आर्या...भाग 15

आर्या.
 भाग 15



             कितीतरी वेळ दोघे एकमेकांचा बाहुपाशात विसावले होते..हे त्यांनाच समजले नाही..पावसाचा जोर आता कमी झाला होता. आर्या त्याचा पासून दूर झाली. त्याचा जवळ येण्याने आधीच ती लाजेने चुर चुर झाली होती.
तिचे गाल आरक्त झाले होते.

उशीर झाला आहे आपल्याला निघायला हवे आर्या म्हणाली
व बुलेटच्या च्या दिशेने जाणार संग्राम ने तिचा हात पकडला कसे तिचे गाल आरक्त झाले संग्राम ने तिला मिठीत घेतले त्याचा एक हात तिच्या कमरेत होता दुसऱ्या हाताने त्याने तिची हनुवटी वर केले तसे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले तशी ती लाजली व नजर खाली झुकवली.

       आता मी गाडी चालवणार तू मागे बस .मलाही तुझ्या बुलेट राणीची सफर करू देत... संग्राम म्हणाला

       तशी तिने गाडीची चावी त्याच्या हातात दिली व त्याच्या पासून बाजूला झाली ..संग्राम गाडीला कीक मारली गाडी चालू झाली तशी आर्या या दबकतच गाडीच्या मागे बसली आज पहिल्यांदा ती बॅकसीट बसली होती तिला संकोच वाटत होता कारण पण आज पहिल्यांदा कोणत्या त्या मुलासोबत ती अशी बसले होते.. तिने हात मागे हँडलला पकडले होते तसे संग्राम ने तिचा हात घेतला व स्वतःच्या खांद्यावर ठेवला.


आता तुला हा अधिकार आहे...संग्राम म्हणाला .

     तसे तिने दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले तशी गाडी सुरू झाली आर्याला खूप भारी फील होत .. ती हा क्षण भरभरून स्वतःमध्ये सामावून घेत होती दोघे खुश होते आज पासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.


       संग्राम ने गाडी एका शोरूमच्या बाहेर थांबवले दोघे खाली उतरले व आत गेले संग्रामला रमा साठी साडी घ्यायची होती म्हणून दोघे इथे आले होते संग्राम ने आर्याला साडी पसंद करायला सांगितले आर्याने सुंदर अशी गुलाबी कलरची साडी रमा साठी पसंद केली संग्रामला साडी खूप आवडली आर्याची पसंद चांगली होती त्याने बिल पेड केले व आर्याला बाहेर थांबायला सांगितले व आत गेला आर्याला काहीच समजत नव्हते थोड्या वेळाने तो बाहेर आला त्याच्या हातात शॉपिंग बॅग होत्या.


हे कोणासाठी आपली खरेदी झाली आहे ना...आर्या.

आपण हॉटेलमध्ये जाऊन बसू उशीर झाला आहे तुला भूक लागली असेल...संग्राम म्हणाला .

तसे दोघे शेजारच्या हॉटेल मध्ये गेले संग्राम ने खाण्याची ऑर्डर दिली व बॅग आर्याच्या हातात दिल्या तशा तिने त्या उघडून पाहिल्या आत मध्ये काही ड्रेस व साडी होती .

हे सर्व कोणासाठी... आर्या.

कोणासाठी काय तुझ्यासाठी. हे बघ आर्या, तू हवे तसे कपडे घाल..मला प्रोब्लेम नाही .
परंतु चार लोकांमध्ये थोडे मुलीसारखी रहा. किती केले तरी सरपोतदार यांची होणारी सून आहे तू... त्याचा बोलण्यावर ती लाजली.


खुप उशीर झाला तरी दोघे अजून ही आले नाही .म्हणून माई आणि रमा त्यांची वाट पाहत होत्या. काहीवेळा ने दोघे आले.. दोघांचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता... रमा चा नजरेने ते टिपले.

किती उशीर .पूर्ण दुकान खरेदी करायला गेला होतात का....रमा.

पाऊस आला होता ना.म्हणून थांबलो होतो..संग्राम म्हणाला तसे आर्या आत गेली.

आधीच आज जे झाले त्याने तिला लाजल्यासरखे होत होते.

रमा तू आर्या ला खाली घेऊन ये. मी वाढायला घेते. माई म्हणाल्या तशी रमा आत गेली.

काय चालते तुमचे हा.. रमा अत येत म्हणाली.

कुठे काय.. आर्या ने नजर फिरवली.

माझा सोबत खोटं बोलू नका . सर्व दिसतंय मला. तुमचा दोघांचे काय चालले आहे ते वहिनी.. ती वहिनी म्हणाली तशी आर्या लाजली.

काहीही काय ,  असे काहीच नाही ... आर्या.

ओ अच्छा , मी भाई ला चांगले ओळखते..ते कधीही कोणत्या मुलीसोबत असे बाहेर जाणार नाहीत. तू पाहिली मुलगी आहे जिचा सोबत ते बाहेर गेले . पण काहीही असुदे आम्हाला वहिनी पसंद आहे .मी खरच खूप खुश आहे आज.. रमा आर्या ला हाताला धरून गोल गोल फिरवत म्हणाली.तशी ती लाजली.

दुसऱ्या दिवशी दोघी घरी जाण्यासाठी निघणार होत्या. विश्वास त्यांना घ्यायला येणार म्हणून रमा खुश होती. आता खरया अर्थाने त्यांचा वैवाहिक जीवनाला सुरुवात होणार होती.

दीक्षित चा वाड्यावर लगबग सुरू होती. सून येणार म्हणून मामी ने जय्यत तयारी केली होती. शालू ही तिला मदत करत होती.

आत्या तुला अस नाही वाटत.आई सुनेचे जास्त कौतुक करत आहे...शालू .

असुदे ग ,  सासू झाली आहे ती. आई आजी ने ही तिचे असेच कौतुक केले होते. हो ना आई...आर्या ची आई म्हणाली.

हो मग , अग ही होती म्हणून माधव चा हाताखाली टिकली .नाहीतर दुसरी असती तर आता तुम्ही या घरात दिसला नसतं... आई आजी.

हे मात्र बरोबर बोलली तू आजी. म्हणून आमचे सर्वाचे आई वर खूप प्रेम आहे.. शालू ने मामी ला मिठी मारली.
त्यातच गाडीचा आवाज आला.

अरे आले वाटते. मामी आरतीचे ताट घेऊन दरवाजात उभ्या राहिल्या. विश्वास रमा आणि आर्या घेऊन आला होता.संग्राम ची इच्छा होती यायची परंतु काही कामासाठी त्याला तालुक्याला जावे लागले .म्हणून तो आला नाही.म्हणून आर्या च चेहरा उतरला होता.

या वहिनी . आई केव्हाच तुमची वाट पाहत आहे..शालू म्हणाली .

तसे मामी ने दोघांना ओवाळून आत घेतले.
रमा सर्वाचा पाया पडली. मामा ही खाली आले. रमा त्यांचा ही पाय पडली.परंतु त्यांनी म्हणावे तसे लक्ष दीले नाही .व बाहेर निघून गेले. आर्या ला त्यांचे वागणे अजिबात आवडले नाही.परंतु रमा होती त्यामुळे ती शांत बसली. सर्वाचे जेवण झाले .रमा आर्या च रूम मध्ये आराम करत होती.विश्वास ही कामासाठी बाहेर गेला होता.आर्या गायब होती .कुठे होती कोणाला काहीच माहीत नव्हते.

संग्राम हा तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये बसला होता.संदीप ने त्याचा साठी महत्वाची माहिती आणली होतो.त्या साठी तो घाईत आला होता.

काय माहिती आहे संदीप.मला इतक्या घाईत का बोलवले आहे... संग्राम.

सांगतो , खर तर आर्या इथे हवी होती. परंतु तू म्हणाला आज रमा ची पाठवणी आहे .म्हणून तिला बोलवले नाही..संदीप.

आता सांगशील काय झाले ते... संग्राम.

हे पेपर पहा म्हणजे तुला समजेल .संदीप ने काही कागदपत्र त्याचा हातात तीले
ते पाहून संग्राम चा चेहऱ्याचा रंग उडाला.

आता समजले .मामा आर्या आणि तिचा आई वर इतका मेहेरबान का झाला आहे ते... संदीप.

म्हणजे आर्या च आजोबांनी सर्व प्रोपटी आर्या चा नावावर केली आहे... संग्राम.

येस , आणि हेच कारण आहे .मामा तिचा जीवावर उठला आहे.कारण आर्या मेली तर सर्व प्रॉपर्टी मामा ना भेटेल.. संदीप.

आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आर्या ची आता काळजी वाटत आहे ...संग्राम.

तू काळजी करू नको, मी तिचा मागावर पोलिस ची पळत ठेवतो. परंतु आता लवकर आपल्याला आर्या च वडीलाची केस ओपन करावी लागेल. एकदा का मामा जेल मध्ये गेला सर्व काही सुरळीत होईल.गावकऱ्यांचे जिने त्याने मुश्किल केले आहे . संदीप चे बोलणे संग्राम ला पटत होते.

मी आता आर्या ला कॉल करून हे सर्व सांगतो. संग्राम.

अजिबात नाही.उद्या तिला घरी बोलावं .तेव्हाच आपण या विषयावर बोलू. आणि असेही घरी सर्व तिची आठवण काढत आहे.भेटणेही होईल. आफ्टरोल .आमची होणारी वहिनी आहे ती.संदीप म्हणाला तसे संग्राम लाजला.

तू चक्क लाजत आहे,  आमचा वहिनी ची जादू चांगली चढली आहे म्हणायचे. संदीप च बोलण्यावर दोघे हसले.

थोड्यावेळ एकडचा तिकडचा गप्पा करत होते  दोघे घरी जाण्यासाठी निघाले.

रात्री सर्वाचे जेवण झाले.रमा अजुनही आर्या च रूम मध्ये होती. तितक्यात आर्या व शालू आत आले.

हे घे वहिनी. लवकर ही साडी नेसून तयार हो... आर्या.

अग कशासाठी .कुठे बाहेर जायचे आहे का...रमा.

हो हो, बाहेरच जायचे आहे.तू हो तयार मग सांगते.

आर्या च म्हणण्यावर ती तयार झाली . हिरवी गर्द साडी ,दागिने ,केसांची वेणी व त्यावर गजरे .खूप सुंदर दिसत होती ती.

तुम्ही दोघी ही येणार अहात ना मझासोबत...रमा.

हो मग आम्ही येणारच आहोत. चला आता
नाही तर उशीर होईल .
आर्या गालात हसली.

दोघी तिला घेऊन विश्वास च रूम मध्ये दाखल झाल्या. आणि रमा ला जे समजायचे ते ती समजली . पूर्ण रूम गुलाबांच्या फुलांनी सजवली होती..रमा तर लाजून चुरचुर झाली होती.

मला नाही वाटत .आता आमचे इथे काम आहे. Good night वहिनी ..आर्या व शालू बाहेर गेल्या.

रमा चा तर भीतीने थरकाप उडाला होता. ती तशीच खिडकी जवळ उभा होती की तितक्यात विश्वास आत आला. रूम ची सजावट पाहून त्याला ही धक्का बसला.कारण हे सर्व त्याला अपेक्षित नव्हते. आज दिवसभर तो बाहेर होता.त्याची नजर खिडकीत उभ्या रमा कडे गेली .व तो पाहत च बसला. खूप सुंदर दिसत होती ती.या आधी त्याने तिला निरखून कधीच पाहिले नव्हते. तो जसा तिचा जवळ आला .तिची काळजाची धडधड वाढली.गाल आरक्त झाले .

रमा ...विश्वास.

ह्ममम .तिला शब्द सुचत नव्हते.

मला थोड महत्वाचे बोलायचे होते. ते काय आहे ना.या घरातील वातावरण वेगळे आहे..तुला हळू हळू समजेल .फक्त इतकेच म्हणायचे होते . रागाने कोण काही बोलले वाईट वाटून घेऊ नको.मी ही काही बोललो तरी मला अंतर देऊ नको... विश्वास.

अस काय बोलता तुम्ही. आता हे माझे घर आहे. आपल्या माणसाचा बोलण्याचा कसला राग...रमा .

खूप समजूतदार आहे तू
म्हणून तर लग्न केले मी.आणि आज सुंदर दिसत आहे तू. विश्वास तिचा डोळ्यात पहात म्हणाला तशी ती लाजली.

त्याने तिचा हात हातात घेतला व तिला स्वतःजवळ ओढले तशी ती त्याचा मिठीत विसावली.

मामा ना आता काही करून लवकरात लवकर कागदावर सह्या हव्या होत्या.कारण पैशाची चणचण आता जाणवत होती. व बँकेतून त्यांना पैसे काढता येत नव्हते.कारण सर्व आर्या चा नावावर होते.तिची सही असल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते.


मालक .बोलावलं तुम्ही ...रंगा.

मला नाही वाटत ती मुलगी मझ ऐकेल.तू ऐक काम कर.माणसं गोळा कर आणि लवकरात लवकर तिला उचलून आन .दुसरा पर्याय नाही आता.तिने एकदा का सही केली त्यानंतर तिला तिथेच संपवून टाकूयात.म्हणजे या कानाची खबर त्या कानाला जाणार नाही.


रंगा लगेच तिथून निघून गेला. मामा विचार करायला लागला. आता लवकरात लवकर आबा सहेबांसोबत राजनीती मध्ये उतरायचे.म्हणजे बक्कळ पैसा मिळेल.या साठी त्यांनी रमा ला घराची सून केले होते.परंतु संग्राम त्याचा पासून सावध राहायला हवं होत.तो दिसतो तसा नाही.

काय झालं जी. समद ठीक हाय ना.शेवंता मामा च शेजारी बसत बोलली.

काहीच ठीक नाही.ही आर्या आणि तो संग्राम ,आमचा सुनेचा भाऊ.दिसतो तसा नाही. एकदा का आबा साहेब आमचा पाठीशी उभे राहिले तर इलेक्शन मध्ये बक्कळ पैसा कमावता येईल... मामा.

त्या पायी इतकं विचार का करायचा.त्या संग्राम ला जावई करून घ्या की.सर्व प्रश्न आपोआप सुटतील.विसरू नका एका मुलीचे बाप अहात तुम्ही.. शेवंता.

शेवंता . तू नसती तर आमचं काय झालं असतं.हा विचार आमचा डोक्यात कसा नाही आला. आता वेळ पाहून लग्नची बोलणी करतोच.मला नाही वाटत आबा साहेब या नात्याला नाही बोलतील.

मामा खुश होत म्हणाला. कपटी हसत संग्राम आता तुला ही काही करता येणार नाही माझा मार्ग मोकळा.


       इथे आर्या एकटीच रूम मध्ये जागी होती.  आज तिला झोपच येत नव्हती.. सारखा संग्राम बरोबर घालवलेला वेळ आठवून गालावर हसू येत होते..
त्यात फोन वाजला स्क्रीन वर संग्राम चे नाव पाहून तर मग पोटात फुलपाखरे उडू लागले..

      काय करते माझी राणी.. झोपली नाही अजून उशीर झलाय बराच... संग्राम.


         नाही झोपेतच होते, फोन वाजल्याने उठले.
बोलाना काय म्हणताय.. तुम्ही जागे कसे अजून. झोप येत नाही का?... आर्या.


      माझी राणी जवळ नाही ये तर झोप कशी येईन मग. तुझी आठवण येत होती... संग्राम

     हो का, झोपा आता उशीर झालाय फार. उद्या परत काम असतील ना तुम्हाला.


      हो राणी सरकार, झोपतो आहे पण उद्या आपल्याला भेटायचे आहे संदीपच्या घरी. आणि हो काल घेतलेल्या ड्रेस मध्ये पहायचे तुला तर माझी इच्छा पूर्ण करा राणी सरकार.. संग्राम.

   
      हम्म,  ठीक आहे.  गुड नाईट..

      गुड नाईट?.. मिस यु.....   संग्राम.

🎭 Series Post

View all