change in life during lockdown

social changes that are happend during this years lockdown
 

To

CcBcc

 

-

 

देखते है आज हम खुश राहा विरानिया दोस्तों के संग कटी जहा कितनी तन्हाईया गुजर गया वो दोर बिछड गये सब दोस्त याद रह गई तो बस लम्हों की कहानिया लॉक डाऊन च्या काळात या ओळी सतत मला मनात आठवत होत्या covid-19 या विषाणूं सर्व मानव जातीच्या जगण्याला किती मर्यादित करून टाकलं ह्याची जाणीव अगदी प्रकर्षाने होत होती covid-19 एक परजीवी विषाणू पण त्यानं साऱ्या जगभर थैमान घातलं ज्यांना त्याचा संसर्ग होतो त्यांच्या फुफ्फुसात बिघाड होऊन श्वास घेण्यास त्रास होतो आणि आणि काहींना तर आपला जीवन प्रवास ही थांबवावा लागतो ह्या कोरणा नावाच्या रोगांन माणसाच्या केवळ श्वसन संस्थे वरच परिणाम केला नाही तर अनेक देशांच्या आरोग्य अर्थ आणि औद्योगिक तसेच उत्पादन क्षमतेवर म्हणजे एकूणच जगभरातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम केला अनेक आधुनिक विकसित तंत्रज्ञानात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या आपल्याच तोऱ्यात जगणाऱ्या देशांना पुरतं जेरीस आणलं मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याला ह्या कोरोना ची चाहूल लागली 22 मार्च रोजी आपण सगळ्यांनी जनता कर्फ्यू च पालन केलं आणि आणि संध्याकाळी पाच वाजता घंट्या थाळ्या टाळ्या आणि शंखनाद करून कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन तर दिलच पण त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त केली त्या एका दिवसाच्या जनता कर्फ्यू न आपलं सामाजिक असणं अधोरेखित केलं आणि त्यानंतर सुरू झाली टाळेबंदी म्हणजे लॉक डाऊन ज्यामुळे शाळा कॉलेजेस कार्यालय मॉल जिम पार्क सलून स्पा सेंटर पार्लर बंद झाली रेस्टॉरंट हॉटेल दुकान रस्त्यावरचे मोर्चे मिरवणुका जुलूस सार्वजनिक सभा समारंभ उत्सव याशिवाय लग्न मुंजी बार्शी सगळं बंद झालं त्यासोबतच टीव्हीवरील मालिका आणि वर्तमानपत्र सुद्धा बंद झाली रस्त्यांवर फक्त सफाई कर्मचारी अन कचरा उचलणाऱ्या गाड्यांचा आवाज जनतेने सामाजिक अंतर पाळावे यासाठी ोलीस कर्मचार्‍यांचे पथसंचलन आणि परेड यांचाच आवाज होता आपण घरात राहणं किती आवश्यक आणि महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी रेडिओ आणि टीव्ही वरून केलं जाणार आवाहन कोरोनाविषाणू हा किती भयानक उत्पात करू शकतो आणि इतर देशात त्यांना कसं हे मान घातला आहे हे दाखवणाऱ्या त्या-त्या देशांमध्ये कोरोनामुळे बळी गेलेल्या लोकांच्या बातम्या वारंवार सांगितल्या आणि दाखवल्या जाऊ लागल्या यासोबतच सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येत होतं आधीच आधुनिक जगाने माणसा माणसाच्या मनामध्ये अंतर निर्माण केला आहे आता तेही कमी म्हणून कोरोना ची भर पडली रोजच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी मनासारखे करिअर करण्यासाठी लोकसंख्येमुळे कमी असलेल्या उत्तम करिअरच्या संधी मिळवण्यासाठी दिवसापासून रात्रीपर्यंत धावणारे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी यांपासून ते कारखान्यात काम करणारे कामगार यान पर्यंत सर्वच थांबले एखाद्या लहान मुलांना खेळता खेळता आपल्या मित्रांना स्टॅच्यू करून टाकावं अगदी तसंच सारेच स्तब्ध झाले आधुनिक जगाची एक अपरिहार्य भेट म्हणजे नात्यांमधला माणसा माणसातला संपलेला संवाद आणि त्यात कोरोनामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याची निर्माण झालेली संपत्ती पण या सुरक्षित अंतराने किती जणांचे जगणे आणि एकूणच आयुष्य असुरक्षित करून टाकलं याचा तर विचारच न केलेला बरा कारखान्यात काम करणारे कामगार घरकाम करणाऱ्या मोलकरणी टीव्ही सिनेमातले लहान-सहान भूमिका करणारे दुय्यम कलाकार मेकअप मॅन हेअर ड्रेसर बॉईज लहान दुकानदार मजूर हात गाड्या वाले चहाच्या टपरीवाले फेरीवाले हमाल रिक्षा आणि ऑटो चालक लहान-मोठे व्यवसायिक अशा किती जणांचे अर्थनियोजन बिघडले तेच जाणोत एकीकडे महानगरांच्या उंच उंच भव्य आलिशान इमारती सुटाबुटात वावरणारे एसी कार मधून जाणारे कॉर्पोरेट क्षेत्रातले मोठे मोठे अधिकारी ऑफिसर्स देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे खांब असणारे बडे बडे उद्योजक कारखानदार आणि नेते घडाळ्याच्या काट्यावर धावणारे मध्यमवर्गीय नोकरदार तर दुसरीकडे खोली नावाच्या खुराड्यात येणारा दिवस ढकलणारे गावाकडच्या कुटुंबाला पैसा पाठवून रोजच जगण्याचा संघर्ष करणारे यांच्यातली कधीही न दिसणारी आहे रे आणि नाही रे ची रेखा अधिक ठळक आणि गडबड झाली केवळ अखेरच्या क्षणी तरी कुटुंबाजवळ असावे याकरिता बेघर स्थलांतरित मजुरांची भर मे महिन्याच्या उन्हाळ्यातली पायपीट जीवाची परवा न करता एका गाठोड्यात ला संसार घेउन आपल्या मुलांना पोटाशी धरून घराकडे परतताना ची परवड आपण सगळ्यांनीच पाहिली वाचली ऐकली कितीही विषमता एकीकडे दोन वेळेच्या अन्नाचा प्रश्न सोडवणारा कामगार सर्वहारा वर्ग तर दुसरीकडे चंगळवादी मानसिकता कितीही दरी किती हे अंतर आज्या कोरणा च्या काळात आपण सगळ्यांनीच आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा आपल्याजवळ असलेल्या कौशल्याचा उपयोग आपल्या समाज बांधवांसाठी पर्यायाने आपल्याच देशासाठी करण्याची आवश्यकता आहे आपण सर्व अभिजन वर्गाने आपल्या मुलांना म्हणजेच येणाऱ्या भावी पिढ्यांना निसर्ग संवर्धन पर्यावरण साक्षर अर्थसाक्षर करणं गरजेचे आहे यासोबतच आपल्याकडे असणाऱ्या सीमित संसाधनांचा आणि पर्यायांचा योग्य आणि कुशलता पूर्वक उपयोग करण्याचं शिक्षण प्रशिक्षण आजच्या तरुण बेरोजगार युवांना देणे अत्यावश्यक आहे पृथ्वी नावाच्या या सुंदर ग्रहाचा हे मानवा तू काही राजा नाहीस तर ही सुंदर वसुंधरा जशी इतर प्राण्यांची सजीवांची जननी आणि पालन-पोषण करती आहे तशीच ती तुझी ही माताच आहेस तू काही इथला सम्राट नाहीस तर तूही एक प्राणीच आहेस केवळ इतर प्राण्यांपेक्षा अधिक उत्क्रांत केवळ एक प्राणी हे लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे

Send