Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व -एक लढाई भाग 5

Read Later
अस्तित्व -एक लढाई भाग 5


अस्तित्व - एक लढाई भाग-5


नुसतं बसून राहण्यापेक्षा तिने घर सफाईला घेतलं.खूप दिवस कोणी राहत न्हवत म्हणून खूप खराब झालं होतं.


बेडरूममध्ये ही रोहनचा खूप पसारा होता, जितकं जमेल तितकं सगळं तिने आवरलं. सगळं होईपर्यंत 7वाजले पण तो अजूनही आला न्हवता. दिवे लावून ती तुळस शोधत होती पण कुठंच भेटली नाही.


स्वतःशीच ती बोलत होती.
"आता काय करावं?
सगळं तर झालं, ह्यांना कॉल करू का?अजूनही मीटिंगमध्ये असतील तर चिडतील. नको वाट बघते....स्वयंपाक करू का? पण त्यांना काय आवडत?
रोहन तर म्हणत होते फक्त नॉनव्हेज खातात मग आता मला तर येत नाही बनवता."
ती नुसताच विचार करत  इकडून तिकडे फेऱ्या मारत होती.


दरवाजा खोलून रोहन आत आला तरी ती  फिरतच होती.आजही सिम्पल शिफॉनची साडी  तिने घातली होती, केसांचा मेस्सी बन , कानात टॉप्स, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, चेहऱ्यावर कोणताहि भडकाऊ मेकअप नाही साधीशी टिकली आणि काजळ.


"रोहन- आज पहिल्यांदा माझी कोणी तरी वाट पाहतय, घराला घरपण आल्यासारखे वाटत आहे."तो मनातच बोलत होता."सोनू..."


"हा....कोण?"


"आहो तुम्ही.."

"हो मीच अशी फेर्या का मारतेयस काय झालं?""ते मी ..."


"तू..."

तिने त्याला पाणी दिले.....


"असच कोणी न्हवत आणि सगळं कामही झालंय म्हणून आता काय करू विचार करत होती..?"


रोहनने तिच्यावर नजर हटवून घराकडे बघितले तर खरचच बाई आल्यावर घराला घरपण येत असच काहीस झालं होतं. तिने संपूर्ण घराचा कायापालट केला होता, सगळं जागच्या जागी आणि क्लीन होत.
"सोनू हे सगळं तू केलं आहेस?"


"हो का नाही आवडलं तुम्हांला?"


"तुम्हांला काही चेंजेस करायचे आहेत का?"


"नाही...खूप मस्त आहे...मला पहिल्यांदा घरी आल्याचा फीलिंग येतोय..नेहमी अस वाटायच की एखाद्या गेस्ट हाऊसमध्येच राहतो.""तुम्ही फ्रेश होऊन या मी कॉफी करते .""ठीक ये मी आलोच..""रूममध्ये ही सगळ नीट अँड क्लीन होत, त्याच कपाट सेट करून ठेवल होत, बुकशेल्फ मध्ये बुक्स नीट होते. सगळं जागेवर बाथरूममध्ये मध्येही सगळं व्यवस्थित.....
मनाशीच हसून तो फ्रेश होयला गेला घरात वेगळाच सुगंध दरवळत  होता."


तिने त्याला कॉफी दिली आणि स्वतःही घेतली.....

"आहो.."


"बोल ना.."


"रात्री जेवायला काय करु?"


"सोनू तू आज खूप काम केलं आहेस, राहू दे स्वयंपाक आपण बाहेर जाऊ जेवायला."


"नको मी करेल ना""राहू दे तुलाही कंटाळा आला असेल ना?"


"तस नाही मी ठीक ये."


"तरी पण नको, जा आवरून ये मला एक मेल सेंड करायचा आहे ते झालं की मी येतो."

"बररररर जाते."


"सोनू"


"काय"


"तू ड्रेसेस घातले तरी चालतील."


"ठीक ये."


ती वर येऊन स्वतःच आवरून घेते सिम्पल अनारकली ड्रेसच घालते.

रोहन वर येऊन बघतो तर ती आरश्यासमोर उभी राहून काजल लावत होती. किती तरी वेळ तो तिलाच बघत होता.तिच्या ड्रेसची मागची झिप अनलोक झाली होती म्हणून तो लावण्यासाठी पुढे सरसावला आन त्याच्या हाताने ती लावून दिली. त्याच्या थंड हाताच्या स्पशानेचे तिच्या आंगच पाणी पाणी झालं. तोंडातून शब्दच फुटत न्हवते.


"ते तुझी झिप अनलोक होती."


ती अजूनही तशीच उभी होती हृदय खूप जोरजोरात धावत होत. कधी न कधी तर रोहनला सामोरं जावं लागणारच होत.


"शाल्मली...माझ्याकडे बघ"


त्याने तिला स्वतः कड वळवुन घेतल.


पुसटस ही तिच्याकडून बोललं जातं न्हवत.


"छान दिसतेयस तू, मला तर तू कोणत्याही रूपात आवडायला लागली आहेस."
तो अजूनही shirtless होता.ती मान खाली घालून  ओढणी हातात गच्च  पकडून उभी होती, अंग थरथर कापत होत.


"काय झालं?घाबरलीस का?मी नवरा आहे शाल्मली तुझा.माझ्याजवळ तरी इतकं घाबरू नकोस.मला माहिती आहे मी स्ट्रिक्ट , रागीट आहे, म्हणून तुला माझी भीती वाटते.पण तुझ्यावर राग नाही निघणार याची पुरेपूर काळजी घेईल कारण तुझ्यात जीव अडकला आहे माझा आणि स्वतच्या जीवाला मी त्रास देत नाही अन देणार नाही."


त्याने तिला मिठी मारली आणि हलकेच त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले.. डोळ्यातील पाणी रोखून ती अजूनही तशीच उभी होती. पायात थरथरत होते.
रोहनचे ओठ तिच्या  मानेवर फिरत होते पण तिच्या अंगावर भीतीने असंख्य शहारे येत होते.
त्याने हाताने एक नाजूक हिऱ्याच मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधले ती अजूनही डोळे बंद करून होती.


त्याचा मोबाइल वाजला तस ती भानावर आली अन पळतच वॉशरूममध्ये गेली त्याला वाटलं लाजली असेल पण ती तिथं जाऊन तिला अश्रू अनावर झाले.
रोहनच्या प्रेमाच्या आपण लायक नाही हे तीच मन तिला खात होत आपण चुकलो आणि चुकतोय.


"सोनू आवरलं का?उशीर होतोय."


तिने तोंडावर पाणी मारल आणि गळ्यात लक्ष गेलं तर तीच लग्नातील मंगळसूत्र न्हवत, वेगळं खूप सुंदर अस मंगळसूत्र होत तिने त्याला हात लावुन बघितलं.कस बस सावरून मनाला समजावून ती बाहेर आली. थोडंस आवरून दोघेही जेवायला बाहेर आले.


"काय खाशील?"


"काहीही."


"अशी कोणतीच डिश मी तर नाही खाल्ली कधी?"


"तुम्ही जे खाणार तेच मी ही खाईल मग"
तिने एक ओठ बाहेर काढून बोलली."मी जे खाणार ते तू खाल्लेल आवडेल, मला पण तू ते खाऊ शकशील की नाही मला दाऊट आह."


"म्हणजे?"


"मी चिकन खाणार आहे, तू खाशील?"


"नाही."

तिने गाल फुगवून सांगितलं,
"मग.."

"मी sizzlers खाते."


"ओक मीही तेच घेतो मग."


दोघानाही डिश ऑर्डर केल्या, रोहन एकटाच बोलत होता. ती फक्त हो नाही इतकंच सांगत होती.ती शब्दात अडकली की मग तिचे गोंधलेले एक्सप्रेशन बघायला त्याला फार आवडायचं.


"आहो.."


"आपण दोघच असताना रोहन बोललिस तरी चालेल मला."


"बर...
हे मंगळसूत्र?"


"हे मला त्यादिवशीच आवडलं होत आनि तुला आजसाठी काहीतरी गिफ्ट ही द्याच होत ना?म्हणून."


"आज काय आहे?"
ती खूप निरागसपणे विचारत होती.


तो क्षणभर तिच्यात हरवून गेला.

"काही खास नाही पण लग्नाच गिफ्ट द्यायचं असत ना?
मी माझ्या फ्रेंड्स कडून एकल आहे."


"तुम्हाला फ्रेंड्स पण आहेत?"


"फ्रेंड्स आहेत का म्हणजे?
नसू नये?""तस नाही"तिने मान खाली घातली.


"बोल ना सोनू"


"नको सॉरी."


"अरे सॉरी काय त्यात?तू मला माझ्याबद्दल विचारतेयस, आवडतय मला...तुला मला जाणून घेण्याची इच्छा आहे चांगलं वाटतय , बोल ना!!!"


"म्हणजे तुम्ही म्हणाला होता ना मी शांत आहे कोणाशी जास्त बोलत नाही म्हणून वाटलं की जास्त फ्रेंड्स नसतील."

त्याला अजूनच हसू आलं.


"लग्नात बघितलं नाहीस का तू.?किती जण होते, मी अबोल असलो तरी फ्रेंड्स खूप आहेत मला तुला भेटवल तर होत लग्नात."


तीच लक्षच न्हवत लग्नात तर ती आठवणार तरी काय?
"मला नाही राहील लक्षात खूप पाहुणे होते."


"बर मग नंतर भेटवल निघायचं.""हो"जसजसे घर जवळ येत होतं, तिच्या मनाची घालमेल चालू झाली होती. गुड्डू म्हणत होती तस पहिली रात्र अन अंजलीचे शब्द तिच्या कानात घुमत होते, ए सीमध्येही तिला गुदमरून गेल्यासारखे होत होत म्हणून तिने खिडकीची काच खाली घेतली. जरा मोकळ्या हवेत बर वाटू लागलं होतं पण डोक्यात विचारांच थैमान चालू होतं.

हवेने तिची केस उडत होते, तो कार चालवता चालवता तिला बघण्यात मशगुल होता.

"सोनू""हू"


"चल."


"कुठं?""घर आलंय.""ओहहह सॉरी मी ते"


"Its ok... नवीन आहे म्हणून .."


जे होईल ते होईल अस स्वतःला समजावून ती त्याच्या पाठोपाठ घरात आली..


"सोनू"


"हा"


"एक ग्लास दूध आणशील"


"दूध"

"हो "


"आणते..."
ती दूध गरम करून रूममध्ये येते ,संपूर्ण रूमला सुंदर अशी सजावट केली होती, डीम लाईट्स,बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांनी heart बनवलं होत.
आजूबाजूला छोटे छोटे कॅडेल्स लावले होते, मंद असा सुगंध दरवळत होता.


तिने बघीतलं आणि पोटात गोळाच आला. आता याक्षणाला कुठं तरी पळून जावं, असा विचार मनात येत होता पण जाण्याच्या वाटा तर तिने स्वतःच बंद केल्या होत्या, वॉशरूम मधून रोहन बाहेर आला ती अजूनही सगळीकडे अनामिक भेदरलेल्या नजरेने बघत होती.

त्याने तिच्या मागून येऊन मिठी मारली, दुधाचा ग्लास पडणारच की त्याने सावरलं.


"आवडलं.."


"रो..... ह...... न....... हे........"


"माझ्या फ्रेंड्सनी केले आहे अरेंजमेंट्स..."


त्याने त्याची हणूवटी तिच्या मानेवर स्थिरावली त्याचे गरम श्वास तिला  जाणवत होते पण अंगातून जीव जाईल कि काय असच वाटत होतं हातपाय थंड पडत चालले होते.

"सोनू"


"बोल ना "त्याने हलकेच ओठ तिच्या मानेवर ठेवले त्याच्या स्पर्शानेच तिने एक हलकासा सुस्कारा  सोडला.


"आहं...."


तिच्या त्या मधाळ आवाजनेच तो घायाळ झाला.


"सोनू मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे,तिथं एक बॉक्समध्ये आहे, प्लिज तू बघून घेशील  मी खाली आहे.
10 -15मिनिटात आलो..."त्याने मिठी सोडत तिला सांगितले..........


"रोहन..."कसेबसे तिच्या तोंडून शब्द फुटत होते.


"बोल ना ..."


"हे दूध..."


"तुझ्यासाठी आहे तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहेम्हणून कोणतेही आढेवेढे न घेता गुपचूप माझ्यासमोर पियाचे. तिला समोर बसवून त्याने पूर्ण तिला पाजले आणि खाली निघून गेला.तिने अजूनही सावरली न्हवती रोहनबद्दल जे काही एकल होत आणि जे अनुभुवत होती त्यात खूप फरक होता. तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता तो तिची आवड जपत होता.मनापासून प्रेम करत होता फुलासारख जपत होता.

तिने हिम्मत करून बॉक्स उघडला तर त्यात अतिशय सुंदर वनपिस होता.त्याला काय म्हण्याचं ते तिला उमगलं होत , डोळ्यातून अखंड अश्रू थांबायचं नाव घेत न्हवते.
मनापासून कोणाला तरी समर्पित होणंआणि मनात नसताना समरस होणं यात खूप फरक असतो. यात नुसते शरीर नाही मन ही एकरूप होणं गरजेचे आहे.


ती तशीच त्या बॉक्सकड अन रूमकडे बघत होती. तितक्या तिचा मोबाईल वाजला आदुचा कॉल होता.
तिने डोळे पुसून कॉल घेतला.


"सोनू...
कुठं आहेस ?
केव्हाचा कॉल करतेय?"


"आदू.."
ती रडत होती..


"काय झालंय?
तू का रडत आहेस..?
रोहन..ने काही केलं का तुला?""नाही.."


"मग बोल माझा जीव जायची वेळ आली आहे. तू रडू नकोस आणि मला सांग काय झालंय ते? मी आहे ना सोनू.."


ती मुसमुसत तिला सगळं सांगते......


"सोनू... आज नाही तर उद्या तुला हे फेस करणं आहेच.....ह्या सगळ्यात रोहनचा काहीच दोष नाहीये....
त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या माफक आहेत....
कोणताही नवरा आपल्या बायकोकडून हेच अपेक्षित करतो ना....
अन तो घेतोय तुला समजवून....
सोनू तू त्याला चान्स दे.....
मला तर रोहन चांगला वाटतोय.... कदाचित हाच ती व्यक्ती असेल जो तुला सगळ्यातुन बाहेर काढायला मदत करेल...."


"हम्मम्म्मम्म...
मला भीती वाटते ग ...
मला नाही जमणार.....मी.." ती अखंड रडत होती.


"सोनू मूर्खपणा करू नकोस... स्वताला संभाळ...
तूच हा रस्ता निवडला आहेस...आता पळून जाणार तरी कुठं?
रोहन घेईल तुला सांभाळून....
तुझ्या घरची माणसं तर माहेर म्हणण्याच्या सुद्धा लायक मला वाटत नाही..
निर्दयी आहेत...
आता तोच तुझा सहारा आहे...
त्याला दुखावू नकोस... प्लिज ...
मागे माझ्यामुळे तू वीरला  होकार  दिला होतास..
आज मीच तुला सांगतेय.....सगळं विसरून जा राजा आणि रोहनला आपलं म्हण."


"मला कळतंय ग पण वळत नाही,रोहन जवळपास असले तरी मला भीती वाटते त्यांना काही कळलं तर मला कधीच माफ नाही करणार"


"तुझी काहीच चूक नाहीये सोनू,
स्वतःला दोष देत बसू नकोस.
प्रेम करणं कधीच गुन्हा असू शकत नाही...
तू आजवर स्वतःच्या लिमिट्स कधीच क्रॉस नाही केल्या....तू तेव्हाही पवित्र होतिस अन आताही आहेस.....
ह्याने तुमचे संबंध अजून मजबूत होतील राजा........
त्याला कधीच काही कळणार नाही याची काळजी आपण घेऊच...
तू तो टॉपिक काढायचा नाही कधीच... समजलं...."


"आदू मी.."त्याच्या अपेक्षावर उभी राहू शकेल का ग?"


"हो ग राणी...स्वतःवर विश्वास ठेव....कुठं गेली ती शाल्मली जी कॉन्फिडन्ट होती."


"ती मरून गेली कधीच.."


"सोनू बस झालं..!!!
आता तू सगळं मागे सार आणि तयार हो.
आज नाही तर उद्या तुम्हाला एकत्र यायचं आहे तर आज का नाही.?
मला विश्वास आहे रोहन तुला संभाळून घेईल.....
तू जा आन फ्रेश हो
रडू नकोस."


"हम्मम्म्मम्म्मम"

कसबस तिने उठून चेंज केलं आणि फ्रेश होऊन आली. रडल्यामुळे डोळे थोडे लालसर झाले होते म्हणून काजळ लावल फक्त बाकी कोणताच मेकअप तिने केला नाही.
आरश्यासमोर उभ राहून ती स्वतःला आजच्या रात्रीसाठी मानसिकरित्या तयार करत होती..
तब्बल अर्ध्या तासाने रोहन आत आला, ती अजूनही ड्रेससिंग टेबलजवळच बसून होती.


"सोनू..."


त्याने आवाज दिला तशी तिची तंद्री तुटली आणि तिने उठून त्याच्याकडे पलटून बघितलं.


त्याने दिलेला शॉर्ट वनपिसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. केसांचा मेस्सी बन त्यातून सुटलेल्या बटा, कानात स्टडं, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, डोळ्यात काजल बाकी कोणताही भडकाऊ मेकअप नाही....तरीही खूप सुंदर...तो  तिच्याजवळ आला..
"आज माझी नजरच हटत नाहीये.....
You look stunning
Gorgeous!!"


ती मान खाली घालून ऐकत होती.


त्याने तिला कपाळावर , गालावर किस केलं आणि मिठी मारली तीच आंग आंग शहारल रोहनचे हात तिच्या उघड्या पाठीवर फिरत होते.
आणि  ओठाने तो मानेला  किस करत होता.
ती स्तब्धचं राहिली. कस आन काय वागावं.?"चल.."

"कुठं?"


त्याने त्याच्या छोट्या टेबलच्या बाजूला...बिन बॅग आणि चेअर अरेंज केली... टेबलावर वर old wine ची बॉटल आन 2 ग्लास ठेवले दोन्ही ग्लास भरले.
अन तिला एक दिला.


"मी ....
मी नाही घेतलं ओ कधी...
मला नको प्लिज..."


"सोनू ही दारू नक्कीच नाहीये,तू बेवडी नाही होणार ह्याच्याने अन झालीस तरी मला चालेल...मलाच तुला सांभाळायच आहे.."


"पण मग नकोय मला...मी काही बाही बोलले तर..."


"त्या निमित्ताने तू बोलशील तरी..."तो तिच्याजवळ जाऊन तिला ग्लास देत होता.


"नको ना प्लिज.."ती आता रडू लागली होती.


"अरे बाबा रडू नकोस ..नको घेऊस....
शाल्मली..."


"मला कंपनी तरी देशील ना?"

ती गप्प तिथे बसली.


तस तर तिने बोलाव म्हणून त्याने हा सगळा उपदयाप केला होता पण ती नकोच म्हणून बसली होती.उगाच रडून त्याला तिला हर्ट न्हवत करायचं.
त्याने स्वतःसाठी एक ग्लास घेतला आणि sip by sip पिऊ लागला.


"तुला भीती वाटतेय का?"


"हम्मम्म्म....."


"साहजिक आहे...."
सोनू तू मनापासून या लग्नाला तयार होतीस ना ग?""आहो.."


"म्हणजे ठीक आहे अरेंजमरेजेसमध्ये नवरा बायकोमध्ये एक अवघडलेपणा असतो मान्य आहे मला. पण एक हुरहुर असते आपल्या पार्टनरबद्दल त्याला जाणून घायची, त्याच्यासोबत वेळ घालवावा अस वाटत असते ती missingवाटते आपल्यात."

"8 दिवस झालेत आपल्या लग्नाला पन आपण एकमेकांना नीटस ओळखत ही नाही.
तुला बघितलं की अस वाटत की तू कोणत्या तरी दडपणाखाली वावरतेस.

"तुला कशाची भीती वाटते माझी, घराची की आपल्या नात्याची?
मी फोर्स करेल तुला अस वाटत का तुला?"


"रोहन..!!"

"शाल्मली मी  listen am Country Head.... Am handling Sales department so, I can easily Read faces of people...

लोकांना बघून ते पुढच पाऊल काय उचलतील हे समजत मला......पण तुझ्या मनात काय चालू आहे..हे नीटस समजत नाहीये मला."


शाल्मली अवाक झाली होती त्याच्या बोलण्याने तिने मान वर करून त्याला  पाहिले.


तो ग्लास तोंडाला  लावत तिच्याकडे न बघता बोलत होता.


ती आपल्याकडे बघतेय हे जाणवल्यावर त्यानेही तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच स्माईल दिली.....

"बरोबर आहे ना माझं बोलणं."


"ते .......आहो........ मी........"


"बरोबर की चूक इतकंच सांग ....स्पष्टीकरण  नकोय मला ...."


"हम्मम्म्मम्म...""कशाची भीती वाटते?हे बघ आज मला तुला जाणून घायच आहे,तू अशी बावरलेली, भेदरलेली का जानवतेस......?
का शाल्मली?"


"ते .......मी......"

"भीती आहे...?
right??"


"हो....."


"माझी...?"


"हम्मम्म्मम....""Ok .....का?""तुला आठवत का मी सांगितल होत माझ्याकडे पेशन्स नाहीयेआता बोलशील का?"


"रोहन..."


"माहिती आहे माझं नाव रोहन आहे ते... तुझं कारण सांग....""मला सगळ्याची भीती वाटते."


"म्हणजे??"


"म्हणजे मला हे जमलं का? लग्न, संसार, आपलं नात... ही आजची पहिली रात्र...
मला माझ्याकडून काही चूक होईल की काय असच वाटत राहतं..."


"तू......वेडी आहेस का?
नक्की शाळेत गेली होतीस ना"""हूं.....


""No i guess I should check your certificates...... First.........""वहिनी म्हणली होती ...तूम्हाला लगेच राग येतो... आणि गुडू पण तसच म्हणत होती..""म्हणून तू माझ्याबद्दल तुला वाटेल ते ग्रह बनवून मोकळी झालीस...."


"आहो...."


"Shut up शाल्मली...."
तिने तर रडायला सुरुवात केली.


"तुला एकदाही माझ्याशी बोलावसं वाटलं नाही,मी नेहमी स्वतः हुन तुझ्याकडे येतो..
येतो ना?"


"हो"


"रडू नकोस शाल्मली....मला रडणारे लोक अजिबात आवडत नाही.."


"सॉरी...."


"मी कसा आहे हे बाहेरुन जाणून घेण्यापेक्षा मला जवळून बघून तुला लवकर समजलं असत... पण तुला तर माझ्याकडे बघायचंही नाहीय."


"आहो"


"नकोय मला तुझं आहो !!तुला वाटलं का की मला समजत नसेल की तू मला टाळती आहेस..?"


त्याने बघता बघता सगळी बॉटल सम्पवून टाकली होती.


"झोप जाऊन तू....मला माहिती आहे तू तयार नाहीयेस....आणि मी इतकाही डेस्पो नाहीये."

"रोहन...."
ती रडत रडत त्याला आवाज देत होती."गो सोनू.....
मी माझा राग खूप कंट्रोल करतोय....उगाच तुझ्यावर मला काढायचा नाहीये....""सॉरी रोहन..""I Said Go Shalmali?"


तो ओरडला तशी ती दचकून मागे सरकली.
आणि पळत वॉशरूममध्ये गेली आणि रडू लागली.इथं त्याने पूर्ण बॉटल पिऊन टाकली होती तस तर 1 बॉटल ने त्याला काही होणार न्हवत.


"शीट यार..."
तो केसातून हात फिरवत रूममध्ये येरझाऱ्या मारत होता."सोनू........
बाहेर ये.........
प्लिज..........
शाल्मली.......सॉरी यार.......
प्लिज बाहेर ये......
मी नाही रागावणार.....
सोनू........."

ती खूप वेळ झालं बाहेर येत नाही बघुन त्याला भीती वाटू लागली होती म्हणून तिला आवाज देत होता.


"सोनू...........
प्लिज ......." तो दरवाजा वाजवत होता...... तितक्याच तिने दरवाजा उघडला........
रडून रडून डोळे सुजले  होते, नाक लाल झालं होतं, गाल फुगले होते....काजल ही पसरलं होत...


"बाहेर ये...."

त्याने तिला बाहेर बेडवर बसवलं आणि पाणी दिले.......
AC च टेम्प्रेचर सेट केलं.


"इतकं रडतात का?"


"सॉरी.."


"आता बस रडण..... मला येत नाही समजूत घालणं
प्लिज....टिश्यु घेउन त्याने तिचे डोळे टिपले.."सोनू... तू माझ्या जागेवर असतीस तर तुलाही वाईट वाटलंच असत ना.
मी आधीही तुला सांगितल होत ना...मला जास्त अपेक्षा नाहीयेत  पण तु माझी हवीस.
मीही माणूस आहे ....त्रास होत असेल ना?
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग आणि तू माझी वाहवी यात गैर काय आहे?
तुला वेळ दयायला मी तयार आहे.....
लगेच तुझ्यावर तुटून नाही पडायचं मला.....
पन तुझ्या डोळ्यात मला माझ्यासाठी काहीच भावना नाही दिसत ये ग....
वाईट वाटन साहजिक आहे ना होय ना?
"सॉरी रोहन...""प्लिज सॉरी नको म्हणूस मी तुला दुखावलं म्हणून मीचं तुझी माफी मागतो,
मला फक्त तू हवी आहेस.."


"हम्मम्म्मम्म "


"मी माझे 100 %देईल.


"तू 1% जरी दिलास ना शाल्मली तरी मला चालेल..."
तो उठून खिडकीतून बाहेर बघू लागला.


"आहो......
प्लिज ना ...."
तीही त्याच्या मागे मागे गेली.


"रोहन प्लिज मला एक चान्स द्या."


"सगळं तुझचं आहे शाल्मली.....चान्स काय.?"
तो निर्विकारपणे बोलला तस तिला अजूनच उन्मळून आलं.


"चल खुप वेळ झाला आहे....
तसही तू आज खुप कामही केलं आहेस......दगदग झालीये तुझी....
दमली आशील ना खूप?
It\"s better  to take a proper rest.."


रोहणच्या बोलण्यात आपलेपणा जाणवत होता. आदू आणि शंतनू सोडला तर कोणीच तिच्याशी नीट बोलत न्हवत. रोहनची काळजी घेणं, तिला समजावन तिला कुठं तरी सुखावून गेलं होतं.


उन्हाने तापलेल्या रखरखत्या  जमिनीवर पाण्याचे थेंब पडल्यावर जस आल्हाददायक वाटत तसच काहीस तिला वाटत होतं..


तिला राहवलंच नाही म्हनून  तसच त्याला पट्कन मिठी मारली.


"सॉरी रोहन.."


रोहनला तर शॉक लागला होता....जीची तो स्वप्नं बघत होता ती स्वतःहुन त्याच्याजवळ त्याच्या मिठीत होती..


"It\"s OK dear.....now Plz Stop crying...."
रोहणेही त्याची मिठी घट्ट केली आणि केसात किस केलं..


तीच मुसमुसन थांबलं होत पण त्याच्याजवळ सेफ वाटत होतं म्हणून अजूनही तिने त्याला सोडलं न्हवत.


"सोनू...तू पूर्ण आयुष्य जरी मला अस जवळ घेउन राहीलीस तरी मला काही हरकत नाहीये."

तिला तिची चूक उमगली अन पटकन बाजूला झाली....


"सॉरी.."


"सॉरीच्या पुढेही शब्द आहे , पण तुझ्या डिक्शनरीमध्ये नसतील तर ..""आहो..."

रोहनने तिला उचलून बेडवर आणल.......


आणि नीट झोपवल आणि तिचे विस्कळीत झालेलं केस नीट केले. वेट टिश्युने चेहरा नीट पुसून घेतला.
ती फक्तच त्याला बघत होती.कपाळावर किस केलं..
"झोप ..."

तिने नकारथी मान हलवली.\"सोनू मी इथंच आहे....ठीक ये......"


तिने नजरेनेच होकार दिला.

सारख रडून रडून तीच डोकं भयंकर दुखत होत.....
त्याने हळुवारपणे डोकं दाबायला सुरुवात केली, त्याच्याकडे बघता बघता ती झोपी गेली रोहनही तसाच तिच्याजवळ झोपी गेला.झोपेतच रोहनने तिलाजवळ कवटाळून घेतलं होतं
ती गाढ झोपेत होती. कितीतरी दिवसांनी तिला शांत अशी झोप लागली होती.दोघेही निवांत झोपी गेले......
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself