Oct 22, 2020
स्पर्धा

अस्तित्त्व

Read Later
अस्तित्त्व

     रागिणी एक सर्वसामान्य मुलगी, दिसायला खूप सुंदर नाही पण नाकीडोळी नीटसं. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नाही पण व्यवस्थित बेताची. ती ट्यूश्न्स घेवून घराला हातभार लावत होती. सगळ शिक्षण पूर्ण करुन तिला एका कंपनीमधे जॉब मिळाला. ती प्रामाणिकपणे आपल काम करत होती. त्यातच तिच रितसर ठरवून लग्न ठरल. छान राजबिंडा मुलगा नवरा म्हणून मिळाला. सासू सासरे आणि एकुलता एक मुलगा, आणखी काय हव? पण मुलगा मोठ्या शहरात नोकरी करत होता, त्यामूळे रागिणीला तिची नोकरी सोडावी लागली आणि लग्न करुन ती मोठ्या शहरात रहायला गेली.

     रागिणी आणि तिचा नवरा सुजय दोघांचा छान, गोडी गुलाबीने संसार सुरु झाला. नव्या शहरात नविन नोकरी शोधण्या आधी तिने थोडी विश्रांती घ्यायची ठरवली कारण नवर्याचा जॉब हा रोटेशनल शिफ्टचा होता. म्हणून थोडावेळ घराला देता यावा म्हणून तिने तसा विचार केला होता.

     मग नव्या नवलाईचा संसार सुरु झाला. रागिणी पूर्ण रमून गेली संसारात. घरातली सगळी काम मार्गी लागेपर्यंत, दिवस कधी संपून जायचा हे कळायचच नाही. अशातच नव्या पाहुण्याची चाहूल लागली. सगळीकडे खुशीचा माहोल. रागिणीने हळूहळू सर्व सुरळीत मार्गी लावलं होत. आणि काय हव असत?..... एवढं सुख खूप काही असत आपल्यासाठी.

     पण अशातच सुजय थोडा बदलला. कसा काय...  ? कुठे.....? पण काहीतरी खटकत होत तिला पण काय ते समजत नव्हत?.... पण रागिणीच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. तिने बरोबर ताडलं की ह्याच बाहेर काहीतरी चाललंय. तिने शेवटी ह्याला विचारलंच की काय चालू आहे?.... तर अगदी भोळाभाबडा चेहरा करुन त्याने सगळ सांगून टाकलं. आणि माफी सुद्धा मागितली. खूप मोठा मानसिक धक्का होता रागिणीसाठी. पण डळमळीत होण्याइतकी मनाने नाजुक नव्हतीच ती कधी. एकंदरित ते प्रकरण एवढं खोलवर गेलेलं नव्हतच.

     त्यानंतर सगळ सुरळीत चालू झालं. पण ह्या सगळ्या प्रकारात तिच पुन्हा नविन जॉब शोधण्याच स्वप्न अपूर्णच राहील. असेच दिवस चालले होते... आणि दुसर्या नविन पाहुण्याची चाहूल लागली. मग मात्र रागिणी परत दोन मुलाना घडवंण्यात व्यस्त झाली.

     त्यात सुजयच दुसर प्रकरण सुरु झाल होतं. काय बोलायचं अशा नवर्याला.....? आणि ही मुलगी त्याच्या ऑफीसमधलीच होती. जिकडे रागिणी सर्व ठिकठाक करुन बाहेर पडायला बघत होती तर तिच्यासमोर काहितरी नविनच प्रश्न, यक्ष म्हणून हजर......!!! बर हे सुजयच प्रकरण खूपच पुढे गेलेलं होत. कारण ती मूर्ख मुलगी ह्याच्या बरोबर दुसर लग्न देखील करायला तयार झालेली होती. आता मात्र रागिणीला वेगळाच पवित्रा घ्यायला लागला. त्या मुलीबरोबर बोलून तिचा चांगलाच समाचार घेतला बरोबर सुजयचाही त्यानंतर बर्याच महिन्यांनंतर हे प्रकरण थांबल. त्यासाठी रागिणीला लॉकडाऊनचा सुद्धा खूप फायदा झाला. कारण त्यामुळे काम घरुन करायच होत. आता सगळ वादळ शमल आहे.

     आपण आपल अस्तित्त्व टिकवून ठेवलच पाहिजे.  कारण यासर्व काळात सल्ले देणारे खूप भेटतात आणि ते असेही काही सल्ले देतात की तू सोडून दे त्याला. आपली अस्तित्त्वाची लढाई आहे. अशी अस्तित्त्वाची लढाई कोणी करू नये. अस्तित्त्व आणि घटस्फ़ोट या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा मेळ कधीच घालू नये आणि चुकीचे निर्णय घेऊ नये. विचाराअंतीच पाऊल उचलावं. तसच रागिणीने उचललं.आता ती सुखात आहे. सुजयला ही आपली चूक लक्षात आली.

Circle Image

Sapana Nandakumar Kadrekar

Housewife

I m a law graduate.