Jan 28, 2022
स्पर्धा

असे हे जाधव कुटुंब !

Read Later
असे हे जाधव कुटुंब !


( श्रेणी : कौटुंबिक )


" पेशंटचे नाव काय ?" मेडिकलवाल्याने विचारले.

समोर उभा असलेला उंचापुरा , बलदंड शरीर असलेला तरुण काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. कानात गोल्डन इअररिंग स्टड घातले होते. काळ्या शर्टमध्ये त्याचा गौरवर्णीय देह अधिक उठावून दिसत होता. पण या चंद्राला ग्रहण लागले होते. या राजबिंडा चेहऱ्यावर वेगळीच उदासी होती.

" मिस्टर ?" मेडिकलवाला वैतागला.

" पार्थ जाधव. " समोरचा तरुण म्हणाला.

" तुमचे कोण लागतात ?" मेडिकलवाल्याने विचारले.

" आजोबा. " त्या तरुणाचा कंठ दाटून आला.

" तुमचे नाव ?" मेडिकलवाल्याने विचारले.

" प्रतीक जाधव. " तो म्हणाला.

" पाच हजार. "

प्रतिकने खिसा तपासला. त्यात फक्त चार हजार होते.

" आता औषधे द्या. एक हजार पुन्हा देतो. " प्रतीक म्हणाला.

" सॉरी सर. रुल्स आहेत. "

" आम्ही पळून थोडी जाणारे ?" प्रतीक चिडला.

" सॉरी सर. "

प्रतिक क्षणभर भूतकाळात गेला.

" काय झाले ? चेहरा का उतरलाय ?" आजोबांनी विचारले.

" आजोबा , आज वाढदिवस आहे. मुले पार्टी मागतात. बाबांनी दोनच हजार दिलेत. " प्रतीक लटक्या सुरात म्हणाला.

" हे घे तीन हजार. " आजोबांनी खिशातून पैसे काढले.

" अहो , आजोबा नको. "

" आपण जयविरू आहोत ना. अरे आजोबा नातवाचे लाड नाही करणार तर कोणाचे करणार ? " आजोबा म्हणले.

प्रतीकने आजोबांना मिठी मारली. जोपर्यंत आजोबा होते प्रतिकला पैश्याची कधीच कमी पडत नसे.

असो. प्रतीक वर्तमानात आला. आधीच टेन्शनमध्ये असलेल्या वडिलांना पैसे मागणे बरोबर दिसणार नाही म्हणून प्रतिकने तेजश्रीकडून पैसे घेतले. तेजश्री प्रतिकची मोठी बहीण होती. तिने इंजिनिअरिंगमध्ये टॉप तर केलेच होते आणि आता एमबीए करणार होती. डॉक्टरांनी अमोलला आत बोलावले. अमोल जाधव म्हणजे पार्थ जाधव यांचे सुपुत्र आणि प्रतीक जाधव याचे वडील होते.

" बोला , डॉक्टर. बाबा ठीक तर होतील ना ?" अमोलने काळजीच्या सुरात विचारले.

" तुमचे वडील कोम्यात आहेत. किती दिवस राहतील काही सांगता येत नाही. कधी सात दिवसात बरे होतात तर कधी वर्षानुवर्षे कोम्यातच राहतात. तुम्ही मानसिक तयारी ठेवा. " डॉक्टर म्हणाले.

अमोल बाहेर आले. तेजश्री आणि प्रतीक आशेने त्यांच्याकडे पाहू लागले.

" डॉक्टर म्हणाले काही सांगता येत नाही. घरी चला. मला खूप भूक लागली आहे. " अमोल इतकेच म्हणाली.

तिघे घरी गेले. घरी मेघा तळमळत बसली होती. तिघे येताच तिचा जीव भांड्यात पडला.

" कसे आहेत बाबा ? ठीक तर होतील ना. " मेघाने लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

" हो. तू जेवायला दे. मला बसायचे आहे हॉस्पिटलमध्ये. " अमोल म्हणाले.

मेघाने तिघांना वाढले. खरतर जेवणाची इच्छा घरात कुणालाच नव्हती. पण सर्वजण बळजबरीने घश्याखाली अन्न टाकत होते. पण जाधव कुटुंब नेहमीच इतके उदास नव्हते. पार्थ जाधव हे या घरचे प्रमुख होते. तेजश्री आणि प्रतीक ही नातवंडे त्यांची जीव की प्राण होते. सून मेघावर त्यांचा वेगळाच जीव होता. तेजश्री समजूतदार होती पण प्रतीक तारूण्य जगणाऱ्यापैकी होता. प्रतीकला पार्टी करणे , गर्लफ्रेंड बनवणे , हँगआउट करणे याची प्रचंड आवड होती. अमोलचे आणि त्याचे नेहमी खटके उडत. पण पार्थ सर्व सांभाळून घेत. आजोबा-नातवाच्या युतीमध्ये अमोलचा सॅंडविच बनत. पार्थ आपल्या मित्रांसोबत बसने अक्कलकोटला जाणार होते. दुर्दैवाने अपघात झाला आणि पार्थ कोम्यात गेले. तेव्हापासून कुटूंबाचे सुख नाहीसे झाले. असो. जेवण करून अमोल रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबले. सकाळी घरी येताना त्यांना जोशीकाका भेटले. दोघांमध्ये काही गप्पा रंगल्या.

" अरे अमोल , माझ्या नातेवाईकमध्ये असाच एक वृद्ध मनुष्य कोम्यात गेला. वीस ते तीस लाख रुपये खर्च झाले. शेवटी कोम्यातच मृत्यू आला. मी म्हणतो फायदा काय ? एवढे पैसे वायाच गेले ना. मला तुझी काळजी वाटते होते. तुझे वडील काय त्यांचे आयुष्य जगले. पण तुझ्या मुलीचे लग्न , प्रतिकचे शिक्षण बाकी आहे ना. " जोशीकाका म्हणाले.

थोडे बोलणे झाल्यावर दोघे आपापल्या घरी गेले. अमोल येताच मेघा त्यांना सामोरी गेली.

" पाणी गरम केले आहे. पोहे चहा टाकते. ते खाऊन झोपा. प्रतिकला पाठवते हॉस्पिटलमध्ये. " मेघा म्हणली.

" पोहे नको बनवू. बाबांना खूप आवडायचे तुझे पोहे. कौतुक करून थकत नसायचे. चहाच कर. " अमोल भावुक होऊन म्हणाले.

" हम्म. " मेघा म्हणली.

प्रतीक जॉगिंग करून आला. त्याने कपडे बदलले आणि हॉस्पिटलमध्ये गेला.

हॉस्पिटलमध्ये त्याला एका मित्राचा फोन आला. त्या मित्राचा स्वतःचा पब होता.

" प्रतीक , आज येतोस का पबमध्ये ? मस्त दारू पिऊ. " मित्र म्हणाला.

प्रतीक पुन्हा भूतकाळात गेला. एकदा असच तो दारू पिऊन घरी आला. अमोलचे डोळे लाल झाले होते.
पण पार्थने अमोलला काही बोलू दिले नाही. सकाळी प्रतीक उठल्यावर पार्थ रागाने त्याच्याकडे बघू लागले.

" आजोबा , सॉरी. काल मित्रांनी फोर्स केले !" प्रतीक मान खाली टाकून म्हणाला.

" राग तर मला आलाय. एकटीच पार्टी केलीस !" पार्थ म्हणले.

प्रतिकला हसू फुटले आणि अमोलने डोक्यावर हात आपटला. दोघे आजोबानातू जॉगिंगला गेले. थोड्या वेळाने एका बेंचवर बसले.

" प्रतीक , तो समोर मिस्टर कुलकर्णी बघतोय ना ? त्याचा पण तुझ्याएवढाच मुलगा होता तरुण. खूप हौस पुरवायचा तो मुलाची. एकदिवस त्याच्या मुलाने ड्रिंक करून ड्राईव्ह केली आणि अपघातात त्याच्या मुलाने प्राण गमावले. आज त्याची मुलगी फोटोसमोर राखी ठेवते. आता गार्डनमध्ये हसतोय जोरजोरात पण मनात किती वेदना आहेत त्याचे त्यालाच ठाऊक. मी तुला बुलेट घेऊन दिली. पैसे देतो. कारण माझे तारूण्य खूप कष्टात गेले रे. अमोलची वृत्ती पण अंथरूण पांघरूण पाय पसरायची झाली. पण मला मनापासून वाटते की जे आम्ही एन्जॉय करू शकलो नाही ते तू एन्जॉय करावे. तुला दारू प्यावी वाटते तर पी. मला पण खूप आवडायची दारू. पण खिश्यात पैसेच नसायचे. आता प्यावे म्हणले तर आरोग्य नाही. असो. तू पी दारू पण जर काल दारू पिऊन घरी येताना अपघात झाला असता तर मेघाअमोलने कुणाकडे बघितले असते रे ? अमोल काही बोलला नसता पण मनातल्या मनात सारे खापर माझ्यावर फोडले असते त्याने. तू या घराचा नातू आहेस रे. तुझे प्राण महत्वाचे आहेत. मी श्रीस्वामी समर्थाकडे एकच मागणे मागतो की माझ्या नातवंडांची संकटे माझ्यावर येऊ दे. दारू पी पण दारू पिऊन कुणाला मारहाण करू नको आणि ड्राईव्ह पण करू नको. "

" हो आजोबा. मी यापुढे कधीच ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करणार. "

" बर पुढच्या पार्टीत मला पण घेऊन जा. मी पण एखादी गर्लफ्रेंड बनवतो तुझ्यासारखी. "

" काय आजोबा तुम्ही पण !" प्रतीक लाजला.

प्रतिकची तंद्री भंगली. तो वर्तमानात आला.

" मित्रा , सॉरी मी पार्टी नाही करू शकत. पण मला एक हेल्प हवी होती. मला जॉब हवा होता रे वेटरचा. तुझ्या पबमध्ये भेटेल का ?"

" व्हॉट ? आर यु सिरीयस ? दि प्रतीक जाधव. जो आमच्या पार्टीची जान असायचा तो ड्रिंक नको म्हणतोय आणि वेटरचा जॉब मागतोय ? काय झाले ब्रो ?" मित्राने विचारले.

" एल लग गये है ब्रो. तू सांग ना जॉब भेटेल का नाही ?"

" दुसऱ्या पबमध्ये विचारतो. काही मदत हवी असेल तर सांग. आज चार वाजता ये. सांगतो तुला जॉब कुठे भेटू शकतो ते. "

" थँक्स भाई !"

त्याच दिवशी दुपारी मेघा एकाला फोन करते.

" मी दिवसाच्या पन्नास चपात्या देऊ शकते आणि मला लोणचे , पापडपण बनवता येते. " मेघा समोरच्या व्यक्तीला म्हणते.

" चालेल मॅडम. आम्ही रोज सकाळी अकरा वाजता मुलगा पाठवतो. " समोरचा व्यक्ती म्हणाला.

" हो. पण फक्त माझ्या मिस्टरांना कळू देऊ नका प्लिज. " मेघा हळूच म्हणते.

@ थोड्या दिवसांनी

प्रतिक जॉगिंगहून येतो. बाबा सोफ्यावर बसलेले असतात. तेजश्री कसलेतरी कागदपत्रे घेऊन येते.

" बाबा , माझी प्लेसमेंट झालीय. तुमचे साईन हवे होते. " तेजश्री म्हणते.

" तू तर एमबीए करणार होती ना ?" अमोलने विचारले.

" बाबा ते एक वर्ष जॉबचा अनुभव असला तर सिवि चांगला दिसतो. " तेजश्री हळू आवाजात म्हणली.

" बाबा , आज लवकर आलात हॉस्पिटलहून. " प्रतिकने विचारले.

अमोल उठला आणि त्याने प्रतिकला थोबाडीत मारली. मेघा बाहेर आली.

" अहो , का मारताय असे मुलाला ?" मेघाने विचारले.

" इथे मी दिवसरात्र एक करून बाबांचा हॉस्पिटलचा खर्च भागवतोय. कितीतरी जुन्या एफडी तोडतोय आणि हे महाशय रोज पबमध्ये पडून असतात. आपल्याला म्हणतो ना ग्रुपस्टडी ते काही नसते. पबमध्ये दारू पीत असतो हा. काल जोशीने बघितले तुला पबमधून बाहेर पडताना. " अमोल रागात म्हणाले.

" जोशी काय करत होते तिथे ? ते पण पितात का ?" मेघा म्हणाली.

तेजश्री प्रतीक हळूच हसले. तोच दरवाजात रामू आला.

" मेघाताई , पन्नास चपात्या !" रामू पचकला.

मेघाने कपाळावर हात मारला. तेजश्रीने चपात्या आणून रामूला दिल्या.

" बाबा , त्या दिवशी जोशी तुम्हाला काय काय सांगत होता सर्व ऐकले मी. घरी येऊन सर्व सांगितले. तुमचा खूप खर्च होतोय ना आजोबांमुळे. पण आजोबा नक्किच बरे होतील. मी पबमध्ये पार्टी करत नाही तर वेटर म्हणून जॉब करतो. " प्रतिक म्हणला.

" बाबा , मला पण चांगला जॉब लागलाय. मी पण आजोबांच्या उपचारामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकते. मला नाही करायचे एमबीए. " तेजश्री म्हणली.

" मी पण रोज शंभर चपात्या लाटत जाईल. पण तुम्ही प्लिज सासरेबुवांचे उपचार थांबवू नका. सासूबाईंनी दिलेली काही दागिने मी कधी वापरत नाही ती पण विकू शकतो. " मेघा म्हणाली.

" बाबा , मी आयुष्यात कधीच दारू पिणार नाही. पार्टी करणार नाही. पण प्लिज आजोबांना जगवा. "प्रतीक कळवळीने म्हणाला.

" अरे तुमचा आजोबा आणि तुझा सासरा आहे तो पण माझे वडील आहेत ते. मी त्यांना वाऱ्यावर सोडेल अस कसे वाटले तुम्हाला ? मी किडनी विकेल पण बाबांचे उपचार थांबू देणार नाही. " अमोल रडत म्हणाले.

प्रतीकने अमोलला मिठी मारली. तेजश्रीला पण राहवले नाही. तिनेपण मिठी मारली. सर्व कुटुंब संकटसमयी एकत्र आले होते.

" स्वामीच वाचवू शकतात या घराला.अक्कलकोटला जायचे स्वामींच्या दर्शनाला ?" मेघा उच्चारली.

सर्वाना ही कल्पना आवडली. पूर्ण कुटुंब अक्कलकोटला गेले. स्वामींची आरती सुरू असतानाच अमोलला फोन आला. ती खबर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली.

" बाबा , शुद्धीवर आले. " अमोल म्हणाले.

सर्वांनी स्वामींचे आभार मानले.

समाप्त

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

पार्थ

Student

माझ्या सर्व साहित्याचे अधिकार राखीव आहेत. कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.