Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 4

Read Later
अस्तित्व - एक लढाई भाग 4


अस्तित्व - एक लढाई भाग 4


लग्न होऊन ते गावाला म्हणजे रोहनचे आई बाबा जिथं राहतात तिकडे आले.


हाताचे ठसे उमटविन्यात आले. ती माप ओलांडून आत येणार तोच, नाव घेण्यासाठी आग्रह करन्यात येत होता. त्याचे चुलते- मालते जवळच राहत होते म्हणुन सतत घरात माणसांचा राबता असायचा.तिने हळू आवाजात बोलायला सुरुवात केली,  गुड्डूने सगळ्याना शांत बसायचा सांगितले, रोहन कान टवकारून ऐकत होता.

"रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा
रोहनरावांचे नावाचा, भरला हिरवा चुडा."


वाह वहिनी!! जबरदस्त!

"आता दादा तू"


"मला नाही येत गुड्डू असलं"


"प्रयत्न तर  कर"

"वेट"


"अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
शाल्मली माझी सर्वांपेक्षा सुंदर."रोहनने नाव घेताच सगळ्याच्या भुवया ऊंचावल्या तस तो जास्त कोणाशी मिक्स होत न्हवता, त्याच काम भलं आणि तो भला.शाल्मलीने एक चोरटा कटाक्ष त्याच्याकडे टाकला. त्यानेही तिला बघितले नजरानजर झाली तस तिने परत मान खाली घातली.


"अपर्णा(रोहनची चुलत वहिनी)- भावजी सुधारणा झाली की ओ तुमच्यात."


"हो रे दादा..आता आमचा डिमांड संपला का मग आता?"

"गुड्डू"


"आई- चला रे झालं असेल तर त्यांना आत येऊ द्या."


"माप ओलांडून कुंकवाच्या पायाने तिने गृहप्रवेश केला."सगळे बसले होते.


रोहन मी चेंज करून आलो, तो उठला तसा तिच्या पदराला ओढ बसली.


"आहो"


"अरे सॉरी"


"काकू - आता तुला बायकोच्या पदराला बांधलं आहे रोहन कुठं जाऊ नाही शकत तू तिच्या परवानगीशिवाय"

त्याने हसून उपरण काढून तिच्याकडे दिले.आईने तिला ही फ्रेश होयला पाठवल.शालू काढून तिने साधीशी साडी घातली आणि बाहेर आले. चहापाणी झाल्यावर, गेम्स खेळले.


रोहन जिंकत होता शाल्मली त्याला घाबरूनच आधीच हार मानत होती.


जेवण झालं दुसऱ्या दिवशी मोजकी लोक  देवदर्शनाला जाणार होते.

आई बाबाना तर इतक्या लांबचा प्रवास करण शक्य न्हवत म्हणून रोहनचा चुलत भाऊ आणि त्याची बायको ह्यांच्यासोबत जाणार होते. दुसऱ्यादिवशी सकाळी ते निघाले. पहिले जेजुरीला गेले प्रथेप्रमाणे रोहनने तिला उचलून घेतलं पण 5 नाही 20-25  पायऱ्या तो चढत होता.


"अहो"


"बोल ना"


"सोडा ना मला खाली"


"का?"


"सगळे बघताते ये."


"तुला नाही आवडलं मी उचलुन घेतलेलं."


"तस नाही पण ....प्लिज...ते भावजी आणि वहिनी सगलेच आहेत..


"बर बाबा."


दोघाना मागे सोडून सगळे पुढे गेले."सोनू""हा""छान दिसतेयस तू"


"Thnk you""काल नवरीच्या वेषेत तू खूपच सुंदर दिसत होतीस, तुझ्यावरून नजर हटतच न्हवती माझी."


ती फक्तच मान खाली घालून चालत होती..


खूप वेगळी आणि भारीवाली waw वाली फीलिंग येत होती. की ही सुंदर मुलगी माझी बायको आहे.
तु ही बोलणं काही तरी..


"मी काय बोलू?\"


"मला माहिती आहे तुला या नवीन वातावरणात स्वताला रूळवायला वेळ लागेल पण सुरुवात करणं ही गरजेचं आहे ना."


"हो... मी करेल प्रयत्न मला फक्त वेळ द्या प्लिज."


"प्लिज काय त्यात तुला पाहिजे तितका वेळ घे,
मला तू खूष हवी आहेस."2सेकंद थांबून ती रोहनला बघत होती, किती तरी दिवसानी कोणी तरी तिच्या आनंदाचा विचार करत होत.

रोहन तिला भरभरून प्रेम देत होता,टीपीकल नवरा न्हवता थोडसा स्ट्रिक्ट पण तिला समजून घेत होता.


"काय झालं , दमलीस का?"


"नाही ...म्हणजे हो..."


"हे घे पाणी"


पाणी पिताना पण ती त्यालाच बघत होती.आपण किती मोठी फसवणूक केली आहे. हे तीच मन तिला खात होत.

"मी जर ह्यांना माझा  भूतकाळ सांगितला तर घेतील का समजून हा विचार ही तिच्या डोक्यात चमकून गेला.


"मला पाहून झालं असेल तर निघुयात."


"हूं...""पण आवडलं मला कोणी तरी माझ्यात हरवलं आहे याचा खूप आनंद आहे मला."


"आहो""तुझ्या ह्या आहो ने च घात केला आहे माझा."


"म्हणजे?"


"इतक्या प्रेमाने म्हणतेस की मी स्वतःला हरवून देतो."


"कधी कधी मी स्वतः पण विचार करतो की मी इतका कस काय बदलून गेलो आहे.
ते जोरु का गुलाम बनू नये म्हणजे झालं."

तो असा चेहरा करून सांगत होता की, शाल्मलीच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आलं."छान दिसतेस हसताना, अशीच राहत जा."


"हम्मम्म्म...
चालायचं ...."


"चला मॅडम सगळे पोहोचले गडावर"


दर्शन घेऊन सगळे  खाली आहे आणि तुळजापूरच्या दिशेने निघाले. दुपारी जेवण करून रोहनने कार चालवायला सुरूवात केली.....

"अपर्णा- शाल्मली तू पुढे बस"


"पण मी वहिनी..."


"गुड्डू- दादा पुढं आहे तर तू मागे काय करतेयस? जा ना..."

अंजलीला त्यांनी आणल न्हवत.


दमल्यामुळे सगळे झोपी गेले, रोहन आणि सोनू दोघेच जागे होते.


"सोनू"


"हा"


"तुला झोप आली असेल तर झोप खूप धावपळ झाली आहे ना तुझी."


"आहो पन मग तुम्ही एकटे..
तुम्हाला बोअर होईल ना..
मला नाही आली झोप...""Ok.."त्यालाही बर वाटल तिला त्याची काळजी आहे म्हणून.1-2 तासाने तिला कंटाळा येऊ लागला.


"अहो...."
थोडं कचरतच तिने त्याला आवाज दिला.


"बोल न..."


"चहा पिऊयात मला झोप येतेय..."


"बर.."


एका हॉटेलमध्ये त्याने गाडी थांबवली, सगळे फ्रेश होऊन आले चहापाणी झालं.


परत अजितने कार घेतली.


"अपर्णा- शाल्मली.."


"हा वहिनी"


"तुला आता तुझ्या तबियतीची जास्त काळजी घायला हवी खूपच बारीक आहेस तू.""हम्मम्म्मम्म.."


"भावजी बायकोकडे लक्ष द्यावे लागेल तुम्हाला"


"हो वहिनी.."


रोहन पुढं बसला होता त्याने आरसा सेट केला होता तिला बघायला.ती खिडकीतून बाहेर बघत होती.रात्री ते मंदिरात पोहोचले दर्शन घेऊनदेवीची ओटी भरून रात्री तिकडेच थांबले आणि दुसऱ्यादिवशी घरी परतले.


तो दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पुजा आणि जागरण गोंधळ होता. रोहन एकुलता एक होता म्हणून घरचे प्रत्येक कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त होते कुठंही कमी ठेवत न्हवते , पूजा झाली.

शाल्मलीच्या घरचेही आले होते, बघायला गेलं तर अंजलीच माहेरचं असल्याने  जास्त अवघडलेपना न्हवता. सगळे उत्साहित होते गुड्डू तर सगळ्या तिच्या मैत्रीणीला तिची वहिनी दाखवण्यात बिजी होती.


शाल्मली कोणाशी बोलू अथवा न बोलू गुड्डूसोबत चांगलं ट्युनिंग जमलं होतं. बाकी मोठयाशी बोलताना ती मोजक आणि संभाळून बोलायाची. घरात जास्त पाहुणे असल्याने रोहन आणि तीच जास्त  बोलन होत न्हवत.


आखी रात्र जागून काढल्यामुले थकून तिने रोहनच्या रूममध्ये झोपून घेतलं, बाकी लोक ही ज्याल जिथं जागा भेटेल तिथं झोपून घेतले.


रोहन बाहेरच आवरत होता गोंधलीना पैसे देण्यासाठी तो रूममध्ये आला तर शाल्मली झोपलेली दिसली. इतक्या दिवसांचा थकवा तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. स्वतःच्या मनाला आवर घालत तो बाहेर निघून आला.
दुपारी ती मांडवपरतनीसाठी जाणार होती."वहिनी"

"हा "

"तुम्ही परत कधी येणार?"


"2-3 दिवसांनी."


"का ग?""इतके दिवस नको ना, मला तर आताच तुला सोडू वाटत नाहीय."


"वेडी आहेस का?मी परत येण्यासाठी चाललेय ना?"


"दादाला विचाराल?"


"कशाचं?""तू जाणार आहेस ते त्याला माहिती आहे का?""आमचं काहीच बोलण नाही झालं ग."


"मी त्याला बोलावते, अन सांगते तू मला उद्या परत पाहिजेस."


"गुड्डू आग ऐक."


"कॉल वर"


"हा गुड्डू..."


"तू तुझ्या बेडरूममध्ये ये...""हम्मम्म आलो"


"तू का केलंस अस.? त्यांना काय बोलू मी...अधिच भीतीने शब्द फुटत नाही त्यांच्यासमोर"


"वहिनी...dont tell..तू दादाला घाबरतेस.."


"हम्मम्म्मम्म तु का केलंस अस..."


"आग पॅनिक नको होऊस मी आहेना."

गुड्डू...बोल.."


"दादा बघ ना"


"काय...?""वहिनी माझं ऐकत नाहीये"


"शाल्मली- गुड्डू"
"का ? सोनू.....?"


"अहो... "


"काय केलं वहिनीने तुझ्या अस...?अन अस काय सांगीतले तू तिला की ती ऐकत नाहीये."


"दादा तिला म्हणल की आज जा आणि उद्या परत ये ती म्हणतेय 2 - 3दिवसानी येते."


"गुड्डू..."


\"कुठं चालीयेस तू शाल्मली.?"


"अहो"

"इतिजातील"


"मला विचारलस का?"


"नाही.."


"मग...?""मला वाटलं तुम्हाला माहिती असेल..\"\"


"हो माहिती आहे पण तुला संगावस वाटलं नाही?""आहो ते...मी..."ती कधीही रडू न देईल अशी तिची अवस्था झाली होती.


"दादा बस खूप  खेचुन... रडेल ती...बघ कसा झालाय चेहरा तीचा."
?
"वहिनी सॉरी ग...दाद्याला सगळं माहिती आहे...
आम्ही तर तुझी खेचत होतो.."


"हम्मम्म्मम्म्म..."तीच मुसमुसन चालूच होत.......


"सोनू ..."


"हा..."

"मी उद्या न्यायला  येईल तुला."


"ठीक ये.."


"ये दादा काय अरे तू...आधीच ती तुला घाबरते..."


"काय?तूच सुरुवात केलीस गुड्डू..."तेवढ्यात..
अंजली- वन्स चला निघायच ना?"


"वहिनी..."


"अरे रोहन भावजी तुम्ही इथ..."


"अंजु ताई 5 मिनिताट पाठवतो तीला चालेल.""हो चाललं की"


"गुड्डू- मी ही येते ताई...दादा तू सांभाळ बाबा आता...""हम्मम्म्मम्म्म....तुला बघतोच मी ..."


"सोनू बॅग भरलीस का तुझी......?"


"हम्मम्म्म..."


"सॉरी..."


\"\"इट्स ok..."


"सोनू आग लगेच कस रडतेस... जस्ट मजाक  होता हा ..गुड्डूने मेसेज करून सांगितलं होतं.."त्याने तिचे ओघालेले अश्रू पुसले.


तो जवळ येतोय हे बघूनच ती भीतीने थरथरत होती.


"माझी इतकी भीती वाटते तुला..?"


"हूं"


"सॉरी...आता अस काही नाही करणार ज्याने तुला भीती वाटेल."


\"\"मी जाऊ का?"


"नको म्हणल तर राहशील का?"


"हम्मम्म्मन"


"यावेळी ठीक ये ...यापुढे नाही पाठवणार..."


"आहो..."


रोहन अजूनच तीला बघून हसत होता.


"चल अंजु ताई परत वर येईल."


ती माहेरी निघून गेली.


आईने भाकर तुकडा टाकून तिला घरात घेतलं.

तिच्या रूममध्ये जाऊन तिने स्वताला कोंडून घेतलं आणि इतके दिवस थांबवलेल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. रडता रडता ती कधी झोपी गेली तिलाही समजलं नाही......संध्याकाळी शंतनु तिला उठवायला आला तेव्हा तिला जाग आली.तिने रात्री अदितीला कॉल केला.


"हॅलो"


"आदू..""आलीस का तू?"


"हो...तू येणं मला भेटायला"


"कशाला?"


"आदू प्लिज ...मला गरज आहे तुझी..."


"ठीक ये येते..."


रात्री जेवन करून ती तिच्या रूममध्ये होती, आदू ही आली तिने पळत जाऊन तिला मिठी मारली.

"तू का वागलिस अस सोनू...?"


"मला माफ कर ग..."


"हम्मम्म्मम्म्म...जाऊ दे..."


"तू ठीक आहेस ना?""हो ठीक ये""सगळे कशे आहेत तिथं?""चांगले आहेत."


"अन तुझा नवरा..?"


"तोही चांगला आहे...थोडा स्ट्रिक्ट आहे पण ठीक ये"


"तो बरा आहे ना? तुझं बोलणं झालं का?"


"हो झालं...ठीक ये हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज दिला आहे पण तो कुठं तरी निघून गेलाय ग कोणाला काहीच माहिती नाही.""रागावला असेल ना ग माझ्यावर?"


"तो कधी रागावताना पाहिलं आहे का तू? तुझ्यावर तर कधीच तो रागावू शकणार नाही. जीव आहेस तू त्याचा."
"नाही ...आता नाही"

"माझी देवाजवळ इतकीच प्रार्थना आहे की, तो जिथं कुठं राहील तिथं सुखरूप  आणि आनंदात राहावं.
त्याला लवकरात  लवकर यातून  बाहेर पडण्याची हिम्मत देव त्याला देवो. आजच हे शेवटचं यापुढं मी त्याच नावही घेणार नाही...पुसून टाकेल त्या सगळ्या आठवणी....अवघड आहे पण  मी हे करेल...
आमच्या दोघनच भलं यातच आहे..."


"जे झालं ते झालं पण सोनू हे नातं टिकवणं खूप अवघड आहे....रोहनला तू जस्टीस देऊ शकशील...तू म्हणतेस तस त्याच पोस्सेसिव्ह होणं ..""त्याला फसवतेय ग मी ...खूप जीव लावतो तो मला माझी आवड जपण्याचा प्रयत्न करतोय....पण मी... मी त्याच्या प्रेमाच्या लायक नाही..."

"मला नाही माहिती आदू...
रोहन जेव्हा ही जवळ येण्याचा प्रयत्न करतात माझे भीतीने हातपाय गळून पडतात."


"तू टेन्शन नको घेऊस, आजवर त्यानेही तुला स्पर्श केला नाहीये."


"हो आदू पण... मला रोहनची खूप भीती वाटते ग,
होईल ना ग सगळं नीट""होईल .. तू तुझे 100%दे या नात्याला आता तुला परतवाट नाहीये.""हम्मम्म्मम्म...
कधी कधी वाटत रोहनला सगळं सांगून टाकावं पण त्यांनी नाही समजून घेतलं तर रोहनला सामोरं जाण्याची भीती वाटते मला, की माझ्या डोळ्यातील खोट त्याला दिसू नये म्हणून...""असा मुर्खपणा कधीच करू नकोस,
कोणताच नवरा हे समजुन घेऊ शकणार नाही.""हम्मम्म्मम्म..."


"तू स्वतःला आणि ह्या नात्याला वेळ दे.""हो..."रोहनचा कॉल येतोय .....


"तू बोल मी येते"


"आदु तू रागावू नकोस..."


"नाही ग सोनू घरी येऊन विचार केला तर तू तितकी चुकीची नाही वाटलीस..."


"थँक्स..."दोघीनी एकमेकींना मिठी मारली.


अन गेली अन तिने परत रोहनला कॉल केला.


"आहो"


"तुला खरच माझी आठवण येत नाही होय ना?"


"आहो... तुम्ही अस का बोलताय?"


"मग पोहोचल्यावर कॉल मेसेज तरी केलंस का?"


"सॉरी ते सगळे होते मग राहून गेलं."


"आता ही कॉल केलता तेव्हा..?"


"माझी फ्रेंड् आली होती अन मोबाईल सायलेंटवर होता."


"ओहहहहहहहह "


"मी उद्या दुपारी पोहोचेल."


"ठीक ये..."


"सोनू..."


"काय?"


"तू नेहमी पंजाबी सुट्स घालायची कि कधी जीन्स वेस्टर्न पण घालयाचीस."


"घालत होते."


"ठीक ये...मग उद्या येताना ते ही सोबत घेशील...नाही तर मग उद्या शॉपिंगला जाऊ"


"पण का?"


"सोनू...."


"हा.."


"हनीमूनला तू साडी घालून पॅरिसला फिरशील का?""पॅरिस?"


"हो आपण तिकडं चलोय.."


"तु म्हणाली होतीस ना कुठही चालेल , मग मला वाटलं ते चांगलं प्लेस आहे.""ठीक ये"


\"तू जेवलीस?"


"हो अन
तुम्ही?"


"नाही अजून माझी भाजी अजून होयची आहे."


"कसली?"


"मटण..."


"??आज तर सोमवार आहे ना?"


"मी सांगितले होते ना मला रोज लागत...ते लग्न आणि देव देव होत म्हणून मी कसबस स्वतला कंट्रोल केलं...आज नाही करू शकत.""बर"


"आहो"


"बोल ना..."


"मी झोपू का?मला झोप येतेय..."


"ठीक ये झोप आज जितकं झोपायचं आहे, तितकं उद्यापासून तुला खूप त्रास देईल."


ती तर आतापासूनच घाबरत होती.


"लाजलीस की काय?"


झोप मला माहिती आहे तुझी या काही दिवसात खूप धावपळ झाली आहे...कर आराम."


"Gn.."

"Gn dear..."

"सोनू.."


"बोला णं..."


"Miss you..."


शाल्मलीने डोळे बंद केले तसेच अश्रू ओघले.


डोक्यात विचारांनी थैमान घातले होते, रोहनला बायकोच प्रेम ती देऊ शकत न्हवती. शरीराने एकवेळसोबत तरी राहील पण मनं जुळली पाहिजे ना? तिला होईल का प्रेम त्याच्यासोबत?


बराच वेळ विचार करत तिला झोप कधी लागली तिलाही नाही समजले.


दुसऱ्या दिवशी.


सकाळीच रोहन आला होता, ती अजूनही  झोपलीच होती...दमली होती म्हणून कोणी उठवलं ही न्हवत.


"शंतनू- अरे भावजी याना"


"सॉरी ते मला  दुपारी एक मीटिंग आहे म्हणून म्हणल लवकर शाल्मलीला घेऊन जावं... आवरलं का तीच....?"


बाबा- रागात आईकड बघत होते आणि इशाऱ्याने ती उठली नाही का विचारत होते.


"अंजली- भावजी ते त्या दमल्या होत्या खुप म्हणून झोपल्यात मी उठवते."


"Its Oky... सॉरी मी लवकर आलो तर तिला सांगितलं नाही."


"आई- चहा घेणार की कॉफी..?"


"कॉफी..."


"अंजु ताई मी उठवू का शाल्मलीला? ते तिचे काही documents पण पाहिजे आहेत तर."


"हो वरती आहे, तिची रुम मी दाखवते."


अंजली त्याला रूमच्या इथं सोडते.


तो पाहिल्यानंदाच तिच्या रूममध्ये आला होता.ती निवांत अशी दोन्ही हात माणेखाली घेऊन झोपली होती, अंगावर कोणताच दागिना न्हवता पण तशीही ती खूप निरागस, लोभस वाटत होती. तो खुप वेळ तिला न्याहाळत होता. मनाला आवर खालन त्यालाही अवघड झालं होतं. शेवटी त्याने मान खाली झुकवुन तिच्या गालावर हलकेच किस केलं.त्याच्या स्पर्शानेच ती झपकन जागी झाली अन सरकुन बसली."अहो..तुम्ही?""हो.......good morning"


"Good morning.."


"तू इतका वेळ झोपतेस?"


"हम्मम्म्मम्म मी खूप दमली होती म्हणून.."


"Ok सॉरी पण आता प्लिज आवरून घेशील ...
मला खूप अर्जेन्ट मीटिंग आहे म्हणून मला जावं लागेल."


"ठीक ये.."


ती अर्ध्या तासात आवरून खाली येते,माहेरची ओटी भरून सगळे तिची पाठवणी करतात.रोहन तिला त्याच्या रो हाऊसमध्ये घेऊन येतो.


"अहो हे..."


"आपलं घर आहे...आवडलं..?"


"छान आहे..."


"आई बाबा अन गुड्डू आहेत आत चल..."दोघेही आत आले, आईनी ओवाळून  त्यांना घरात घेतलं.


रोहनला ऑफिसला जाण गरजेचं होतं म्हणून तो लगेचच गेला.


"वहिनी...चल मी घर दाखवते तुला."


गुड्डू तिला सगळं घर दाखवून आणते...3bhk row हाऊस होत...बाहेर छोटस गार्डन पण जास्त काहीच झाड न्हवती तिथं रोहन जास्त वेळ बाहेरच राहायचा म्हणून घराला वेळच देता येत न्हवत.


"वहिनी ही तुमची बेडरूम."

\"छान प्रशस्थ अशी रूम होती पण सामान अस्थव्यस्त  होत."


"दादा कधीच सुधारत नाही, खूप पसारा असतो ह्याच्या रूममध्ये त्याला आवरायला वेळच नाही भेटत मावशी आहेत इथं जे सफाईला येतात.""आवडलं का ग तुला घर.."


"हो ...पण तू का नाही राहत इथं? तू पण शिफ्ट कर ना मला एकटीला बोअर होईल."


"मला नाही आवडत दादा खूप स्ट्रिक्ट आहे, कोण त्याला रोज रोज तोंड देत बसेल."


"मुझे तो अपनी जिंदगी बोहोत प्यारी है."शाल्मलीला खुदकन हसू आलं..
"हसू नकोस तुला माहिती नाही किती चिडखोर आहे तो कळेलच...पण काळजी नको करुस... मला नाही वाटत तुला रागवेल...तो गेला ना बाहेर मी येत जाईल आपण मज्जा करत जाऊ...


"चाललं तेव्हा तरी येशील ना?"


"हो मग काय?प्रश्न होता का?चल खाली जाऊ."


तिने आईकड जाऊन त्यांना विचारून किचनचा ताबा घेतला...आजच जेवण ती बनवणार होती तस तर तिला सगळच येत होतं पण व्हेज फक्त हे रोहन सोडलं तर कोणालाच माहिती न्हवत.


स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून चौघे जण जेवले.


"आई- शाल्मली "


"हा आई.."


"मीही तुला सोनूच म्हणत जाईल...बर सोप्प पडत आपलं म्हणायला."

"चालेल.."


"आम्ही निघतो आता.""का?माझं काही चुकलं का?""बाबा - अरे बेटा  घरी शेतात खूप काम आहेत अन उद्या रात्री तुम्ही ही चाललात ना?"


"पण बाबा थांबणं मी एकटी"


"आग वहिनी दादा येईल न संध्याकाळीपर्यंत.."


"तू तरी थांब...""नको आईला थोडी मदत करते, घरी खूप पसारा आहे ग..."


"मग मीही येऊ का?"

रोहनसोबत एकट राहायचं या विचाराने तिला घाम फुटला होता.


"वेडी आहेस का?"


"तू आणि दादा निवांतपणे राह, तशीही आज तुमची पहिली रात्र आहे, आम्ही डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला.."तिघेही निघून गेले.


एवढ्या मोठया घरात ती एकटीच होती तशी भीत्री न्हवती पण सगळं नवख..


पहिली रात्र नकोच ती विषय.क्रमशःपार्ट कसा वाटला नक्की सांगा......
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself