Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 6

Read Later
 अस्तित्व - एक लढाई भाग 6

अस्तित्व - एक लढाई भाग 6

 

 

दोघेही निवांत असे झोपले होते... सकाळी रोहनला नेहमीप्रमाणे लवकर जाग आली...शाल्मली अजूनही त्याच्या शोल्डरवर शांत अशी झोपली होती.

न जाणो कित्येक दिवस तिला अशी झोप लागली होती की नाही, त्याने तीला हळुवारपणे तीच डोकं खाली ठेवले आणि फ्रेश होऊन जिमला निघून गेला. जिममधून येऊन तो बाथ घेऊन तयार ही झाला पण ती अजूनही झोपलेलीच होती.

त्याने तिला उठवलंच नाही त्याच त्याच ऑफिससाठी तयार होऊन ब्रेकफास्ट बनवायला खाली आला.

 

 

काही वेळाने तिचे डोळे उघडले, आजूबाजूला बघितलं तर कोणीच न्हवत... तिची झोप मोड होईल म्हणून त्याने पडदे पण उघडले न्हवते... ती तशीच उठून बेडला टेकून बसली. कालच दिवस खूप काही शिकवून गेला होता तिला..

 

 

"रोहन कुठ आहेत??

त्यांना राग आला असेल का माझा??"

तिच्या अंगावर अजूनही तोच वनपीस होता...

"मी....काल खुप विचित्र बेहेव केलं...

मला त्यांची माफी मागायला हवी...

पण किती वेळा मी त्यांना सॉरी म्हणू... 

आता मलाच स्वतःची लाज वाटायला लागली आहे.

लग्नाचा निर्णय मी पूर्ण विचाराणीशी घेतला होता...

मग आता मी माघार घेण्याचा विचार कसा करू शकते....?

रोहन  माझ्यामुळे सफर का करावेत..?

आदू म्हणली तस त्यांचा ह्याच्यात काहीच दोष नाहिये...

किती पेशनटली ते काल बोलत होते...

माझ्या मुर्खपणामुळेच मी त्यांना राग आणून दिला.

सगळे म्हणतात तस ते आहेत रागीट पण माझ्यावर का नाही दाखवत मग?

काल त्यांच्या जागी दुसरा कोण असता तर त्याने मला समजून नक्कीच नसत घेतल." 

 

"पण रोहन........"

"खरच करत  माझ्यावर इतकं प्रेम करत असतील का ते?"

"पण आम्ही तर तस जास्त भेटलो पण नाहीत...?"

मग ?

मी काय करू देवा तुम्हीच मार्ग दाखवा.....मी अजून त्यांना दुखावू शकत नाही....आहेत कडक पण प्रेमळपण वाटतात." 

 

"आता खाली असतील का.??

की रागाने कुठं गेले असतील...... 

ती तशीच  पटकन बेडवर उठून उभी राहिली ....ड्रेस नीट केला आणि पळतच खाली आली." 

 

हॉलमध्ये, बाकीच्या रूममध्ये बघितलं तर तो कुठंच न्हवता,किचनमधून आवाज आला म्हणून तिकडं गेली तर तो  काही तरी बनवत होता.

 

 

 

निळया रंगाचा  चेक्सचा शर्ट थोडयाशा फोल्ड केलेल्या बाह्या, त्यावर ब्लॅक ट्रोउझर,हातात घड्याळ , मस्त सेट केलेले हेअर्स, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास, खूप ग्रेसफुली तो व्हेजटेबल्स कट करत होता. 

 

आज फर्स्ट टाइम ती त्याला निरखुन बघत होती, नाहीतर लग्न जमल्यापासून तिने त्याला नीटस बघीतलं ही न्हवंत...काहीही आवाज न करता ती त्याला बघतच होती. 

 

कोणीतरी आल्याचा आभास झाला की काय म्हणून त्याने बघितलं तर ती दरवाज्यात उभी होती...कालचाच ड्रेस ....केस थोडेसे विस्कळीत झाले होते पण कालच्यापेक्षा आज चेहरा थोडा फ्रेश दिसत होती....थोडीशी वेंधळी..

 

 

"Good morning....."

 

 

"ह........"

 

 

"I said Good Morning.....शाल्मली...."

 

 

"Good morning....."तीने कसणूक हसून त्याला ग्रीट केले....

 

 

"मी करू का?"

 

 

"नको तसही मला आज लेट झालाय..... 

तू फ्रेश होऊन येतेस का मग आपण एकत्र ब्रेकफास्ट करु?

If you don't mind ?"

 

 

"Yes sure give mi 10 minits....."

 

 

"Good"

 

 

तीने पटकन जाऊन  बाथ घेतला आणि  प्लाझो आणि कुर्ती घातली आणि पळतच खाली आली, केसातून अजूनही पाणी टपकत होत. चेहऱ्यावर फक्तच पावडर , नाजूकशी टिकली आणि छोटासा सिंदूर 

 

तिला बघुनच तो हरवुन गेला....

पण अजूनही ती त्याच्याकडे कोणत्याही भावनेने बघत नाही हे त्याला माहिती होत म्हनुन त्यानेही तिच्याकडे जास्त बघितलं नाही. 

 

पण तिलाही कुठंतरी तो आपल्याला इग्नोर करतोय हे जाणवू लागल होत.

 

 

"मी काही करू का?"तिने कचरतच विचाराल.

 

 

"नको मी केलं आहे....तू ऑम्लेट तर खाणार नशील ना?"

 

 

"नाही"

 

 

"हम्मम्म हे घे ओट्स......आणि ज्यूस...."तो तिच्याकडे न बघता त्याचा नाश्ता करत होता.......

 

 

तीही चुपचाप खात होती....हळूच मान वर त्याला बघत होती पण तो मोबाइलमध्ये बघत त्याचा ब्रेकफास्ट संपवत होता..

 

 

"शाल्मली...."

 

 

"हा.."

 

 

 

"मी ऑफिसमध्ये चाललो आहे..

थोडं काम कॅम्पलिट कारायच आहे...

सो 5 वाजता येईल मी...."

 

 

"ठीक ये.."

 

 

"मी माझी बॅग भरली आहे...तू तुला जे हवंय ते भरून ठेव... ८ वाजताची फ्लाइट आहे  आपली..."

 

 

"हो..."

 

 

"तुमचा लंच??"

 

 

 

"करेल मी ऑफिसमध्ये...तू करून घेशील..... जेवण स्कीप नको करुस."

 

 

 

"हो."

 

 

 

"काही लागलं तर मला कॉल कर...."

 

 

"चालेल....."

 

 

तिला बोलायच तर होत पण शब्दच फुटत न्हवते... आणि रोहन ऐकण्याच्या तयारीत ही वाटत न्हवता

घाईत होता....

 

 

चुपचाप तो बॅग घेउन निघून गेला जातानाही तो एक नजरही तिला बघून गेला नाही.

 

 

"मी खूपच चुकले काल?

अस न्हवत वागायला पाहिजे मी?

पण  काय करू?

माझं मन अजूनही त्यांना स्वीकारायला धजावत नाही..... ते चुकीचे नाही माहिती आहे मला.... मीच कमी पडत आहे....." 

 

तिने ब्रेकफास्ट करून घरातील थोडीबहुत काम केली.... आणि बॅग भरायला घेतली.

तितक्यात दरवाजाची बेल वाजली, ती कोणालाच ओळखत न्हवती.

रोहन ही न्हवता मग कोण आलं असाव?

 

 

 

तिने दरवाजा उघडला तर 25 - 26 वर्षाची मुलगी होती.

 

 

"हॅलो वहिनी मी तारा?"

 

"हाय.

मी ओळखते का तुम्हांला?"

 

 

 

"अहो अस काय करताय?

लग्नात भेटलो की आपण.??"

 

 

"लग्न????

मला काहीच कस आठवत नाही....?शाल्मली तुना...

मरशील अश्याने..." 

 

"सॉरी मी नाही ओळखलं ......"

 

 

"मी तारा.. 

तुमचा नवरा आहे ना त्याच्या बेस्ट फ्रेंडचीची बेस्ट बहीण."

 

 

"कोण बेस्ट फ्रेंड्?"

 

 

"अरे देवा ... आता येऊ का मी?

का अस दरवाज्यातून चौकशी करणार तुम्ही?"

 

 

"सॉरी सॉरी....याना...."

 

 

"तुमचा नवरा रोहन आणि ध्रुव माझा भाऊ जिगरी दोस्त आहेत. मी त्याची बहीण.... इथं शेजारीच राहतो आम्ही.....दादा डॉक्टर आहे माझा..

 

 

"ओकाय..."

 

 

"कॉफी करता का?

म्हणल तुम्ही विचारसाल पण तुमचे प्रश्न तर संपतच नाहीयेत."

 

 

"सॉरी मी करते."

 

 

शाल्मलीने दोघनसाठी कॉफी केली.....

 

 

"रोहन दादा जाताना सांगून गेलाय तुम्हांला काही लागत असेल तर बघ म्हणून...तस तर आईने आज संध्याकाळी जेवायला बोलावणार होती पण तुमची फ्लाइट आहे ना?"

 

 

"हो...."

 

 

 

"बॅग भरलीस का?"

 

 

"नाही आता घेत होते..."

 

 

"चल मग आपण भरूयात..रोहन दादाची ओर्डर आहे ....तुला हेल्प नाही केली तर चिडेल तो...

खूप चिडचिडा आहे यार तू कसा सहन करतेस त्याला...?"

 

 

"तुम्हांला पन वाटत ते कडक स्वभावाचे आहेत म्हणून...?"

 

 

"का ?

तुला नाही वाटत...?

आम्हांला तर नेहमी वाटायचं.... रोहन दादाची बायको कशी असेल ??

कसा सांभाळलं तो तिला.....देव जाणे अन तू तर इतकी नाजूक आहेस कस होईल तुझ.....?"

 

 

"हो का?"

मनांत "हे सगळे लोक मला भीती दाखव्हायच्या मागे का लागलेले आहेत.....?

मला तर रोहन नाही वाटत कडक...कदाचित माझ्यासाठी वेगळा असेल त्यांचा स्वभाव....."

 

 

 

"वहिनी कोणते ड्रेस काढले आहेत तू?"

 

 

"हे जीन्स... अन टॉप..." 

 

"Honeymoon ला असेल कपडे घालणार का तू?" 

 

"मग कसले घालू?" 

 

"सेक्सी  कपडे नाहीयेत का तुझ्याकडे?ज्याला बघुनच रोहन दादा तुझ्यावर फ्लॅट झाला पाहिजे.."

 

 

"काय" 

 

"आग घाबरतेस कशाला??मी तर माझ्यावेळी मस्त वनपीस घेतले होते..."

 

 

"तुमचं लग्न झालाय?"

 

 

"हो...."

"एक मुलगा पण आहे मला.....तुमच्या लग्नासाठी आले होते म्हणल थोडं माहेरपण खाउनच परत जावं" 

 

"छान..."

 

 

"तुझ्याकडे आहे का शॉर्टवनपीस..."

 

 

"हो म्हणजे 1-2 आहेत."

 

 

"घे मग ते..."

 

 

तारा तिची सगळी बॅग भरून देत होती,पहिलं शाल्मलीला ती वेगळी वाटली पण नंतर मस्त वाटत होती, फ्री होती मनांत येईल ते बोलायची जास्तीची भीडभाड न्हवती ठेवत.

 

 

"झाली बॅग भरून...अजून काही राहील आहे का?तुला ऍड करायचं आहे का?" 

 

"नको झालं..."

 

 

"चल मग......"

 

 

"कुठं?"

 

 

"जेवायला.!!

रोहन दादा सांगून गेलाय तुला कंपनी द्या म्हणून.... नाहीतर तू जेवणार नाहीस..."

 

 

"न बोलता पन त्याना सगळं समजत..

कसे आहेत मला तर आता काही कळतच नाहीये..

किती कँफुजन आहे मला....त्यांच्याबद्दल..."

 

 

"येतेस ना?"

 

 

"हो 5 मिनिट.... मी एक कॉल करून येते.."

 

 

 

"ठीक ये मी खाली आहे.."

 

 

 

"एकदा कॉल करू का? जाऊ का विचारते....

राग गेला असेल का?सकाळी तर एकदाही बघितलं नाही वळून.."

 

 

"हॅलो...."

 

 

"येस..."

 

 

"आहो ...मी शाल्मली..."

 

 

"हम्मम्म्मम....."

 

 

"ते तारा आल्या आहेत ....."

 

 

"मग?"

 

 

"त्या म्हणतात ये... जेवायला घरी चल...काय करू?"

 

 

"जा मग...

घराची चावी खाली बाजूच्या टेबलावर आहे."

 

 

"ठीक ये....तुमचं जेवण?""

 

 

"करेल आता.."

 

 

 

"रोहन....."

 

 

"शाल्मली मला एका मीटिंगला जायच आहे, आपण घरी आल्यावर बोलू.."

 

 

 

"बर...

लवकर या...."

 

 

रोहणच्या चेहऱ्यावर हलकेच स्माईल आली...

आज कोणीतरी हक्काचं माणूस होत त्याची वाट पाहनार..

 

 

"हम्मम येतो.....बाय..."

 

 

"बाय....."

 

 

शाल्मली तारासोबत तिच्या घरी आई

आली.... ध्रुव तर न्हवता पण त्यांची आई होती... स्वभावाणे मवाळ होत्या त्या...

जेवण करून त्यांनी तिची ओटी भरलीनंतर ती परत घरी आली.... सगळं...परत व्यवस्थित चेक करून थोडा वेळ बसली तशीच तिचा डोळा लागला.

 

 

रोहन 5 वाजता आला तर घरात शांतता होती,तशीही ती काय आवाज करणाऱ्यातील न्हवती त्यात नवखी.

 

 

बेडरूममध्ये आला तर निवांत झोपली होती, पडदा थोडा उघडा होता म्हणून सूर्याची एक किरण तिच्या चेहऱ्यावर पडत होती आणी ती उशीनेच चेहरा झाकत होती, त्याला मज्जा वाटत होती कीती झोपेत होती की....

 

 

"आळशी आहे......खूप."

 

 

त्याने पडदा नीट केला जेणे करून तिच्या चेहऱ्यावर अजून किरण पडणार नाहीत अन फ्रेश होयला निघून गेला...

 

 

तिला जाग आली तर तो ड्रेससिंग टेबलच्या इथं उभा होता...नुकताच बाथ घेऊन आला होता म्हणून आंगावर पाणी दिसत होतं....मागून त्याचे मस्सल्स आणि टॅटू उठून दिसत होते...

 

 

"रोहन..."

 

 

"उठलीस का?

झाली झोप......?"

 

 

 

"हो ...."ती अजून आळसावलेलीच होती.

 

 

"मी खाली कॉफी करतो तू ये खाली...."

 

 

"नको मी करते ना..."ती बोलता बोलता पटकन उठून उभी राहिली....

 

 

 

"का?मी चांगली नाही बनवत का?"

 

 

 

"बनवता पण मला चहा आवडतो, कॉफी नाही....."

 

 

 

त्याला हसू फुटत होत.... 

पण कसबस कंट्रोल करून चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न तो करत होता..₹

 

 

"ठीक ये चहा करतो.... ये आवरून... उशीर होतोय.."

तो tshirt आंगावर चढवत खाली निघुन गेला.....

 

 

"ठीक ये येते..."

 

 

ती ही फ्रेश झाली....ब्लू जीन्स त्यावर टी शर्ट आणि डेनीमच जॅकीट,केसांचा बन बनवला होता, हातात घड्याळ, पायात शु,  माथ्यावर सिंदूर लावून ती खाली आली..

 

 

 

तो ट्रे घेउन आला तर तीच हे रूप त्याला खूपच नवखे होत खूप लोभस दिसत होती..नाजूकशी..

आता हिलाजवळ घेउन जोराची मिठी मारावी अस त्याला खूप वाटत होत.

पण अजून तितकी जवळीक दोघनमध्ये न्हवती....

म्हणून गप्पच बसला योगायोगाने दोघनच्या टीशर्टचा रंग सेमच होता.

 

 

"सगळं नीट घेतलंस ना?"

 

 

"हो तुमचं काही घाययचा आहे का?"

 

 

"नाही मी घेतलं आहे..."

 

 

"तुझे डोक्यूमेंट्स माझ्याकडे आहेत...."

 

 

"ठीक ये.."

 

 

"निघुयात मी कॅब बोलावतो."

 

 

"ठीक ये...

मी देव घरात दिवा लावून आले..."

ती मनोभावे देवाची पूजा करत होती जेणेकरून तिला शक्ती मिळेल आयुष्यात पुढं जाण्यासाठी ....दिवा लावून पाया पडून बाहेर आली.. रोहन बॅग घेउन आला होता."

 

 

"आहो..."

 

 

"काय?"

 

 

 

"तुम्ही नाही पडणार देवाच्या पाया."

 

 

 

मनांत "तस तर मी नेहमीच ट्रॅव्हललिगमध्येच असतो कधी पडणार?अन कधी गेलो ही नाही तिथं....

आता हिला काय सांगू?" तीच मनही त्याला मोडू वाटत न्हवत. 

 

"हा जातच होतो.."

 

 

तिच्यासाठी तो जाऊन पाया पडून आला, दोघेही कॅबनी एअरपोर्टवर आले...

 

 

"तू फ्लाईटने कुठं गेली आहेस  का म्हणजे तुला भीती वाटते का?"

 

 

 

"हो 2 - 3 वेळा गेली आहे...नाही वाटत तशी भीती."

 

 

"गुड..."

 

 

 

प्लेनमध्ये  ही 1-2 तास ठीक वाटलं म्हणजे मोबाईल वर टाइमपास पण नंतर  तिला बोअर होऊ लागलं...रोहन बीजनेस मॅगझीन वाचत होता म्हणजे दाखवत तर तसच होता तिला वाटत होतं त्याच्याही बोलावं पण त्याला राग येईल डिस्टर्ब केलं तर म्हणून परत बाहेर बघू लागली.

 

 

"शाल्मली...."

 

 

"हा...."

 

 

 

"काय झालं?"

 

 

"बोअर होतय...."

एक ओठ बाहेर काढून खूप innocently ती बोलली.... 

 

"हम्मम्म्म मूवी पाहणार."

 

 

"ठीक ये..."

 

 

""ते ध्रुव तुमचे बेस्ट फ्रेंड् आहेत का?"

 

 

"हो...... तो होता का घरी?"

 

 

 

"नाही...तारा अन आई होत्या.."

 

 

"करमल का तुला मग आज?"

 

 

 

"हो म्हणजे त्या कॉन्टिनु बोलत होत्या...मग वेळ कसा गेला कळलंच नाही."

 

 

 

"बोलकी आहे...ती खूप...."

 

 

 

"हो पन मनाने साफ आहेत."

 

 

 

"हो..."

 

 

 

"तुला दुपारी काय बोलायचं होत?"

 

 

 

"ते असच..."

 

 

"बोल आता आजून खूप वेळ आहे आपल्याला पोहोचायला."

 

 

"म्हणजे तुम्हाला राग आला का माझा?

म्हणजे आहे का अजून हे विचारायचं होत.....?"

 

 

"काय उत्तर हवंय तुला?"

 

 

"खरं?"

 

 

 

"तसा राग नाहीये मला पण वाईट वाटलं मी असा इमोशनलफुल नाहीये पण झालं फील तस.पण तुला माझ्याबद्दल काहीच फिलिंगस नाहीयेत.

आजवर खूप मुली येऊन गेल्या पण मी कोणालाच माझ्याजवळ भरकटू दिले नाही कारण कोणाच्यातरी भावनांशी खेळन मला आवडत नाही.

मी नेहमी ठरवलं होतं...मी ज्या व्यक्तिशी लग्न करेल तिलाच माझं आयुष्य बनवेल.....

हे फालतू अफेअर्स GF- BF कन्सेप्ट मला कधी रुचल्याच नाही म्हणून खूप नाही पण माफक अपेक्षा होत्या तुझ्याकडून..... पण ठीक आहे...."

 

 

"प्लिज अस नका बोलू ना."

 

 

"मग कस बोलू तू सांग...?

शाल्मली खोटी सहानुभूती नाही आवडत मला."

 

 

 

"रोहन तुम्ही जेजुरीत म्हणाला होता मला वेळ देसाल."

 

 

"देईल ना.... वेळ द्यायलाच आपण चाललो आहे , पण हे नक्की आहे शाल्मली मी स्वतःहुन तुझ्याजवळ नाही येणार आता."

 

 

"रोहन.."

 

 

"जोवर मला वाटत नाही तुला खरचच माझ्यासाठी भावना आहेत...तोपर्यंत नाही.."

 

 

 

????

"तुम्ही खूप रागावलेत का माझ्यावर...?"

 

 

 

"नाही ग..

तुझ्यावर रागावून मी काय करणार...?

कोणता बघायचा मूवी.."त्याने सरळ-सरळ विषय बदला.......

 

 

दोघेही संपूर्ण प्रवासात मोजकच बोलत होते.

 

 

बऱयाच तासांच्या प्रवासांतर ते पॅरिसला पोहोचले....

 

 

शाल्मली पार मरगळून गेली होती...हॉटेलपर्यतच्या कॅबमध्येच  तीने रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवून दिले..

 

 

"Tired.....??"

 

 

"हम्मम्म्मम "

 

 

"हॉटेलवर गेलो की बाथ घे ...आन आराम कर..."तो लहान बाळाला समजावतो तस तिला सांगत होता.

 

 

"सगळं फिरतय अस वाटत आहे."

 

 

"थोडा वेळ वाटेल फक्त"

 

 

सगळी बुकिंग त्याने अगोदरच केली होती म्हणून कुठंच जास्त वेट करावा लागला नाही.खूप सुंदर असा honeymoon स्वीट त्याने बुक केला होता, ज्याला बघुनच तिचा थकवा कमी झाला.

 

 

फ्रेश होऊन ती खिडकीतून बाहेर बघत होती...सगळं खूप वेगळं ....फ्रेश वाटत होतं ...

 

 

"आवडलं का?"

 

 

 

"हो खूप सुंदर आहे..."

 

 

"हो .."

 

 

 

"टी  कॉफी?"

 

 

"रोहन मला भूख लागली आहे..

 

 

"तुला ठीक वाटत असेल तर बाहेर जाऊ फिरायला म्हणजे चालून जरा बर वाटल आणि बाहेरच खाऊ काहीतरी.."

 

 

 

"हम्मम्म चालेल."

 

 

"ती तयार होऊन आली"

 

 

High west जीन्स आणि त्यावर क्रॉप टॉप.....छोटस सिंदूर, हातात ब्रेसलेट, मंगळसूत्र, पायात संडेल्स.. नो मेकअप....

 

 

"ही अशीच माझ्यासमोर येत राहिली तर मी कसा स्वताला सांभाळू?"

 

 

"आहो निघायचं?"

 

 

"हो चल....."

 

 

दोघेही जिथं वाट फुटेल तिथं फिरत होते,नविन जागा होती म्हणून तिने त्याचा हात सुरुवातीला जो पकडून ठेवला होता तो शेवटपर्यंत सोडलाच नाही बाहेरच खाऊन दोघ परत रूममध्ये आले. तिच्यासाठी त्यानेही आज व्हेजच खाल्लं. प्रवासाने दमले होते म्हणून पडल्या पडल्या लगेच झोपी गेले..

 

 

दुसऱ्या दिवशी ही रोहन तिला सिटी दाखवायला घेउन गेला..... तिला काय हवं नको ते सगळं  बघत होता... क्षणभर पण तिला लांब जाउन देत न्हवता. तिला खूप सारी शॉपिंग करून देत होता.... तीही गुड्डू ,आई, शंतनू आदूसाठी काही न काही घेत होती..

 

 

कोणी तरी आपल्याला इतका महत्त्व देतेय,ही भावनाच किती सुखदायक असते. रोहन त्यान दिलेला शब्द पाळत होता... जवळ तर होता पण जवळीक साधण्याचा प्रयत्न ही करत न्हवता...

पण नवरा म्हणून तो त्याचा अधिकार आहे अन आपण तो हिरावून घेतोय हे तिला आतून खात होत. 

 

पण आता काय? 

 

तिन स्वतःहून पुढाकार घेणं तर या जन्मात तर शक्य न्हवत...

 

 

आज तो तिला पबमध्ये घेउन आला होता. रोहन पेग वर पेग घेत होता, ती सोफ्टड्रिंक घेऊन आजूबाजूला बघत होती बरेच जण स्मूच करत होते बिनधास्त. 

 

"डांस करणार शाल्मली..?" 

 

"चाललं.."

 

 

रोहन तिला डांस फ्लोअरवर घेउन आला, तील परफेक्ट डांस येत होता पण घरच्यांनी हे त्याच्यापासून लपवल होत.

डांस करता करता दोघही बरेच जवळ येत होते आज तीने शॉर्ट वनपीस घातला होता.

 

 

"सोनू.." 

 

"हा...."पाहिल्या रात्रीनंतर आज तो तिला सोनू म्हनाला होता, कुठंतरी हे तिला सुखावत होत.

 

 

"खूप सुंदर दिसतेयस तू...."

 

 

"थँक्स.."

 

 

"रोजच तशी छान दिसतेस... 

सोनू तुला का नाही कळत मी किती प्रेम करतो तुझ्यावर?

मी इतका वाईट आहे की तुला आवडत नाही..?"

 

 

"तस नाहीय रोहन."

 

 

"मग कस आहे?मला कारण जाणून घायच आहे...तुला जाणून घायच आहे सोनू...?"

 

 

"रोहन ..!!"

 

 

तिच्या मनात वीरच्या आठवणी अजूनही ताज्याच होत्या.... 

 

"मन काही फुलपाखरू नाही एका फुलाचा गंध घेतला की दुसऱ्यावर जायला..... " 

 

वीर वर तीच खर प्रेम होतं जरी आज रोहन तिच्या आयुष्यात असला तरी इतका सहजासहजी ती त्याला कस विसरू शकेल? 

 

"बोल ना सोनू....मला हवी आहेस तू.......कायमस्वरूपी..... शरीराने, मनाने..... 

सर्वस्वी फक्त रोहनची असेल शाल्मली..."रोहन तिला जोरात मिठी मारली आणि तीच  भितीने आंग शहारल..

 

 

 

""हो ????

मी फक्त तुमचीच आहे....""

 

 

हे बोलतानाही तिच्या मनाला किती अगनिक वेदना झाल्या होत्या.

 

 

पण रोहन खूप आनंदात होता, रीअली सोनू?"

 

 

तिने चपळाईने डोळे पुसले....

"हो रोहन...."

 

 

"I can't believe this...

Am sure am not forcing you..honey"

 

 

"No......"

 

 

"Ohhhhhhhhhh my sweetheart..

तुला माहिती ही नाहीये तू किती मोठा आनंद मला दिला आहेत..." 

 

"SONU  I want to tell you something.."

 

 

 

"What ?"

 

 

"I LOVE YOU SWEETHEART....

I LOVE YOU SO MUCH..."

त्याने परत तिला मिठी मारली.

 

 

"HMMMMMMMM..."

 

 

थोडं बहुत खाऊन दोघेही हॉटेलमध्ये परतले.रोहन कॅबमधेच तिला जवळ घेऊन हातांच्या बोटाशी खेळत होता त्यावरून तिला आज काय होणार याचा थोडा अंदाज आला होता. 

 

पण काहीही झालं तरी ती  आज स्ट्रॉंग राहणार होती. रोहनला दुखवन आता तिलाही सहन झालं नसत कारण त्याच्याशिवाय आता तिला कोणीही न्हवत.

 

 

रूममध्ये आल्यावर ती वॉशरूममध्ये गेली आणि चेहऱ्यावर सतत पाणी मारून स्वतःला आजच्या रात्रीसाठी मानसिकरित्या तयार करू लागली.

 

 

थोडं फ्रेश  होऊन ती बाहेर आली....तर रोहन झोपला होता..... पण चेहऱ्यावर एक सुंदरशी smile होती...खूप निरागस भासत होता तो...

तिने त्याला नीट झोपवलं... शूज, वॉच काढल... शर्ट कसा बसा काढला आणि  पांघरूण टाकून नीट झोपवलं. 

 

झोपेतही तो "  I LOVE YOU SONU......"

म्हणत होता...

 

 

तो आपल्याला इतकं प्रेम करतोय हे ती पचवूच शकत  न्हवती.

 

 

क्रमश: 

 

एका नवख्या माणसासोबत राहणं तेही आपल्या मनात नसताना खूप अवघड असत.. 

तुम्ही बाबा बिलकुल कॉमेंट्स करत नाही मला कस समजणार तुम्हाला कथा आवडतेय की नाही आवडली तर कॉमेंट्स नक्की करा आणि स्क्रीनवर हार्टच ❤️सिम्बॉल आहे ते प्रेस करून लाईक जरूर करा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself