आशिर्वाद

आशिर्वाद



*आशिर्वाद*

लाभता आशिर्वाद थोरांचा
आयुष्य हे होईल सार्थ,
संचारुन अंगी नव चैतन्य
जीवनास या येईल अर्थ.

घ्यावा वृद्धांचा हात हाती
देऊ नये कधीही अंतर,
उपकारांची ठेवूनी जाण
सेवेत त्यांच्या रहा तत्पर.

म्हातारपणी असते ओढ
आपुलकीच्या नात्यांची,
मायेची उब देणा-या त्या
प्रेमळ हाताच्या स्पर्शांची.

वार्धक्यातही जर सोबतीला
असेल उमदा तारुण्याचा हात,
सुख समाधान ओसांडेल मनी
नसेल तमा जीवन जगण्यात.

जुन्या अन् नव्या परंपरेत
कुटुंब वाढेल आनंदात,
दोन पिढ्या असता एकत्र
हर्ष उल्हास नांदेल घरात.
---------------------

सौ.वनिता गणेश शिंदे@