असे महाराज पुन्हा होणे नाही

Chatrapati Shivaji Maharaj


असे महाराज पुन्हा होणेच नाही !!

स्वराज्याचा ध्यास ,
शत्रूचा नाश
मित्रांची आस
आईचा घास

पर स्त्री माता
एकनाथांची गाथा
समर्थांची वाचा
गोर गरिबांची व्यथा

थोरा मोठयांचें आदर
सख्या सोयरांवर माया
भवानी मातेचा जागर
दिन दुबळ्यांची सेवा

एक एक माणूस जोडून
उभे केले स्वराज्य
एक एक शत्रू तोडून
वाढवले स्वराज्य.

उभे आयुष्य वेचले
बालपणी उचलली तलवार
गनिमी काव्याने लढले
गड किल्ले केले स्वार

जाणता राजा छत्रपती होई
स्वराज्याचे स्वप्न पाहता लोचनी
रयतेचा राजा लाडके दैवत होई
असे महाराज पुन्हा होणेच नाही
© शीतल महामुनी माने