असे आगळे हे नाते

It's A Story Of Ramabai Ranade And Her Teacher Who Is Nothing But Her Husband Only.


असे आगळे हे नाते

नोट: रमाबाई या त्यांच्या पतीला " स्वतः " असं बोलायच्या

माधवराव - रमाबाई रमाबाई ,अहो असा अट्टहास का करत आहात आज ?. तुम्हाला ठाऊक आहे ना आम्हाला हे असलं नाही आवडत,अहो तुमचे पती आहोत आम्ही हे विसरला का ओ तूम्ही ?.

रमाबाई- नाही ओ मी कसं काय विसरेन हे ,तुम्ही माझे फक्त अहो नव्हे तर त्याही पेक्षा खुप काही आहात ,ते मला शब्दात सांगणे कठीण आहे . आजचा दिवस खास आहे ना त्यामुळे हे सगळं करतेय .स्वतः (माधवराव)बसताय ना तुम्ही ?

माधवराव - अहो मला आठवतंय जेव्हा रमा ही पोर माझी बायको होऊन दहा वर्षांपूर्वी या वाड्यात आली तेव्हा मी कार्यालयातून आलो की तुम्ही माझे असेच पाय धुवायचा आणि मी विचारलं तर म्हणायचा
"माझी आई म्हणते असं केल्याने नवरा बायको मधील प्रेम वाढते ".

रमाबाई - हो आपलं प्रेम तर वाढलं आहेच एकमेकांबाबत, पण त्याही पलीकडे जाऊन एक वेगळं नातं आहे आपलं. या अशिक्षित रमेला तुम्ही चार बुकं शिकवून मोठी केली, पाटीवर श्रीगणेशा गिरवायला शिकवलं . म्हणून आजच्या या गुरुपौर्णिमाच्या दिवशी मला माझ्या गुरूंची मनोभावे पूजा करायची आहे .त्यासाठीच ही तुम्हाला आवडणारी मोगऱ्याची फुलं आणि चंदनाचा लेप तुमच्या पायावर शिंपडत आहे आणि नतमस्तक होत आहे .


अहो स्वतः(माधवराव) , आता या चला जेवायला आज तुमच्या आवडीची पुरणपोळी आणि आमटी केली आहे .

माधवराव - पण तुम्हाला असं वाटत नाही का की तूम्ही हे जरा जास्तच वाढलं आहे आज ?.

रमाबाई: नाही ओ नेहमीप्रमाणे तर आहे

माधवराव- मला ठाऊक आहे तुमचे बहाणे .तूम्ही माझं उष्ट राहिलेलं जेवण खाता आणि सांगता की "माझी आई म्हणते नवऱ्याचं उष्ट खाल्ल्याने नवरा बायकोचं प्रेम वाढतं ".. म्हणून मी आता हवं तेवढंच खात असतो,पण आज एवढं सगळं जे भरभरून वाढलंय म्हणजे मला कळलं की मी मुद्दाम उष्ट ठेवावं अशी तुमची कल्पना दिसत आहे .

असं हसू नका आता मनातल्या मनात, चला या समोर बसा, तुम्हाला आज आमच्या हाताने भरवतो.

रमाबाई- इश्श ,अहो नको काहीपण काय तुमचं आपलं.

माधवराव- या म्हणतोय ना मी ? तुमच्या गुरूंचं ऐकणार नाही का ?.

माधवराव : घ्या हा एक घास घ्या.
अहो आता डोळ्यात पाणी आणायला काय झालं ?.

रमाबाई - अहो स्वतः , तुम्हाला आठवतंय जेव्हा मी नवीन नवीन या घरात आले होते तेव्हा तुमच्या सारखे मिशा तोंडावर काढून, हातात बुके घेऊन खुर्चीवर आरामात बसायचे.तेव्हा तुम्ही मला बजावलं की, "नवऱ्याची नक्कल करण्यापेक्षा आमच्या सारखी बुके शिका"
तेव्हापासून मी खूप शिकले ,रोज येणारा दिवस मला नवीन काहीतरी शिकवत होता.. तुम्ही मला पाटीवर अक्षरे लिहायला शिकवत आहे हे बघून लोकं नाही नाही ते बोलली तुम्हाला, पण तुम्ही त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मला शिकवत राहिलात, कधी मी अभ्यास करण्यासाठी आळस आणला तर मला छडीची भीती सुद्धा दाखवायचा. एका अडाणी रमेला आज तुम्ही तिला तिच्या पायावर उभी केलीत ,तुमच्या सारखे गुरू समाजातल्या प्रत्येक पत्नीला, स्त्रीला मिळो हीच त्या श्रीगणेश चरणी प्रार्थना.

माधवराव- आणि आम्ही म्हणेल की तुमच्या सारखी बायको प्रत्येक नवऱ्याला मिळो . आम्हाला आजही आठवतोय तो प्रसंग जेव्हा तुमचा गर्भदानाचा सोहळा होऊन तुम्हास आमच्या खोलीत निजवायास पाठवले..तेव्हा खरेच क्षणभर आमचे पाय लटपटलेच होते.पण आमच्या निश्चयासोबतच तुमचे निर्मळ मन आणि डोळ्यातील निरागस भावामुळे आम्ही तो कठीण प्रसंग देखील पार केला.

रमाबाई : हो .त्यावेळस मला काहीच कळले नव्हते, पण आज मागे वळून पाहिले म्हणजे कळते. त्यावेळेस तुम्ही किती संयमाने किती निश्चयाने सारे सांभाळून घेतले.पण आपल्या जागी दुसरे कोणी असते तर ?
पण ज्यांचे पती स्वतः (माधवराव) नाहीत अशा कितीतरी मुलींवर किती भयाण प्रसंग ओढवत असेल त्या कोवळ्या वयात ? याची कल्पना सुद्धा करावी वाटत नाहीये. स्वतः (माधवराव) आशा मुलींसाठी माझ्याकडून तुमच्या सोबतीने जे काही करता येईल ते केल्याशिवाय मी काही राहणार नाही.. आणि हीच माझी गुरुदक्षिणा समजा .खरेच.

" त्याच्या कृतार्थ डोळ्यात ,झुले उंच माझा झोका "