आर्या... 19

आर्या..


       
    इन्तहा हो गई, इंतज़ार की
आई न कुछ खबर, मेरे यार की
ये हमें है यक़ीं, बेवफ़ा वो नहीं
फिर वजह क्या हुई, इंतज़ार की, इन्तहा हो...

बात जो है उसमें बात वो यहाँ कहीं नहीं किसी में
वो है मेरी, बस है मेरी, शोर है यही गली गली में
साथ साथ वो है मेरे ग़म में मेरे दिल की हर खुशी में
ज़िंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी ज़िंदगी में
बुझ न जाये ये शमा, ऐतबार की
इन्तहा हो...



                संग्राम आरामात हॉल मध्ये बसला होता ..परंतु नजर त्याची आर्या ला शोधत होती.. तिला पाहण्यासाठी तो आतुर झाला होता..आणि इथे महेश ची हलत खराब झाली होती .कारण शालू त्याला कुठेच दिसत होती..म्हणून त्याचा चेहरा पडला होता.

         काय रे , असा चेहरा पाडून का बसला आहे ....संग्राम.
काही नाही ?सहज महेश म्हणाला ... ☺️तितक्यात शालू त्याचा समोर आली.

चहा ,,,,

       तिला पाहून त्याचा चेहरा खुलला..जे संग्राम चा लगेच लक्षात आले... परंतु तो काही बोलला नाही, आता त्याला समजले इथ येण्यासाठी महेश इतका उतावीळ का झाला होता .

घ्या ना, नाहीतर थंड होईल ...."शालू .

हो .हो .मी घेतच होतो,  कशा आहात तुम्ही... माज नाव महेश...." महेश.

मला माहित आहे तुमचे नाव आणि मला काय होणार आहे, बरीच असते मी
         असे बोलून तिने संग्राम ल चहा दिला व निघून गेली ...महेश तिला जाताना पाहत राहिला.

         यार काय तिखट आहे ही, आपल्याला अशीच मुलगी पाहिजे नाहीतर आई चा हाता खाली दिवस कसे काढणार...."महेश मनात विचार करत होता.

काय महेश राव झालं तुमचं....संग्राम .

काय झालं, अजून चहा प्यायचा आहे...तू पण पी थंड होतोय....महेश.

तुझा कडे नंतर पाहतो मी , संग्राम म्हणाला तसा महेच ने नजर चोरली आपली चोरी पकडली तर नाही ना..याचे त्याला भीती वाटतं होती.

या .या .संग्राम राव, केव्हा आलात..आधी सांगितले असते तुम्ही येणार आहे... मी घरी थांबलो असतो मामा व विश्वास घरी आले होते ... त्याचा पाठी पाठी विलास पण घरी आला होता .

हे काय आताच आलो होतो , दोन दिवसांनी पाडवा आहे ना...  आई ने रमा साठी साडी पाठवली होती....तीच देण्यासाठी आलो होतो...." संग्राम.

अहो , तुमचे च घर आहे हे तुम्ही केव्हा ही येऊ शकतं. बसा ना...."मामा.

       नाही नाही..निघतो आता..उशीर होईल , मी काय बोलतोय पाडवा नंतर रमा आणि विश्वास राव यांना घरी पाठवल असतं तर.... माई ची तशी इच्छा होती. संग्राम म्हणाला तसे रमा खुश झाली. परंतु तो जाणार म्हणून आर्या च चेहरा पडला होता.

एक दिवस कशाला , पाडवा झाला की दोघांना जोडीने पाठवतो....हवं तर तीन ,चार दिवस दोघांना तिथेच रहुद्य.... पण त्या आधी माझी एक अट आहे, मामा म्हणाला तसे सर्व विचारत पडले ... संग्राम ला ही काही सुचत नव्हते .

अहो इतका विचार काय करताय,  आमची इच्छा आहे आज तुम्ही इथेच थांबा ... अस ही हे तुमचे च घर आहे. आमचा सून बाई ला ही बर वाटेल....  मामा चा बोलण्यावर आर्या चा चेहरा खुलला....  तिची ही इच्छा होती संग्राम ने तिथे राहावे , आणि महेश चा आनंद ला तर परावरा उरला नव्हता .

नाही, बर नाही वाटतं बहिणी चा सासरी राहणे...."संग्राम.

ते आम्हाला काही माहित नाही....आज तुम्ही इथेच राहणार आम्ही आबा साहेब सोबत बोलतो....आणि असे ही आज रात्री आम्ही घरी नाही...काही कामासाठी बाहेर जात आहोत....असे बोलून मामा निघून गेले .

काहीवेळ सर्वांना वाटले आपण स्वप्न पाहत आहोत..मामा मध्ये असे परिवर्तन झाले कसे ...चक्क संग्राम ला घरी राहण्याचे आमंत्रण ..ते ही मामा घरी नसताना....त्यांचा आनंद ल पारावार उरला नाही .
      
          विलास बाहेर गेला व एकदा खात्री करून घेतली, मामा गेले आहे की नाही ... काहीवेळाने तो आत आला व अंगठा दाखवला... तसे सर्व जोरात ओरडू लागले .

      अरे काय कालवा आहे हा.शांत बसा ... "आई अजी.

अरे अजी, असा योग नेहमी नेहमी येत नसतो मी काय बोलते दादू , आज रात्री पार्टी करूयात.... असा योग सारखा सारखं येत नाही...... आर्या .

नेकी आणि पुच पूच!... आधी दोघांना त्यांची रूम दाखव. थोडा आराम करू दे थकले असेल , तुम्ही आराम करा मी आलोच...असे बोलून विश्वास आणि विलास तयारी करण्या साठी गेले .

यार
काय भारी सासर वडी आहे ताई ..मला ही अशीच सासुरवाडी हवी....? महेश म्हणाला तसे संग्राम त्याचा कडे पाहू लागला .

चला तुम्हाला रूम दाखवते , आर्या म्हणाली व वर जाऊ लागली.... तिचा सोबत शालू ही होतीच, पण ती मुद्दाम अंतर राखून चालत होती .... कारण तिला माहित होत
          दोघांना बोलता यावं म्हणून .

थांबा इथे .पुढे पुढे का पाळता य..... शालू .

तुम्ही म्हणत असल मी इथून हलत नाही, पण काही विशेष....." महेश .

काही नाही , थांबा तुम्ही आणि सारखं मला अहो जावो करू नका
तुमचा पेक्षा लहान आहे मी....."शालू .

मी ही तेच म्हणणार होतो , माझा सोबत मेत्री कराल .... तसा इतका वाईट नाही मी
रमा ताई ल विचारा हवं तर.....?महेश चा बोलण्यावर शालू लाजली .

आर्या आणि संग्राम रूम मध्ये आले .

       ही तुमची रूम , मी बाहेर जाते .जेवणाची तयारी करायची आहे.... आर्या जाणार त्याने तिचा हात पकडला .

       हे काय तुझा साठी मी इथ आलो .आणि तुला माझा साठी वेळ नाही...."संग्राम.

      अस काही नाही,  पण घरात कोणाला समजले तर .मामा माहित आहे ना कसे आहे ... ते घरी नसले तरी त्यांची नजर आपल्यावर असणार......आर्या .

पण मला एक समजत नाही , मामा मध्ये इतका बदल झालं कसा आणि आज रात्री ते गेले कुठे असतील......संग्राम .

मी काय बोलते , तुम्ही तुमचा माणसाला लक्ष द्यायला सांगा . ते काय आहे ना.... मी आता इलेक्शन लढणार म्हणून ते रागात आहे.मला खात्री आहे.नक्की ते काहीतरी करतील....."आर्या.

तू काळजी करू नको , मी सांगतो.पण तू ही स्वतः वर लक्ष दे.... तसा रणु आहेच ...संग्राम म्हणाला .तशी आर्या जाणार संग्राम ने पुन्हा तिचा हात पकडला .

अहो काय करताय ,  तुम्ही पण ना कोणी येईल...."आर्या .

अजिबात नाही , तुला पाहिलं की सोडव वाटत नाही..... संग्राम .

आई तू इथे , आर्या म्हणाली तसे संग्राम ने घाबरतच तीच हात सोडला व ती पळून गेली .... संग्राम मात्र हसत होता .

थोड्या वेळाने महेश गान गुणगुणत आत आला ... तसा संग्राम त्याचा जवळ गेला .

काय चालले आहे तुझ,  मी केव्हा पासून पाहतोय .तुझी लक्षण ठीक दिसत नाही....आता सांगतो की.....संग्राम .

मी काय केलं.

का काय झाले .
महेश म्हणाला तसे संग्राम ने त्याला रोखून पाहिले.

आता मला खर खर सांगायचे ..काय चालले तुझे .तुला आर्या च घरी येण्याची इतकी घाई का.
संग्राम म्हणाल तसे महेश ने नजर चोरली .

काही नाही, .ते रमा ताई ला भेटायची घाई झाली.....म्हणून मी .
महेश ने नजर चोरली....तसे संग्राम ने त्याला पकडले .

माझा सोबत खोटं बोलयचे नाही, नाहीतर .संग्राम मारायला जाणार तसा तो घाबरला.

सांगतो,  ते शालू आहे ना..ती मला .
तो बोलता बोलत थांबला तसे संग्राम हसायला लागला.

हे माझा लक्षात कसे आले नाही..म्हणजे तू ही प्रेमात पडलं की काय..चालायचे..शेवटी संगत चा असर आहे.....संग्राम.

ये संग्राम तुला काही प्रोब्लेम नाही ना.मला मनापासून ती आवडती. महेश.

तू प्रेम करत असेल तर माझा काही प्रोब्लेम नाही.एका मांडवात दोघांचा बार उडवून लावू..
त्याचा बोलण्यावर दोघे हसले .

रमा हॉल मध्ये बसून होती..चेहऱ्यावरून ती अस्वस्थ वाटत होती. तितक्यात आर्या तिथे आली.

काय झाले वहिनी साहेब.कोणत्या गहन विचारता अहात....आर्या .

मामा जी नी दादा ला घरी राहण्याची परवानगी दिली . तुला नाही वाटत त्यांचा स्वभाव बदलला आहे
......रमा .


तुम्ही पण ना.असे काही नाही..नक्कीच या मागे त्यांचे कारस्थान असेल .समजेल लवकर .

काळजी नको करू वहिनी...आर्या म्हणाली .

मी पण ना , नको ते विचार करते चल लवकर..
.रात्री चा जेवणाची तयारी करायची आहे .त्यात आपल्याला आज पार्टी करायची आहे ना...उगाच उशीर झाला तर हे लोक आपल्या वीणा पार्टी करतील ....  रमा .

तू नको काळजी करू . मी आहे ना सगळे मिळून लवकर काम उरकून टाकू .फक्त सिनियर लेडीज ना लवकर झोपायला सांगू .नाहीतर पार्टी काही होणार नाही ..... आर्या .

अस काय बोलते
त्यांना पण राहूदे की .रमा म्हणाली तसे आर्या तिचा कानात काहीतरी बोलली .


अस होय, हा विचार मी केलाच नाही .ये पण दादा घेत असेल अस वाटत नाही . पेहेलवण आहे तो .स्वतःचा शरीराला खूप जपतो...." रमा .

चील ग , आता कोणी एवढे सज्जन नाही... नसेल घेत तर बघू मग बरच आहे.. मला तसाही काहीच प्रॉब्लेम नाही ये कुठल्या गोष्टींचा... आर्या म्हणाली तसे रमा तिला पाहत बोलली,  माझ्या दादाला अशीच मुलगी पाहिजे होती..

🎭 Series Post

View all