Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 3

Read Later
अस्तित्व - एक लढाई भाग 3

अस्तित्व - एक लढाई भाग 3
अश्यातच 2 - 3 दिवस गेले. लग्नाची तयारी सुरू झाली.रोहनने होकार दिल्यामुळे शाल्मलीला थोडी बरी वागणुक मिळत होती यामध्ये रोहनने तिला अजून तरी कॉल केला न्हवता .


शॉपिंगसाठी सगळे भेटनार होते.


रोहन अन फॅमिली आणि  इकडून शाल्मली, आई, अंजली आणि मिहीर आले होते.ती फक्तच सगळ्याच्या  होकाराला होकार भरत होती..अंजली तिला स्वतः ला आवडेल असच काढत होती.
रोहनला तीची आवड बिलकूल आवडत न्हवती पण शाल्मलीही तोंडातून भ्र ही काढत न्हवती म्हणून शेवटी त्याने गुड्डूला सांगून अंजलीला बाजूला घ्याला सांगितले आणि स्वतः तिच्याजवळ बसला आज ती फुल्ल स्लीवसचा अनारकली खालून आली होती,केसांची मेस्सी वेणी, कानात झुबे, कपाळावर टिकली, हातात कड,डोळ्यात काजळ, खूप लोभसवाणे रूप वाटत होतं तीच."तुला कोणती साडी आवडली..?"


"सगळ्या छान आहेत..."तिने मान खाली घालून उत्तर दिले.


"त्यात सगळ्यात जास्त..?"


"रेडवाली...."


रोहनने तिथं बसून तिला आवडतील अश्या साड्या काढायला लावल्या.


दागिन्यांची ही खरेदी आजच करणार होते.

सगळ्यानी मिळून तिच्यासाठी भरजरी दागिने काढले.
रोहनने दोघनसाठी कपलरिंग पसंत केली.तिला दाखवली तिनेही त्याच्या होकारात हुंकार भरला.


जाताना रोहनने तिच्या हातात एक बॉक्स दिला...


"अहो हे काय?""तुझ्यासाठी मोबाईल आहे असं दुसऱ्याच्या मोबाइलवर कॉल करण नाही आवडत मला...सिम टाकलं आहे.."


"पण आई..?"


"मी दिला आहे म्हणल्यावर कोणी काही बोलणार नाही...अधिकार आहे तो माझा.."


शाल्मली आणि घरचे परतले.सगळे खरेदी बघत होते, तिने मोबाईल  दाखवला."वन्स हा नंबर कोणाला देऊ नका, उगाच वाढीक कामधंदा करू नका आता.""हूं...."तितक्या रोहनचा कॉल आला..


आई आणि अंजलीने तिला त्यांच्यासमोरच बोलायला लावल.


तिने कचरतच कॉल घेतला."हॅलो...."


"पोहोचलीस का?"


"हो.."

"खरेदी आवडली का तुला?\"


"हम्मम्म्मम.""तुला बोलता येत का ग?""हम्मम्म्मम."


"मग जर येत असेल बोलायला, तर कधी तरी बोलत जा ना.."


"हम्मम्म्म..."


"शाल्मली परत तेच.."


"सॉरी..."


"बर तुझे बाबा आहेत का ?"


"हा........कशाला?"


"का घाबरली का?""हम्मम्म्मम्म""अरे बाबा तुझा पासपोर्ट हवा आहे..हनिमूनसाठी."


"अहो....."


"कुठं जायला आवडेल तुला?"


"तस काही नाही...कुठंही..."


"शाल्मली..."


"हा...बोला ना.....?"


"तुला मी आवडलो ना?
तू खूष आहेस ना........??""अहो अस का विचारताय..?"


"वाटलं मला...
तू मन मोकळं बोलतेस अस वाटत नाही मला...
हे बघ अजूनही काही असेल तर आताच सांग...
परत..."


"आहो...."


"नुसतच आहो म्हणत असतेस...
हे बघ मला वाटतंय तू माझ्या बोलण्याचा दुसरा अर्थ घेतला आहेस.."


"म्हणजे?"

"म्हणजे मी म्हणल होत की मला जास्त बोलले आवडत नाही... याचा अर्थ मला मुकी बायको बिलकूलच नकोय..."


"आहो......""कोणी आहे का तुझ्या बाजूला?"


"हा...."


"अच्छा अस आहे का , कोण ये?"


"आई आणि वहिनी आहेत.."


"हम्म्मम्म....अस आहे तर... घाबरट आहेस तू खूपच...
आजकालच्या जमान्यात अस कुठे असते का?"

"हूं....."


"तुला घरी सगळे सोनू म्हणतात का?सकाळी म्हणत होते...""हो ..."


"मीही तसच म्हणत जाईल.. शाल्मली खूप मोठं नाव आहे..."

"चालेल.."

"शाल्मली .....मी 8 दिवसांसाठी abroad ला चाललो आहे...."


"पन मग..."

"मग काय.....?"

"कधी येणार .......?"

"तुला मी जावं अस वाटत नाहीये.... अस वाटतय मला.."


"अहो म्हणजे तुमची तयारी.."


"अच्छा चला तुला आलय लक्ष्यात की माझंही लग्न तेव्हाच आहे..."


ती गप्प बसली

"सकाळपासून एकदाही तुला विचाराव नाही वाटलं का की माझं काय?""तस नाही काही...""मग कस ये..??"त्यालाही तिला शब्दांत पकडायला आवडत होत...


"मला नाही माहिती...""रागावू नकोस जीन्स वर नाही येणार लग्नात..मी उद्या जाईल माझे फ्रेंड्स आहेत सॉ एकत्र जाऊ..."


"ठीक ये...."


"चला म्हणजे तुला थोडं तरी बोलता येतंय..."


"हम्मम्म्मम येत...""बर....बाबांना देतेस..."


"हम्मम्म 2 मिनिट.."


रोहन त्याच्याकडून पासपोर्ट घेतो...


बघता बघता सगळी तयारी होत आली होती..
मनात असू की नसू ती चेहऱ्यावर खोट हसू दाखवून ती सगळ्यात भाग घेत होती....


बांगड्या ,देव देव.... सगळ्यात ती असून नसल्यासारखीच होती....

रोहन अजूनही परतला न्हवता..
कॉल मेसेजेस ही जास्त न्हवते येत....त्याला कामातुन वेळ भेटत न्हवता अन तिची तर काहीच इच्छा नसायची...
"वन्स..."


"हा ..."

"रोहन भावजी कधी येणार आहेत काही बोलणं झालं?"


"नाही वहिनी""मग करा की कॉल सारख त्यानी तुमच्या मागे पुढे फिरावं असच वाटत ना तुम्हाला...होणारा नवरा आहे तो तुमचा...करा फोन ..."


"पण तिथं आताच सकाळ झाली असेल वहिनी..."


"त्याला काय होतंय...
आणि हे बघा नवऱ्याची मर्जी राखायला शिका 3 - 4 दिवसांवर  लग्न आलंय...आतच नाही नंतर ही बायकोची खूप कर्तव्य असतात..
समजतंय ना?"


"हो वहिनी मला येत सगळं घरातलं काम..""हे देवा ह्यांना तर सगळं फोडुन सांगावं लागेल...
लफडी करताना सगळं येत होतं ..."


"वहिनी तुम्ही काय बोलताय...?"


"उलट बोलू नका वन्स... मला ह्यांना बोलवायला भाग पाडू नका....बसलेला मार कमीच दिसतोय.. का जाताजाता पण....""सॉरी...."


"मी तुम्हाला पहिल्या रात्रीविषयी सांगत होते... पुरुषांच्या खूप अपेक्षा असतात... त्या रात्री बायको कडून...
नको अन होय नका करू.... जे जस ते म्हणतील तस करा... उगाच पहिल्याच रात्री रोहणच्या रागाचं शिकार होऊ नका..."


"शिईईईई......"

तिला अंजलीच्या विचारांची किळस वाटली......


"वहिनी त्याना वाट्टेल ते करू द्या म्हणजे ...मलाही जीव आहे, अपेक्षा आहेत..."


"आई-  हो मान्य आहे आम्हाला (त्या आत येताना दोघींचं बोलणं त्यानी एकल होत)
पण हे असंच असत... तिथं बाईच मन नाही बघत कोणी..."


"अंजली- एका पुरूषाला बाईकडून तेवढंच हवं असत..."अंजलीच्या विचारांचीच तिला कीव आली... आणि तिच्याशी बोलायच तिने बंद केलं..करा कॉल त्यानाही वाटू द्या तुमहाल पण त्यांची आठवण येतेय ते...काल गुड्डू पण म्हणत होती वहिनी दादाला कॉल नाही करत...त्या दोघीही तिला जबरदस्ती रोहनला कॉल करायला लावतात अन बाहेर जातात.


रोहन अजूनही झोपलेला होता..


"हॅलो..."


"Hello  whose this...."


"It\"s me ......""Who...Me.....Look am dam tired don\"t waste my time....."

"Sorry......"

"मी शाल्मली......."


"सोनू तू...
तू अचानक माझी आठवण काढलीस..?"


"आहो...."


"बोल ना सोनू....""कधी येणार आहात.......?""अरे वाह कोणी तरी मला खूप मिस करतय वाटत...""हा म्हणजे ... नाही म्हणजे...... तस ..""अरे सोनू स्पष्टपणे बोलत जाण....""कधीपर्यंत येणार ये इंडियात..."


"आज रात्रीच्या फ्लाईटने..."


"बररर..."


"मग तुझी झाली तयारी?""हो चालू ये..."


"गुड्डूला मेहंदीचा फोटो पाठवू शकतेस मग मला का नाही पाठवला"


"ते .........."


"तुला सांगितल आहे ना तुझ्यावर सगळ्यात जास्त अधिकार माझा आहे."


"हो....सॉरी...."


एक प्रकारचा विचित्र ओकवर्डनेस होता तिच्या मनात.....
रोहन जो तिच्या प्रेमात अखंड बुडून गेला होता... आणि तिच्या मनाचा कोपरा तिने कायमचा बंद केलता ..


"बोल ना सोनू.... मला खूप छान वाटलं तू स्वतःहून मला कॉल केलायस...आज पाहिल्यानंदा तू कॉल केला आहेस..""हो"


"मी येतो वेळेवर तू काळजी नको करुस तुझी तयारी कर नीट आणी काही लागलं तर मला सांग..."


"हो"


"मी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स घेतले आहेत,
तू लग्न होऊन आलीस ना तेव्हा देईल एकांतात.....
नाही तर गुड्डू मागत बसेल."


"हम्मम्म..."


"चल मी आवरतो तू ही तुझी बॅग ते भरून ठेव..."


"हो..."


"अजून काही"


"नाही लवकर अन सावकाश या.."


"हो रे बाबा  लवकर येतो आणि सावकाश यायला प्लेन मी नाही पायलेट चालवतो. त्याला सांगेल माझी गोड होणारी बायको वाट पाहतेय सो नीट शिस्तीत चालावं....


"आहो...."


"बस मोजून तितकेच शब्द येतात "


"अहो...
हो....
हुन.....
हम्मम्म्म
बर........"


"बरोबर ना?"


"हूं"


"शाल्मली  you made me crazy..
चल आवरून घेतो पॅकिंग बाकी आहे माझी..."

"ठीक ये..."

"बाय "

"बाय "


क्रमशःअस्तित्व - एक लढाई भाग 3

रोहन इंडियात आला होता......


लग्नच्या आदल्या दिवशी कार्यालयात पाहिले साखरपुडा मग हळद होणार होती...


सगळे तिथंच जमा झाले होते, शाल्मलीच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या पण तिची सगळ्यात जवळची मैत्रीण अजुनही आली न्हवती " अदिती"

साखरपुडा सूरु झाला हिरव्यागार रंगाच्या नऊवारीमध्ये आणि साजेशा मेकअप ती खूपच सुंदर दिसत होती.
रोहनच्या घरचे आणि बाकीचे नातेवाईक खूपच तारीफ करत होते तिची रोहन पण काही कमी न्हवता. नेव्ही ब्लू रंगाचा कुर्ता त्याने घातला होता.सगळ्यांनाच त्यांचा जोडा खूप आवडला होता.


बघता बघता हळद कुंकू लावून सुपारी फोडून टिळा झाला, एकमेकांना अंगठ्या घातल्या सुवासिनींनाकडून ओटी भरली गेली.


फोटोग्राफर जस सांगेल तस दोघ जण फोटोस काढत होते. रोहनचा स्पर्श होताच तिला कसतरी होयच त्यांच्या नात्याला ती कसलीच तयार न्हवती.त्यात अंजली जे बोलली ते डोक्यातून जाता जात न्हवत, रोहनसोबत आता आपलं पुढील आयुष्य कस असेल हे विचार सारखे तिच्या डोक्यात डोकावू पाहत होते.

पण जे असेल ते आपला प्रारब्ध असेल आणि ते आपण निभावायचा पूर्ण निष्ठेने हे तिने मनाशी गाठ बांधूनच ठेवलं होतं.


1 तासाच्या आंतराने हळदीला सुरुवात झाली, सगळयांनी मिळून दोघाना हळदीने माखून टाकलं होतं रोहन मनापासून सगळं एन्जॉय करत होता आणि शाल्मली खोट हसू ठेवून.


तिचे बाबा आणि मोठा दादा तो मुलगा काही तमाशा करू नये याची खबरदारी घेत होते. शंतनू  आलेल्या नातेवाईकांना सरबराईमध्ये काही कमी पडू नये याची काळजी घेत होता..
हळद उतरवून झाली आणि सगळे आपल्याला रूममध्ये आले.


आई, अंजली, मिहीर, शंतनू सगळे मिळून उद्याची बोलणी करत होते......

"आरव(मिहिरच 4 वर्षाचा मुलगा)- आत्तु तू उद्या आम्हाला सोडून जाणार..?"


"हो बाबू...."


"किती दिवस म्हणजे बाबा जातो तसा लगेच येशील ना?"

"मग तुझ्याशिवाय मला करमत नाही.."


"मलाही बाळा"


"अंजली- बाबू आत्तु आता कायमची चालली आहे ती आता तुझ्याशी खेळायला नाही येऊ शकणार."


"का ग आत्तु...?मला तू पाहिजे...."


"हो बाबू मी इथंच आहे... तुला जेव्हाही माझी आठवण येईल माझ्याकडे येत जा..."


"वन्स पहिलं तुमचा संसार सांभाळ पण बघू आपण...  आरव बाहेर जा आणि आजोबांना सांग इकडं बोलवलं आहे...आहेराचे बघायच आहे..""अस का बोलताय वहिनी.. मी इतकी परकी झाली का ओ तुम्हाला..??"


"आई तू आताही माझ्याशी नीट  बोलणार नाही का ग?इतकी वाईट आहे का ग मी??
की तुम्हांला कोणालाच मी नकोय.."


"सोनू...तू जे वागलिस त्यामुळे तुझ्या वाटेला हे दुःख आलं आहे..."


"पण आई मी माफी मागितली ना ग???
प्लिज मला एकदा तरी तुझ्याजवळ घे ना...मी उद्या जाणार आहे...."


"सोनू जेव्हा तू आई होशील ना.... तेव्हा तुला माझं दुःख समजलं..."

""आई ही नेहमीच मूल आणि नवरा यांच्यामध्ये भरडली जाते........"" का अस वागलिस.......?""मला एक संधी दे ना ग..."


"मिहीर दादा तू ही असच वागशील का रे माझ्यासोबत कायम..."


"सोनू...... तू हे लग्न नीट निभावून दाखव आमचा राग ही निवळून जाईल....तुला दुखावून आम्हीही आनंदात नसू ..."


"मी सगळं करेल तुम्ही सांगाल तस पण प्लिज माझ्याशी असा अबोला नका धरू.....खूप खायला उठत रे हे....मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय.."


"आई- आम्ही  असणारच आहोत सोनू...... मूल कशीही वागली तरी आई बापाचं कर्तव्य कधीही चुकत नसतात... जगाच्या लाजकाज ते आम्ही करणारच..
तू फक्त सासरकडून कोणत्याहि तक्रारी येऊन देऊ नकोस.....जेणेकरून आमची मान लाजेने खाली जाईल."

"मी अस काही नाही करणार ग...ज्यांन तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागला...मी रोहन आणि त्यांच्या फॅमिलीला नीट बघेल..."


शाल्मली आईच्या गळ्यात पडून रडू लागते, मिहीर आणि शंतनू ही इमोशनल होऊन  जातात.मिहीर तिच्या डोक्यावर हात ठेवून बाहेर निघून जातो."


बाबा दरवाज्यातूनच सगळं पाहतात पण तिच्याशी चक्रशब्द ही बोलत नाही..


सगळ्यांची माफी मागितल्यामुळे तिच्या मनावरचं ओझं जरा कमी झाल्यासारखं वाटत.लग्नाचा दिवस.......


पार्लरवाल्या तिला तयार करत होत्या. भरजरी शालू त्यावर शेला साजेसा मेकअप.. हातभार बांगड्या... काकान... मुंडावळया......खूप सुंदर दिसत होती ती..


आणी ती आली....


अदिती....


"आदू........"


"मेरी जान ...तू काय करत आहे....तू का हे करतेयस......?"


"आदू गप्प बस....." मेकअपवाल्यानं थोडा वेळ बाहेर पाठवून त्या दोघी आत बसतात..


"सोनू का?"


"नको ना आदू....मी ठीक ये.... आणि लग्नाला तयार ही आहे..."


"मी तयारी केली आहे सोनू.... त्याच्याशी बोलणं ही झालाय.... कार खाली आहे.....आपण निघतोय...... आतच्या आता..."

"नको आदू ....
वेड लागलय का तुला.....
घरचे जीव घेतील.....""अजुनही बाकी आहे का? आग हैवान आहेत तुझ्या घरचे....त्याची जी हालत केली आहे ना....कोणी दुष्मनासोबतही अस वागू शकत नाही..."


"सगळी चूक माझी आहे आदू आता नको त्या मोहात मला पाडू नकोस..."
"मोह ......
बावळट मुली...प्रेम केलं होतंस ना...?
आग तो मरून जाईल..
तुझ्यासाठी किती वेडा आहे माहिती आहे ना....
त्यानेच मला इथं पाठवलं आहे....आपण इथून लांब निघून जाऊ..""आदू तुला समजत नाही का?
आग घरचे कुठूनही शोधून काढतील मला...आण मारून टाकतील दोघंनाही..
आत खूप उशीर झाला आहे...""मग तुझ्या सो कॉल्ड नवऱ्यासोबत जगशील का?????


"हो रोहन चांगला मुलगा आहे.."


"असेल पण.... तुझं प्रेम नाही...
तू जास्त डोकं नको चालवू...."


"आदू आता जर मी चुकले तर मला कोणीच माफ नाही करणार आणि मी स्वतः ला पण माफ नाही करू शकणार."


"मग हे प्रेम करण्याअगोदर सुचलं नाही का शहाणपण.. का बरबाद केलंस तुमच्या दोघनच आयुष्य..."


"चूक झाली माझी..."


"होणं मग अशी चूक अजून एक कर आणी चल, माझ्या पोलिसात ओळखी आहेत.
तुम्हाला काही होऊन नाही देणार मी."


"आदू समजून घे...वरात येईल आता... घरच्यांची खूप इज्जत जाईल...आई बाबा कोणाला तोंड ही दाखवू शकणार नाहीत....
अन रोहन....!!!
तो आधीच खूप पोस्सेसिव्ह आहे माझ्यासाठी... त्याला काही समजलं तर अजून कोणाला नाही दुखवायच मला!!"


"रोहनची अन सगळयांचि काळजी आहे तुला आणी त्याची?"

"तू पहिल्यापासूनच घाबरट आहेस, आज थोडी धीट बन नाहीतर आयुष्य खूप कठिण होऊन बसेल ग"


"मला मान्य आहे पण आता मी कोणताही वेडवाकड पाऊल उचलणार नाही.""हो ना...त्याच काय..."


"तो सावरून घेईल स्वतला..."


"मग हे घे...तू त्याला स्वतः सांग.."


"मी नाही बोलू शकणार त्याच्याशी..."


"आज तुला बोलावं लागेल...घे आलाय त्याचा कॉल....."

थरथरत्या हातानेच तिने मोबाईल घेतला.


"हॅलो..."


"हॅलो...सोनू...."
"हूं..."


"तू बरी आहेस ना...खूप त्रास झाला ना माझ्यामुळे...
मी खूप वाईट आहे न....माझ्या परीला अर्ध्यावर सोडून दिले..."


"तू अस नको बोलुस."


"सोनू.....राजा..... आदू बोलतेय तस कर ......खाली कार आहे.......निघून ये..... आपण इथून लांब निघून जाऊ.....
कोणीही आपल्याला हातही लावू शकणार नाही...""तू समजून का नाही घेत येस...... वेळ निघून गेली आहे..... मंडप पडला आहे , पाहुणे आहेत, थोड्याच वेळात अक्षता पडतील...... खूप नाचक्की होईल रे.....
मी अस नाही करु शकत.....मला माफ कर....""राजा.... थोडी हिम्मत दाखव....
मी असेल पावलोपावली तुझ्यासोबत.... अस करू नकोस सोनू....मी नाही जगू शकत....
हे 20 दिवस कसे काढलेत मला माहितीय....
अन तुही माझ्याशीवाय जगू नाही शकणार...."


"तुला फक्त मी सांभाळू शकतो..... तूच तर अस म्हणायची ना.....
आज प्लिज सगळं धीर एकवटून एकदा तो उंबरठा ओलांडुन ये.....""तुला समजत कस नाही...मी नाही येऊ शकणार,
तू प्लिज मला विसरुन जा."


"शाल्मली ही मजाकची वेळ नाहीये....""मी करतही नाहीये.... मी माझ्या निर्णयावर ठाम आहे...मी लग्न करणार.... मी माझ्या घरच्यांना अजुन दुखावू शकत नाही.... बाबा मारून टाकतील सगळ्याना.....असा श्राप घेउन आपण सुखाने राहू शकणार नाही..."


"ते मी घेईल बघून.... शाल्मली तू येत आहेस बस...."


"मी नाही येणार...."


"तू प्लिज यापुढं माझ्याशी कोणताही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नकोसआणि यदाकदाचित कुठं दिसलेच तर ओळख ही दाखवू नकोस....""सोप्प वाटतेय का तुला.....?
तू चुकतेयस सोनू........"


"हो पण यातच आपली भलाई आहे...तू मला विसरू जा..... आणि तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर.""मला तुझ्यासोबत जगायचं आहे......बाकी कोणी नकोय मला""तू समजून घेण आता माझ्यात कसलीच  सहनशक्ती नाहीये.""आदू- सोनू रोहनचा कॉल येतोय..."


"हम्मम्म्म..."


"सोनू तू माझ्याजवळ ये तुला कोणाचीच कमी मी भासू देणार नाही."


"मला माहिती आहे.....पण तू जर खरचच माझ्यावर प्रेम केलं आशील तर मला फोर्स करू नकोस."


"अस कस म्हणू शकतेस तू?"


"कोणी मला माफ नाही करणार मग...... आणि स्वतः मी पण ..."

"सोनू......I LOVE TOU MORE THAN MY LIFE.......
DON\"T DO THIS WITH US...""I KNOW..."


"पण तुला माझी शप्पथ आहे.....आपलं नात.... मी......सगळं विसरुन जा...."


"मी नाही करू शकत हे...."


"मग माझ्याजवळ एकच पर्याय आहे..."


"कोणता?"


"स्वतःचा जीव देणे."


"सोनू..."


"अदिती- तू वेडी झाली आहेस का?""ठीक ये तूला हेच हवं आहे ना ठीक ये मी यापुढं कधीच तुझ्यासमोर नाही येणार""Am sorry ...""तू कशाला सॉरी म्हणतेस.... माझंच नशीब खराब आहे...ज्याच्या नशिबात तू नाहीस."


"अदिती- रोहन खुप वेळ झालं तुला कॉल करतोय सोनू....""तू स्वतःची काळजी घे मला प्रॉमिस कर तू सगळं विसरुन move on करशील..."


"मी अस काही प्रॉमिस तुला नाही करणार..."


"प्लिज....माझ्यासाठी..."


"हममममममम प्रयत्न करेल."


"तू लांब जा इथून सगळ्या आठवणी जिथं पुसल्या जातील."


"हम्मम्म्मम्म्म...""जमलं तर मला माफ कर; मी कधीच तुझ्या लायक न्हवते.""अस नको म्हणूस......आज एक प्रेयसी म्हणून जरी तू हरली आशील तरी मुलगी म्हणून जिंकली आहेस."


"Am sorry..."


"Sonu..."


"Ha..."


"I LOVE YOU SWEETHEART "


I LOVE YOU TOO VEER........."


CUT....."अदिती- तू हे चांगलं नाही केलंस सोनू तुझ्या एका निर्णयामुळे खुप जण दुखावले जातील."


"मला माहीती आहे..."

"तुझं काय माझी राणी..... तुझ्या अस्तित्वाच काय...?तितक्या परत रोहनचा कॉल येतो..


"यापुढं रोहन असेल माझं अस्तित्व....
माझं सर्वस्व...एक बायको म्हणून मी माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही..
माझ्या आईवडीलांची मान खाली झुकवणार नाही.."


तितक्याच दरवाजा वाजतो...


दोघी घाबरून जातात..


अंजली दरवाजात असते...


"इतका उशीर का लागला..?"


"वन्स कोणाशी बोलताय?"


"रोहन..... "


"बघू...."ती हिसक्याने मोबाईल घेते तर रोहन असतो..तसा परत तिला देते... "आवरून घ्या..""हॅलो,"


"अहो.""सोनू मी किती वेळ झालय कॉल करतोय.."


"आवरत होते..."


"Ok...
झालं आवरून.."


"हो..."


रोहनला कोणीतरी बोलवलं तसा तो तिला बाय म्हणून गेला..."आदू...""तू बोलू नकोस माझ्याशी सोनू तू खूप वाईट वागलिस त्याच्यासोबत, तुला काय वाटत हा खोटा मुखवटा घेऊन तू सुखाणे राहू शकशील...खुप अवघड जाणार आहे तुला ....आज स्वतः साठी जी काही स्टँड नाही घेऊ शकली..... तिची कसली आलीये अस्तित्वाची लढाई..
तुझ काहीही अस्तित्व  नाहीये....
मार्क माय वर्डस...
Happy Married life..... shalmali....."


"आदू कुठं चालली आहेस तू......?\"

"मला हे बघवणार नाही सोनू.....मला माफ कर....अदिती तसच तिच्याकडे न बघता निघून जाते.....


शाल्मली तशीच आसव गालात तिथं बसून घेते.


"मला माफ कर..... मी खूप वाईट आहे ना..."अंजली आणि बाकीच्या बायका ही येतात........
थोडासा मेकअप टचअप करून तिला लग्न मंडपात आणलं जात....

मंगलाष्टके होऊन अक्षता पडता........सगळ्या विधी होतात.....

देवब्राह्मणांच्या साक्षीने शाल्मलीच्या गळ्यात रोहनच्या नावच मंगळसूत्र बांधलं जात...........


विदाईच्या वेळी ती सगळ्यांच्या गळ्यात पडून खूप रडते....

आई  , मिहीर, शंतनू, छोटा आरव चे डोळे पाणावतात......"बाबा ..."


"सुखी राह!आई बापाच्या नावाचा उद्धार होईल असं काही वागू नकोस..."


अंजली तिच्यासोबत पाठराखिन म्हणून येणार असते......
क्रमशः


हेय कसा वाटला पार्ट कॉमेंट्स करायला विसरू नका.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself