Jan 28, 2022
सामाजिक

आर्या...29

Read Later
आर्या...29

(तुमच्या सगळ्यांच्या कमेन्ट वाचून खूप छान वाटेल... मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे.. जॉब, घर, मुलं यामधून मलाही लिहायला वेळ कमीच मिळतो... पण पुढील पार्ट लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल..... तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करते...)र्यायायायायायाया.......???????
रात्रीची किर्र शांतता, फक्त जंगली जनावरांचा दूरवरून ओरडण्याचा आवाज येत होता...
        सगळे घाबरून इकडे तिकडे फिरत होते... झाडाच्या फांदीच्या मदतीने ते दरीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते.... आजूबाजच्या सगळ्या झाडांच्या गर्दीत शोधा शोध चालू होती...
आता पर्यंत पोलीस आणि बचाव यंत्रणा पण हाजिर झाली होती पण पण पण कोणाच्याच हाताला काही लागत नव्हते.... हतबल झाले होते सगळे.....?
वरतून प्रेशर येत होते मोठ्या साहेबांचे, जर लवकर काही कळले नाही तर अवघड होईल... वरती जबाब काय देणार हेच टेन्शन सगळ्यांना आले होते...
चार तास झाले, मध्यरात्र उलटली होती... तरी काहीच सापडत नव्हते...


संग्राममममम  .................................................................................................................

         

  
आर्या❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️..........................................................
.................................................................


एहसास की जो ज़ुबान बन गये
एहसास की जो ज़ुबान बन गये दिल में मेरे मेहमान बन गये

आपकी तारीफ में क्या कहें
आप हुमारी जान बन गये
आप हुमारी जान बन गये

आप ही रब्ब आप ईमान बन गये
आप हुमारी जान बन गये

किस्मत से ह्यूम आप हम दूं मिल गये
जैसे की दुआ को अल्फ़ाज़ मिल गये

सोचा जो नहीं वो हासिल हो गया
चाहूं और क्या ये खुदा दे अब मुझे

रब्ब से मिला एक अयान बन गये
ख्वाबों का मेरे मकान बन गये

आपकी तारीफ में क्या कहें
आप हुमारी जान बन गये
आप हुमारी जान बन गये

आप ही रब्ब आप ईमान बन गये
आप हुमारी जान बन गये

दिल है इलाही मेरा मान है माही में तो सजदा करूँ उनको
अर्ज़ रुबाई मेरी फ़र्ज़ गवाही मेरी इश्क़ हुआ मुझको

दिल है इलाही मेरा मान है माही में तो सजदा करूँ उनको
अर्ज़ रुबाई मेरी फ़र्ज़ गवाही मेरी इश्क़ हुआ मुझको

जान बन गये..


                             
संग्राम आणि आर्या दोघेही शहराकडे जाण्यासाठी निघाले होते.... संग्रामने गाडीत गाणे चालू केले...संग्राम आज खूप रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे तुम्ही...\" आर्या.


      "बायकोवर पहिल्यांदा बाहेर फिरायला निघालो आहे ना.?. मग  थोडा रोमांटिक असणारच मूड नाही का ?.. आजचा दिवस फक्त बायको साठी आहे संग्राम म्हणाला.       \"" मग आज काय काय प्लान केलाय मला तरी सांगा...  आपण तीकडे दिवसभर काय करायचा आहे..." आर्या.


      " ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं सांगून  खराब नाही करायचे मला,  आता आपण शॉपिंग ला जाणार आहोत पहिले... संग्राम.


      " काचेतून येणाऱ्या थंड हवेमुळे आर्याला झोप लागली...  बाहेर गुलाबी थंडी , मंदसा वारा चालू होता..
सकाळची सुर्याची कोवळी किरणे वाऱ्याच्या चेहऱ्यावर पडत होती,  संग्राम गाडी चालवत असताना त्याचे लक्ष आर्याकडे जात होते...   हवेने  तिचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते,  ती इतकी मोहक दिसत होती की संग्राम ला पुढे गाडी चालवण्यात लक्षच लागत नव्हतं...

       " थोडं पुढे गेल्यावर संग्रामने गाडी साईडला घेतली... आर्याच्या चेहऱ्याकडे बराच वेळ बघत बसला... तिच्या चेहऱ्यावरील केस मागे करण्याचा मोह त्याला आवरला गेला नाही...  तिला हात लावू नको या विचारात तो चार वेळा हात तिच्या चेहरा जवळ नेऊन मागे घेत होता.        " संग्राम तुमचीच बायको आहे , एवढा विचार करण्याची गरज नाही... " आर्या डोळेबंद करूनच म्हणाली.


       "तुला झोप लागली होती ना , तुझी झोपमोड होईल म्हणून मी तुला त्रास देणार नव्हतो.... चेहऱ्यावर आलेले केस कानामागे खोचत संग्राम म्हणाला.        " संग्राम तुम्ही माझ्या जवळ आल्यावर  तुमच्या परफ्युम च्या वासाने कधीच झोप मोडली माझी...
       आणि एवढा विचार नका करत जाऊ , मी तुमचीच आहे आणि तुमच्या मुळे मला कधीच त्रास होणार नाही....." आर्या.


        " असं आहे का.?  संग्राम आर्याला जवळ घेत म्हणाला..        " संग्राम आपण रस्त्यात आहोत , आजूबाजूला लोक आहेत ...  प्लीज नको ना...." आर्या.


       " तुझा अँटोमँटिक नवारा आहे ना.? आता दाखवतो तुला रोमान्स कसा असतो... संग्राम ने आर्याची हनुवटी हाताने वर केली आणि तिच्या ओठावर ओठ टेकवले..."


        "दोघेही एकमेकात गुंतलेले असताना आर्याला आजुबाजूला काही तरी चाहूल जाणवली....तिने संग्रामला स्वतः पासून बाजूला केले...
       त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक गाडी उभी होती

संग्राम बराच वेळ पासून आपल्या मागे ती गाडी आहे...
खूप वेळ झाला निरीक्षण करते आहे , ती गाडी पाठलाग करते असे मला जाणवते आहे..." आर्या.
       " हो मी पण बघतो आहे... मी बघून येतो कोणाची गाडी आहे.... कोण आहे जो आपला पाठलाग करतोय...." संग्राम गाडीतून उतरण त्या गाडीकडे जाऊ लागला.

       "संग्रामच्या गाडीजवळ जात असताना ती गाडी अचानक चालू झाली आणि वेगाने पुढे येऊ लागली... काहीच अंतर दूर होती ती गाडी संग्राम पासून...
       गाडी वेगाने येत होती, संग्राम ही रागात त्या गाडीच्या दिशेने जात होता... गाडीसमोरून आता संग्रामकडे वेगाने येत होती...
गाडी संग्रामला धडकणार.....? तेवढ्यात आर्याने त्याला मागे घेतले... संग्रामला अचानक ओढल्या गेल्याने तोल जाऊन दोघेही बाजूला जाऊन पडले... त्यांच्या बाजूने ती गाडी वेगात निघून गेली.        " संग्राम तुम्ही ठीक आहात ना?..  तुम्हाला काही लागलं तर नाही ना...." आर्या संग्रामलस बघत म्हणाली.

    
      " आर्या तू खाली पडली,  तुला लागला का.?? मी ठीक आहे...  तुझ्या हाताला  लागल्यासारखं वाटतंय रक्त येतय बघ हातातून..." संग्राम आर्या उभे करत म्हणाला.      "ठीक आहे संग्राम मी...  मला काही नाही झालं...
तुम्ही काय गाडी समोर  जात होते,  ती गाडी तुमच्या अंगावर येत होती तरी तुम्हीच बाजूला झाला नाही..."आर्या


         " त्याला अंगावर गाडी घातली नसती...त्याच्यात तेवढी हिम्मत नव्हती...
मी त्याला पकडला असता आज.... कोण होता काय माहीत , एवढेच पाठलाग करायची हौस होती तर एकदा चेहरा दाखवायचा होता त्याने... लपून-छपून पाटला करणारे भित्रा होता तो...." संग्राम.


      " त्याला जाऊद्या,  त्याचा नंतर शोध घेऊ...  आता आपण घरी जाऊयात, आता नको पुढे जायला...
उगच काही प्रोब्लेम नको व्हायला... "आर्या.


     " माझी वाघीण कधी पासून घबरायला लागली, काही नाही होत चल तू... असल्या फालतू गोष्टीमुळे आपला प्लॅन कॅन्सल नाही करायचा...\" संग्राम.


      " संग्राम आज मन खूप घाबरते आहे... आज पहिल्यांदा भीती वाटते मला, तुमच्या पासून लांब जाण्याची....
ती गाडी जर अजून जवळ आली असती आणि आपण वेळेत बाजूला झाले नसतो तर.... संग्राम माझ्यामुळे तुम्हाला काही झाले तर..................." आर्या.
  
   शूशशशशशशश..... काही नाही होणार मला... मी माझ्या अर्याला सोडून कुठेच जाणार नाही, कायम तुझ्या बरोबर राहील शोना..." संग्राम आर्याच्या तोंडावर बोट ठेवत बोलला.       " आर्या ने संग्राम ला मिठी मारली... डोळे बंद करून मनातले वाईट विचार दूर करू लागली... संग्राम कायम माझ्या बरोबर असतील... मी कधीच त्यांच्यापासून दूर जाणार नाही, आणि त्यांना ही जाऊ देणार नाही.... स्वतःच्या मनाला समजूत घालू लागली...

      \" संग्राम ला ही कळाले होते आज आर्या पॅनिक झाली आहे....
ती स्वतःसाठी नाही पण संग्राम साठी घाबरली होती....
आर्या आपण अजून शहरात नाही आलो... गावाजवळच आहोत, आजूबाजूचे लोक हसताय आपल्याला पाहून...
किती निर्लज्ज बायको भेटली मला म्हणून विचार करत असतील सगळे लोक....?


      " आर्या ने संग्राम कडे पाहिले तो हसून तिला डोळ्याने समोर बघ म्हणून खुणवत होता.
आर्या ने समोर पाहिले तर शेतावर कामाला निघालेल्या बायका हातात न्याहरीची छोटीस गठल घेऊन आर्या आणि संग्राम कडे बघत तोंडाला पदर लावून हसत होत्या...
माणसे बाजूला बघून एकमेकांना काहीतरी सांगून बोलत होते...
आर्या लाजून संग्राम च्या माघे लपली...

      " शोना मला तुला बघू देना... तू लाजताना एवढी गोड दिसते, फार कमी वेळा तुला असे बघायला मिळते... मागे का लपते, समोर ये मला तुला बघायचे आहे... " संग्राम.

      " आर्या अजून त्याच्या शर्ट पकडून माघे लपत होती...


      \"" आबा साहेब इनामदा याचा मुलगा आहे ना?.. तुम्हाला आमच्या गावच्या सरपंचाच्या मुलाच्या लग्नात पाहिले होते आबा साहेबांन बरोबर...
तुम्ही इथ कसे म्हणायचे , असे रस्त्यात ... आणि ती गाडी..? कोण व्हत त्यात, तुमच्या अंगावर घालत व्हता की... बर झाल्या या बाईसाहेब व्हत्या म्हणून तुम्हाला वढल मागं... तिथे असलेल्या एका माणसाने विचारले..

          " व्हय भाऊ... मी संग्राम इनामदार हाय... माहित नाही कोण व्हत, पण बघू त्याला नंतर सापडलं च की परत तो कधीतरी... जातो कुठे माझ्या पासून वाचून..." संग्राम.


     " ,ह्या बाई कोण म्हणायच्या... आधी कधी पाहिले नाही यास्नी इथ... नवीन हाय म्हणायच्या का इथ या?..." गावकरी.

       " ह्या इनामदारीन बाई... कारभारीन बाई हायती त्या आमच्या...\"" संग्राम हसत म्हणाला.

     " अस व्हय, सूनबाई म्हणायच्या की आपल्या या...
आता इथ थांबला हायात तर चला जरा शेतावर वाईस हुरडा भाजुन देतो, जर पाय लागतील तेवढेच तुमचं आमच्या शेताला...सूनबाई थोडीच रोजच्याला येणार हाईत..." गावकरी.

       " काय मग कारभारीन बाई जायचं का जरा वेळ... तुमची ईच्छा असेल तर..." संग्राम आर्याकडे पाहून म्हणाला.


    " हो चालेल धनी जाऊयात...\" आर्या.

    " चलतय की... चला मग कारभारी न बाई..." आर्या.


        "आर्या संग्राम चा हात पकडून जाऊ लागले त्याचा अवतार बघून तिथल्या बायका कुजबुजू लागल्या
   ।सुनबाई लईच मोडल म्हणायची जीन्स आणि टॉप नवऱ्याच्या हातात हात घालून चालले हाय...

      शहरा कडची असेल पोरगी , तिथल्या पोरी अशाच असतात...
पण दिसायला लय देखणी वर का संग्रामरावांस अगदी उठून दिसू राहिली

     

          "संग्राम आणि आर्या गावकर यांबरोबर शेतामध्ये गेले ावकर्‍यांनी त्यांना छान चुलीवरचा चहा करून दिला..  नंतर तिथेच असलेला हुरडा काढून भाजून  त्यांना खाण्यासाठी दिला...
      आर्या कधीतरी शेतावर येत होती.. त्यामुळे तिला या गोष्टी खूप छान वाटत होती।

       " संग्राम हे शहरात कधीच नाही मिळणार , खरंच याची मजा गावातच असते...
तुम्ही तर  कधी शेतावर घेऊन नाही गेले आपल्या..
  मला पण बघायचे तुम्ही कसं काम करतात ते...      \" बर घरी गेलो की तुला शेतात घेऊन जाईल...

      "संग्राम आऱ्याला पाच मिनिट सांगून बाजूला निघून गेला,  ावकर्‍यांचे काहीतरी बोलून संग्राम पुढे चालला गेला..

      
    "सुनबाई संग्रामराव तुमास्नी तिकडे बोलावताय... या अंगाने जावा भिगिभिगी तिकडे..."  एक गावकऱ्याने येऊन सांगितला.

       " आर्या गावकऱ्यांनी सांगितलेल्या दिशेने जाऊ लागली,  थोडं पुढे गेल्यावर आर्याला सूर्यफूलाची शेती दिसली बाजूला संग्राम.


        "संग्राम ने हात काही सूर्यफूल तोडून घेतले आणि आर्या समोर  पकडून गुडघ्यावर बसून बोलू लागला..

माझ्या श्वासात तू...
माझ्या जगण्यात तू...
माझ्या आयुषयातील सुंदर परी तु...
माझ्यासाठी माझे जीवन तू..
कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलेच नाही...
पण तू माझे आयुष्य झाली हे तेवढेच खर आहे.
माझ्या या छोट्याशा आयुष्यात रंग भरणारी परी..
आज झाली तू माझ्या दिलाची राणी..????

     I love you आर्या.... Love you so much ever and forever\"....." संग्राम बोलत होता पण आर्या च्या डोळ्यात पाणी होते...

      \"काय झाले शोना तुला आवडले नाही... माझ काही चुकल का?.. "संग्राम उठून काळजीने तिला मिठीत घेत बोलला.

      " Thanks संग्राम... And love you so much माझ्या आयष्यातील शेवटच्या श्वासपर्यंत...\"\"आर्या.


      " तू रडली का शोना... काही झाले का?.
मला तुझ्यासाठी ते फिल्मी स्टाईल ने , तुमच्या शहराच्या पद्धतीने असा टेबल वैगरे सजवून, फुगे लावून प्रपोज नाही करता आलं... तुझ्या अपेक्षा असतील त्या मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल...." संग्राम.

 
      \"" संग्राम ते करण्याची काही गरज पण नाही... चार फुल देऊन तर कोणीही प्रपोज करेल पण अशी डायरेक्ट बाग समोर ठेवून मनातल्या भावना बोलणे हे सगळ्यांना शक्य आहे का?..
जे तुम्ही केले ते सगळ्यात स्पेशन आहे माझ्यासाठी...
खूप भारी वाल फील येतंय मला आज..
बाबा नंतर कोणी इतके जपलेच नाही, माझ्यासाठी माझ्या मनाचा विचार करून कोणी वागलेच नाही...
पण तुम्ही आज माझ्या बाबांची कमी भरून काढली माझ्या आयुष्यातली... तुम्ही बाबासारखे जपतात मला...\"" आर्या.


       " कायम असाच जपून ठेवेन मी तुला माझ्याजवळ...
पण आता निघायचं का?... उशीर होईल पुढे जायला...
तुझी खरेदी बाकी राहील मग परत.


        "संग्राम आणि आर्या गावकऱ्यांना निरोप देऊन पुढच्या प्रवासाला लागले...

       शहरात पोहचून आर्यांचे काही पुस्तके घेतली... नंतर बराच वेळ आर्या स्वतासाठी आणि संग्रामसाठी शॉपिंग करत होते... आर्या सकाळचा अक्सिडेंट विसरली म्हणून संग्राम निश्चिंत होता...

  
       " आर्या हॉटेल कुठले चांगले आहे... बराच वेळ झालाय जेवण करून घेऊ आपण..." संग्राम.


        " आज आपण सुकांता मध्ये जाऊयात...छान थाळी मिळते तिथे...(पुण्यात असाल तर नक्की try करून बघा... डेक्कन जवळील ह्या हॉटेलमध्ये... माझं तर फेवरेट आहे..)


         "दोघांनाही जेवण केले आणि गाडी घेऊन पिक्चर  बघायला निघाले... संध्याकाळी बराच लेट झाला होता...

आर्या आपण दगडूशेट चे दर्शन घेऊन मगच परत  जाऊयात..." संग्राम म्हणाला..

संग्राम आर्या दगडूशेठ ला गेले, आज मंगळावर म्हणून मंदिरात मोठी लाईन होती...
संग्राम फार वेळ लागेल दर्शनासाठी... दोन तास तरी लागतील... आपल्याला फार लेट होईल परत जायला..

        " हो शोना... जाऊयात बरोबर तू कळजी नको करुस... मी माई ला सांगितले आहे उशीर होईल म्हणून... होईल थोडावेळात...." संग्राम..


         " संग्राम आपण आज इथेच थांबुयात... माझं घर  जवळ आहे , सकाळी लवकर उठून जाऊया घरी...
आता अर्धी रात्र होईल गावी पोहचायला...
रात्रीचे दहा वाजले होते , सकाळचा प्रसंग आठवून आर्याला मनात थोडी भीती होती... पण संग्रामला तसे दाखवता येत नव्हते...

         " शोना सकाळी मला काम आहे... तो इंजिनिअर येणार आहे , नवीन मशनरी लावायची ना शेतात... सकाळी लवकरच शेतात जावे लागणार आहे... आपण निघुया 1 वाजेपर्यंत पोहचू घरी आपल्या....
संग्रामला काम असल्याने आर्या फार काही बोलली नाही...  दोघेही परत जाण्यासाठी निघाले...

        " संग्राम आपल्या मागे कोणीतरी आहे... मला दिवसभर कोणीतरी पाठलाग करतंय असे वाटतंय... अजूनही जाणवते कोणीतरी आहे आपल्या मागे..."आर्या जरा टेंशनमध्ये आली.


       " आर्या सकाळचे अजून तुझ्या डोक्यातून गेले नाही का?...
कोणी नाही आहे आपल्या मागे , तुझ्या मनात भीती आहे म्हणून तुला वाटते तसे....
आणि तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस... असल्या गोष्टींचा माझी आर्या कधीपासून विचार करायला लागली...." संग्राम अर्याला समजून सांगत होता...
वातावरण हलके होण्यासाठी त्याने रेडिओ चालू केला......दिल ये संभल जाए
कैसे तुम्हें रोका करूँ
मेरी तरफ आता
हर ग़म फिसल जाए
आँखों में तुम को भरूं
बिन बोले बातें तुमसे करूँ
गर तुम साथ हो
अगर तुम साथ हो

तेरी नज़रों में है
तेरे सपने तेरे सपनों में है नाराज़ी
मुझे लगता है के
बातें दिल की होती
लफ़्ज़ों की धोखेबाज़ी
तुम साथ हो या ना हो
क्या फर्क है
बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है
गर तुम साथ हो अगर तुम साथ हो

पलकें झपकते दी
दिन ये निकल जाए
बैठी बैठी भागी फिरूँ
मेरी तरफ आता
हर ग़म फिसल जाए
आँखों एमीन तुम को भरूं
बिन बोले बातें तुमसे करूँ
गर तुम साथ हो अगर तुम साथ हो


तेरी नज़रों में है
तेरे सपने तेरे सपनों में है
नाराज़ी मुझे लगता है के बातें दिल क
होती लफ़्ज़ों की धोखेबाज़ी
तुम साथ हो या ना हो
क्या फर्क है बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है
अगर तुम साथ हो

दिल ये संभल जाए अगर तुम साथ हो 
हर ग़म फिसल जाए
अगर तुम साथ हो 
दिल ये निकल जाए
अगर तुम साथ हो  हर ग़म फिसल जाए
अगर तुम साथ हो । अगर तुम साथ हो ।


गाणे चालू होते आर्या संग्रामच्या खाद्यांवर डोके ठेवून गाणे ऐकत होती...
अचानक... समोरून एक भरधाव ट्रक आला संग्राम ने गाडी रस्त्याच्या बाजूला करण्याच्या प्रयत्नात होता.. पण ट्रक त्यांच्या गाडीच्या दिशेने आला आणि गाडीला जोरात धडक बसली....... आणि आर्या आणि संग्रामची किंकाळी??????????????????????????????.....................................(भाग कसा वाटला नक्की कळवा... आणि हो मला गावची भाषा येत नाही थोडासा प्रयत्न केला चुकले तर समजून घ्या...☺️)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now