आर्या... भाग 20

आर्या

 भाग 20



                रात्री सर्व टेरेस वर पार्टी करण्यासाठी गेले होते.. रमा ने आधीच आई अजी ,मामी व आर्या यांना लवकर जेवण करून झोपवले होते....  विश्वास आणि विलास ने सर्व तयारी केली होती.....  आज मामा नाही म्हणून सर्वाचा आनंद उधाण आले होते.... आर्या ने सिंपल केप्री व ब्ल्यू टी शर्ट घातला होता... व केस मोकळे सोडले होते. लांब मोकळ्या केस मध्ये ती सुंदर दिसत होती .

चल लवकर,  वहिनी केव्हाच वाट पाहत आहे.... शालू आत अली तसे तिची नजर आर्या वर गेली .

मेक अप न करता इतका ग्लो , मला ही सांग ना..काय लावले तू चेहऱ्याला?....शालू .

मार खाशील , काहीही असतं तुझ आर्या हसत म्हणाली .


सांग की , आजकाल तू काहीच सांगत नाही मला..☹️ पण मल सर्व समजत हा..!? संग्राम राव आल्यापासून चेहरा कसा चमकत आहे.... शालू .

तू ना थांब, .पाहते च तुझा कडे .

असे बोलून आर्या तिचा मागे धावत गेली , तशी शालू पुढे पळत सुटली.... दोघी ही पळत वरती टेरेस चा दिशेने जात होत्या , तितक्यात आर्या संग्राम ला धडकून पडणार..
त्याने तिला सावरले व तिचा डोळ्यात हरवून गेला .
त्याने तिचा कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढले ..ती ही त्याचा डोळ्यात हरवून गेली.... दोघांना हि तो क्षण इथेच थांबवा असे वाटत होते....त्यातच रमा ने आर्या ल आवाज दिला तसे ते भानवण आले... व आर्या आत पळून गेली.


संग्राम ही हसत तिचा मागे गेला .


सर्व वरती बसले होते , संग्राम महेश शेजारी जाऊन बसला व आर्या त्याच समोर बसली.... त्याची नजर अजून ही तिचा वरून हटत नव्हती... मोकळ्या लांब केस मध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती .


काय करत होता तुम्ही , किती उशीर .रमा चा बोलण्यावर दोघे चपापले.


राहूदे ना , झाला असेल उशीर . का त्यांना प्रश्न विचारून हैराण करते....अशाने आबा घरात असण्याचा फील येतो..?,.विश्वास चा बोलण्यावर सर्व हसले .


तसे विलास ने ड्रिंक करण्यासाठी बॉटल बाहेर काढल्या व खाण्याचा वस्तू मांडून ठेवल्या .


हे काय ...,!मी ड्रिंक करत नाही...... संग्राम .


ये काय यार , कधीतरी घेतली की नाही काही होत . माझा वाढदिवसाला तर घेतली होती की.....महेश.


संग्राम राव , आम्ही तरी कुठे जास्त घेतो.....हे आपल कधीतरी चोरुन नाहीतर आमचे पिता श्री आम्हाला बाहेर काढून टाकतील.... विलास चा बोलण्यावर सर्व हसले.


विश्वास ने सर्व साठी ग्लास भरले...फक्त रमा आणि शालू ने कोल्ड्रिंक्स घेतली .


संग्राम ला माहित नव्हते , आर्या ड्रिंक करते.... पण आज आर्या ला संग्राम समोर घ्यायला नको वाटत होते.... कॉलेज मध्ये असताना मस्ती मस्ती ती कधीतरी ड्रिंक करत होती..... तीने समोर पाहिले आणि कोल्ड्रिंक्स चा ग्लास हातात घेतला... विश्वास ने तीच्या हातातून तो ग्लास ओढून घेतला... आर्या काय झाले आज तुला घ्यायची नाही का...?  की पाहून आहे म्हणून लाजते आहे,   दरवेळी आली की उलट तू संधी शोधत असते माझ्या माघे लागून आणि आता हे काय नवीन...... विश्वास ने तीच्या हातात बळच ग्लास दिला.....तिने ग्लास उचलला व ओठांना लावणार तिची नजर संग्राम वर गेली....तास तिला संकोच वाटला . ती ग्लास खाली ठेवणार....त्याने डोळ्याने तिला घे म्हणून इशारा केला तसे तिने प्यायला सुरुवात केली .


      हे तुम्हाला माहीत आहे , संग्राम कॉलेज मध्ये असताना खूप सुंदर कविता करत होता .... महेश .


अरे वाह . रमा तू कधी बोलली नाही.... विश्वास .


अरे हो .मी सांगायची विसरली , दादा ने खूप साऱ्या कविता केल्या आहे. दादा बोलून दाखव ना एखादी....रमा .


काहीतरी च काय .ते कॉलेज मध्ये असताना करत होतो..आता कुठे , अत काही आठवत नाही ....संग्राम.


काय भाई , अस कुठे असते का..? म्हणजे नक्कीच कॉलेज मध्ये असताना भाई कोणावर प्रेम करत असेल म्हणून तेव्हा कविता सुचत होत्या....,?आता नाही .हो ना,  महेश म्हणाला तसा आर्या ने संग्राम कडे पाहिले .


         हे काहीही काय,. तू काय माज ब्रेक अप करायला आला आहेस का.....संग्राम हळू आवाजात म्हणाला.


मग बोल की , का वहिनी ला पाहून काही सुचत नाही .इतकी वाईट ही दिसत नाही ती.... त्याचा बोलण्यावर संग्राम चिडला.


        बोला ना संग्राम राव , आपण च आहोत इथे...थोडी साहित्य संमेलन आहे जिथे लोक तुम्हाला बोलतील...आणि असेही आम्हाला त्यातले काही समजत नाही.तरी आम्ही तुम्हाला दाद देऊ....विलास चा बोलण्यावर सर्व हसले.


        सर्व इतका फोर्स करत आहे.तर बोला ना प्लीज....आता आर्या ने संगीलत तसा त्याचा नाईलाज झालं  व त्याने कविता बोलायला सुरुवात केली .


काय वर्णावे मी
सौंदर्य तुझ्या रूपाचे
नेहमीच मज वाटे
कौतुक साधेपणाचे

गुलाबी डोळे, गुलाबी ओठ,
गुलाबीच तुझे लाजणे हे
हा भास माझा की, आहे
नव्याने प्रेमात पडणे हे

मोकळ्या केसांत तुझ्या
अवखळ वाराही गुणगूणतो
हळूच घ्यावे मिठीत तुजला
हा संदेश मला पोहोचवतो

निरभ्र आकाशी पहुडलंय
तुझ्या तेजाचं चांदणं
देशील का साथ मला
तोडून मनाची बंधनं ?

देशील का साथ मला
तोडून मनाची बंधनं ?"




          त्याने जशी कविता संपवली , सर्वांनी टाळ्या वाजवल्या.... आर्या ला खूप लाजल्या सारखे झाले होते ???
कारण तीला माहित होते , ही कविता तिचा साठी आहे.


      अरे वाह ....! संग्राम राव , तुमचा सारखी पेहेलवन माणसं अशी रोमँटिक कविता बोलायला लागले तर आमचे कसे होणार.....विश्वास .

     माझा दादा आहे च हुषार...! हो की नाही आर्या.... रमा तिच्याकडे पाहत म्हणाली तशी ती लाजली .


     नाहीतर तुमचा घरात कवितेचा क तरी येतो का   कोणाल....रमा .


             तू चेलेज करू नको हा ,  आमचा घरात एक च मल्टी टेलेंटेड मिस आर्या..... विलास म्हणाला तसे सर्वांनी तिच्याकडे पाहिले .


         आर्या आणि कविता, शक्य नाही...?.हा कोणाचे हात पाय कसे तोडायचे हे तिला चांगले माहित आहे..... संग्राम म्हणाला तसे सर्व हसले.


         आर्या ला त्याचे बोलणे अजिबात आवडले नाही . तिने रागात त्याचा कडे पाहिले तर तो तिलाच पाहून हसत होता....तसे तिने कविता बोलायला सुरुवात केली .




"मनात तू.. ध्यानात तू..
हृदयाच्या स्पंदनात तू..
स्वप्नात तू.. सत्यात तू..
आहेस माझ्या अंतरात तू

होते चलबिचल नजरेची
स्पंदने सूर छेडती
तू जवळी येता
रोम रोम हर्षती

ओढ तुझ्या मिठीची
वाटे मनास फार
विरहाचा क्षणभराच्याही
होई पापण्यांस भार

चांदण्या रात्रीत ह्या
तुझा हात हाती घेऊनि
चालायचे जन्मभर मला
तुझी प्रेयसी होऊनि"


             तिने कविता संपवली तसे सर्वांनी टाळ्या वाजवल्या, आर्या ने खूप सुंदर कविता बोलली होती .


पाहिले , मी म्हणालो होतो ना...!आमचा घरातील सर्वात हुषार मुलगी....विलास चे म्हणणे सर्वांना पटले होते .


         त्या रात्री खूप वेळ सर्व बोलत होते व नंतर आपापल्या रूम मध्ये निघून गेले....संग्राम ला तिचा सोबत टाईम स्पेन करायचं होतं, ☺️परंतु सर्व समोर हे शक्य नव्हते .
आज आर्या ही खुश होती, आज खूप वेळ संग्राम तिचा समोर होता.....तिला त्याला डोळे भरून पाहत येत होते .

        सकाळी सर्व हॉल मध्ये आले, संग्राम आणि महेश ही आवरून आले होते . त्यांना ही घरी जायचे होते....सर्वांनी सोबत नाश्ता केला .


        चला निघतो आम्ही , संग्राम सर्वाचा पाय पडला.
अधून मधून येत जावा....घर कसे भरल्यासारखे वाटते.नाहीतर घर अगदी खायला उठते.....मामी.


        मी असताना तू असे कशी बोलू शकते . घरात मी आहे म्हणून बडबड एकायला मिळते नाहीतर मामा श्री चा भीती ने सर्व चिडी चूप असतात.....आर्या म्हणाली तसे सर्व हसले .

       संग्राम ने जाताना एकदा तिचा कडे पाहिले.
तिचा चेहरा उतरलं होता. पण सर्व समोर त्याला आर्या सोबत बोलता ही येत नव्हते... म्हणून तो महेश सोबत बाहेर आला व आर्या ला मेसेज केला.


         मी संदीप चा घरी चाललो आहे,  तू तिथे येऊन भेट.
           आर्या चा मेसेज ची रिंग वाजली तसे तिने मेसेज पाहिलं व तिचा चेहऱ्यावर मोठी smail आली. ??


           संग्राम ची गाडी संदीप च घराजवळ येऊन थांबली ..आज सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता..व त्यानेच सकाळी कॉल करून संग्राम ला घरी येण्यासाठी सांगितले होते.


अरे भाऊजी या ना,  हे केव्हाच वाट पाहत आहे.... सुमन ने त्यानं आत घेतले , तसे दोघे खुर्चीवर बसले .


अरे महेश राव , कसे अहत.... संदीप.


काय करणार , ? आज काल आमची डुटी फक्त संग्राम  सोबत असते.....ते बोलतील तिथे निमूटपणे चालायचं..... महेश.


          त्यांची वारी संध्या मोरगाव मध्ये जास्त वाढली आहे ....संदीप च बोलण्यावर सर्व हसले.


तितक्यात सुमन चहा ,नाश्ता घेऊन आलो .

कशाला वहिनी,  आम्ही नाश्ता करून आलो आहोत.....संग्राम.

थोड खाऊन घ्या , तुम्ही येणार म्हणून मी आधीच बनवला होता....सुमन म्हणाली तसे आर्या ची बाईक बाहेर येऊन थांबली .

अरे वाह ..!  वहिनी साहेब ही आल्या आहेत तर ......संदीप गालात हसत म्हणाला तसा संग्राम लाजला.

हॅलो वहिनी ....कशा अहत .आर्या आत येत म्हणाली.
मी ठीक आहे,  तू बास मी चहा घेऊन येते. सुमन आत गेली.... आर्या ही खुर्चीवर बसले .

          बर झाले तुम्ही दोघे आलात .तुमचा दोघांना महत्वाचे सांगायचे होते.... संदीप ने फाईल हातात घेतली व बोलायला सुरुवात केली .

         आर्या , तुझा बाबा ची केस मी reopen केली आहे.लवकरच त्यांचा खून झाला आहे....हे आपल्यासमोर येईल .संदीप म्हणाला तशी आर्या खुश झाली , तिचे डोळे पाणावले.

तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही .


            हे माझे कर्तव्य आहे . तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल... संदीप ने तिला धीर दिला.

      आपल्या लवकर पुरावे गोळा करावे लागतील , कारण आर्या या वेळी इलेक्शन साठी उभी राहणार आहे. त्या आधी आपल्याला मामा चा पर्दा फाश करायला हवा..... संग्राम .


       तुम्ही निच्छित रहा संग्राम , आता मला काहीतरी करावे लागेल खूप झाले....आता मी माझा बाबा ना न्याय दिल्या शिवाय राहणार नाही...आर्या म्हणाली तसा संग्राम चा फोन वाजला.


         तो बाजूला गेला व कॉल रिसिव्ह केला
कॉल वर त्याने जे एकले त्या नंतर त्याचा चेहऱ्याचा रंग उडाला .

क्रमशः

🎭 Series Post

View all