अस्तित्व - मैत्रीतल्या प्रेमाची गोष्ट

Friendship Meaning


अस्तित्व- मैत्रीतल्या प्रेमाची गोष्ट
भाग

भास्कर क्षितिजावर येऊन टेकला , प्रणालीने निरंजन देवघरात पेटवली अन कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आराम खुर्चीत येऊन बसली. आज नामंकीत डॉक्टर झालेल्या प्रणालीला मनातलं शल्य स्वस्थ बसू देईना. डोळ्यातला थेंब जसा कॉफीच्या पात्रात विरघळला तसा कॉफीचा फुरका घेत प्रणालीने भूतकाळात धाव घेतली.

"अग, प्राजे लवकर कर की कॉलेजला उशीर होतोय" ?

प्रणे, \"थांब ग झालं पाच मिनिटांत\" !

मेड फॉर ईच ऑदरचं लेबल जणू यांच्या आयुष्याचं एकक होतं . प्राजक्ताच्या सतत बरोबर असणाऱ्या प्रणालीला तिच्याशिवाय दुसरं सोबत कुणीच नव्हतं. जणू प्राजक्ता आयुष्य बनलं होतं तिचं. अभ्यासात टाळाटाळ करत प्रणाली प्राजक्ताशी धिंगाना घालायची. प्रेमाच्या या महासागरास दृष्ट ना लागो अशी कृष्णा-सुदामाची जोड़ी फुटलीच.

प्राजक्ता अचानक प्रणालीशी कानाडोळा करु लागली, प्रत्येक कृतीला आडवे उत्तर देऊ लागली. पण मैत्रीच्या या विश्वात अखंड बुड़ालेल्या प्रणालीला हे काहीच दिसेना. अन त्यादिवशी प्राजक्ता जरा मोठ्यानेच खेकसली.

"काय ग सतत मागे मागे असतेस ? मला माझही आयुष्य आहे" . प्रत्येक वेळी तू माझ्यासोबतच असावचं का? तिचा नाजूक सुर आज भेसुर भासला. प्रणालीचे डोळे आपसुक पाणावले. प्राजक्ताच्या डोळ्यातील रागासोबत कुठेतरी मैत्रीची प्रतिमाही झळकत होती. प्राजक्ता रागाच्या भरात खुप काही बोलत अन प्रणाली एखाद्या निद्रिस्त भंगलेल्या प्रतिमेसारखी स्तब्ध उभी. अश्रू पापण्याची सीमारेषा ओलांडून ओसंडून वाहत होते. मला तुझी जराही गरज नाही , माझ्या आयुष्यातून तू कायमच निघुन जावसं. तरच मी सुखाने जगू शकेल.प्राजक्ताचे एक एक बाण प्रणालीच्या काळजाशी ठोक्यांचे युद्ध खेळत होते. अन अश्रूची गतिही वाढवत होते.
पण , प्राजु, मी माफ़ी मागते काही चुकलं का माझ?
मला काही ऐकायच नाही.! तू सतत अशी मागे मागे फिरतेस मला अशी लोचट मैत्रीण नकोय. हा तीर ज़रा जास्तच भिडला, प्रणालीच्या भावनेशी. प्राजक्ता तिथून रागाने निघुन गेली, अन प्रणाली अश्रू ढाळीत आजवरच्या तिच्या सोबतच्या आठवणीत रमुन हुमसुन हुमसुन रडु लागे. बुबळं लाल झाली, डोळे सुजलेले, केस विखुरलेले , व्यथा गुदमरलेली, भावना चिघळलेल्या, अन वेदना मेलेल्या. तिला तिथेच शांत झोपही लागली.

क्रमशः

सुशांत भालेराव