Jan 26, 2022
नारीवादी

अशी सासू हवी ग बाई...

Read Later
अशी सासू हवी ग बाई...

लाडक्या सोनलचे लग्न झाले आणि माईंना आता लेकाच्या, साहीलच्या लग्नाचे वेध लागले...मुली बघणं सुरू होतं आणि साहिलने ऋतूला पसंत केलं...माईंना तशी ऋतू काही फारशी आवडली नव्हती.दिसायला सावळी , अगदी बारीक चणीची तर साहिल अगदी गोरा गोमटा..पण साहिलला आवडली म्हणून कुठलीही हरकत न घेता अगदी थाटामाटात साहिल - ऋतूच लग्न झालं आणि ऋतूच्या रूपाने घरात सौख्य आलं.माईंनी
ऋतूला अगदी मुलगीच मानलं होतं...दोघींचं सुंदर नातं बघून सोनलला सुद्धा त्यांचा हेवा वाटायचा...सोनलला तिच्या सासुबाईकडून अगदी थोडही प्रेम मिळत नव्हतं...
ऋतूला पुढे शिकण्यासाठी घरातून अगदी खूप प्रोत्साहन होतं त्याप्रमाणे तिने तिच्या आवडत्या कोर्सेला एडमिशन घेतली आणि लवकरच गोड बातमीही दिली...
ऋतू अगदी आनंदात होती...तिचे सगळे लाड माई अगदी प्रेमाने पुरवत होत्या...ऋतूची परीक्षा नेमकी नववा महिना लागल्यावरच आली...काय करावे असा प्रश्न सगळ्यांपुढे होता.डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अजून पंधरा दिवस नक्कीच होते इतक्यात काही डिलिवरी होणार नव्हती.मग ऋतूला परीक्षेला जाताना सोबत म्हणून माई जाऊ लागल्या.रोज पेपर पूर्ण होईपर्यंत त्या बाहेर बसून राहत... ऋतू ची अवस्था बघता माईंना बाहेर बसण्याची परवानगी मिळाली...' ही ऋतू ची आई नाही तर सासू आहे ' असे कळल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा आणि कौतुकाचा धक्काच बसला ! 
परीक्षा व्यवस्थित पार पडली आणि ऋतूने एका गोंडस परीला जन्म दिला ! सगळेजण बाळाच्या कौतुकात मग्न होते पण माईंनी आधी ऋतूला जवळ घेतलं आणि देवसोबतच तिचेही आभार मानले.
परीच्या रूपाने घरात आनंद आला होता...आणि ऋतू सुद्धा परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाली होती ! देवाच्या आधी ती आईंच्या पाया पडली होती आणि भरल्या डोळ्यांनी दोघींनी एकमेकींना मिठी मारली ! 
परी सहा महिण्यांची झाली आणि ऋतूला एका छान जॉब ची ऑफर आली...पण एक प्रॉब्लेम होता ...सहा महिने दुसऱ्या शहरात ट्रेनिंग साठी जावे लागणार होते.यावेळी सुद्धा आईंनी ऋतूला मोलाची साथ दिली. 
" तू निश्चिंत पणे जा ...आम्ही आहोत परीसाठी..असे निघून जातील बघ दिवस " जड पायांनी ऋतू निघाली.आई घरी असल्यामुळें तीला परीची कासलीहि काळजी नव्हती...
कसेबसे ते दिवस संपले ! ऋतू परत आली आणि समाधानाने तिची नोकरी सुरू झाली. अताश्या आईसुद्धा थकत चालल्यात , त्यांना परीच्या मागे धावणे होत नाही हे लक्षात आल्यावर ऋतू आणि साहिलने परीला पाळणा घरात ठेवण्याचा विचार बोलून दाखवला . तसं माईंच्या डोळ्यात पाणी आलं .
" माझ्या परीला मी नाही ठेऊ देणारं पाळणा घरात." असं म्हणून त्या रडायला लागल्या.मग घरीच स्वयंपाकाला बाई ठेवली आणि प्रश्न सुटला.
सोनल सारखी बोलवायची आईला तिच्याकडे पण माईंचं नेहेमी आपलं ऋतू , परी , साहिल हेच चालायचं ! " तूच ये ना राहायला " असं म्हणत त्या तिला.
" जगात एकच सून आहे ग तुझी लाडकी ...आता मलाही विसरलीस तू तिच्यापुढे " असं म्हणून सोनल आईला नेहेमी चिडवायची!
अधून मधून माहेर पणाला येऊन भावाचा संसार डोळेभरून पहायची.आपल्या नशिबी हे सुखनही याची मनोमन खंत तिला होती.कितीही केलं तरी सासूबाई कधीच आनंदी नसायच्या..पण माईंचे संस्कारच होते तिच्यावर तसे त्यामुळे ती सगळं निभावत होती.कुठेच कमी पडत नव्हती.
आपल्या दादाच्या संसाराला कोणाची नजर लागू नये म्हणून सोनल नेहेमी देवाजवळ प्रार्थना करायची !
अनेक वर्ष गेली सगळं आनंदात सुरू होतं.परी आता दहा वर्षांची झाली.
आणि अचानक काही ध्यानी मनी नसताना सगळ्यांच मायेचं छत्र हरवलं...' जो आवडतो सगळ्यांना तिची आवडे देवाला...' आणि देव सगळ्यांच्या लाडक्या माईला कायमचं आपल्या सोबत घेऊन गेला !
ऋतुने तर आईलाच जणू गमावलं होतं.सोनल आणि ऋतूची अवस्था अगदी सारखी होती.त्या इतक्या मोठ्या दुःखातून कसबस एकमेकींना सावरत होत्या.काही दिवसांनी सोनलला तिच्या घरी परत जावच लागलं...
कशी बशी सोनल घरी आली.आता तर आपली आई नाही...सासूबाई अश्या...त्यामुळे ती अजुनच दुःखात बुडाली ! रडत रडत कधी झोप लागली ते तिला कळलं नाही...
जाग आली तो तिच्या सासूबाई तिच्या जवळ आल्या..." बाळा काळजी करू नकोस..आपल्या हातात काहीच नाही.तू असं रडलेल आवडेल का तुझ्या माईला ? उठ चहा केलाय तुझ्यासाठी...आणि हो कधीही वाटलं तर माझ्या जवळ ये.मला तुझी आईचं समज..." असं म्हणून तिला जवळ घेतलं ! सोनल ला वाटले आपण स्वप्नात तर नाही ना ? पण ते खरं होतं...देवाने सासूच्या रुपात तिच्यासाठी दुसरी आईचं पाठवली होती...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing