असावे सादर...

The cutest fight and war between young girl with her grandma along with her grandpa

       हि गोष्ट आहे आहनाची! तिच आहना जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात दडली आहे. अल्लड, थोडी समजदार आणि भरपूर खट्याळ. लेकीची लेक म्हणून तिच्या आजोबांच्या म्हणजे आण्णांच्या ती सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय!  तशी बाकी नातवंड होती; पण आहना तिच्या आईकडे आणि बाबांच्या घरच्यांची सगळ्यात लाडकी बाळ. मुंबईत राहत असल्याने तिचे गावी जाणे जवळपास अशक्य होते. पण बाकी कितीही झाले तरी मे महिन्याच्या सुट्टीत चार दिवसांसाठी का असेना ती नक्की गावी जात असे. 


      ह्या सुट्टीत देखील ती गावी आली होती . आजी आजोबा, मामा मामी ,मावशी काका आणि  भावंडे सगळे एकत्र येऊन खूप धमाल करायचे. आजोबांच्या घराला लागून आणखी त्यांच्याच चुलत भावंडांची घर होती, त्यामुळे तिने भावंडे मामाचा वाडा चिरेबंदी च्या ऐवजी मामाची चाळ चिरेबंदी असे म्हणायला सुरूवात केली . मामी तर अक्षरशः त्यांच्या मागे पळून अगदी दमून जायच्या.  शेतात जाऊन कैर्‍या तोडणे, बैलगाडीतून पूर्ण गावाची रपेट घेणे तिच्या   नित्यनेमाचा कार्यक्रम असायचा. आई बाबांचा पण तिला विसर पडला होता. दुपारच्या वेळी जेवणाचे ताट घेऊन मामी दादाला(मामेभावाला ) जेवण भरवण्याआधी हीला जेवू घालत असे.

      सायंकाळी उशिरापर्यंत शेतात खेळून आल्यावर मामींच्या ऑर्डरप्रमाणे आहना आणि तिच्या   मामेभावाला मारूतीच्या देवळात तेलाचा अभिषेक करून येत होतो. तितक्यात आण्णा  (आहनाचे आजोबा ) आणि मोठे आजोबा बोलताना  त्या दोघांनी ऐकले की दुसर्‍या दिवशी माई आणि आण्णांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा तिला जरा अप्रुप वाटले की एवढ्या मोठ्या माणसांना त्यांची वेडींग अॅनिवर्सरी कशी काय लक्षात आहे आणि आपल्याला हे आधी का माहित नव्हते याचे वाईट वाटले. त्या  सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन सरप्राईज पार्टी प्लॅन केली. त्यासाठी  सगळ्या घरच्यांनी तिची खूप हेल्प केली तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीचं खूप कौतुक वाटलं. रात्रीच गुपचूप सगळ्या नातेवाईकांना आणि पाहुण्यांना फोन करून आमंत्रण देण्याचे काम आहनाने केले. 

     सकाळी लवकर उठून  आहना आणि तिचा दादा बसलेत तर काय आण्णांनी आकाशवाणीवर बातम्या सोडून चक्क मराठी सिनेमांची गाणी लावली होती आणि एरवी पोहे खाऊ नका असे बोलणारी माई आण्णांना प्लेटभर गरम पोहे देत होती. आता कुणाला वाचताना काय वाटते माहित नाही पण तेव्हा आम्हाला जाम भारी वाटलं तिला. प्लॅननूसार त्यांनी केक सायंकाळी सगळ्या नातेवाईकांना निमंत्रण दिले होते आणि माई आण्णांना देवळात जाण्यासाठी पिटाळले. मामा मामी आणि घरात जिन्नस बनवत होते आणि आहना आणि तिच्या भावंडांनी पूर्ण घर सजवलेले होते. 

    घरी परतल्यावर  सरप्राईज म्हणून माई आण्णांसमोर ठेवला तेव्हा ते जाम खुश झाले होते.  नंतर केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आहनाच्या मनात अचानक काय आले काय माहित ती माईला जाऊन विचारते," माई तुझ्या आणि अण्णांच्या लग्नाला किती वर्षे झाली? " "पूर्ण पंचेचाळीस वर्षे!"माई उत्तरली. आहनाने लगोलग माईला विचारले, "बापरे बिचारे माझे आण्णा इतकी वर्ष तुला कसं सहन करत आहेत?" ऐकून सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. 

    माईने सगळ्यांसमोर माझी कानपिळी घेतली अन् बोलली,"तू खूप वात्रट झाली आहेस. पुन्हा असं बोललीस तर फटके देईन. " "अगं मामा कालंच बोलत होता मला; सगळ्यातजास्त गट्स माझ्यात आहेत की मी तुझ्या मामीचं सगळं ऐकतो; म्हणून मी विचारले. " हे ऐकून मामींनी मामाकडे डोळे मोठे करून पाहिले. मामा मात्र चाचपडत खाली बघू लागला.. मामी आजीसोबत किचनमध्ये जाते. तेवढ्यात आण्णा तिच्यासमोर येतात आणि बोलतात, "हे बघ बाळ. तुझ्या माईशी लग्न केले आहे ना मी. आता ना ती बदलू शकत ना मी.  मी तिला पंचेचाळीस वर्षे सहन केलं आणि तसं ती पण मला सहन करतच आहे ना! माझी काळजी घेते.. माझी औषधं घेण्याची वेळ आणि तुमच्या भाषेत काय म्हणता ते mood swings सांभाळते.. तेव्हा मी एकच तत्व अंगी बाळगलं "आलिया भोगासी असावे सादर" आणि तुझ्या माईला सहन करतोय. चल जा सगळे  आता खेळायला." आणि तेपण पारावर रेडिओ ऐकायला  निघून जातात.
 ~ऋचा निलिमा