Oct 24, 2021
कथामालिका

दुवा

Read Later
दुवा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

दुवा


भाग १" पिंटू , आताच बाहेरून खेळून आलास, आणि लगेच टी. व्ही समोर बसलास ! दीड तासांपैकी अर्धाच तास उरलाय. अभ्यास कधी करणार आहेस ? " पिंटूची आई उमा म्हणाली.
" ए ममा, प्लीज ना. " तो लाडिक स्वरात म्हणाला, आणि पुन्हा टीव्हीवर लक्ष केंद्रित केलं.
पिंटू तसा शहाणा, आज्ञाधारक मुलगा होता. टाइमटेबल प्रमाणे रोज शाळेतून आल्यावर आवरून साडेपाच वाजता मित्रांसोबत खेळायला जायचा. बरोबर तासाभरात घरी येऊन अभ्यासाला बसायचा. पण आज त्याचे पपा बाहेरगावी गेले होते. होमवर्कही नव्हता. त्यामुळे आजचा दिवस अभ्यासाला सुट्टी द्यायची, असं त्यानं ठरवून टाकलेलं. वडलांना तो खूप घाबरत होता.‌ ते घरात असताना अभ्यास झाल्यावरही टी. व्ही, मोबाईल वैगरे बघण्याची त्याला भीती वाटायची. तशी आईबद्दल ही त्याच्या मनात आदरयुक्त भीती होती. पण शेवटी आईच ती. थोडी लाडीगोडी लावली की ती नक्कीच मानेल, याची त्याला खात्री होती.
त्याच्या \" प्लीज \" वर उमा काही तरी बोलणार होती, तोच दरवाजा उघडून पिंटूचे वडील आत आले. ते खरंतर मगाशीच घरी परतले होते. आता उमा तेच सांगणार होती. पिंटू कडे नजर जाताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. भुवया आक्रसल्या. ते झपाझप चालत त्याच्या समोर उभे राहिले, अन् करड्या सुरात जवळ जवळ ओरडलेच -
" कार्ट्या.."
ते एकदम ओरडत समोर उभे ठाकल्याने पिंटू दचकून थरथरला. त्याचा तोल जाऊ लागला होता ; पण कसाबसा स्वत:ला सांभाळून तो खाली उतरला. वडिलांनी मात्र तिकडे लक्ष दिल नाही. कदाचित ते ज्या कामासाठी गेले होते, ते नीट पार पडल नसावं. त्यामुळे आधीच त्यांचा मूड ऑफ होता. त्यात घरी आले तर अभ्यासाच्या वेळी पिंटू खेळायला गेला होता, आणि आता टीव्ही बघत बसलेला. हे बघून अजूनच चिडले होते. आवाज आणखी चढवून ते बोलू लागले. पिंटू खाली मान घालून उभा होता. चेहरा भीतीने गोरामोरा झालेला. वडिलांनी त्याच्या हातून रिमोट हिसकावून टीव्ही बंद केला. रिमोट सोफ्यावर फेकून आले तसेच झपाझप चालत आपल्या रूममध्ये गेले. पिंटू थोडावेळ तसाच उभा होता. मग मिनीटभराने भानावर येऊन तोही त्याच्या रूममध्ये गेला.

उमा रूमच्या दरवाजात जरावेळ थबकली. पिंटू टेबलाजवळच्या खुर्चीवर बसून वाचत होता. मगाशी त्याचे पपा त्याला ओरडत होते, तेव्हा ती तिथेच होती. त्याचीच चूक असल्यामुळे मध्ये मात्र पडली नाही. चेहऱ्यावरून ती अजूनही उदास, दबलेला आणि थोडा चिडलेला दिसत होता. तसा थोड्या वेळानंतर तो नॉर्मल झालाही असता ; पण मनातली भीती आणि राग जाणार नव्हता. त्या भावना मनातल्या एका कोपऱ्यात दडून राहिल्या असत्या. आणि या दडलेल्या भीती व रागामुळेच त्याला वडिलांबद्दल गैरसमज आणि त्यातून काहीशी अढी निर्माण झाली होती. आणि ती वाढतच गेली असती. तसा होऊ नये यासाठी त्याच्याशी बोलणं आवश्यक होतं.


क्रमशः

कथा आवडल्यास भेट द्या - 

https://facebook.com/groups/758165158061766/

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing