Jan 23, 2021
माहितीपूर्ण

अशी सासू सुरेख बाई

Read Later
अशी सासू सुरेख बाई

अदिती आणि पराग दोघेही उच्चशिक्षित, परागचा व्यवसाय असल्यामुळे तो सतत व्यस्त असतो आणि अदिती मात्र लग्नाला जेमतेम 6,7 महिने झाल्यामुळे सध्या घरीच असते.लग्नापूर्वी तीही नोकरी करायची. बघायला गेलं तर त्यांना कसलीही कमी नाही अगदी श्रीमंत घराण. घरात सासू सासरे आणि ही दोघेच. आणि एकाच शहरात असलेल्या तिच्या 2 नंदा म्हणायला त्यांचीही लग्न झालीत मात्र एकाच शहरात असल्यामुळे त्यांची वर्दळ मात्र नेहमीच सुरू असते. आणि असायला हवी सुध्दा, त्यात तिची काहीच हरकत नव्हती,पणं त्या आल्या की सासूबाई सारख्या शुल्लक कारणावरून अदितीची त्यांच्याकडे तक्रार करत असे. आणि त्या आईची बाजू घेऊन तिलाच नेहमी बोलत. त्यामुळे ती बोलत काही नसली तरी,आतून मात्र दुखावली होती.होत असतात चुका सर्वांकडून आणि शेवटी तीच नविन लग्न,जमेल तेवढं ती सर्वांचं आवडीने करायची.पणं सर्व करून सुध्दा तिला बोलणी ऐकावी लागे.तसा पराग फार समजूतदार सासरी तिला त्याचा मोठा आधार होता.तो तिच्या आवडीनिवडी अगदी मनापासून जपत.पणं आता घरच्यांच्या वागण्यामुळे अदितीला टेन्शन यायचं,कारण पराग घरात फार कमी वेळ असायचा आणि दिवसभराची कामे आणि बोलणी ऐकून अदिती मात्र फार थकायची.आणि याचा परिणाम तिच्या तब्येतीवर दिसायला लागला.
बाहेरून येणारी मुलगी तुमच्यासाठी तडजोड करू शकते, तर थोड फार आपण का नाही करू शकत? ज्येष्ठ लोकंच ठीक आहे, त्यांच्या वयानुसार ते आपली मानसिकता बदलू शकतं नाही.पणं समवयस्क असणाऱ्या नंदा आणि जावानी सुध्दा समजून घेऊ नये,का?तर म्हणे ती बाहेरची,अहो कोण बाहेरची?ती सुध्दा तुमच्याच घरातली आहे ना..! तुमच्याच मुलासाठी आणि घरासाठी आली आहे ना..!करतेय ना प्रयत्न, मग तुम्हीपण करा की थोडा तिला समजून घ्यायचा..!नसेल जमत तिला काही तर हक्कानी सांगा ना..!कोण नको म्हणते? पणं उगाच दुसऱ्यांजवळ बोलून स्वतःला का वाईट सिध्द करता? शेवटी माणूस म्हणजे चुका आल्याचं,पणं जसं आपल्या मुला मुलींच्या चुका पदरात घालतो, तसचं सुनेच्या घातल्या तर काय बिघडत? तडजोड नेहेमी एकाणीच का करायची?थोडी तुम्हीपण करून बघा ना, तुमच्या मुलीचं लग्न जुळल की तुम्ही लगेच तिला पुरणपोळी पासून तर पूर्ण घरकाम शिकवता का? नाही ना..!मग सूनेपासून अशी अपेक्षा का ?जसं आपल्या मुलीला शिकवता तसचं तिलाही शिकवा,आणि मग बघा सासुसूनेच्या नात्यातील वीण कशी घट्ट होते ते..!
तस तर दोघी घट्ट मैत्रिणी असायला हव्या कारण दोघींची ही नाळ एकच, एकीचा मुलगा तर दुसरीचा नवरा एकीने 30 वर्ष काढली असतात तर दुसरीला काढायची असतात. आणि तसचं जाऊ आणि नंदा सुध्दा सुनेच्या घट्ट मैत्रिणी असायलाच हव्या कारण एक बाहेरून आलेली असते तर दुसरी जाणारी. नात्यातील वीण ज्याची त्याला घट्ट करायची असते,कारण सर्व काही असून जर घरात सततची भांडी वाजत असतील तर हळुहळु घरातील घरपण नाहीस होत जाते आणि उरतात फक्त भकास भिंती, सततची चिडचिड,आणि कोरडा पडलेला चेहरा..!
बघा पटतय का? नाहीतर सोडून द्या..!