आर्या ... भाग 34

आर्या।


(ज्यांना 34 भाग दिसला नाही त्यांच्या साठी परत पोस्ट करत आहे..)


मागील भागात......

         " आर्या?? तू आलीस माझ्याजवळ... किती दिवस झाले तुला भेटून, खूप आठवण काढली मी तुझी.... पण तू मला सोडून लांब का गेलीस... आता मी तुला माझ्याच जवळ ठेवेल कायम , तुला कुठेच जाऊ नाही देणार मी.... कुठेच नाही...." संग्राम मेणकला आर्या समजून तिच्या गालावर हात ठेवत बोलत होता....

        आज तर मेणकाच्या इरादा पूर्ण होऊन संग्राम कायम तिचाच होईल हीच अपेक्षा तिला वाटू लागली....
ती संग्राम ला काहीही न बोलता, त्याला न अडवता त्याच्या शर्टची बटणे काढून त्याच्या पोटावर छातीवर आपला हाताची बोट फिरवू लागली....
संग्रामही नशेत तिला आर्या समजून प्रेमाने बघत होता.....................................................



      " सकाळी जेव्हा संग्राम उठला तेव्हा त्याचे डोके जड झाले होते... त्याला काल रात्री काय झाले हे काहीही आठवत नव्हते................................
तो डोकं दोन्ही हातात गच्च धरून बसला होता.... नंतर त्याच्या लक्षात आले की त्याच्या अंगावर शर्टच नाही आहे.... त्याला आता तर अजून काहीतरी वाईट घडल्याची जाणीव होऊ लागली....
तो तडक उठला आणि आवरून घराबाहेर पडला.... तो कशिबशी त्याची गाडी चालवत अर्ध्या तासात एक घराजवळ पोहचला....
त्यांने गदूतून उतरून त्या घराचा दरवाजा वाजवला.... दुसऱ्याच मिनींटाला दरवाजा उघडला गेला................


      आता पुढे......


      संग्रामने पुढे जाऊन हात पसरवले तसे त्याला मिठी मारली गेली.....
तुम्ही ठीक आहात ना..?  काही त्रास नाही झाला ना तुम्हाला.....


       " नाही शोना... मी एकदम ठीक आहे, मला काहीही झाले नाही.... तू आहेस म्हटल्यावर मला काही होईल का...? पण तुझी खुप आठवण येत होती आज स्वतःला नाही रोखू शकलो तुला भेटण्यापासून...  तू कशी आहेस, तुझ्या हाताची दुखापत बरी आहे का आता....  " संग्राम काळजीने विचारत होता.


       " मी एकदम बरी आहे , थोडावेळ शांत उभे रहा ना.... मला तुमच्या मिठीत असेच राहू द्या काही वेळ.... खूप सेफ फील होत मला तुमच्या मिठीत ..." आर्या संग्राम च्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी होती... संग्राम पण हाताचा विळखा घालून तिला आपल्या जवळ घेऊन उभा होता......( शॉक लगा क्या...??? अपनी आर्या जिंदा है।।  
अब कहाणी की सही शूरवात है।।।...)


       " सँग्राम तुम्हाला इथे येताना कोणी बघितले तर नाही ना...? आपण हे सगळे करतोय त्याचा फायदा होणार नाही, कोणाला अजून तरी कळायला नको मी जिवंत आहे म्हणून...." आर्या काळजीने म्हणाली.


     " शोना आज वीस दिवस झाले तुला बघून, तुला किती लागले कुठे लागले हे पण नाही बघितले...
आज नाही राहू शकलो तुला बघण्यावाचून.... म्हणून आलो.... " संग्राम.


        " संग्राम मी आता ठीक आहे नका कळजी करु.... वहिनी आणि संदीप भाऊंजी खूप काळजी घेतात माझी... त्यांच्या मुळेच मी आज इथे उभी आहे... ते वेळेवर नसते आले तर काय झाले असते... आज कदाचीत मी तुम्हाला दिसले पण नसते...." आर्या.


      शुऊई... मी असताना तुला काही होणार नाही....  मला तुझ्याबरोबर राहायचे आहे आपली दहा बारा मुलं जन्माला घालायची आहे...?
तुझी स्वप्न जगायचे आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस....." संग्राम.


      " संग्राम? दहा बारा... काहीही बोलतात तुम्ही..." आर्या ने लाजून त्याच्या छातीवर चेहऱ्यावर झाकून घेतला....

        " तूच तसे लिहले होते ना लेटर मध्ये... त्यात फक्त किती मुलं हवे ते मी सांगितले?...
आता आई आणि वडिलांची एवढी मोठी जबाबदारी सांभाळायला दहा तरी मुलं हवे ना...." संग्राम.


       " अरे बापरे म्हणजे आता पासून तयारीला लागायला पाहिजे तर , तरच तुम्ही तुमचे एवढया मुलांचे स्वप्न पूर्ण कराल...." संदीप आणि वहिनी मागून बोलले.


       " काय वहिनी तुम्ही पण यांचे ऐकताय...." आर्या संग्राम पासून लांब होत बोलली..


      " मग मित्रा राहवले नाही का बायकोला न बघता... अजून काही दिवस दम काढायचा ना..?...
लवकरच आपण सगळे प्रॉब्लेम सोडवणार आहोत...." संदीप.


         " तुझी वहिनी  आहेच तशी काय करणार , मी तिला न बघता नाही राहू शकलो....
तुझ्या घरी यायला काही अडचण पण नाही.... तू एकतर माझा मित्र आहे आणि त्यात आमच्या अक्सिडेंट केस तूच बघतो आहेस, तर कोणाला काही संशय येणार नाही....
म्हणून तर आर्याला मी इथेच ठेवले....." संग्राम.


        " हे घर पण तुझेच आहे संग्राम.... मी तुझी काही मदत करू शकतोय हेच माझ्यासाठी फार आहे.....
बर तुम्ही दोघे आत बसा रूममध्ये, इथे कोणी आले तर आर्या इथे दिसायला नको...." संदीप.


      " मी तुमच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते तुम्ही बसा आता जाऊन...."वहिनी म्हणल्या


       " आर्या तुला कुठे लागले दाखव ना... मला तुझी जखम बघू दे, तू दुसरे कोणाला सांगणार  नाहीस, तुला काही त्रास झाला तरी....." संग्राम.


 
        " संग्राम आता बर वाटतंय... पाठीला गाडीतून खाली पडल्याने तिथे बाजूला असलेला दगड घुसला.... तीच जखम अजून बरी नाही झाली...." आर्या.


       "आर्या मी बघू शकतो ना..? मला बघू दे...." संग्राम सांगत होता पण आर्याला थोडी लाज वाटत होती....
संग्राम ने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि आर्याची पाठ पाहू लागला.... जखम बरीच खोल होती.... पाठीला असल्याने त्यावर टाके घेता आले नाही... पट्टी बांधली होती पण ती अश्या जागी होती की पट्टी पण निघून जात होती....." संग्राम ला जखम बघून खूप वाईट वाटले.
        आर्या तुला झोपायला त्रास होत असेल ना..? तू कसे सहन करते आहे हे सगळे....
तुला हॉस्पिटलमध्ये पण नेता येत नाही किंवा डॉक्टरांना ही इथे घेऊन येता येत नाही..... सगळे माझ्या हलगर्जीपणा मुळेच झाले ना..?


        " संग्राम तुम्ही असा विचार का करतात... उलट माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला.... तुमच्या बरोबर असे काही झालेच नसते , जे आता झाले.... उलट मीच याला जबाबदार आहेस...."आर्या.

  

       " शोना तू आणि मी वेगळे आहोत का?... सुखात तुझ्या बरोबर आहे तर दुःखात पण बरोबर असणारच मी.... असला विचार परत कधी नाही करायचे... संग्राम तिला मीठीत घेत बोलला.


         " हम्मम, तुमची खूप दगदग होते ना, तुमची शेती , मग फॅक्टरीवर जायचे त्यात या केसच टेंशन..... तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देत जा... उगच तुम्ही आजारी पडलेले, किंवा ही स्टील बॉडी कमी झाली तर मला आवडणार नाही...." आर्या.


       " कितीही काम केले तरी मी माझी काळजी घेतो, तुला जर वाटत असेल तर माझी स्टील बॉडी दाखवू शकतो मी.... तू फक्त हो बोल...." संग्राम मिश्कीलपणे हसत बोलला..


        " संग्राम आपण दुसरीकडे आहोत... हे तरी लक्षात असू द्या....." आर्या संग्राम लांब ढकलत बोलली.


      " असुदेत... संग्राम बोलत आर्याला जवळ ओढले तिची हनुवटी हाताने पकडून वर केली...
हळूच तिच्या ओठावर ओठ टेकवले... आर्याने डोळे बंद करून घेतले, ती संग्रामचा प्रेमळ सहवास अनुभवत होती.... बराच वेळ दोघे एकमेकांत गुंतले असताना अचानक दार...
संग्रामने वैतागतच दरवाजा उघडला....
काय रे तुला काय दम नाही का..? एवढ्या दिवसांनी बायकोला भेटलो माझ्या निवांत बोलू पण देत नाहीस...."संग्राम संदीपला दारात बघून बोलला.


        " मला तुला डिस्टर्ब नव्हते करायचे पण मला पोलीस स्टेशनमधून फोन आला तर लगेच निघावे लागेल.... तुला मी नसताना इथे थांबता येणार नाही, सॉरी पण आत निघुया...." संदीप.


     " संदीप ठीक आहे, तू आधीच माझ्यासाठी एवढे करतोय, आता सॉरी नको बोलूस... चल निघुया....
संग्राम आर्या जवळ जात तिला परत एकदा मिठीत घेतले....
काळजी करू नको, तू फक्त तुझ्या अभ्यासावर फोकस कर.... लवकरच सगळे नीट होईल आणि तुला मी इथून घेऊन जाईल...आर्याच्या डोक्यावर ओठ टेकवून संग्राम तिथून संदीप बरोबर बाहेर पडला....


       " आर्याला आज संग्रामला समोर बघून छान वाटले,  सगळी खबर मिळत होती तरी त्याला आज डोळ्याने बघूनच तो ठीक आहे की नाही हे कळले होते..


       " संग्राम आता आपल्याला जास्त जपून पावलं उचलावी लागतील, आर्याला फार दिवस असे घरात लपवून नाही ठेवू शकत....
तुझ्याशिवाय तिला पण राहवत नाही, त्यात असे घरात बसून फार दिवस नाही राहू शकत... आपल्यालाच आपली पावले लवकर उचलावी लागेल..."संदीप.


      " संदीप बोलत होता पण संग्राम त्याच्याच विचारत हरवला होता....
आर्या आज किती कोमेजली होती...  तिला  घरात जे काही झाले त्या बद्दल कळले तर काय वाटेल तीला... मी तिला समजावून सांगेल पण जर तिला आधीच कळले तर, ती माझ्याबद्दल काय विचार करेल....
मला माझी आर्या सोडून माझ्या आयुष्यात दुसरे कोणीच नको आहे...


       संग्राम कसला विचार करतो आहेस... तूला तर खुश व्हायला पाहिजे की तू आज आर्या वहिनींना भेटला...
बराच बदलला आहेस भावा तू लग्न झाल्यापासून.... नाहीतर मुलींचे नाव घ्यायला पण घाबरत होता... सगळी आर्या वहिनींची कमाल आहे..." संदीप त्याला चिडवत बोलली.



(आजचा भाग थोडा घाईत लिहला आहे... समजून घ्याल....
आणि छान छान कमेंट करायला विसरू नका...
आता खुश केले ना मी तुम्हाला आर्याला परत घेऊन आले... आता मलाही खुश करा।?...)

🎭 Series Post

View all