अस्तित्व मैत्रीतल्या प्रेमाची गोष्ट भाग-३

Friendship


अस्तित्व- मैत्रीतल्या प्रेमाची गोष्ट
भाग -

प्रिय प्रणे,
अग आज मी तुला बोलले त्याचे एकेक घाव माझ्या काळजाला भिडले ग. मला तुझ्यातला आत्मविश्वास कमी जाणवायला लागला होता, तुला माझी इतकी सवय झाली की तू स्वतःच आयुष्य विसरलीस. प्रत्येक वेळेस आधाराला मी असाव अस् तुला वाटायच.माझ्यासोबत राहून कोमट आयुष्य जगायला लागली होतीस ग तू . मला तुला या अवस्थेत पहावेना ग प्रणे,मला माहित आहे तुला हे घाव लागले असतील.आता तू पेंटून उठावे , जिंकावे, यशस्वी व्हावे,अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्यावास. यश तुझच आहे ग. फ़क्त मला तुझ्यातला आत्मविश्वास जागा करायचा होता. मी तुझ्यासोबत च् नातं तोड़ल ग आज, पण मी मैत्री जपली न ग प्रणे...?
तुझीच प्राजू

हृदयातील पेटलेली आग डोळ्यातील पाण्यात विरुन गेली.अन अचानक गाडीचा आवाज आला अन प्रणाली डायरी पुढ्यात ठेवून स्वतःला सावरून बसली. दारावर एक टिपिकल स्री , चेहरा थोडासा काळवंडलेला पण तेजस्वी लोचनी चांगल्या कामाची पावती देत होते. साड़ी अगदी साधी , चप्पल, केसांची सुंदर वेणी . प्रणे ती आत येताच प्रणीने तिला जोरदार मिठी मारली. अन अश्रूने प्राजुची साडी ओली करु लागली. गुदमरलेल्या साऱ्या भावना बाहेर साडीवरती अश्रूरूपी सांडू लागल्या. माफ़ कर ग ! प्रणालीचा हा शब्द सुडाच्या विजलेल्या आगीसोबत बाहेर आला. ये असं नाही बोलायचं .!पुढ्यात पडलेली डायरी प्राजुला सर्व काही सांगून गेली. मग शांत होऊन दोघीही सोफ्यावर बसल्या. अन पोहयाच्या आस्वादा बरोबर जुन्या आठवणी मधे दोघीही रंगून गेल्या.

आज प्रणालीला आपल्या छोटेपणाची कुठेतरी लाज वाटली.
प्राजु तू ग्रेट आहेस ग.!
ते जाउदे तू कस येणं केलस?
अग माझ लग्न जमलय त्यासाठी तुला भेटायला आले. Congratulations dear.
Thank you.
मी नक्की येईल ग लग्नाला.
प्राजक्ताच निरागस ,निर्मळ रूप प्रणालीस देवासारख़ं भासलं.हीच ती आहे जिणं माझ आयुष्य बदलवलं.

अन अचानक कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
निशांत?
अशी अंधारात काय बसली बाल्कनीत ? लाइट तरी लावायचास ना.? ओघळलेले अश्रू गालावरचे सुकून गेले होते अगदी मोगऱ्याच्या सुकलेल्या गजऱ्यासारखे .! तिने कॉफीचा कप टेबलवर ठेवला अन गुदमरलेली भावना तशीच हृदयाच्या एक कोपऱ्यात ढकलत प्रणाली स्वयंपाक घरात घुसली . मागोमाग निशांत ही तिच्या मागे गेला.

बाल्कनीत उरली होती ती निरव शांतता. हवेच्या वलयी घुसमटलेल्या प्रणालीच्या भावना अन सर्वांना साक्ष देणारा तो कॉफीचा रिकामा कप...!

प्रणालीच्या लपुन हरवलेल्या आयुष्याचा दरवाजा उघडून तिच्या अस्तित्वाचा आरसा नकळत तिच्यासमोर उघडा करुन प्राजूने तिच्या आयुषी सुखाचं कोंदन रचलं होतं. प्रणाली जो भाळी सुडाग्नीची ज्वाला घेऊन यशस्वी झाली ती तर प्राजुने दिलेल्या फुलांचा पुष्पहार होता. याची प्रणालीस जेव्हा जेव्हा जाणीव होते, तेव्हा नकळत तिचे अश्रू पापण्याची सीमारेषा ओलांडतात.

समाप्त
सुशांत भालेराव डोंबिवली (पूर्व)