्या अपघातात जातात."मानसी ची मामी

"नवऱ्याचे कार्यविधी आटोपल्यावर सुलेखा मुलीला घेऊन माझ्याकडे येते कारण तीच माझ्याशिवाय दुसरं कोण नसत आणि मी मात्र पंधरा दिवस फक्त तिला ठेऊन घेतो आणि गोड गोड बोलून तिच्याकडून सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतो.माझ्या ओळखीचा वकील आहे त्यालाच थोडी जास्तीची रक्कम देऊन मी हे सगळं घडवून आणल." मानसी चा मामा

"मी पण तिला मोलकरणीसारख वागवलं आणि जश्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री आमच्या नावावर झाल्या त्याच रात्री आम्ही नवरा बायकोनी मिळून मायलेकिना घरातून हाकलून दिल.आणि त्याच रात्री एक गाडी सुलेखा ला इथे पंधरा मिनिटांच्या अंतरावरच उडवते."मानसी ची मामी

"तुम्हाला कस माहीत पंधरा मिनिटांच्या अंतरावर उडवते."पोलीस विचारतात

"त्यांना घरातून बाहेर काढलं. सुलेखा हात जोडत होती विनवणी करत होती पण आम्ही दार लावून घेतलं. थोड्यावेळाने बघितलं तर त्या दोघी दाराबाहेर नव्हत्या म्हणून आम्ही पंधरा मिनिटाच्या अंतरावर एक आईस्क्रीम वाला आहे तिथे गेलो आईस्क्रीम खायला.तिथेच आडवळणावरून सुलेखा आणि मानसी जातांना दिसल्या, तेवढ्यात मागून भरधाव ट्रक येतोआणि सुलेखा ला  उडवतो. ट्रक वाला सुलेखाला उचलून बाजूच्या फुटपाथ वर आणून ठेवतो आणि तिथून निघून जातो......"मानसी ची मामी

तिच्या बोलण्याचा शीतल ला खूप राग येतो आणि शीतल तिच्या सणसणीत कानशिलात आवाज काढते........आणि मानसी ला घेऊन पोलिस स्टेशन मधून बाहेर पडते.

आजोबा आर्मी रिटायर असतात त्यामुळे त्यांना पण बरेच कायदे माहीत असतात त्यात फसवणुकीच्या कायद्यांतर्गत त्या दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करतात.

आजोबा आणि शीतल मानसी ला घेऊन घरी जातात आणि आजी ला सगळी हकीगत सांगतात.

मामा मामी वर खटला चालू होतो, पण ही केस जास्त वाढू द्यायची नसते कारण आजीआजोबांचं कोर्टाच्या फेऱ्या मारण्याएवढं वय नसत म्हणून सुलेखा ची सगळी इस्टेट मानसीच्या नावावर करा आम्ही केस मागे घेतो अस आजोबा सांगतात...... तसं मग मानसीचा मामा फसवून घेतलेली सगळी इस्टेट मानसी च्या नावावर करतो आणि ही केस आजोबा संपवतात.आजोबा मानसीच्या इस्टेटीची कागदपत्रे आजी कामाला होत्या त्या बँक मध्ये मानसी च्या नावे जमा करतात आणि जो पर्यंत मानसी जाणती होत नाही तोपर्यंत ती कागदपत्रे कोणी फसवणूक करून आपल्या नावावर करू शकत नाही अश्या पद्धतीत जमा करतात आणि तिला वारसदार शीतल ला ठेवतात.

शीतल च काम जोमात चालू असतं आणि तिला तिच्या कामातून पुरेसा मोबदला मिळत असतो. त्यातूनच ती मानसी ला पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते आणि तिचं ऑपरेशन करून तिला तिचा आवाज पुन्हा मिळवून देते. कारण काही कारणांमुळे ती बोलू शकत नव्हती अस डॉक्टरांच म्हणण होत तिची सगळी ट्रीटमेंट शीतल स्वखर्चाने करते आणि फक्त हसून हातवारे करून आपल्या भावना व्यक्त करणारी मानसी बोलायला लागते. तिच्या मधुर अश्या आवाजाने घर अगदी नंदनवन भासू लागते.

तिची जन्मतारीख आणि शितलच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो म्हणून शीतल थोडी उदास असते, कारण महेश तिच्याशी खूप क्रूरतेने वागला होता तिची कूस त्याच्यामुळे भरली होती आणि तोच त्या बाळाचा यमसूद बनला होता.शीतल डोळ्यातलं पाणी पुसते आणि मानसी च्या वाढदिवसाची तयारी करते.आजीआजोबा आणि शीतल तिघे मिळून बंगला मस्त असा सजवतात.शीतल केक घरीच बनवते.मानसी च्या आवडत्या फ्लेवर चा..... आजीआजोबा त्यांच्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाचा आमंत्रण देतात आणि शीतल पण तिच्या काही निवडक स्टुडेंटस ना बोलावते. घरीच मुलांच्या आवडीचा असा बेत करते. सगळे मिळून छान पैकी केक कापतात......मानसी परी राणी च्या फ्रॉक मध्ये अगदी खुलून दिसत होती.वाढदिवस अगदी जोशात साजरा होतो आणि या सगळ्यात शीतल आणखी एक कार्यक्रम करते तो म्हणजे मानसी च्या नाव बदलण्याचा...... कारण मानसी ने या सगळ्यांच्या आयुष्यात येऊन नवीन सूर भरले होते म्हणून शीतल "मानसी"  च नाव बदलून "स्वरा"असं ठेवते. शीतल च बाळ गेलं म्हणून शीतल फार दुःखी होती पण स्वरा च्या सोबतीत तिला फार बरं वाटत होतं म्हणून ती स्वरा ला तिला "मम्मा" बोलायला सांगते.

आजीआजोबा स्वरा आणि क्लास या सोबत शितलचं आयुष्य मस्त चाललं होतं. स्वरा अगदी दिवसभर मम्मा मम्मा करत शीतल च्या मागे मागे असायची. शीतल तिच्या आयुष्यात खूप खुश होती.

*दोन महिन्यांनंतर*

शीतल बाजारासाठी स्वरा सोबत मार्केट मध्ये जाते तर तिथे महेश उभा असतो.तो शीतल ला एकटक बघत असतो. स्वरा जेमतेम चौदा महिन्याची असेल जेंव्हा त्यांना भेटली होती.शीतल चा हात पकडून तिची आपली बोबडी बडबड चालू होती. महेश ला अस अचानक समोर बघून शीतल जरा घाबरतेच.तिला त्याने केलेला अत्याचार आठवतो आणि तिच्या काळजात धस्सस........होते.

(महेश शीतल ला बघून काय करेल??? हे वाचण्यासाठी मला फॉलो करत रहा.आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे जरूर कळवा.)

क्रमशः

(सदर कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा फॉरवर्ड करताना लेखिकेच्या नावसहित करावी.)

धन्यवाद....

श्रावणी लोखंडे.......




 


🎭 Series Post

View all