अलक.... असे ही असतात काही

Ase Hi Astat


असतात असे ही #अलक

1.....विभास ने ज्या मित्राबद्दल सगळ्या ऑफिसमध्ये काही काही चुकीचे सांगून त्याचे नाव खराब केले त्याला सगळ्यांच्या नजरेतून पडले त्याच मित्रासमोर आपल्या आईसाठी रक्त देण्यासाठी आज हात पाय जोडतांना पाहिले होते...

२......अग ती माहीत आहे मला, तिचे चारित्र्य कसे आहे हे चांगलेच माहीत आहे म्हणणारी प्राजक्ता आजकाल माया सोबत रोजच्या रोज पार्टी करतांना दिसत होती...तिच्यासमोर तिच्याबद्दल गुण उधळत होती...


3......आमच्या सून बाई खूप सुगरण आहेत, तुम्ही त्यांच्या हातचे खाल तर खातच रहाल...जी सासू इतके कौतूक करत होती सगळ्यांसमोर ती सूने कडून घरातील सगळी कामे करून घेत होती... आणि तिला जेवण म्हणून फक्त एक भाकर देत होती...