नातीगोती 4

A Person With God Hearted..


#नातीगोती_४
नाती रक्ताने नाही तर मनाने जोडली जातात याचेच एक उत्तम
उदाहरण म्हणजे या लेखातून भेटणारा माझा अजून एका परिवार. जिथे जात धर्म ही सीमा ओलांडून माणुसकीचे धडे गिरवले गेले, जिथे माझ्या बालपणातला महत्वाचा भाग लिहिला गेला अश्या माझ्या #नाईकवाडी परिवाराला.
मला आठवतय तसे आमच्याआयुष्यातील प्रत्येक अडचणीच्या काळात नाईकवाडी परिवार हा नेहमीच आमच्या पुढे उभा राहिला आहे.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
हे मी यांच्याच घरात पाहिलं, आणि काकूंकडून परात काढून घेवून भाकरी करायचा एक अयशस्वी प्रयत्न ही करून बघितला, तेंव्हा अगदीच लहान होते मी ती गोष्ट वेगळी .
काका काकू आसिफ दादा इम्रान दादा रेश्मा ताई अशी ही माझी माणस होती ज्यांनी मला खरच माणुसकीची व्याख्या शिकवली . माणसाला जगायला जात धर्म कधीच लागत नाही लागते ते फक्त प्रेमाचे चार शब्द आणि सहानभुतीचा पाठीवरती हात.
आपल्याला आयुष्यात घरातील सर्वांना सुखात आनंदात ठेवायचे असेल तर घरातील एखाद्याने आपल्या स्वप्नांचा बळी देवून अपार कष्ट करून आज ज्यासाठी आपण या खस्ता खाल्या ते स्वप्न पूर्ण होताना आयुष्यातील सर्व दुःखाना मागे टाकत पुढे पुढे चालल्या आसिफ दादाची वाटचाल मी पाहिली आहे अनुभवली आहे . अंधारलेल्या घरात सारवलेली जमीन वेताच्या पट्ट्यांची भिंत वजा पर्टिशन ते आज उभारत असलेला कोट्यवधींचा बंगला हा प्रवास सोपा नव्हता. भावाला इंजिनियरिंग करता यावं म्हणून अर्ध्यातच शिक्षण सोडून वडिलांना हातभार लावायचा घेतलेला निर्णय म्हणजे तर त्या साऱ्यांच्या आयुष्याचा turning point होता .
स्वतः कितीही अडचणीत असला तरी माझ्या घरातील कुणी ही त्याला मदतीला बोलावले की सदा तत्पर असणार आसिफ दादा म्हणजे आमच्या पूर्व पुण्याई ने लाभलेले व्यक्तिमत्त्व आहे .
माझ्या बाबांना योग्य वेळी कोणता ही पुढचा मागचा विचार न करता दवाखान्यात हलवून सात महिन्यांचे बोनस आयुष्य देणारा आसिफ दादा आमच्या सर्वांसाठी देवदूतच आहे. जेंव्हा बाबांनी या जगाचा निरोप घेतला तेंव्हा माझ्या पाठीवरचा पहिला सहानभुतीचा हात आसिफ दादाचाच होता. अमु काका आता नाहीत पण आम्ही सगळे आहोत अजिबात खचून जायचं नाही तुझ्या या अवस्थेत तू खचलेली काकांना ही आवडले नसते हे शब्दच मला बाबांचे नसणे स्वीकारायला आणि पुढे माझी डिलिव्हरी होईपर्यंत जगायला धीर देवून गेले .
आज ही आम्ही सर्वच भावंडं आई काका काकू यांना संकेश्र्वर मध्ये ठेवून आमच्या कामात आपापल्या ठिकाणी निश्चिंत राहतो कारण आसिफ दादा आणि त्याची फॅमिली आमच्यासाठी तिथे आहे.
आसिफ दादाचे आणि त्याच्या घरच्यांच्या उपकारांची या जन्मात तरी आम्ही उतराई होवू शकणार नाही. आसिफ दादाकडूनच शिकायला मिळाले आहे नेहमी चंदनाप्रमाणे झिजून दुसऱ्यासाठी सुगंध पसरवत रहायचे असत.
ही वृत्ती माझ्यात थोडी जरी आली तरी या जन्माचे सार्थक होईल.
आसिफ दादा तुला आणि तुझ्या परिवाराला दीर्घायुष्य देवून तुझा हा सहवास आमच्या आयुष्यात अखंड राहू दे हीच प्रार्थना.

अमृता

9535997174



🎭 Series Post

View all