आर्या... भाग 14

आर्या...
(भाग - 14)


आर्या ओरडणार तितक्यात त्याने स्वतःचा हात तिचा तोंडावर ठेवला.

ओरडू नको.... मी हाय ,

तुम्ही...?इतक्या रात्री इथे काय करताय...कोणी पाहीले तर काय म्हणतील....आर्या घाबरली होती.

पाहिले तर पाहुदे... मला तुझा सोबत बोलायचे होते... आता नाही बोललो तर पुन्हा हिम्मत होणार नाही... संग्राम तिचा डोळ्यात पाहत म्हणाला... त्याचा हात अजून ही तिचा कमरेत होता... तो एकटक तिचा डोळ्यात हरवला होता.

तुझा अशा वागण्याचा मला किती त्रास होतोय माझी मनी... का छळवाद चालवला आहेस माझा... संग्राम म्हणाला..त्याचा बोलण्याने तिचे गाल आरक्त झाले...तिने नजर खाली झुकवली... त्याचे जवळ येणे तिला आवडले होते.. परंतु मेनका चा विचार येताच तिने विचार बाजूला सारले.

सोडा मला, .नाहीतर मी ओरडेल, मला नाही बोलायचे तुमचा सोबत... या पुढे माझा सोबत जवळीक साधायची नाही. ती रागात म्हणाली...संग्राम चा पारा आता चढला होता.

तुला काय राग आहे मला माहित नाही...पण माझे तूझावर्...तो काही बोलणार आर्या मध्येच म्हणाली.

मला काहीही ऐकायचे नाही, जा तुम्ही..आणि पुन्हा मझाजवळ येऊ नका... सोडा मला.आर्या सुटण्याचा प्रयत्न करत होते.... तसे त्याने तिला सोडले.

तुझा बद्दल सर्व बरोबर बोलतात... तू ऐक उद्धट आणि उर्मट मुलगी नाही... तुझा अशा वागण्याने मी काय कोणी तुझवर् प्रेम करणार नाही... तो रागात म्हणाला व निघून गेला... त्याचा बोलण्याचे तिला वाईट वाटले ती तशीच रडत होती .

सकाळी आर्या उशिरा उठली... ती गॅलरीत आली. मस्त हवा सुटली होती... रात्री संग्राम चा डोळ्यात तिला प्रेम दिसले होते... परंतु असे असेल मग मेनका चे काय... तिचा सोबत ते लग्न कसे करत आहेत...हा विचार तिला सतावत होता...तिची नजर शेजारी टेरेस वर गेली,  संग्राम तिथे कसरत करत होता... त्याने फक्त ट्रवजर घेतली होती... त्याचे कसरत केलेले कमावलेले शरीर उठून दिसत होते.घामाने तो ओलाचिंब झाला होता... आर्या ऐक टक त्याला पाहत होती.

काय पाहतेस .... रमा आत येत म्हणाली.

काही नाही वहिनी...  Sorry उठायला थोडा उशीर झाला.... आर्या.

ते ठीक आहे...पण तू माझा दादा ला चोरुन का पाहत होती, त्याचा प्रेमात पडली की काय... रमा.

तू पण ना वहिनी , असे काही नाही... आणि त्यांचे लग्न ठरले आहे ना... मग मी का लाईन मारू... आर्या.

असे काही नाही.... लग्न करायचे हे मोठ्याने मत आहे.... अजून दादा ने होकार दिला नाही....आणि देईल की नाही माहीत नाही... तेच आज मी त्याला विचारणार आहे... पाहू आता दादा चा निर्णय काय आहे ते.... रमा चा बोलण्यावर आर्या शॉक झाली...
आता तिला समजले .संग्राम आणि मेनका मध्ये असे काही जे ती समजत होती.तिला वाईट वाटत होते....ती संग्राम सोबत रूड वागली याचे.

आर्या रमा खाली आले...सर्व नाश्ता करायला बसले होते... आत्या ने आर्या ला पाहिले तसे तोंड फिरवले. संग्राम अजून आला नाही.

संग्राम कुठे राहिला... जा त्याला बोलवून आन. माई म्हणाल्या तशी मेनका उठली.


मी बोलून आणते... मेनका .

मेनका त्याचा रूम मध्ये गेली तो शर्ट घालत होता.

माई तुम्हाला खाली बोलवत आहे....मेनका आत येत बोलली....

तसे संग्राम ने पटकन शर्ट घातले,  रूम मध्ये येण्याचा आधी नोक करायची पद्धत असते... साधे मॅनर्स माहित नाही तुला....संग्राम.

आता लाईफ टाइम मला याच रूम मध्ये राहायचे आहे. म्हणून सवई करून घेते...मेनका.

तुझ डोकं फिरल आहे... कोण बोललं तुला हे... संग्राम .

आपले लग्न ठरले आहे... सर्वाचा होकार आहे,  आता फक्त बोहल्यावर चाढणे बाकी आहे.. मेनका म्हणाली तसा त्याच पारा चढला तो रागात बाहेर आला.

माई ,माई .मी हे काय ऐकत आहे... संग्राम.

काय झाले अचानक तुला... सर्व ठीक आहे ना...माई.

मेनका काय बोलत होती, आमचे लग्न ठरले आहे...मला न विचारता तुम्ही इतका मोठा निर्णय घेतला कसा.... संग्राम.

त्यात विचारायचे काय, मेनका चांगली मुलगी आहे.माझा सासरची आहे... आज ना उद्या लग्न करावे लागणार ना.... आत्या .

मी कोणासोबत लग्न करायचं हे मी ठरवणार ... बाकी कोणी नाही  आणि मला ती मुलगी अजिबात आवडतं नाही.... असे बोलून तो रागात निघून गेला.

आता आर्या ला समजले जे झाले त्यात संग्राम चुकी नव्हती.... आबा ने ही त्याच बोलणे ऐकले होते

इतका अपमान ,  आता ऐक मिनिट मी या घरात थांबणार नाही... मेनका जाण्याची तयारी करा, आता या घरात ऐक मिनिट थांबणार नाही मी... आत्या रागात आत गेली.... माई तील समजावत होत्या.

मला माहित होते हे असेच होणार...पण बर झालं जे झालं ते...असे ही मला ती मुलगी अजिबात आवडली नाही
माझा दादा ला अशी बिनधास्त मुलगी हवी... रमा आर्या कडे बघत बोलली..


आत्या आणि मेनका रागात गाडीत बसले व निघाले... जाता जाता मेनका ने आर्या वर जळजळीत कटाक्ष टाकला.

हे नको समजू , मी नाही तर तुझा नंबर लागेल..संग्राम फक्त माझे आहेत....मेनका

होय हॅलो. विसरू नको,  तुझी गाठ या आर्या सोबत आहे... या आधी बोलले नाही , पण आता बोलते... संग्राम फक्त माझे आहे.आणि आता त्यांना माझा पासून कोणी हिरावून घेणार नहीं... आणि तू.दुसऱ्यांचा प्रॉपर्टी वर लक्ष देणे सोड. नाही तर. आर्या ने हाताचा स्लीवझ वर केल्या.तशी ती रागात निघून गेली.

पण आता तिला संग्राम चा राग शांत करायचा होता. काय करावे याचा ती विचार करत होती.

संग्राम शेतात बसला होता... रात्री आर्या आणि आता मेनका दोघींनी त्याच डोकं फिरवलं होत...त्यात सकाळ पासून त्याने काही खाल्ल ही नाही...म्हणून तो चिडचिड करत होता. . गडी शेतात काम करत होते. त्यात बुलेट चा आवाज आला...त्याने पाहिले आर्या त्याचा दिशेने येत होती.


आता ही इथ कशाला आली, अशीच डोक फिरल माझे....संग्राम मनात म्हणाला.

आर्या उतरली व त्याचा जवळ आली... तिचा हातात छोटी बॅग होती... संग्राम ने नजर दुसरीकडे वळवली.

वहिनी सा , कधी आला स... या बसा ना....शेतातला गडी म्हणाला तशी आर्या हसली.

ते काय आहे ना... आमचं धनी सकाळ पासून उपाशी हाई सा.त्यांचा साठी जेवण घेऊन आलो....आर्या हसतच म्हणाली , तसे संग्राम ने तिच्याकडे रागात पाहिले .

माई म्हणाल्या तुम्हाला भूक सहन होत नाही
आधी काहीतरी खाऊन घ्या...त्यानंतर हा रागीट लूक द्या....आर्या.

जा इथून , आधीच माज डोकं गरम आहे... संग्राम.

सॉरी ना,  ते मेनका ने माज ही डोकं फिरवलं होत...म्हणून मी अशी वाटत होती, आता आधी खाऊन घ्या....त्या नंतर आपण लाँग ड्राईव्ह ला जाऊ यात... माझा बुलेट रणी सोबत... संग्राम बळच रागाचे नाटक करत तोंड फिरवून बसला... आर्या त्याच्या पुढे कान पकडून उभी राहिली... तरी संग्राम तिच्या कडे दुर्लक्ष करत बाजूला पाहू लागला... आर्या ने त्याच्या समोर खास पकडला आणि बळच त्याच्या तोंडात कोंबला... आमचे धनी असे उपाशी राहिले तर आमच्या बी पोटात अन्नचा कण जाणार नाही... मग आम्ही जर उपाशी राहिलो तर इथे आम्हाला चक्कर येईन मग तुम्हालाच उचलुन न्यावे लागेल..
आर्या चा बोलण्यावर तो हसला... दोघांनी ही नाश्ता केला, व जण्या साठी उठले.

तुला जमेल, मला घेऊन बसायला... आधी विचार कर...नाहीतर मी चालवतो... संग्राम.

आर्या दिसते तशी नाजूक नाही... मी ट्रिपल सीट ही आरामात चालवते, ती म्हणाली .संग्राम फक्त तिला पाहत होता...तसे तिने नजर खाली झुकावली.

खर तर त्याची ही खूप इच्छा होती... ऐकदा तिचा बुलेट वर बसायचे.... बुलेट चालवताना आर्या खरच भारी दिसायची... अगदी राउडी लूक .

तिने बुलेट स्टार्ट केली तसा तो तिचा मागे बसला. नकळत त्याचा हात तिचा खांद्यावर ठेवला... पण तिने त्याला रोखले नाही.... त्याचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता... ती अगदी सराईतपणे बुलेट चालवत होती. संग्राम तर आणखी तिचा प्रेमात पडला होता. दोघे आता गावापासून थोडे दूर आले होते... त्यात च पावसाला सुरुवात झाली.

यार हा पाऊस ला ही आताच यायचे होते.... आर्या.

तुला नाही वाटत . पावसा मूळे वातावरण आणखी रोमँटिक झाले आहे.... संग्राम म्हणाला तसे तिने गाडी थांबवल... दोघे उतरले व ऐका आडोशाला जाऊन थांबले. आर्या बर्या पैकी ओली झाली होती... तिचे काही भिजलेले केस तिचा चेहऱ्यावर आले होते. तिने संग्राम कडे पाहिले तर तो तिला पाहत होता

असे काय पाहत आहात,  कधी मुलगी नाही पाहिली नाही का.... आर्या.

कधीच नाही.या आधी कधी कोणत्या मुली कडे पाहिले च नाही. पहिल्यांदा तूच मनात भरली... संग्राम म्हणाला तशी ती लाजली. तिचे गाल गुलाबी झाले... तिने तिचे लांब केस मोकळे केले व झटकू लागली.... त्याने संग्राम आणखी घायाळ झाला. आज पहिल्यांदा तो तिला जवळून पहात होता.... ती दिसायला सुंदर होती यात वादच नाही.

पाऊसाचा जोर चांगला वाढला होता. तिचा मनात काय आले माहित नाही. ती पळत च पावसात गेली व भिजू लागली... तिने तिचे दोन्ही हात हवेत खुले केले व चेहऱ्यावर पावसाचे थेंब घेत होती... ज्यात ती आणखी सुंदर दिसत होती. तिला आता कशाचे भान नव्हते... ती मनमुराद पावसाचा आनंद घेत होती. तिचा शर्ट पावसाचा पाण्याने तिचा शरीराला पूर्ण चीपकला होता. केस चेहऱ्यावर विखुरले होते... आता संग्राम ला राहवले नाही
तो तसाच तिचा जवळ आला... व तिचा कमरेत हात घालून तिला जवळ ओढले..तसे तिने दोन्ही हात त्याचा खांद्यावर ठेवले... व त्याचा डोळ्यात हरवली. त्याचा स्पर्श तिला बेधुंद करत होता.

आय लव यू माझी राणी आय लव यू . तो म्हणाला तशी ती अवाक झाली . तिला हे अनपेक्षित नव्हते.... ती त्याचा पासून दूर जाणार त्याने तिचा गालावर ओठ टेकवले...  तसे तिचे गाल आरक्त झाले तिने लाजून नजर खाली झुकवली .

त्याने तसेच तिला वर उचलले व गोल गोल फिरवू लागला. आता खऱ्या अर्थाने त्यांचा प्रेमाला सुरुवात झाली होती.

आता पावसाचा जोर कमी झाला होता..त्याने तिला खाली उतरवले तशी ती त्याचा मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागली.

सोडा ना. घरी जायला उशीर होईल... आर्या.

आधी मला उत्तर हव आहे.त्यानंतर तुझी सुटका ....संग्राम.

मी नाही बोलणार....आर्या लाजून म्हणाली.

ठीक आहे.मी या लाईफ टाइम तुला मिठीत घ्यायला तयार आहे.... संग्राम .

सोडा ना.का ही जबरदस्ती.... आर्या.

ठीक आहे .म्हणजे तुझा होकार नाही तर. आता घरी जातो आणि माई ना सांगतो...मेनका सोबत लग्न फिक्स करा .तिलाच माझी काळजी आहे.तो हसत म्हणाला तशी ती रागात त्याचा कडे पाहू लागली.

तुम्ही फक्त माझे आहात. कोणत्या मुलीने साधं तुमचा कडे पाहिले तर मी तिचा जीव घेईल....जे आर्या चे आहे ते फक्त तिचेच आहे... आर्या म्हणाली तसे त्याने तिला जवळ ओढले.
ती ही त्याचा मिठी त विरघळून गेली .व त्याचा कानात हळूच म्हणाली.

आय लव यू संग्राम ,

संग्राम ला हे अनपेक्षित होत.त्याने मिठी आणखी हट्ट केली.... दोघे ही त्या क्षणाचा आनंद घेत होते.

🎭 Series Post

View all