Jan 26, 2022
नारीवादी

अस्तित्व - एक लढाई भाग 7

Read Later
अस्तित्व - एक लढाई भाग 7


अस्तित्व भाग 7सकाळी ती लवकर  उठून आवरून बसली कॉफी  मागवली. तरी तो उठला नाही."आहो..."

"रोहन......उठ ना....."

"खूप लेट झालाय...."


तो खूपच गाढ झोपेत होता..
तिच्या त्या चिमणीच्या आवाजाने तो जराही हलला  नाही
म्हणून तिने त्याला थोडस हलवून उठवलं.


सोनू….थोडा वेळ झोपू देना कूस बदलून परत तो झोपी गेला .


"रोहन उठा नाsssss.....लेट झालाय खूप..."


"बर बाबा उठतो..." तो उठून बेडला टेकून बसला डोळे अजूनही बंदच होते पण तिचा काहीच आवाज नाही म्हणून नीट बघितलं तर ती रागात वाटत होती."हे घ्या स्ट्रॉंग कॉफी"


"सोनू तू रागावली आहेस का?"


"तुम्हाला माझ्या रागाचं काय घेणदेण आहे.....?"


"अस कस ....
काय झालं बोलशील का?
जास्त झाली होती मला काल...... सॉरी
पण मी बऱयापैकी शुद्धीत होतो"
त्याने स्वतःची बाजू पटकन सावरून घेतली.


"हो...."


"बर मी आलो आवरून मग बाहेर जाऊ..." त्याने पटकन काढता पाय घेतला.


"अस वागतात की काहीच झालं नाहीये."


रोहन आवरून बाहेर आला तोवर तिनेही आवरून घेतलं. आज तिने लॉंग गाऊन घातला केसा मोकळे सोडले, साधासा मेकअप केला.


रोहन ही टी शर्ट जीन्स त्यावर जॅकेट अडकवून तयार झाला. रोहन खूप कॉन्फिडेंट होता कोणताही ड्रेस घातला तरी त्याला चांगलंच दिसायचं. गेल्या 3-4 दिवसात ते बरेच फिरले होते, आज Eiffel tower ला जाणार होते..


रोहन तिला बरीच माहिती पुरवत होता.


"तुम्ही आले आहेत का आधी पण....?"

"हो एकदा आलो होतो."


"Oky.... फिरायला आवडत का तुम्हांला?"


"हो आवडत सोलो ट्रिप पण आवडते.....कोणी पार्टनर न्हवता न आजवर" त्याने तिला एक डोळा मारला..

"ध्रुव ?ते अन बाकीचे फ्रेंड्स पण जाता का?"


"हम्मममजस जमलं तस जातो पण माझं कामच अस आहे की मला दुसऱ्या सिटीत, परदेशात जावंच लागत मग बघून घेतो ती सिटी पण.
कस आहेना सोनू....
एकटही जगता आलं पाहिले....
नेहमी आपल्यासोबत कोणी ना कोणी असेल असं सांगू शकत नाही ना आपण.....?
काही रस्ते एकट्यानेच पार करायचे असतात......
म्हणून.."


"हम्मम्म्म  रोहन पण मला एकटेपणाची भीती वाटते म्हणजे जीवनात प्रत्येक पावलावर साथीची गरज लागतेच की."


"हो बाळा.......तुझंही खर आहे.. म्हणून तर तुझ्याशी लग्न केले आहे. तू देशील ना प्रत्येक पावलावर माझी साथ?आशील ना माझ्यासोबत .....?????


"हो देईल ना....."
ती Eiffel tower  कड बघत नकळतपणे बोलून गेली...


रोहनलाही हायस वाटत ती रुळत होती.
"तुला काल मी काही बोललो होतो का वेडवाकड?"


"नाही.... का ओ?"


"असच..."


"तुम्ही नेहेमीच ड्रिंक करता..."


"सोनू अश्या फॉरेन कंट्रीजमध्ये थंडीमध्ये वाचायचं असेल तर ड्रिंक तर करावी लागेलच ना?""मग तिकडं..?इंडियात...."


"तिथंही करतो माझ्या बॉडीला आता सवय लागून गेली आहे.""कमी नाही करू शकत...""मी जास्त घेतच नाही कमी करायला."


"हम्मम्म्मम्म्मम...."


बराच वेळ रोहन आणि ती बोलत होते.... stupid questions विचारत होती पण त्याला आवडत होत.
कोणालाही जास्त entertain न करणारा तिच्या तसल्या questions ची पण नीट उत्तर देत होता.फिरता फिरता संध्याकाळ होत आली होती, आज तिला बर वाटत होतं....थोडंस मोकळं ...
फिरता फिरता एका ब्रिज जवळ आले होते.


"सोनू भूख लागली आहे का तुला.?"


"हो आता लागली आहे.."


"काय खाणार.?"


"मला तर इथं आल्यापासून काही कळतच नाहीये मी काय खातेय ते?"


"आज सांगतो..." तो हसू आवरत बोलला

ती त्या वाहत्या खळखळनाऱ्या पाण्याकडे पाहत होती.
मनात असंख्य प्रश्न तर होते पण उत्तर न्हवती अन कोणाला ते विचारूही शकत न्हवती.


"पाण्याचा गुणधर्म माहिती आहे काय आहे?"


"काय?"


"ते कधीही एकाजागेवर स्थिर राहू शकत नाही,
कितीही अडचणी येऊ देत कसलीही जागा असू देत ... खडक, पर्वत, उथळ जमीन ते कशाचीच भीडभाड न ठेवता सगळ्याला भेदून आपला रस्ता बनवतच.."

"आपलं आयुष्य ही असच असत सोनू...
मागे काय झालं, कस होत आयुष्य आपलं हे चघळत बसण्यापेक्षा पुढं जाण्यातच हुशारी आहे....
तुला हे का सांगतो महितेय?"


"का??"


"कारण अजूनही तू तुझी मागची लाईफ येथपर्यंत कॅरी करतेयस."


शाल्मली त्याच्या ह्या वाक्यावर शॉकच झाली..
क्षणात हृदय बंद पडाव..... असच काहीस झालं होतं..."तुम्ही काय बोलत आहात?""हो म्हणजे मला असच वाटत.... तू लग्न झाल्यावर जस वागतात तस वागतच नाहीयेस.... may be अजूनही तुझ्या माहेरच्या लोकाध्ये तुझा जीव अडकला  आहे...
तुला येत असेल त्यांची आठवण पदोपदी कळतंय मला..
पण सोनू... तुला यापुढं एकटीने हा रस्ता पार करायचा आहे...."


"अन तुम्ही?""मी असणारच ना बाळा.."त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला.


"माझ्या म्हणण्याचा उद्देश..... की तुला सगळ्या आठवणी नीट जपून ठेवून आपल्या नवीन आयुष्यची सुरुवात करणं गरजेचं आहे."


"हो मान्य आहे मला मी स्वतःला खूप गुंतवून घेतलं आहे.."

ती अजूनही पाण्याकडे बघत होती.


"सोनू......तू माझ्यात कधी इतकी गुंतून जाशील?"


"आहो..."


"मला खरचच अस रोमँटिक बोलता नाही येत....म्हणजे जस तुला सगळे सांगतात अगदी तसाच आहे मी...
पण तुझ्या बाबतीत नाही जमत मला कडक राहायला.."
तो हळूहळू जवळ येत होता....थंड हवेने उडणारे तिचे केस  सावरत होता.....ती भान हरपून त्याला बघत होती.

त्याच म्हणणं अगदी योग्यच होत....
निर्णय तिचा होता मग आता उगाचच स्वतला वीर मध्ये अडकवून ती स्वतःच स्वतःच आयुष्य धोक्यात टाकत होती.
त्या वाहत्या पाण्यासारख तिलाही ह्या सगळ्यातुन मार्ग काढायचा होता... तोही एकटीने.... कारण रोहन जरी सोबत असला तरी आंतरिक त्रास तिला एकटीला भोगायचा होता.

तिथं होणाऱ्या वेदना कोणीही वाटून घेणार न्हवत....
ती अनामिक नजरेने त्याला बघत होती...
जसजस तो जवळ येत होता तिच्या हृदयाची स्पंदन वाढत होती.

त्याने हळुवारपणे तिच्या नाजूक ओठावर त्याचे ओठ टेकवले आणि तिला कोणताही त्रास न देता.... किस
करत होता.... शाल्मली काहीच रेऍक्ट न्हवती करत.. सावधान मोडमध्ये उभी होती...त्याचे हात तिच्या पाठीवर होते.....काही सेकंदच त्याने तिला किस केलं आणि जवळ घेतलं.....


"I LOVE YOU SONU "


HMMMMM "


"तू खूष तर आहेस ना?"


"हो....."
आता तिला हिम्मत करणं गरजेचं होतं ,रोहन दुसर्यांदा स्वतःहून तिच्याजवळ आला होता तेही तिला न दुखावत. आज जर तिने एक पाऊल मागे खेचल असत तर... मात्र रोहन आणी तिच्यातील दुरावा वाढतच गेला असता.
त्याचा सहनशक्तीचा अंत घेण्याची हिम्मत तिच्यात न्हवती.
थोडस कचरतच तिने त्याच्या पाठीवर हात टेकवले.
तिचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता किती दिवस तो तरी दुरावा सहन करेल.


"जेवायला जायचं सोनू.."


"हम्मम्म्म...."


रोहन तील एक छानशा रेस्टॉरंटमध्ये घेउन आला....त्याला घासफूस खाऊन कंटाळा आला होता..... शाल्मलीसाठी डेसेन्ट डिश मागवून त्याने स्वतःसाठी नॉनव्हेज मागवलं आणि सोबतच ड्रिंक ही..
दोघहनी मिळून जेवण केलं....


तिला जॅकेट घालूनही थंडी वाजत होती.....

"सोनू..... तु थोडी ड्रिंक घेते का?बरं वाटलं....."


"पण मी कधी घेतलं नाही."


"काही होत नाही...थंडी कमी होईल तुझी..."
त्याने तिला रेड वाईन मागवली अन कस पियाची ते पण सांगितलं पण ते हळूहळू हलवून हलवून पिन तिला काही जमत न्हवत म्हणून तिने पटकन ते पिऊन घेतले.

"हळू बाळा...."


"अजून एक...."


"सोनू नक्की ना?"
त्याला हसू येत होत....
छोट्याश्या मुलींसारखं मला डॉल पाहिजे तस ती त्याला ड्रिंक पाहिजे म्हणत होती.


"हम्मम्म्म प्लिज..."


"Ok मागवतो..."


तीने 3 ग्लास वाइन पिली पण त्याच्यापेक्षा जास्त तो तिला देत नाही. पहिलीच वेळ होती म्हणून त्रास होईल की काय ह्याची त्याला भीती वाटत होती थोडीशी नशा तिला चढत होती.


चालायला ही पाय एकदा दोनदा अडखळला होता.


"सोनू मी घेऊ का तुला उचलून.."


"नको मी लहान आहे का उचलून घ्याला...?""खूप मोठी आहेस......चल ...."


"सोनू  जाऊन फ्रेश होऊन घे म्हणजे तुला बर वाटल
अन दरवाजा बंद नको करुस.."


"बर"

कसबस अडखळत ती वॉशरूम जाते आणि तोंडावर पाणी मारून येते..


रोहन बाहेरच थांबला होता..


"रोहन "

"मी आलो फ्रेश होऊन तू बस इथं"


ती बेडवर बसली.....
रोहन चेंज करुन आला तर.....
तीने तिचा लॉंग tshirt घातला होता .....
Knee च्याही थोडावर होता.... आणि शोल्डरवरून एका साईडने खाली ओघळत होता....तिचे नाजूक पाय, पैंजन, जोडवी, त्यावरची मेहंदी हळूहळू फिक्की होत चालली होती.. आणि गोरा रंग बघुनच रोहनचा ताबा सुटत चालला होता.....

"रोहन ...."


तिने 2वेळा आवाज दिला पन तो त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही...ती कसबस अडखळत  चालून त्याच्याकडे गेली.


त्याला हळवुन आवाज दिला तर क्षणात दचकला आणि दोघेही बेडवर पडले. तिला लागू नये म्हणून त्याने तिला स्वतःवर घेतलं केसांमुळे चेहरा झाकोळला होता त्याने एका बाजुला केस केले.नितळ अशी तिची कांती ,डोळ्यात निरागस भाव ती नशेत असल्याने हळूहळू डोळे उघडझाप करत होती.


तिच्या सर्वांगाचा त्याला स्पर्श होत होता ज्याने त्याच्या आंगवर रोमांच येत होते. स्वतला तो कधीच तिच्यात हरवून बसला होता नशेमुळे तिचा तोल जात होता.


त्याने तिला नीट बेडवर झोपवलं स्वतःही तिच्याजवळ पहुडला.


"रोहन..."


"हा सोनू...."


"Do you love me?"


"Off course
I love you so much sweetheart..."


"तू मला सोडून नाही जाणार ना????कधीच??""कधीच नाही....""मला मारणार नाही ना?"


"शाल्मली हे तू काय विचारत आहेस?"


"तुला सांगायचं आहे की नाही..?""


"नाही बाळा.... कितीही वाईट परिस्थिती येऊ देत मी तुझ्यावर कधीच हात उचलनार नाही."


"कधी मी खोट बोलली तर तू रागावणार?"


"नाही..."


"रोहन मला माहेरी नाही जायचं...... they all are bad...अंजली वहिनी खुप बॅड आहे.....सारखी रागवत असते मला.."


"सोनू तू नशेत आहेस आपण उद्या बोलू..."


"नाही आता म्हणजे आता..."ती हट्ट करून बेडवर मांडी खालून बसली.


"ठीक ये....नको जाऊस तुला जिथ जाऊ वाटेल तिकडं जा... मी काही बोलनार नाही."


"तिला आपल्या घरी नाही घायच....?"ती गाल फुगवून त्याला सांगत होती.


"कोणाला बाळा....?"
तिला जवळ घेत तो बेडवर टेकून बसला....


"अंजलीला... बॅड गर्ल.....नो बॅड वूमन..."


"बर बाबा नाही घायच...ज्याला माझी सोनू हा म्हणेल त्यालाच घेणार घरात मी."

"गुड बॉय..."

"तुला का नाही आवडत ती.....?""ती वाईट आहे...
मला मार बसवते.....
माझं नाव सांगते घरी......
माझे सेक्रेटस फोडते.....
मला खूप वाईट वाईट बोलते..... सारखे taunt मारते...
तिच्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात imp व्यक्ती हरवून बसली......
तिला नाही घ्याच आपल्या घरात तू घेतलं ना मग मी बोलणार नाही तुझ्याशी."

ती नशेच्या आहारी जाऊन काहीही बरळत होती.


"सोनू कोणती व्यक्ती?कोणाला हरवलं आहेस तू?"


मी ..."

ती झोके खात होती......डोळे बंद होत होते......मध्येच तिला उचक्या सुरू झाल्या


"पाणी हवंय.......मला..."


"हा देतो.."


त्याने तिला पाणी पाजलं....


"ती मला मार बसवते...मिहीरदा अन आई मग मारतात मला. अन म्हणते रोहनला पहिल्या रात्री जे करायचं आहे ते करू दे...तू त्याला अडवू नको पण मलाही भभावना आहेत ना?"
"काय?
म्हणून तू त्या रात्री घाबरली होतीस का?"


"हम्मम्म्मम्म !!!ती म्हणते तू रागीट आहेस...मी नाही बोलले तर मला ओरडशील..पण तिला माहितीच नाही ....तू तर नाही रागवत मला....""तुला मारत होते का ते लोक?""हो....त्याना मुलगी नको होती....पण शंतनू आणि मी जुडवा आहे ना.... मग...
मला बाबा लाड नाही करत......
घरी कोणीच नाही फक्त शंतनू.... अन आदू....  अन ....तो......"
तिचे डोळे पाणावले होते......"तो कोण?"

"आरव...."

"ओहहहहह मिहीरचा मुलगा...."


"मी आहे ना सोनू ...
आता तुला कोणीच काहीच करू शकणार नाही."


"पण तू लगेच चिडतोस..."


"करेल कमी चिडण्याचं.."


"गुड...."
ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती.....
रोहनला तिची मनस्तीती थोडी थोडी समजत होती.... अंजलीबद्दल तर त्याला मनात खूप राग येत होता....


"रोहन...."


"हम्मम्म्मम्म्म.."


"मला अजून वाइन हवी आहे...."


"काय?"


"हो छान आहे..... Test....
I want one More...."


ती खुप इमोशनल झाली होती अन तोही.... म्हणून जास्त आढेवेढे न घेता त्याने अजून वाइन मागवली......


दोघही घेत होते......
शाल्मली आता गप्प होती.... थोडं मनाला बर वाटत होतं तिच्या कोणाशी  तरी शेअर केल होत..

रोहन तिला बघत होता......कसबस तिने एक ग्लास घेतला असेल ठेवून देऊन ती गप्प त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती त्यानेही स्वतःचा ग्लास संपवला अन तीच डोकं खाली ठेवलं......

दोघही खूप जवळ होते शाल्मलीला रोहनमध्ये वीरची झलक दिसत होती. वीर ही तिला खुप समजून घायचा, रागात असली की तिला हवं तसं करून घ्यायचा मग शांत करून समजवायचा.


तिने अलगद तिचे बोट त्याच्या चेहऱ्यावर फिरवले..... तस रोहन त्याचे डोळे बंद केले, त्याचे श्वास वाढत चालले होते.शाल्मली त्याच्या केसातुन तिचा हात फिरवत होती, जसजसा तिचा हात फिरत होता तसतस त्याचा ताबा सुटत चालला होता.

शेवटी न राहवून तो बेभान होऊन तिच्या चेहऱ्यावर, मानेवर किस करू लागला.
शाल्मलीचा फक्तच सुस्काऱ्याचा आवाज येत होता,
तिच्या आवाजाने त्याला आणखी जोश चढत होता.
चेहऱ्यावर किस केल्यानंतर त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.ती डोळ्याची उघडझाप करत त्याला बघत होती...

"I love you shalmali..."

"I love you too"


ती त्याच्या चेहर्यावर तिचा हात फिरवत होती..... कानात हलकेच बोट फिरवत होती जेणेकरून त्याच्यात आणखी चेतना निर्माण होऊ लागल्या. तिच्या ओठावर कितीतरी वेळ किस करत होता.. तीही त्याला जमेल तसा रिस्पॉन्स देत होती.


रोहन हळूहळू सगळ्या कपड्याचा अडसर दूर करु लागला, दोघांचेही शरीर आता एकमेकांसाठी आसुसलेले होते.


शाल्मलीला असा कोणी तरी हवा होता जो तिला समजून घेईल....चांगल्या वाईट प्रसंगात तिच्या बाजूला हक्कान उभा राहील.....रोहन तसाच होता. आजपासून ती त्याची होऊन राहणार होती, दुसऱ्या कोणाचाही विचार मनात आणण ही तिच्यासाठी पाप होत.

आज ती सर्वस्वाने रोहनची झाली होती. तो तिला जास्त न दुखावत खुलवत होता, पहिला स्पर्श असल्याने असंख्य वेदना तिला होत होत्या पण रोहन खूप passionately, ग्रेसफुली तिला हाताळत होता.


ती त्याला हाताने ढकलत होती, तिचे नख त्याला टोचत होती पण त्याने त्याचा उत्साह अजूनच वाढत होता तिला जास्त त्रास तो देत न्हवता.आजपासुन ती त्याची झाली होती ही भावनाच त्याला सुखावत होती दोघही सुखाचा तो क्षण अनुभवत होते थकल्याने ती पटकन झोपून गेली पण तो किती तरी वेळ तिला पाहत होता, तरीही त्याच मन भरत न्हवत..
ती दोन्ही पाय जवळ घेउन त्याच्या कुशीत झोपली होती..


रोहननेही  दोघांच्या आंगवर ब्लँकेट ओढून घेतले आणि तिला जवळ कवटाळून तोही झोपी गेला.......क्रमशः......


मग मंडळी कसा वाटला आजचा पार्ट.....तुमच्या प्रतिक्रियाची वाट पाहतेय....कॉमेंट करायला कंजूसी करू नका......
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhuri Gaikwad- Kshirsagar

Service

Believe In Yourself