Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 2

Read Later
अस्तित्व - एक लढाई भाग 2

 

 

अस्तित्व - एक लढाई भाग 2"रोहन- मला तिच्याशी एकट्याला बोलायच आहे, तर थोडा वेळासाठी तिला बाहेर घेउन जाऊ शकतो का?"


"शाल्मली बाबा- अहो पण......."


"मी आधीच सांगितलं होतं अंजु ताईला ...
माझी ही अट आहे.... घरात नाही बोलू शकणार... काळजी नका करू त्यांना मी सहीसलामत घरी परत आणेल..."


"आई- पण........."


"ही माझी अट आहे...मान्य असेल तरच हे लग्न होऊ शकेल नाही तर नाही..."


"बाबा- ठीक ये..."त्यांचाही नाइलाज झाला...
"पण लवकर या...""जा शाल्मली.."


"मी"

घाबरू नकोस मी काही तुला खाणार नाहीये..."
त्याने ठामपणे सांगितलं...


तिने एकदा घरच्यांनाकडे पाहिलं  तर त्यांनी होकारार्थी मान हलवली..मिहीर तिला बाहेर सोडायला आला..


"जराही हुशारी केलीस ना, तर तो गेला म्हणून समज शाल्मली..."डोळ्यातील पाणी रोखुन ती उभी होती.... रोहन कार घेउन आला.... आणि तिच्यासाठी door open केला....


"बस आत आणि लक्षात ठेव ..."


रोहन कार चालवताना तिच्याकडे बघत होता.....ती आंग चोरून बसली होती...."तुला जॉब करायला आवडेल लग्नानंतर..."


तिने मानेनेच होकार दिला..."तुला काही बोलायच नाही का? माझ्याशी ?"


तिने भरल्या डोळ्यांनीच त्याच्याकडे बघितलं......


"म्हणजे इतका वाईट नाही दिसत  मी??
होणं....?"


"अहो ........"
कसबस ती तितकंच बोलू शकली...


पण त्या एका शब्दातच त्याच्यावर जादू व्हवी अस काहीस झालात...


दोघेही एका कॅफेत आले...


"बस आपण इथं निवांत बोलू शकू म्हणजे तू बोलू शकशील माझ्याशी..."


"काय घेशील??
खाणार काही ..."
तिने नकारार्थी मान हलवली.."कॉफी"

तिने मानेन होकार दिला....


त्याने वेटरला 1 चिकण सॅंडविच अन 2 कॉफी सांगितली...


"बोल .......तू पहिल्यापासूनच अशीच आहेस का??
म्हणजे आधी जेव्हा मी तुला पाहिलं होतं तू खूप बोलकी वाटली होतीस..."

तिने पापण्या वर करून नजरेने कधी म्हणून विचारलं....


"लग्नात बघितलं होत मी तुला .....6-7 महिन्याआधी...
तेव्हा तर बोलत होतीस....माझी भीती वाटते का तुला??"


तिने नाही म्हणून मान हलवली...


"मग घरच्यांनी सांगितले का बोलू नको म्हणून..."


तिने परत नकारार्थी मान हलवली...."शाल्मली एक सांगू ...
माझ्याकडे खूप कमी पेशन्स आहेत, सो तू तोंडाने बोलशील तर बरं होईल तुझा अन माझा दोघनच वेळ वाचेल...."


"बोलशील काsssss??"


तो थोडासा आवाज वाढवून बोलला तशी ती दचकली अन डोळ्यात अश्रू तरळे.....


"सॉरी मला तुला अस घाबरवायच न्हवत...फक्त तू बोलावसं इतकंच वाटलं मला..."


"ते .....तुम्ही....चिकन नका खाऊ.....""का?????"

"काय???"

"काय म्हनालीस तू.....?""आज गुरुवार आहे आज नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे...तिने मान खाली घालून सांगितले..."


त्याला हसूच आलं......


"वेटर...."
त्याने त्याची ऑर्डर कॅन्सल केली...आणि व्हेज मागवलं..."बघ तुझ्यासाठी पाहिल्यानंदा मी नॉनव्हेजला नकार दिला आहे..."


"तुला काय आवडत जेवणात...??? व्हेज की नॉनव्हेज?"


"मी व्हेज खाते फक्त....."


अच्छा  कधीच नाही खाल्लं?????


"नाही ....मला नाही आवडत...""Ok पण मला रोज लागत..."


"हूं......"


त्याला हलकेच हसू आलं....."मी एका MNC कंपनीमध्ये कंट्री हेड आहे...
सो बहुतांशी मी  बाहेरच आसतो.."


शाल्मली खूप हिंमतीने त्याच्याकडे पाहत होती...


"हो म्हणजे महिनातील 15-20 दिवस मी ट्रॅव्हल करतो..
जरी आपलं लग्न झालं तरी मी तुला जास्त वेळ नाही देऊ शकणार...तुला चालेल...?"


तीन हो अन नाही अशी दोनदा मान हलवली...त्याला काही समजलं नाही पण ती खूपच गोड भासली...


"मला जास्त मोठयाने बोलणारे लोक आवडत नाही... धिंगा, मस्ती ही जितक्यात तितकी असेल तर ठीक अतिरेक नाही..."


ती फक्तच त्याला ऐकत होती...


"अस नाही की मी तुला बांधून  ठेवलं घरात...पण माझ्या काही अपेक्षा आहेत...तुला त्या लग्नात बघितलं होत मी बघताच क्षणी आवडली होतीस तू..."


शाल्मलीने मान खाली घालून घेतली.. त्याला वाटलं ती लाजली...


"पण नंतर मला कामासाठी जर्मनीला 6 महिने जावं लागलं.....मग लग्न मागे राहील....मला तू पसंत आहेस....शाल्मली....तुझा निर्णय घेण्याअगोदर माझ्याबद्दल काही सांगू इच्छितो....""मी सतत बाहेर असतो...ड्रिंक, स्मोकच्या सवयी मला आहेत.......अस नाही की रोजच बाटली घेऊन बसतो पण घेतो पार्टीत etc, आमच्याकडे हे नॉर्मल आहे..सो तुला याची सवय करून घ्याला हवी.....आणि बरेच वर्ष परदेशी असल्याने मला नॉनव्हेज जास्त लागत...
आता हे तुझ्यावर आहे की तू कस मॅनेज करशील... तुला सगळं शिकून घायव् लागेल....."


शाल्मलीने होकारार्थी मान हलवली..."मला जॉब करणारी बायको नको आहे......म्हणजे माझी salary ठीक ठाक आहे...तस financial burdern नाहीये काही...तुला घरी बसून कंटाळा आला तर बघू काहीतरी  पण घर संभाळून... तिथं हेळसांड नको...मी घरी आलो की मला माझी बायकोसमोर हवी...
माझं एक row house आहे......जिथं मी एकटाच राहतो..."

तिने त्याच्याकडे बघितलं ....


हो....म्हणजे गुड्डू ... श्रावणी माझी बहीण ....
हॉस्टेलला राहते तिला  फ्रीडम हवा आहे म्हणून..... आई बाबा गावी राहतात........ घरापासून एक दीड तासाच्या अंतरावर गाव आहे आमचं...... कधी मधी येत असतात इकडं...थोडे जुन्या विचारांचे आहेत म्हणू शकतेस त्यांना तस....."
"मला अशी बायको पाहिजे जी माझी असेल फ़क्त...
तिच्या मणीध्यानी पण दुसरं कोणी नको....
तिने फक्त माझं बनून राहावं...माझ्यासाठी सजवा...तिची दिवसाची सुरुवात माझ्यापासून आणि रात्र ही माझ्याजवळच वाहवी....
तुला कधीच काही कमी पडणार नाही याची पूर्ण खात्री बाळग...."


"तुला कोणत्या गोष्टीची गरज लागण्याच्या आगोदरच ती तुझ्याकडे असेल...ती एखादी वस्तू असू देत किंवा परदेश वारी किंवा काहीही.... सगळं असेल तुझ्याजवळ पण तू माझी हवी आहेस फक्त तुझ्यावर फक्तच माझा अधिकार असेल..."


रोहनच बोलणं एकूणच शाल्मलीच्या छातीत धस्स झालं.... ह्यांना जर माझा भूतकाळ कधी समजला तर हे मला कधी माफ नाही करू शकणार....
त्या दिवसाचा विचार करूनच तिला धडकी भरली...तो जे मागत आहे ते चुकीचं नाही...
आपल्या बायकोच्या मनात आपल्याशिवाय दुसरं कोणता नवरा कसा सहन करू शकेल...


"तू मागे लग्नात तुझ्या मैत्रिणीला बोलताना मी एकल होत तुझ्या आयुष्यात कोणीच नाही...मला अशीच मुलगी हवी होती...
मला चुकीचं नको समजूस पण आपली जीवनसंगिनी आपलीच असावी ह्या चुकीचं अस काही नाही  ना???
मी आजवर कधीही कोणाच्या प्रेमात पडलो नाही... तितका वेळही न्हवता अणी मला इंटरेस्ट ही ...
फॉरेनमध्ये किंवा आपल्या इथंही असे खूप जण मी पाहिले आहेत जे... प्रेम एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबत करतात पण ह्यात सगळ्याची फसवणूक होते.......मला ते नको होतं... तुझं काहीही नाही हे एकूनच मला हायस वाटलं होतं....


शाल्मली फक्तच त्याला ऐकत होती...... सुन्न झालात तीच मन आणि शरीर...

मागच्या 6 महिन्यात तीच आयुष्याच बदलून गेले होते......तेव्हा खरचच कोणी न्हवत पण आता ...
रोहनच्या तापट स्वभावाचा अंदाज तर तिला आधीही देण्यात आला होता...... पण आता बोलण्यात ही तो किती बायकोसाठी किती पोस्सेसिव्ह आहे हे तिला समजलं होत...


तितक्या कॉफी आणि त्याच सॅंडविच आलं.....

"तुला काही बोलायच नाहीये का शाल्मली...?""मी काय बोलू?"
म्हणजे काही सुचत नाहीये..."तुला महितेय तू पहिली मुलगी आहेस जीच्याजवळ मी इतका बोललो आहे....तू बाहेर कोणाला बोलशील तर तुझ्यावर विश्वास ही ठेवणार नाहीत...तुला मी आवडलो ना???की तुझ्या आयुष्यात कोणी आहे???"


"अहो..........."


"तुझं हे "" अहो "" मला फार आवडल..!!!
मी आवडलो ना.........???"


"हो....!!!!"
मनाचा हिय्या करून तिने त्याला होकार दिला...तिच्या मनाला किती अगणित वेदाना होत होत्या तिच्या अंतर्मनालाच ठाऊक होत्या...


"Really ...!!!
मी खूप खूष आहे...
तुला सांगू ही शकत नाही....."


शाल्मली ही कसणूक हसली....
थोडीशी कॉफी तिच्या ओठाला लागली होती.


"ते तुझ्या ओठाला काही लागलं आहे."


तिला वाटलं जखम उघडी पडली की काय म्हणून ती प्रयत्न करत होती पण तिला ते पुसता आला नाही..


रोहनने स्वतःच्या आंगठ्याने ती पुसली .... "निघाल.!!"


"तू इतक पॅनिक नको होऊस..."


"निघायचं..."


"हो...."


"तू चल पुढे मी बिल  देऊन आलो...."


बाहेर पडताना पण तिच्या मनात असंख्य प्रश्नानांनी काहूर माजवला होता....


तितक्याच ती कोणाला तरी धडकली.......
आधीच मारामूळ तीच आंग ठणकत होत, त्यात एका पुरुषाच्या धक्क्याने तिला आणखीच दुखू लागल......


रोहन मागून येत होता..


तो माणूस तिला सॉरी म्हणतच होता तितक्यात रोहनने त्याची कॉलर पकडली आणि तिला का धडकला याचा जाब विचारू लागला..."अहो  सोडा त्यांना...
माझी ही चूक होती....प्लिज...."


"नाही हे लोक मुद्दाम मुलींना धक्का मारतात.."


"अहो रोहन प्लिज माझ्यासाठी सोडा त्यांना..."


रागामुळे त्याच्या कपाळावरची नस  ताठली होती.......


त्याने तसच त्या माणसाला सोडलं तसा तो खाली पडला...


शाल्मली अजूनही भितीने कापत होती...तिला बघुनच त्यान स्वताला शांत केलं...


"तू का घाबरत आहेस...??शाल्मली...""तुम्ही का मारामारी करत होता.?
मला नाही आवडत ...
प्लिज अस नका करु ना प्लिज...."


"ओक ओक नाही करत...तू रडू नकोस तुझा लावलेला मेकअप निघून चालला आहे....त्याने वातावरण हलकं करण्यासाठी बोलला..."


"अहो प्लिज ना...."


"हो ना बाबा ....समजलं..."


"चल " गाडीत ही ती शांतच होती...त्याने एका शॉपजवळ गाडी थांबली आणि बाहेर गेला...


"हे घे.."


"काय आहे...""चॉकलेट्स आहेत...
माझ्यामुळे तू रडलीस ना म्हणून कंपनसेट..."


"अहो नको मला प्लिज..."


"घे नाही तर ओरडेल मी तुला...
हे बघ शाल्मली.... मी कधीच कोणाला इतकं पम्पर नाही करत....स्वभाव नाहीये तो माझा..... पण तुझ्या बाबतीत मी बदलतोय.... मला तुला ओरडून बोलायला नाही आवडनार... समजुन घे मी जर काही देत असेल किंवा मागत असेल तर त्याला मनाइ करू नकोस...
समजलं?"


"येस"


"Now smile...."


"घरी जाऊन सगळ्यांना हे सांगायचं आहे ना?"


तो कार चालवतच तिला बोलत होता...


"शाल्मली..."


"हा...."


"सगळे असल्यावर तू मला अहो म्हणू शकतेस पण आपण दोघे जेव्हा  बेडरूममध्ये असू तेव्हा रोहनच म्हण...
छान वाटत तुझ्या तोंडून रोहन ऐकायला...
पहिल्यांदा स्वतःच नाव मला आवडू लागलं आहे..."


"बररर"


घरी आल्यावर रोहनने सगळयांना त्याचा निर्णय सांगितलला...शाल्मलीच्या आई वडीलांना सुटकेचा सुस्कारा सोडला.....


अंजलीने जास्तीचा पुढाकार घेवून 15 दिवसानंतरची तारीख धरायला लावली.........

शाल्मलीला हळदी कुंकू लावून ओटी भरण्यात आली...
रोहनलाही टिळा लावण्यात आला....
दोघानी मिळून सगळ्यांना नमस्कार केला...

निघताना रोहनने  गुड्डूला तिचा नंबर मागायला लावला..


"गुड्डू- वहिनी तुमचा नंबर द्याना...""ते माझा....."


"अंजली- आग गुड्डू त्यांचा मोबाइल बंद  फुटला आहे...माझा आहे ना त्यावर कर वाटलं तर कॉल..."


"ठीक ये..."निघताना गुड्डू शाल्मलीच्या गळयात पडुन गेली..... तिलाही खूप भरून आलं.......गेल्या काही दिवसात तिला कोणी नीट विचाराल ही न्हवत....


तिनेही हसून तीला बाय म्हणल...


रोहन जाता-जाता पण तिलाच बघत होता..


"चल दादा किती बघशील...."


"चल वेडी मी तिला नाही गार्डन बघत होतो.."


"मला माहिती आहे.....मला नकोस उल्लू बनवू..... पहिल्यादा कोणाला तरी बघुन तुझी विकेट गेली आहे.."

केसातून हात फिरवत तो निघून गेला...
शाल्मली रूममध्ये येऊन बसली... रोहन जे काही बोलला त्याचा विचार करत...

क्रमशः

 

आजचा पार्ट कसा वाटला कॉमेंट करून नककी सांगा ...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself