Jan 19, 2022
सामाजिक

आर्या...भाग ३६

Read Later
आर्या...भाग ३६
         "संग्राम खाली चल लवकर आपल्या गाडीची अवस्था बघ...
महेश खिडकीतून गाडीकडे बघत धावत खाली गेला...
संग्राम महेशचा आवाज ऐकत बाहेर पळत आला तर गाडीचा इजिनमन धूर येत होता... जर लवकर लक्ष्यात नसते आले तर गाडीने पेट घेतला असता.....


      संग्राम हे काय आहे... गाडीतर कालच येताना सर्विसिंग करून घेतली होती... गाडीचे इंजिन कसे काय खराब झाले...."महेश.


      " महेश इथल्या पोलिसांना हे कळव, हे कोणीतरी घडवून आणले आहे.... याचा संबध कुठेतरी आर्याच्या आणि माझ्या अक्सिडेंटच्या घटनेशी आहे...
      मला या बद्दल काही निनामी पत्र भेटले होते.... त्यात मला धमकवण्याचा प्रयत्न केला, की मी केस मागे घेतली नाही तर अजून काहीतरी वाईट घडेल..."संग्राम ने सांगितले.


        " संग्राम म्हणजे कोणीतरी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे, आपण इथे आलो हे तर तुलाच माहीत होते, मलाही इथे पोहल्यावर तू सांगितले.... म्हणजे जे कोणी आहे ते तुझ्या फारच मागे लागले आहे...."महेश.       " हम्म, जाऊदेत आता तू सांगितले ती काम कर, पोलीस बघतील काय आहे ते..." संग्राम.


       " महेश कामासाठी निघून गेला आणि संग्राम
वरती घरात आला...
संदीप तू आजच आर्याला इथे पाठवण्याची सोय कर... तिला कुठे ठेवायचे हे तुला माहीतच आहे, कारण माझ्यावर काही लोक लक्ष ठेवून आहेत,  मी इथे आहे तर गावात तुझ्या हालचालीवर कोणी फार लक्ष नाही देणार यातच आपले काम साध्य करून घेऊ...
     आर्याला लवकर इथे पाठव, तिची परीक्षा होई पर्यंत तिची काळजी घे... आता फार दिवस नाही लागणार आपल्याला खऱ्या आरोपी लवकरच हातात येईल...." संग्राम ने संदीपला कॉल करून सांगितले.


       " संग्राम काहीवेळात विचार करून बाहेर पडला... त्याचे काही काम उरकून तो महेश बरोबर परत गावाला परतला.....
संग्राम घरात येताच त्याला समोर मेनका दिसली....
ती संग्राम येताच त्याला बघून लाजत किचनमध्ये पळून गेली...

        " संग्राम ला तर तिला बघून डोकंच उठले.... ही बया आता काय नाटक करते काय माहीत...  अजून काय काय वाढून ठेवले काय माहीत.... महेश संग्राम कडे बघून हसू लागला...
सँग्राम हिचे लक्षण काही ठीक वाटत नाही मला..
जपून रहा बाबा....नाहीतर हीच वांदे करेल तुझे... उगच डोक्याला ताण होईल तुझ्या..." महेश बोलून मित्रा बरोबर बाहेर जायचे सांगून निघून गेला..

    
      संग्राम कुठे गेला होता, घरात काही सांगण्याची पद्धत आहे की नाही... इतका कसा हलगर्जीनाने वागू शकतो...  किती वाटत होती तुझी, आताच येवढ्या मोठया संकटातून बाहेर आलास... थोडीतरी माझी कळजी समजून घेत जा...." माई डोळ्याला पदर लावत बोलली.


      " माई, महत्वाचे काम होते म्हणून घाईत जावं लागलं... विसरलो तुला कळवायला...
आणि तू एवढी कळजी नको करू, मला काही होणार नाही, जे व्हायचे ते होऊन गेले.... आता काही होणार नाही... मला भूक लागली आहे जेवायला वाढ मी येतो हातपाय धुवून..."संग्राम माईला मिठी मारली...
माई रमा कुठे आहे.... दिसत नाही घरात, ती आली ना..?.      " ती आणि विश्वासराव पिक्चर ला गेले आहेत येतील थोडावेळात... तू ये लवकर मी ताट घेते..." माई बोलली.


       " माई मी वाढते जेवायला, बराच उशीर झालाय तुम्ही जावा आराम करा..."मेनका माईला बोलली.


      " संग्राम जेवायला बसल्यावर मेनका त्याला जेवायला वाढायला आली....
माई माई... संग्राम माईला आवाज देऊ लागला..

       माई झोपायला गेल्या, त्यांची तबेत बरी नाही म्हणून मीच त्यांना सांगितले तुला मी वाढते म्हणून.. या वयात त्यांना आता दगदग होत नाही, त्यांना आता मदतीची गरज आहे घर कामाला, तू तर तुझ्या कामात इतका व्यस्त आहेस, तुझे लक्ष नाही अजीबात घरात....."मेनका तिच्या नखरेल अंदाजात बोलली.


     " माझ्या माईंची काळजी तु नका करू....  मी आहे अजून... मला तुझ्या हातचे ताट बघून जेवायची इच्छा नाही राहिली, संग्राम ताटाच्या पाया पडून तिथून उठून जाऊ लागला.
   संग्राम अस उपाशीपोटी नका झोपू मेनका संग्रामचा हात पकडून त्याला थांबवणार पण संग्राम आधीच तिथून निघून गेला....

       "संग्राम रूम जाऊन आर्याला फोन करण्याचा विचार करू लागला....
पण त्या मेणकाला समोर बघून संग्रामला स्वतःचाच राग येत होता... मी आर्याला फसवत तर नाही ना.?
नक्की काय झाले मला काहीच कळत नाही, मी कोणाला सांगूपन शकत नाही... आर्या कसे फेस करू तुला... त्या दिवशी तुला  भेटलो पण फार दिवसाचा दुरावा म्हणून मी सगळे विसरलो पण तुला भेटून आल्यापासून मला माझाच राग येतोय...
आर्या नकळत का होईना मी तुझी फसवणूक करतोय... तू माझ्यावर किती विश्वास ठेवते, माझ्यावर किती प्रेम करते... पण खरंच त्या लायक आहे का..?.. आर्या मला माफ करशील ना तू...?...." संग्राम एकटाच विचार करत बसला असतांना दरवाजा वाजला...
     सँग्राम ने आपले विचार झटकून मागे वळून पाहिले... मेनका दारात दुधाचा ग्लास घेऊन उभी होती.
      तिला समोर बगून सँग्रामच्या कपाळावर आठ्या पसरल्या...
      तुला किती वेळा सांगितले आमच्या रूममध्ये यायचे नाही तुला कळत नाही का?..
सारखी सारखी का येतेस माझ्या समोर, तुला बघण्याची पण इच्छा नाही होत मला.... का उगच मागे लागली माझ्या....." संग्राम वैतागून ओरडतच बोलला.


      " संग्राम परवाची रात्र विसरलात वाटते तु.... त्या वेळी तर तुला मी अगदी जवळ हवी होती, मग आता काय झाले... त्या दिवशी आपल्यात जे झाले होते तेव्हा तर मी तुला आवडत होती...
आताही तुझ्यासाठी हे दूध घेऊन आली मी... तुझी इच्छा असेल तर मी आज पण तयार आहे..
     
        सटाक....??. लाज वाटायला पाहिजे तुला असे काही बोलताना... एक मुलगी असून तू अशी घाणेरडे विचार करते... त्या दिवशी आपल्याला काहीच झाले नाही.... मी फक्त आर्यांचा आहे आणि तीचाच बनून राहिला कायम.. 


      मेनका गालावर हात ठेवून कुच्छित हसत बोलली... संग्राम ही दुसरी वेळ आहे तू माझ्यावर हात उचलला आहेस....  तुला याची मोबदला लवकरच मिळेल... तोही चांगल्या पद्धतीने... मेनका खाली पडलेला ग्लास घेऊन निघून गेली...

       किचनमध्ये अचानक काहीतरी फिटण्याचा आवाज झाला म्हणून माई आबा आणि आत्या सगळे बाहेर आले.....
      मेनका हे काय झाले... माई घाईत मेनका जवळ जात बोलली... किचनमध्ये दुधाचे पातेले खाली पडले होते सगळीकडे दूध पसरले होते, मेनका रडत रडत सगळे साफ करत होती....
    मेनका काय झाले का रडते तू... आणि हे काय तुझ्या गालावर हे बोटाचे वळ कसले आहे....
    
       " माई मेनका रडत माईंच्या गळयात पडली.... माई मी संग्रामने जेवण केले नाही, म्हणून मी दूध घेऊन गेले तर त्यांच्या रूममध्ये गेली तर रागात येऊन त्यांनी माझ्यावर हात उचलला..."


     " माईने मेणकाच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत केले..
आणि संग्रामला आवाज दिला.... आज पहिल्यांदा माईचा एवढा मोठा आवाज ऐकून संग्राम घाईतच खाली आला....
         माई काय झाले संग्राम काही बोलणार तेव्हड्यात त्याच्या गालावर माईचा हात पडला...
        तुला मी हेच शिकवले का सँग्राम मुलींच्या अंगावर हात  उचललायला....
तू असा नव्हता संग्राम पण जेव्हा पासून तुझ्या आयुष्यात ती मुलगी आली होती तसा तू बद्दलला आहेत... तुला बायकांची इज्जत करता येत नाही आता....
खरच तू माझाच तो मुलगा आहे हे खरं वाटत नाही....
मी तर असे कधीच असे वागायला शिकवल नाही, आज तू मला सगळ्यात जास्त दुखावले...
अरे ही मुलगी किती प्रेम करते तुझ्यावर, तुझ्या सारखी मागे पुढे करत असते...
     त्या आर्याने अशी काय जादू केली तुझ्यावर, की तुला बाकी काहीच दिसत नाही....

  
        "माई माझं ऐकून तर घे..." संग्राम बोलत होता पण माईने त्याला हात पुढे करून शांत राहायला सांगितले....

    तुझं खूप ऐकले संग्राम, तू जे केले त्या सगळ्याला आम्ही मान्य केले... तू म्हणशील तसेच वागलो... तू आर्याशी लग्न करून आलास तरी मी तुला काही बोलले नाही...
पण आता नाही संग्राम... आता तुला माझ्या मी सांगते तसेच करावे लागेल...
आता त्या आर्याला विसरून जा... आणि मेणकाशी लग्न करायचे.... ते पुढच्या आठ दिवसांत....
जर तुला या घरात राहायचे असेल तर हे मान्य करावेच लागेल....


      " माई तू हे काय बोलतेय.... मी आर्याला सोडून दुसरे कोणाचा विचार पण नाही करू शकत..." संग्राम मेनकाकडे रागाने बघत बोलला.


      " माझा हा शेवटचा निर्णय आहे... जर तुला मान्य नसेल तर आज पासून मी तुझी आई नाही... तूला या घरात जागा नाही...." माई.


     " संग्राम माईचे बोलणे ऐकून शॉकच झाला... त्याची आई आज त्या परक्या मेणकासाठी त्याच्याशी अशी वागते हे त्याला त्रास दायक होते...
संग्राम पाचच मिनिटात गाडीची चावी घेऊन बाहेर निघून गेला..


        " माई संग्राम निघून गेला... तू त्याच्याशी अश्या पद्धतीने बोलायला नव्हते पाहिजे.... का उगच त्याला त्रास देत आहेस...." रमा दारातून आत येत बोलली.
माई मी थोडावेळ बाहेर गेली तर लगेच घरात हे काय झाले..


      " रमा तुला माहीत नाही काय झाले... तू चार दिवस आली आहेस, आनंदाने रहा आणि तुझ्या घरी जा... उगच तू या गोष्टीत पडू नकोस... " माई अगदी तुटकपने बोलली.


      " माई तू मला परकी समजते आहेस.... आज मुलगी परकी असते हे तू दाखवून दिलेस..." रमा रडत रडत बोलली.


     " मागून विश्वास घरात आला त्याने घरातले सगळे बोलणे ऐकले...
रमा तुझी बॅग घे आपण आताच घरी जातोय... बस झाले तुझे माहेरपण, तुझे घर तिकडे आहे मला वाटते आहे आपण आता निघायला पाहिजे..


      " विश्वास राव आहो इतक्या रात्री कुठे घेऊन जाताय तिला.... कलाच आली ती राहू द्या तिला चार दिवस...." आबा


      " रमा तुला सांगितलेले ऐकू येत नाही का.?.." विश्वास जरा रागातच बोलला...
रमा गपचूप आत निघून गेलीच आणि पाच मिनिटांत बॅग घेऊन बाहेर आली..
      आबा माफ करा पण रमा इथे राहिली तर तिला संग्रामची काळजी वाटेल आणि ती काहीतरी बोलत राहील... उगच परत तिला कोणी असे परक्या सारखे बोललेले मला आवडणार नाही.... म्हणून मी तिला इथून घेऊन गेलेलो बर होईल...." विश्वास बोलून रमा चा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला.


      " विश्वास इतक्या रात्री आपण घरी गेलो तर आई बाबा काय बोलतील... तुम्ही उगच चिडलात..."रमा.


     " गाडीत बस, आता इथे चर्चा नको...."विश्वास ने तिला गाडीत बसवून निघाला गाडी शेतावर घेतली.


     " विश्वास आपण इथे कुठे चललो आहे...." रमा.


     " तुझ्या भावाकडे जायचे आपल्याला... तो आता रागात शेतावरच गेला असेल..
आपण पण आज तिथेच राहू या , त्याला पण आपल्या बरोबर बर वाटेल...." विश्वास.


       " हम्म, विश्वास तुम्ही किती विचार करतात माझ्या भावाचा... खरच संग्राम आणि मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्या सारखा जोडीदार मिळाला.... नाहीतर मला वाटले माझ्या माईचे बोलणे ऐकून राग येतो की काय तुम्हाला..." रमा.


     " तुझ्या साठी थोडीच करतोय आहे हे मी सगळे... मी तर हे माझ्या बहिणीला मदत म्हणून करतो आहे... संग्राम ठीक असेल तर ति पण खुश राहील... तिला त्याचे टेन्शन नाही राहणार...." विश्वास.


     " विश्वास अहो आर्या वहिनी आता नाही आहेत या जगात... तुम्ही पण संग्राम सारखे का बोलताय..."रमा.      " कळेल तुला हळू हळू... आता उतरा आपण पोहचलो आहे..." विश्वास समोर संग्रामकडे बोट करत बोलला.
संग्राम समोर खाटीवर आकाशाकडे बघत पडला होता...


        " झाल्या का चांदण्या मोजून... किती झाल्या आता पर्यंत..." विश्वास हसत बोलला.


      " अहो विश्वासराव तुम्ही इथे.... रमा तू पण...

रमा पळत येऊन संग्रामला बिलगली... दादा तुला घरात कोणीच समजून घेत नाही... माई कशी वागते आहे.... ती तु नसताना कधी जेवण सुद्धा करत नव्हती... पण आज तीच माई तुला घर सोडून जा बोलली.... माई अशी नव्हती...."


      " रमा रागावली आहे ती म्हणून बोलली, उद्या बघ स्वतःच कशी येईल मला शोधत.... आपली माई आहे मी ओळखतो तिला...
तू का इतक्या रात्री इथे आलीस... घरी झोपायचे ना..."संग्राम रमाचे डोळे पुसत बोलला.


      " मला नाही राहायचे तिथे, मी तुझ्या जवळ इथेच राहणार आज...." रमा.


     "बर रडूबाई माझ्याजवळ रहा.... जा आत जाऊन झोप, इथे गार हवा आहे थँडी वाजेल तुला... नंतर तुझे ते छोटुसे नाक लाल होईल... सर्दीने..." सँग्राम तिचे नाक ओढत बोलला आणि रमा ला शेतवरच्या घरात पाठवले.


      " विश्वासराव या जरा आपण पाय मोकळे करून येऊ समोर बांदावरून...
संग्राम आणि विश्वास बोलत बोलत पुढे चालू लागले...
संग्राम ने घरात काय काय झाले त्याबद्दल विश्वासला सगळे सांगितले....

       " सँग्राम तुंम्ही काळजी नका करू... आर्याची परीक्षा होई पर्यंत आपण तिला यातले काहीच कळू नको दयायला.... एकदा पेपर झाला की मग ती सगळे नीट करेल...तो पर्यंत आपण सांभाळून घेऊ इथल सगळं...." विश्वास.


       " रमा ला सांभाळून घ्या माझ्या... खुप हलविता आहे, माई आज जे बोलली ती उगच मनाला लावून घेईन...
तुम्ही आज राहा इथेच रमा ला बर वाटल... मी येतो चक्कर मारून बाहेरून..." संग्राम बोलून गाडी घेऊन गेला...        " आर्या दुसऱ्या शहरात सुखरुप पोहचली होती... सँग्रामने त्याचा एक मित्र फॉरेस्ट ऑफिसर होता त्याच्या घरी आई बरोबर राहण्याचा सोय केली होती... त्याचे घरावर कायन पाहरेकरी असत म्हणून आर्याला काहीच प्रॉब्लेम होणार नव्हता...
तसेच आर्यांचे ओळखीने एक्साम सेंटरपण गुपित ठेवले... कोणीही चौकशी केली तरी आर्या बद्दल कोणालाच माहीत पडणार नाही....


        " आर्या तुला पाच सहा दीवस तिथे ऍडजस्ट करावे लागेल...  तुला तिथे कसलीच भीती नाही, तुला तुझ्या अभ्यासवर पूर्णपणे लक्ष देता येइल बाकी गोष्टीची कळजी राहणार नाही...." सँग्राम.


      " हो सँग्राम ही जागा छान आहे, तुंम्ही नका काळजी करू... लवकरच पेपर झाले की मी परत येणार आहे.... मला तुमची खूप आठवन येते... मला तुमच्या जवळ राहायचे आहे...." आर्या.


     " शोना मला कळते आहे, पण अजून थोडे दिवस नंतर मी स्वतः तुला घ्यायला येईल.... तू आता बाकी विचार नको करुस... अजून थोडे दिवस मग कायम आपण बरोबर असणार आहे....
कुठे फिरायला जायचे तू सांग आपण बाहेर जाऊयात काही दीवस निवांत वेळ तरी मिळेल आपल्याला... एकदा परत कामाला लागलो तर मग परत एकमेकांना वेळ दयायला राहणार नाही...." सँग्राम.


       " तुम्ही ठरवा तसेच करू आपण.... आता मी ठेवते फोन मला अभ्यास करायचा आहे... तुम्ही काळजी घ्या...." आर्या.


        " हम्मम, मी काळजी तर घेतोच आहे...तुझ्यासाठी.... " सँग्राम फोन ठेवून मनातच बोलला...
आता बघू पुढे पुढे काय होतंय ते....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now