आर्या भाग 48

आर्या






        "संग्राम दोन दिवसांनी माझा इंटरव्ह्यू आहे , तुम्ही येणार ना माझ्या बरोबर....
आपण दोन दिवस तिकडेच थांबुयात....चालेल का तुम्हाला...."आर्या विचारत होती.


      "हो शोना...  तुझा इतका मोठा दिवस आहे तर मी येणारच ना... आणि म्हणशील तसे... मी बायकोच्या शब्दाबाहेर आहे का...?
तुला जे योग्य वाटेल तेच आपण करूया...."संग्राम.


     "संग्राम माझा इंटरव्ह्यू झाला की मला ट्रेनिंग ला जावे लागेल जवळ जवळ एक वर्ष.... कसे राहणार आपण.... मला तुमची इतकी सवय झाली आहे की आता सोडून नाही राहवे वाटत...."आर्या संग्राम च्या गळ्यात पडत बोलली.


      "हो शोना सगळे कळते मला.... पण आता एवढे तर सहन करावेच लागेल ना...?
तू परत आलीस की मग जोमाने आपल्या संसाराला सुरवात करूया.... तो पर्यंत हा विरह सहन करणे भागच आहे...


      "हमहमाम,. बर ते जाऊद्या.... मला सांगा तुम्ही रमा वहिनींना काय गिफ्ट घेणार आहात.... त्यांना काय ते चोर चोळी करायची आहे ना दोन दिवसांनी....
आपल्याकडून त्यांच्यासाठी काहीतरी खास भेट घेऊया.... नंतर पुढच्या त्यांच्या कार्यक्रमात मला सामील होता येईल की नाही माहीत नाही ..."आर्या.


          " आर्या तुला सगळ्यांची पडलेली आहे माझ्यासाठी काही प्लॅन केला आहे की नाही.... आता येवढे दिवस मला सोडून जाशील... तर मला काही स्पेशल आहे की नाही....
की घरातच सगळा वेळ जाणार आहे तुझा...."संग्राम.


      "ओह्ह...  मी तर तुमच्या साठी काही प्लॅन च केला नाही.....
पण आता तुम्ही म्हणताय तर नक्की काहीतरी करते.... थोडा विचार करावा लागेल मला...." आर्या विचार करण्याचे नाटक करू लगली.


      " तुला नाटकं नाही करता येत... उगीच कश्याला तुझा वेळ घालवते आहेस यात.... त्यापेक्षा इंटरव्ह्यू ची तयारी कर ते चांगले राहील आपल्याला...."संग्राम.


       "दिवस भर तेच करत असते.... आता कंटाळा आलाय...मला तुमच्या बरोबर वेळ घालवायचा आहे... तुम्ही मला हवे आहे आता....आर्या.


       " असे सांगायचे की आधीच.... मला वाटले तुला अभ्यास असेल, थकवायला नको म्हणून मी तुझ्या पासून लांब राहत होतो...."संग्राम हसत आर्याला जवळ ओढत बोलला.


     "मी तुम्हाला सांगायला पाहिजे असे काही.... आर्या संग्रामच्या खांद्यावर डोके ठेवत बोलली.

        "संग्राम आणि आर्याने पूर्ण रात्र एकमेकांच्या प्रेमात घालवली.


        "संग्राम उठतात ना.... अहो रात्र संपली... सकाळ झाली तरी अजून तुम्ही स्वप्नात आहात का?...."आर्या संग्राम च्या कानात मादक आवाजात बोलली.


        " आर्या तुझ्यात अजून बराच जोर दिसतो आहे... रात्री कमी झाले का... अजून तुला थकायचे आहे का..?संग्राम आर्याला जवळ खेचत बोलला.


      "आर्या त्याच्या चेहऱ्यावर तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर फिरवत बोलली... आता वेळ नाही आणि मला पूजा करायची आहे...
खाली कोणीतरी आले आहे तुम्हाला भेटायला लवकर खाली या.... आणि हो जरा फुल्ल कॉलरचा शर्ट घालून या...."आर्या बोलून निघून गेली.


     "संग्राम अघोल करून आरश्यासमोर उभे राहून केस पुसत होता तर त्याचे लक्ष त्याच्या गळ्यावर गेले....
आर्या आर्या.... म्हणून मला फुल्ल कोलारचा शर्ट घालयाला सांगितला का..? किती चावली आहे मांजर मला..."गळ्यावर वरच्या लव बाईट वर बोट फिरवत संग्राम तयार होऊन खाली आला.


       " संग्राम त्याला भेटायला आलेल्या माणसाबरोबर काम आहे म्हणून सांगून बाहेर जाऊ लागला.


      "संग्राम अहो तुम्ही दूध पण नाही घेतले.... दोन मिनिट लगतील, मी आणते ना लगेच...."आर्या.


      "आर्या महत्वाचे काम आहे.... मला घाई आहे... तू शेतावर नंतर घेऊन ये.... येतो मी..."संग्राम बोलून निघून गेला.... आर्या चे काही ऐकून पण नाही घेतले.L


       "दुपारी आर्या शेतावर जाण्यासाठी तयारी करू लागली....
माई आपण तालुक्याला जाऊन येऊयात का..? रमा वहिनींना काय काय घ्यायचे ते घेऊन येऊया...." आर्या.


     
        "आर्या तू आणि संग्राम जाऊन घेऊन या... मी तुम्हाला सांगते काय काय पाहिजे ते.... तुला माझ्या पेक्षा जास्त कळते आताच्या मुलींना काय आवडते ते...."माई.


      "माई पुढच्या हप्त्यात आम्ही शहरात जाणार आहोत.... माझा इंटरव्ह्यू आहे.... त्यावेळी करते मग सगळी खरेदी....
      माई आपण हा रमा बहिणीसाठी चांगले काहीतरी घेऊयात...."आर्या.


        "आर्या आता सगळे तुझ्यात हातात आहे तुला जे वाटते ते तू कर.... माझ्या नंतर तुलाच सगळे सांभाळायचे आहे....
लवकर तू तुझे काम पूर्ण करून आलीस की मग मी तुझ्या हातात सगळी घराची सुत्र देवून मी आराम करणार..."माई.


       "माई माझे हे स्वप्न पूर्ण करताना मी तुम्हाला दुःख वते आहे ना..? .
तुम्हाला घरात राहणारी.... हे घर संभळणारी सून पाहिजे असेल ना..?..."आर्या.


        " वेडा बाई असा काही विचार करू नकोस... संग्राम ला जे आवडते तेच आम्हाला पण आवडते.... आणि माझी सून अशी बुलेट वर बसून पोलिसांचा काय ते IPS होऊन घरी येईल... किती भारी वाटेल मला....
उलट माझा तुझा अभिमान आहे.... तू नक्की सगळ्या कामात यशस्वी होणार...."माई आज अगदी भरून भरून बोलत होती.


       " आर्या ने हसून माई ला मिठी मारली.... माई तुम्ही आई सारख्याच बोलतात...."


       " बस झाले आता जा.... संग्राम वाट पाहत असेल तुझी... फार वेळ नको करुस भूक लागली असेल त्याला...."माई.


       " माई मला तुमच्याकडे अजून एक काम आहे.... तुम्हीच ते करू शकतात माई...." आर्या.


      " काय काम आहे.... महेश आणि शालू बद्दल का...?..." माई ने हसत विचारले.


  
       " माई तुम्हाला कसे कळले.... मला काय बोलायचे आहे....
तुम्ही मावशिशी बोलाल.... महेश आणि मीनाक्षी... परत एकदा साटे लोट करून घेऊया...."आर्या थोडी चाचरत बोलली.


      "अग बाई... म्हणजे इथे पण पाणी मुरते आहे का..? छान आहे त्या घराच्या दोन्ही मुली माझ्या घरी या घराच्या त्या घरी...
मी आजच तुझ्या मावशि ला बोलते आणि आबांच्या कानावर घालते...."माई.


      "आर्या माई शी थोडे बोलून शेतावर जायला निघाली....
संग्राम आत काहीतरी बियाणे समजावून घेत त्या बद्दल सांगत होता ... .
आर्या शेतावर घरात जाऊन बसली... सहज तिचे लक्ष समोर वाळत असलेल्या साडीवर गेले....

      " रखमा ही तुझी साडी आहे ना.... मला नेसायची आहे तू मला देते का नेसवून...."आर्या तिथे असलेल्या बाईला बोलली.


      "ताई ही माझी जुनी साडी आहे... तुम्हाला दुसरी देते मी नवीनच आहे अजून मी घडी बी नाय मोडली....
चला तुम्हाला दाखवते.... "रखमा कपाटातून एक नववारी साडी घेऊन आली आणि आर्याला नेसायला मदत केली.


       "ताई तुम्ही एकदम झाक दिसताय बघा... संग्राम भाऊ तर आता तुम्हाला पाहतील ना तर नजरच हलणार नाही त्यांची तुमच्यावरच...."रखमा.


        " दे तो डब्बा इकडे... आमच्या धनीला देवून येते.. किती वेळ झाला उपाशी आहे माझा धनी...."आर्या डोक्यावर पदर घेऊन डब्बा ऐक कपडी पिशवीत घातला.... आणि डब्बा घेऊन चालत निघाली.


       "संग्राम च्या समोर काही माणसे होते... त्यांचे काहीतरी बोलणे चालू होते ... आर्या साडीच्या पदराने तिचा अर्धा चेहरा झाकून संग्राम च्या मागे उभी होती...
तिला बघून समोर असलेले मागे बघू लागले.... संग्राम बोलत असताना त्याचे लक्ष गेले की समोर असलेले लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही.... तर ते मागे बघत आहे म्हणून संग्राम ने मागे वळून पाहिले.....

 
       "बाई कोण तुम्ही.... काही काम आहे का तुमचे...."संग्राम मागे गोंधळून बघत बोलला... आर्या चा चेहरा झाकला असल्याने त्याने ओळखले नाही.


        "धनी मी न्याहारी आणली होती तुमच्यासाठी... तुम्हांस्नी भूक लागली असेल ना..?..."आर्या चा आवाज ऐकून संग्राम दोन मिनिट तिच्याकडे एकटक बघत अचानक हसू लागला....
आर्या आज हे काय आहे नवीन....आणि तू अशी.... बापरे.... हसून हसून संग्राम च्या डोळ्यात पाणी आले.


      " धनी.... तुम्हांस्नी आवडले नाही का.... जावा मी नाही बोलत आता तुमच्याशी...
आर्या तोंड वाकडे करत पदर डोक्यावर नीट करत बोलली.


      "अरे अरे... खूप छान दिसते आहेस.... अगदी या शेतकऱ्याची बायको शोभते आहेस बघ.... खूपच भारी धक्का दिला तू मला.... अगदी गोड दिसते आहेस..." संग्राम आर्या ला जवळ घेत बोलला.


     

      "संग्राम शेठ आम्ही नंतर येतो....तुम्ही चालू द्या...."समोर उभे असलेला एक माणूस बोलला.


     " साहेब थांबा... आपले थोडेच काम राहिले आहे ते करून घेऊ.... तो पर्यंत आमच्या कारभारीन बाई थांबतील...."संग्राम.


       "संग्राम साहेब.... तुमची बायको गवतलीच आहे का..? तुम्ही एवढे प्रगत शेतकरी आहे... मॅडम ची जर तुम्हाला मदत झाली तर गावातील बायकांना त्या चांगला सल्ला देवू शकल्या असत्या...."कृषी तज्ञ माणूस सांगत होता.


        " मॅडम ची मदत नक्की होईल पण आता त्यांची स्वप्न आधी पूर्ण करू द्यात.... वर्ष भरात गावात बराच बदल होईल.... त्यासाठी ती प्रयत्न करत आहे..."संग्राम.


       " पण मॅडम ला आधी तुम्हाला शिकवावे लागेल... जर तुम्हाला गरज असेल तर आमच्या काही महिला प्रशिक्षणासाठी पाठवायची सोय करायची का..?
जर मॅडम तयार असतील तर..."तो माणूस.


        "मॅडम ला त्याची गरज नाही.... आर्या यांचे म्हणजे आहे तुला काही शिक्षण घ्यायचे का.... म्हणजे तू गावातल्या बायकांना मदत करशील आणि शेतीत सुधारणा करण्यास मदत होईल ...." संग्राम.


       " मला सध्या तरी या कामासाठी वेळ नाही.... पण माझ्या गावात बायकांना नक्की याचा फायदा होईल...
मी जेव्हा ट्रेनिंग वरून परत येईल... तेव्हा आपण काम लवकरच चालू करूयात.... तुम्हाला काही करता येईल तर तुम्ही सुरवात करायला हरकत नाही..."आर्या बोल्याबर तो माणूस आर्या कडे दोन मिनिट फक्त बघतच राहिला.


       "साहेब ... माझी बायको शहरात शिकलेली आहे... तिचा परवा interview आहे....लवकरच मॅडम ips होणार आहेत ... एकदा तिला पोस्ट मिळाली की या गावात तिला अडवण्याचा कोणीच हिम्मत करणार नाही.... तो पर्यंत आपण योजना नक्की तयार करून ठेवूया...."संग्राम.


        " मॅडम ips होणार.... सॉरी पण यांच्याकडे बघून माझा काहीतरी गैरसमज झाला...."तो माणूस.


       " अहो तिने आज सहज मला आवडते म्हणून ही साडी घातली आहे ... काळजी करू नका... ती आता दिसते तशी अजिबात नाही .. " संग्राम बोलल्यावर त्या माणसाने हसत त्याचा निरोप घेतला आणि आर्या चे अभी करून तिथून निघुन गेला.....


      "काय मग इनामदार बाई.... आज काय सुचले हे नवीन ...  .
पण सरप्राइज छान आहे बर का.... अगदी माझी शेतकरीण दिसते आहे बघ ..."संग्राम..


       "बस झाले आता चला पहिले काहीतरी खाऊन घ्या.... नंतर बोलूया आपण ...
आणि हो मी आज घरी जाणार आहे थोडावेळ... तुम्ही काम झाले की मला घ्यायला या ...." आर्या.


        " म्हणजे तू आता चालली आहेस.... मला वाटले आज दिवस माझ्याबरोबर घालवणार की काय...?
ठीक आहे जाऊन ये... आणि करखाण्याची सगळे काम मार्गी लावून घे आज....
परत त्या कामासाठी तुला वेळ नाही मिळणार...."संग्राम.


       "हो आता निघते मी तुम्ही या लवकरच.... आर्या बोलून तिच्या घरी गेली....
घरात पोहचल्या पोहचल्या काहीतरी गडबड जाणवली....
मामी काय झाले... काय चालू आहे घरात.... आर्या ने मामी जवळ जाऊन विचारले.


        "आर्या बरे झाले तू आलीस... अग शालू आणि विकास साठी लग्नाची बोलणी करायला पाहुणे येताय.... आताच फोन आलेला... येतीलच काही वेळात... चला आता आलीच आहेस तर मदत कर मला...."मामी.


      "पाहुणे पण कोण मामी... आणि सगळे अचानक का झाले... आर्या बोलत होती तर विकास तिथे आला.
आर्या वरती येतेस का मला तुझ्याशी बोलायचे आहे...


        " विकास दादा काय झाले तुला... असा का चेहरा पाडून बसला आहे...."आर्या.



         " आर्या.... हे सगळे काय चालले आहे... शालू आणि मला काही कल्पना पण नाही आणि तुम्ही लोक हे सगळे ठरवुन मोकळे झाले...
आज तुझ्या घरचे येणार आहेत, आधी आम्हाला कल्पना पण दिली नाही...."विकास.


       " दादा.... तुला मीनाक्षी आवडत नाही का..?
तसे असेल तर मी.आताच घरी.बोलते.... मला वाटले तुला मीनाक्षी आवडते...
कारण तिला तू आवडतो....म्हणून मीच शालू.बरोबर तुझे पण सांगितले.


   .     " ये वेडवाई... मी असे कुठे म्हणालो मला ती आवडत नाही...
पण खूप घाई होते आहे... आम्ही दोनच वेळा भेटलो होतो फक्त... त्यात सगळे ठरवुन मोकळी झालीस.... म्हणून मला थोडा वेळ हवा होता...."विलास.


      " दादा अरे कुठे आजच लग्न करून देणार आहेत... आणि तुला वेळ हवा असला तरी तुला तिला परत परत भेटणे शक्य नाही.... कारण घरात आणि या गावात ते प्रकार चालणार नाही...
लग्न झाले की मग हवा तेव्हढा वेळ घे समजून घ्यायला... मीनाक्षी अगदी रमा वहिनी सारखीच आहे, ती सगळे छान सांभाळून घेईल...."आर्या.


   .    " तू ठरवले आहेस तर मग मी पण तयार आहे.... पण आज बाबा काही बोलले तर मी मध्ये पडणार ... मला लग्न करताना मुळीवल्यांनाकुठल्याही अटी नको आहे... नाहीतर मी लग्नच नाही करणार..."विकास.


       " दादा आपण पण मुलीवाले आहोत.... त्यामुळे मामा आता तरी काही करू शकत नाही....
आणि हो आता तू इथेच राहून इथले काम सांभाळावे... मी नसल्यावर विश्वास दादाला मदत होईल तुझी..."आर्या.


         " हो राज... मी आता हे गाव सोडून कुठे जाणार पण नाही..." विकास.


       "आर्या खाली पाहुणे आलेत... आई बोलावते आहे... "शालू दारातूनच बोलली.


  
      " हो आमच्या होणाऱ्या जाऊ बाई, आलेच मी... आर्या खाली गेली तर घरातले सगळे आले होते...
मावशी आणि काका महेश आणि मिनक्षिला घेऊन आले होते.....



      " चहा पाण्याचा कार्यक्रम झाला... मग हळूहळू बोलणी सुरू झाली.... संग्राम स्वतः पुढे होऊन सगळे बोलत होते.
मला वाटते दोन्ही लग्न एकाच मांडवात पार पाडावे.... आणि सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ.... जे पैसे वाचतील ते गावातील शिक्षणाच्या कमी वापरावा... हे माझे मत आहे....."संग्राम.


       " संग्राम आम्ही सगळे तुझ्या हातात सोडले आहे... तुला जे योग्य वाटेल तसेच करूयात... आम्ही सगळे तुझ्याच हातात दिले आहे, घरातला मोठा मुलगा आहेस.... तुलाच सगळी जबाबदारी पार पाडायची आहे...." मावशी.


        " जावई म्हणताय तर आम्हालाही काहीच हरकत नाही.... आता गाव आणि घर सगळे तुमच्याच हवाली केले आहे आम्ही....
तर सगळे जर तयार असतील तर आपण पुढची बोलणी करून तारीख काढून घेऊ.... लवकर सगळे झालेले बरे होईल..." मामा.


      " गुरुजी नी पंचाग बघून तारीख काढली...
येत्या पंधरा दिवसांची तारीख दोन्ही लग्नाला अगदी योग्य आहे...  शुभ मुहूर्त आहे, नंतर कमीत कमीत सहा महिने तरी पुढे तारीख निघत नाही...." गुरुजी बोलले.


       " एवढ्या लवकर फार घाई होईल... सगळी तयारी कशी करणार आपण...." मामी.


      " अहो नंतर आर्या कडे वेळ नाही राहणार.... तर मला वाटते हाच दिवस चांगला आहे... तर जे आहे ते मुलं बघतील ... त्यांना एकदा विचारून बघा..." आबा.


      " महेश ला काही घाई नाही तो सहा महिन्याने पण तयार आहे... "विश्वास बोलल्यावर महेश एकदम ओरडुन बोलला.
नाही मला एवढे लांब नको तारीख आपण पांढरा दिवसानंतर ची तारिक फिक्स करूया..."महेश.


        " सगळे त्याची रिॲक्सन बघून हसायला लागले... शालू तर घरात पळून गेली....
सगळ्यांच्या संमतीने तारिक फिक्स केली ...  विकासही मीनक्षिकडे बघून तयार झाला.....
त्याला तिच्या बद्दल ओढ वाढतच होती....


     "हसत खेळत सुपारी फुटली आणि पुढच्या कार्यक्रमाची मांडणी केली गेली.


        " आर्या या सगळ्यांपेक्षा तूच जास्त आनंदी आहेस.... आज तरी मला खरे कारण कळेल ना..? संग्राम आर्याच्या कानात कळूच पुटपुटला....


     " हो आज रात्री मी सगळे सांगेन...."आर्या बोलली.



  ( अजून दोन भागात ही कथा पूर्ण होणार आहे..
पुढील लवकरच प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेल. मी नवीन कथामालिका सुरू केली आहे.. लहान कथा असणार आहे पण तुम्ही त्याला सहकार्य करावे ही विनंती... कन्यादान एक कर्तव्य हे कथेचे नाव आहे.... आणि एक लाईक ची वाट पाहत आहे ...).

🎭 Series Post

View all