आर्या.... भाग 16

आर्या

भाग 16




           आर्या तयार होऊन खाली आली .तसे सर्व तिचा कडे पाहत होते .तिने संग्राम ने दिलेला ड्रेस घातला होता.ज्यात ती सुंदर दिसत होती. ब्लू प्लेन ड्रेस आणि त्यावर फ्लॉवर प्रिंट ची ओढणी ,आज तिने मोकळे केस सोडले होते .

प्रणाम मातोश्री .आर्या खुर्चीवर बसत म्हणाली.

काय ग, तुझी तब्येत ठीक आहे ना. आज चक्क ड्रेस . कुठे लग्नाला चालली आहेस का .... आई .

       पाहिले आई अजजी ... आधी बोलायचे मुली सारखं वाग आणि वागले तर हे अस....काय करावे या गरीब जीवाने सांग तुच...  अग आता वहिनी आली आहे ना, म्हणून तिचा सारखे वागते मी .कोणी बोलायला नको माझा बहिणीला...की तिची नणंद अशी मुलांसारखी का वागते .

त्याने बोलणे चालू होते की, मामा आणि विश्वास खाली आले व नाश्ता करण्यासाठी बसले .

तसे मामी ने त्यांना वाढायला घेतले .रमा ही त्यांचा सोबत होती .

आर्या , तुझ कॉलेज काय म्हणताय .पुढे शिकायचे आहे की अशीच उनाडक्या करत बसणार आहे....मामा .

नांही मामा, मी चेहऱ्यावरून अशी दिसते...पण माझे स्वप्न कलेक्टर बनायचे आहे .मी त्याची तयारी करत आहे ... आज त्या साठी तालुक्याला चालली आहे.  पुस्तक आणलाय..... आर्या .

अरे वा!.. हे मात्र चांगल केलं तू .तू कलेक्टर झाली म्हणजे आमची काळजी मिटली या वर्षी आम्ही इलेक्शन ला उभे राहणार आहोत..... मामा .

भारीच की , तुम आगे बधो !हम तुम्हारे साथ हे।। .आर्या आज फुल मुड मध्ये होती .

रमा आल्यामुळे मामा घरात सार्वा सोबत चांगले वागत होता... आर्या ने लवकर आवरले व गाडीला किक मारून निघून गेली.. आज संध्याकाळी तिला संदीप च घरी जायचे होते.संग्राम तिला तिथेच भेटणार होता... संग्राम च विचार येताच तिचे गाल आरक्त झाले .

आर्या तालुक्यात गेली व पुस्तकांची खरेदी केली .तिची मैत्रीण सीमा आणि निशा तिला भेटायला आले होते ..  खूप दिवसांतून तिघी मेत्रिणी भेटल्या होत्या .

अरे वाह .आर्या .तुला गावच पाणी लागली की
किती बदलली आहे तू ... सीमा .

अस काही नाही.ते दादू च लग्नात खरेदी केली होती बाकी काही नाही... आर्या बोलली खरी पण टेंशन मध्ये होती .

काय झाले आर्या तू tention मध्ये आहे सर्व ठीक आहे ना सीमा ने विचारले.

हो ग सर्व ठीक ठीक आहे पण....
असे बोलून आर्याने त्यांना मामा विषय सर्व सांगितल हे एकूण दोघींना धक्का बसला .

मी काय बोलते आर्या , आता आमची सुट्टी आहे तर आम्ही दोघी तुझ्या गावी राहायला येतो....तुला मदत होईल एकटी तू काय काय करणार .
आर्याला त्यांचे बोलणे पटले ती खुश झाली व दोघींना संमती दिली .

उशीर झाला होता आर्याने दोघींना निरोप दिला व बाईक घेऊन निघाले... तिला संदीपच्या घरी जायचे होते. संध्याकाळ झाली आली होती रस्त्यावर गर्दी नव्हती रस्ता सुन सान होता आर्या स्पीडने बुलेट चालवत होती तिला समोर एक ट्रक आडवा दिसला तिला पुढे जाता येत होते रस्ता छोटा होता ती रागात खाली उतरली व ट्रक च्या दिशेने गेले.

काय रे समजत नाही का, रस्त्याच्या मध्ये ट्रक लावला आहे ,आम्ही काय तुझ्या डोक्यावरून जायचे का .

आर्या म्हणाले तसे दोन माणसे ट्रकमधून उतरले .त्यांच्या हातात काठी होती .आर्याला जे समजायचे ते ती समजली .

जीव जड झाला आहे का तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी पंगा घेत आहात ...आर्या म्हणाली.

तसा एक एक माणूस तिच्या दिशेने आला तसे आर्याने त्याला मारायला सुरुवात केली तसा दुसऱ्या माणसाने तिच्या पाठीत काठी घातली तशी कळवळली पण तरीही तिने दुसऱ्या माणसाला मारले तिला मारू नको तिला उचलून घेऊन जायचे आहे एक माणूस म्हणाला. व आर्या चा हात पकडला तसे तिने काठी घेतली व दोघांना मारायला सुरुवात केली त्या माणसांनी आर्याला बऱ्यापैकी मारले होते तरी त्यांना हार मानत नव्हती. शेवटी ते दोघे पळून गेले...आर्या ब्लॅक बेल्ट चॅम्पियन होती म्हणून त्यांचा निभाव लागला नाही .

आर्या ला चालायचे अवसान नव्हते... कशीबशी गाडीवर बसले व गाडीला किक मारले...संदीप चे घर जास्त दूर नव्हते .

संग्राम महेश सोबत संदीप च्या घरी आला होता त्याने आर्याला खूप वेळा कॉल केले होते पण तिने कॉल उचलला नाही म्हणून त्याला टेन्शन आले होते आर्या तालुक्याला जाणार हे त्याला माहिती होते .

चिल भाई ,येतील वहिनी कुठे कामात अडकल्या असतील .

हो रे, किती उशीर झाला आहे संध्याकाळ झाली ...संग्राम म्हणाला .

तशी दारावरचे बेल वाजले सुमनने दरवाजा उघडला व जोरात ओरडली.

संग्राम भाऊजी,,,

तसा संग्राम धावत आला आर्या आता चक्कर घेऊन पडायचे बाकी राहिली होती...तिच्या डोक्याला मार लागला होता व जागोजागी खरचटले होते संग्राम ने तिला सावरले .

आर्या तू ठीक आहे ना .
त्याचे डोळे पानवले होते.

भाऊजी आधी तिला आत घेऊन चला मी डॉक्टरांना कॉल करते .
तसे संग्राम ने उचलून तिला बेडरूम रूम मध्ये नेले तिची अवस्था त्याला पहावत नव्हती .

कोणी केले असेल हे.

मला तर मामाचे कारस्थान वाटत आहे... संदीप .

आर्या अजूनही बेशुद्ध होती तितक्यात डॉक्टर आत आली .

आधी तुम्ही सर्व बाहेर जा .

तसे सर्व बाहेर गेले...सुमने आर्याचे कपडे चेंज केले तिच्या पाठीवर मारण्याच्या खुना होत्या तिचे हृदय पिळवटून गेले .डॉक्टरने तिला इंजेक्शन व औषध दिले व आराम करायला सांगितले....काही वेळाने सुमन बाहेर आली.

कशी आहे ती .
संग्राम ने विचारले .

काय नीच माणसे असतात. फुलासारख्या मुलीवर हात उचलायला काही कसे वाटत नाही...मला तिची अवस्था पाहावत नाही .

तसं संग्राम आत गेला आर्या शुद्धीत आली होती संग्राम ला पाहून मंद हसले तसे तो तिच्या जवळ गेला व हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले.

कोणी केले हे मला त्याचे नाव सांग ....
संग्रामने तिचा हात हातात घेतला ....

मला माहित नाही परंतु ते मला किडनॅप करायला आले होते पण माझ्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही.... आर्या म्हणाले .

हो माझी झाशीची राणी आता यापुढे एकटे बाहेर जायचे नाही...मला खात्री आहे हे तुझ्या मामाने केले आहे....संग्राम.

पण मामा असं का करेल...
आर्या ने विचारले.

थांब सांगतो....संग्राम

असे बोलून त्याने संदीप ला आत बोलावले संदीपने तिच्या हातात फाईल दिले....फाईल पाहताच आर्या शॉक झाले .

म्हणजे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे म्हणून मामा माझी सही मागत होता... आर्या.

हो आणि त्यासाठी तो तुझा जीव घ्यायला मागेपुढे पाहणार नाही...कारण तुझ्या संमती शिवाय त्याला एकही रुपया खर्च करता येणार नाही..संदीप म्हणाला .

आता आपण काय करायचे मामा आज बोलत होता तो इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे.... आर्या म्हणाले .


असे अजिबात होता कामा नये...आपल्याला अजून तुझ्या वडिलांचे केस ओपन करायचे आहे पण हे इतके सोपे नाही... मामाच्या ओळखी वर पर्यंत आहे मी कमिशनर साहेबांशी बोललो त्यांनी नकार दिला आहे आता आपल्यालाच पुरावे गोळा करून त्यांना दाखवावे लागतिल....संदीप म्हणाला .

तसे आर्याला टेन्शन आले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संदीप बाहेर निघून गेला तसे संग्रामने तिला मिठीत घेतले.

तू काळजी करू नको मी असताना तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही संग्रामने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तसे तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले तिला पहिल्यांदा सुरक्षित वाटत होते .

रात्र बरीच झाली होते .सुमने सर्वांसाठी जेवण बनवले आता आर्याला घरी सोडायला हवे होते कारण तिला एकटीला जाणे शक्य नव्हते.

आर्या मी तुला घरी सोडवतो रात्र झाली आहे....संग्राम.

ते सर्व ठीक आहे पण घरच्यांनी विचारलं तर काय सांगणार...आर्या .

त्याची काळजी तु करु नको ... संग्राम म्हणाला.

तसे त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आर्या संग्राम सोबत त्याच्या कार मध्ये बसले तर महेश आर्याचे बाईक घेऊन घरी निघाला.


घरी आई टेन्शन मध्ये होते आठ वाजले होते आर्या अजून घरी आली नाही... आज येऊ दे हिला नाही तिची तंगडी मोडली तर माझंही नाव पार्वती नाही... ही वेळ आहे हिची बाहेर फिरायचे...आई .

अगं येईल कुठे अडकली असेल... आई आजी म्हणाली.

आज तू मध्ये पडणार नाही . आज आज बघ तिला कशी जन्माची बद्दल घडवते .

आईने काठी हातात घेतली व दरवाजा उभी राहिले रमाला टेन्शन आले होते कारण आर्या तिला बहिणीसारखी होते .

हेच होणार , बिना बापाची पोर . चांगलं वळण लागावे म्हणून तुम्हाला इथे आणले पण आमची कदर नाही कोणाला... ती मला स्वतःचा दुष्मन समजते. आता पहा बेरात्री पोरगी बाहेर फिरते काय इज्जत राहिली आपले लोक तोंडात शेन घालतील...
मामा आगीत तेल ओतत होता .

बाईकचा आवाज आला , पण हे काय गाडी वर महेश होता .

आर्या कुठे आहे...आईने घाबरत विचारले.

त्या येत आहेत ....

अरे पण तू इथे कसा आणि आर्या ची गाडी तुझ्याकडे कसे.... रमा म्हणाली .

तितक्यात संग्रामची कार दारात उभी राहिले संग्राम उतरला व आर्याला हाताला धरून खाली उतरवले तिच्या डोक्याला मार लागला होता तशी रमा धावतच आली व आर्याला पकडले.

अहो संग्राम राव तुम्ही यावेळी सर्व ठीक आहे ना. विश्वास खाली आला रामाने आर्या ला हॉलमध्ये बसवले व तिला पाणी दिले महेश आणि संग्राम खुर्चीवर बसल्या.

ते काय आहे ना आम्ही येतच होतो की ,आम्हाला आर्या रस्त्यावर पडलेली दिसली तिच्या गाडीचा एक्सीडेंट झाला होता तसे मी माझ्या मित्राच्या घरी तिला घेऊन गेलो व डॉक्टरांना दाखवलं त्यामुळे उशीर झाला .

संग्राम ने सांगितले .

अहो मग आम्हाला फोन करायचा ना... मामा.

त्याची काय गरज आहे आम्ही तुमच्या घरातलेच आहोत ना संग्राम .

हो हो अगदी बरोबर आता जेवण केल्यावरच जा... मामा म्हणाले .

आम्ही जेवण करून आलो आहे इथे इन्स्पेक्टर संदीप आहेत ना त्यांच्या घरीच होतो आम्ही .
संदीप चे नाव घेतात मामा टेन्शन मध्ये आला... आईलाही काहीतरी आठवल्या सारखे झाले कारण आईला माहित होते ज्यांनी तिला लग्नासाठी मदत केली ते याच गावात राहतात व त्यांचा मुलगा इन्स्पेक्टर झाला आहे पण आई शांत बसले काहीच बोलली नाही.


शालू ने दोघांना पाणी दिले .  महेश ची नजर शालू वर खीळली होती.... त्याला पहिल्या नजरेत आवडली होते.

थोडावेळ त्यांनी गप्पा केल्या... रमा आणि विश्वास आर्या ला तिच्या रूम मध्ये झोपवून आले... संग्रामने डॉक्टर यांनी दिलेल्या गोळ्या रमाच्या हातात दिल्या व तिची काळजी घ्यायला सांगितले .
त्याची खूप इच्छा होत होती तिला जाऊन भेटायचे पण तो काहीच बोलला नाही .

ती शुद्धीवर आले की मला कॉल कर .
संग्राम रमा ला म्हणाला व जाण्यासाठी निघाला.

पण त्याचे पाय निघत नव्हते महेश लाही शालू सोबत बोलायचं होते तरी दोघे घरी जाण्यासाठी निघाले..


(भाग कसा वाटला नक्की कळवा... लवकरच भेटू पुढच्या भागात..
बघू आता संग्राम काय करतो, आणि आर्या आणि त्याची प्रेम कहाणी )......

🎭 Series Post

View all