आर्या...भाग38

आर्या







मागील भागात....


" आर्या सगळे मुलंमुली आपल्याला बघताय... सँग्राम बोलल्यावर आर्या त्याला सोडून बाजूला झाली... आजूबाजूला असलेली मुलं त्यांना दोघांना बघून हसत होते...
      आर्या उशीर झाला होता इथे यायला म्हणून डायरेक्ट इथेच आलो तुला भेटायला....
आता जा पटकन आत वेळ झाली आहे, मी बाहेर गार्डन मध्ये तुझी वाट पाहतो....
बेस्ट ऑफ लक शोना??...." संग्राम बोलल्यावर आर्याने त्यांच्या हातून कॅटबरी हिसकावून घेतली आणि पळत आत गेली...


      
  आता पुढे.....   

          आर्या... तुला कसे सांगू घरी काय चालले आहे ते..... आताच कुठे तू फ्री झालीस तुला माझ्या बरोबर राहण्याची किती आतुरता आहे पण तूला जर खरं कळले तर तू माझा राग करशील..
कदाचित मला सोडून जाशील.... काय करू सांगू का आर्या ला, की आता नको काहीच बोलायला...
किती खुश आहे ती सगळे कळले तर मूड खराब होईल.... तिच्या मनाला किती त्रास होईल , कसे सहन करेल ती एवढी मोठी गोष्ट...." संग्राम एकटाच बराच वेळ विचार करत होता.


      "संग्राम झाला विचार करून,  किती आणि काय काय मला सांगायचे, काय माझ्यापासून लपवायचे... सगळे ठरवून झाले असेल तर आपण निघुया इथून...."आर्या संग्रामच्या बाजूला बसत बोलली.


o
      " तू कधी आलीस...?तुझा पेपर कसा झाला..?नीट दिलास ना शोना..?.." संग्राम.


     " संग्राम सगळे नीट झाले, पेपर पण चांगला होता....  मी पण ठीक आहे....
पण तुम्हाला काय झाले, गेले 15 मिन झाले मी इथे बसले आहे तुम्ही विचारात इतके हरवला की तुम्हाला माहीतच नाही मी कधी आले ते...
कसला विचार करताय एवढा.... जे काही बोलायचे आहे ते सगळे बोलून घ्या... मनात ठेवून त्रास होईल जास्त तुम्हाला....." आर्या संग्रामचा हात हातात घेऊन म्हणाला.


      " आपण घरी जाऊयात तुझ्या... तिथे गेल्यावर गप्पा करूया , इथे मला बरोबर नाही वाटत..." संग्राम उठत आर्यां समोर हात करत बोलला.


     "Okk हबी... तुम्ही म्हणाल तसे... चला निघुया... पण आधी मला भूक लागली आहे तर पार्सल घ्या रस्त्यात... आता घरी काही नसेल ना बनवायला..."आर्या बोलल्यावर सँग्रामला हसू आले...


      " चला वाईफी..... आज खूप दिवसात तू अशी हसताना दिसते आहे... तर तुझी फर्माईश तर पूर्ण करावीच लागेलं ना..?
बोल काय खाणार जाताना घेऊया पार्सल...."संग्राम आर्याला गाडीत बसवत बोलला...


     " आर्या संग्रामची गाडी घराच्या दिशेने धावत होती... आज आर्या आणि संग्राम दोघेही खूप रिलॅक्स होते.... कसलेच टेंशन नव्हते आज चेहेऱ्यावर....
     संग्राम मला वाटते आहे आपण आता गावात परत जायला हरकत नाही... जी काही पुरावे पाहिजे ती आता आपल्याकडे आहेच... आता घरात सगळयांना ही गोष्ठ कळायला हवी....


     " हो आर्य सांगायला पाहिजेच आपण.. पण त्या आधी मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...
घरि गेलो की बोलू आपण, आता चांगले हॉटेल बघ पार्सल घ्यायला....." संग्राम समोर बघून बोलला.


     " संग्राम आर्याला घेऊन घरी आला.... पण तरी त्याचे मन काही केल्या थर्यावर नव्हते...
आर्या समोर नसताना एव्हढे काही वाटत नव्हते पण आता आर्याला बघून सारखे अपराधी असल्यासारखे वाटत होते....


       " संग्राम काय झाले असे का लांब लांब राहताय माझ्यापासून... सकाळी भेटल्यापासुन बघते आहे कुठल्या तरी विचारात आहात तुम्ही....
आता सांगाल ना मला...."आर्या मागून मिठी मारत संग्रामला बोलत होती.


     " संग्राम ने आर्याच्या हाताला पकडून पुढे घेतले... आर्या फ्रेश होऊन येतो... तू आराम कर दमली असशील... पेपरचे टेंशन म्हणून तुला झोप नव्हती नीट गेले काही दिवस...." संग्राम आर्याला बेड वर सोडून बाथरूममध्ये निघून गेला.


       "संग्राम किती दिवस माझ्यापासून लपवणार आहात,  मला न सांगता पण राहू शकत नाही तुम्ही.... मी तुमच्या बोलण्याची वाट पाहत आहे संग्राम..
         आर्या बेडवरती डोळे बंद करून विचार करत होती.....सँग्राम तिच्या बाजूला येऊन पडला... आर्याला झोप लागली असेल असा विचार करून तो थोडा अंतर ठेवून पडला...
पण आर्याने बाजूला सरकत संग्रामच्या छातीवर डोकं ठेवले.....
संग्राम तिच्या केसातून हात  फिरवत तीला कुरवाळत होता....
       आर्याने संग्रामला मान वर करून त्याच्या मानेवर आपले दात रोवले.... आणि गालावर ओठ टेकवून परत छातीवर डोकं ठेवून पडली.

        हे काय होत आर्या... चेक करत होती का मी जागा आहे की नाही म्हणून..." संग्राम हसून बोलला.


      " काय करू मग, मी एवढी जवळ आले तरी तुम्ही असे शांत पडलात... काही बोलत पण नाही किंवा काही करत पण नाही...." आर्या तिचे नख संग्रामच्या पोटाला टोचत बोलली.


        " काय करायला पाहिजे शोना.... आता तूच हे नख मला मारण्याच्या ऐवजी सांग....." संग्राम.


      " संग्राम तुम्ही खूप वाईट आहात...." आर्या संग्रामच्या छातीवर बुक्का मारत बोलली.. आणि चेहरा बाजूला करून कूस बदलली...


      " आर्या मला तुझ्याशी बोलायचे आहे..... प्लिज एकदा माझं ऐकून घे,  मग तू ठरव काय करायचे ते...."संग्राम आर्याला मागून जवळ ओढत बोलला.


       " संग्राम मलाही ऐकायचे आहे तुम्ही का इतके टेंशनमध्ये आहात ते.... बोला ना काय झाले..." आर्या कूस वळवत बोलली..


       " आर्या घरात वातावरण खूप बदलले आहे.... माई आता पहिल्यासारखे नाही वागत माझ्याशी... तिला आता माझ्यावर विश्वास नाही राहिला...
मी गेले काही दिवस शेतावर राहत होतो...."संग्राम.


      " संग्राम नक्की काय झाले सांगाल का मला..?"आर्या त्याचा चेहरा हाताच्या ओजळीत पकडत बोलली.....


      " तू या जगात नाही म्हणून मी मान्य करत नव्हतो, याचाच तिला राग येत होता...
आता नवीनच हट्ट धरून बसली आहे ती, मेणकाशी लग्न कर म्हणून मागे लागली....
मला अट घातली आहे मेणकाशी लग्न कर नाहीतर आम्हाला आज पासून विसर म्हणून.... तूच सांग मी काय करू...." संग्राम.


       " मी घरी आले की सगळे ठीक होईल संग्राम, त्या मेणकाच्या तोंडाला कसे कुलूप लागेल बघाच तुम्ही... एवढा वेळ झाला टेंशन घेऊन बसलात मला आधीच बोलला असता तर कदाचीत लवकर यातुन मार्ग काढला असता आपण...." आर्या त्याला समजवत बोलली.


      " आर्या ती मेनका इतक्या सहजासहजी नाही सोडणार आपल्याला....
मी त्या रात्री नशेत होतो, मला पहिल्यांदा घेतल्यामुळे खूपच चढली होती....
मी घरी आलो तेव्हा मला चालायला पण जमत नव्हते... म्हणून मेणकाने मला साहरा देऊन खालच्या रूममध्ये झोपवले..... मी नशेत तू समजून मेणकाच्या जवळ आलो...." संग्राम बोलत होता आर्याच्या चेहऱ्याचा रंग बदलत होता....
         आर्या मी मुद्द्यांम नाही केले,  मला काहीच कळत नव्हते, मी काय करतो ,कसा वागतो.... कसलेच भान नव्हते.... आर्या मी तूला सोडून दुसरे कोणाकडे बघू पण नाही शकत....
        आर्या माझ्या मनात फक्त तू आहेस पण त्या दिवशी माझा तोल गेला आणि ते सगळे घडले.... प्लिज आर्या मला समजून घे,  मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय....  तू मला हवी ती शिक्षा दे पण मला सोडून कुठे जाऊ नकोस...." संग्राम अगदी गयावया करत आर्याला सांगत होता.


       " संग्राम जर माझ्याकडून हे घडले असते... मी चूक झाली म्हणून बोललि असते तर  तुम्ही मला समजून घेतले असते का..?.." आर्या समोर बघत बोलली.


       " आर्या काहीही बोलू नकोस.... मी तुझ्यावर अशी कधी वेळच येऊ देणार नाही.... तू असे काही करणार नाही याची खात्री आहे मला....." संग्राम जरा रागात बोलला.


        " का संग्राम आता काय झाले,  मी एक मुलगी आहे म्हणून मला असे करता येणार नाही.... पण हेच तुमच्याकडून घडले आहे तर मी समजून घ्यायचे....
     आता तुम्ही स्वतःला माझ्या जागेवर ठेवून ठरवा मी काय करायला पाहिजे ते सांगा....." आर्या नजर रोखत बोलली.


        " आर्या...... संग्राम पुढे काही बोलूच शकला नाही.....  आता आर्याच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागला.....
खरंच आर्याकडून असे काही घडले असते तर मी तिला माफ केले असते का?....
तिला समजून घेऊन परत त्याच साफ मनाने स्वीकारले असते का?....  ती एक मुलगी आहे म्हणून तिने मला समजून घ्यायला पाहिजे ही अपेक्षा मी कसा काय करू शकतो.... किती स्वार्थी विचार करतो मी...


       " संग्राम किती विचार करणार अजून....  नाही आहे उत्तर तुमच्याकडे....
तुमच्याकडेच काय जगातल्या कुठल्याच पुरुषाकडे याचे उत्तर नाही भेटणार.... आपल्या बायकोने असे काही केले कोणी सहनच नाही करू शकत....
          तुम्ही वेगळे नाही आहात....." आर्या.


        " मी तुला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न केला असता....  वेळ लागला असता पण मी समजून घेतले असते....." संग्राम आर्याला जवळ घेत बोलला.


        " संग्राम हे उत्तर समाधान कारक नाही.... जाउद्यात मला नको तुमच्या कडून काही उत्तर, मला तुमच्यावर राग पण नाही.... आर्या त्याच्या मिठीत शिरत बोलली....


      " आर्या तुला राग असेल तर तो काढ माझ्यावर , पण एवढे मोठं मन नको ठेऊस तू, मला त्रास होईल त्याचा....." सँग्राम


        " आर्या संग्रामचा चेहरा बघून जोर जोरात हसायला लागली.....
संग्राम गोंधळून आर्याला बघत होता......
ओहह , माझा भोळा नवरोबा.....किती इमोशनल होतात तुम्ही लगेच......


आर्या वेड लगले का अशी का हसतेस.... इथे मला टेन्शन आले तुझ आपलं हसायचे काम चालू आहे.... तू इतक्या गंभीर विषयावर पण इतकी कशी नॉर्मल वागू शकते...."संग्राम जागेवरून उठून रागात लाल होत आर्या वर चिडला....


        "संग्राम आर्या त्याचा हात ओढत खाली बसवत बोलली...
संग्राम अहो तुम्ही जे केलेच नाही त्याचे वाईट का वाटून घ्यायचे.... माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.... तुम्ही कधीही चुकीचे वागणार नाही, जागेपणी पण आणि शुद्धित नसल्यावर सुद्धा...."आर्या.


     " तुला काय माहित त्या वेळी काय झाले ते... मलाच कळत नाही आहे काय झाले ते...."संग्राम.


     " अहो त्या दिवशी तुम्ही खूप ड्रिंक केले होते ना..? तेव्हाच मला संदीप बोलले होते की नक्की काय झाले आणि म्हणून विश्र्वास दादाला आम्ही तुमच्याकडे पाठवले होते....
तुम्ही जेव्हा घरात गेले त्यानंतर काही वेळात संदीप ने दादा ला कॉल करून तुम्हाला आत जाऊन बघून यायला सांगितले होते....
जेव्हा दादा आत दारात आला तेव्हा मेनका तुमचे तुमच्या जवळ होती , पण तुम्ही नशेत होते... आणि त्याचा फायदा ती घेणार हे नक्की होत...
     पण दादा ने काहीच वेळात बाहेर आवाज केला त्याने मेनका घाबरून तुमच्या रुममधून पळत बाहेर आली....
सगळी रात्र माझा दादा तुमच्या बरोबर होता... आणि तुम्ही मला समजून बराच त्रास दिला त्याला..... आर्या बोलत बोलत परत हसायला लागली....


      " आर्या म्हणजे त्या दिवशी मी काही केलेच नाही का...?
म्हणजे मी उगीचच स्वतःला दोषी समजत होतो... बापरे ती मेनका किती विचित्र आहे... आता तर तिला मी सोडणार नाही... किती त्रस दिलाय मला काही दिवसात तिने.... मी तुझ्याशी पण नीट बोलत नव्हतो, मला सारखे मनात तुझ्याशी असे वागलो याची खंत वाटत होती....


      " संग्राम आधीच जर माझ्याशी बोलले असते तर मी तुम्हाला सगळे सांगितले असते...."आर्या.


     " Hmm, पण मला तुझ्या अभ्यासात तुला टेन्शन द्यायचे नव्हते...
पण तू का नाही बोलली आधी मला या बद्दल..."संग्राम.


     " मी बघत होते तुम्ही मला ही गोष्ट सांगता की नाही... मला बघायचे होते माझा नवरा माझ्यापासून काही लपवत आहे की नाही ...
पण खरच आज मी खूप खूष आहे तुम्ही मला सगळेच सांगतात... कधीच काही लपवणार नाही म्हणून...."आर्या बोलली.


      " आर्या तू खरच खूप बदमाश आहे.... पण मला आवडली तुझी आयडिया, आज तुझ्या मुळेच ती मेनका काही करू नाही शकली....
हो पण बिचारे विश्वासराव... त्यांना किती त्रास झालं असेल माझा..." संग्राम चेहरा पाडत बोलला.


      " तुमचा साला आहे मग तेव्हढे तर त्याला सहन करावेच लागेल ना..? आर्या मिक्षकील हसत बोलली.


     " हो का..? मग आता बायकोला त्रास देण्याची वेळ आली आहे..." संग्राम आर्या ला उचलून बेड वर झोपवत बोलला....



(मला माहित सद्या भाग फार उशिरा पोस्ट होतात... पण माझी काम वाढली आहे आणि त्यात माझ्या कीबोर्ड कोमात गेला आहे...
फॉरमॅट मारून पण काहीच होत नाही... कोणाकडे काही ऑप्शन असेल मला सांगा... मला लिहायला फार त्रास होतोय आणि लिखाण पण होत नाही ये...
नाहीतर सगळे वाचक मिळून नवीन मोबाईल घेऊन द्या???
बाकी भाग कसा होता नक्की कळवा...)

🎭 Series Post

View all