गुरूंच्या जीवनातील काही आठवणी

गुरुंच्या जीवनातील काही आठवणी

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नोकरी काळातील काही 

आठवणींना उजाळा देत आहे.

मध्यंतरी साक्षरता अभियानाचा कार्यक्रम शासकीय स्तरावरून 

सुरू झाला होता. त्या कार्यक्रमांतर्गत  अक्षरलेखन उपक्रम

राबवायचा होता. गावातील जे निरक्षर स्त्री पुरुष आहेत

त्यांना अक्षर ओळख करून देणे हा त्या मागील उद्देश.

माझ्या गावात उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूने छोट्या वसाहती आहेत.

मध्ये गाव आहे.

दक्षिणेला गावापासून एक ते दीड किलोमीटर व व उत्तरेला सुद्धा

गावापासून एक ते दीड किलोमीटर अशा या वसाहती आहेत.

ज्याला तिथे टोली म्हणतात. उत्तरेकडच्या वसाहतीकडे जाताना मध्ये

एक मोठा नाला आहे. त्यावेळी त्या नाल्याला पूल सुद्धा नव्हता.

(आता उंच पूल तिथे बांधण्यात आला आहे)

सर्वप्रथम अक्षर लेखनाची सुरुवात  गावच्या उत्तरेकडील 

वसाहतींपासून करायची त्या दृष्टीने आम्ही निरक्षरांची लिस्ट

माझ्या गावात पूर्वी सातव्या वर्गापर्यंत शाळा होती. पुढील 

शिक्षणासाठी मुलांना सहा किलोमीटर अंतरावरील गावाला 

जावे लागे. म्हणून गावातील सहृदय व्यक्तीच्या पुढाकाराने

गावात हायस्कूल सुरू झाले.

आता दहा विद्यार्थी व एक शिक्षक किंवा शिक्षिका प्रायमरी शाळेतून

व दहा विद्यार्थी आणि एक शिक्षक किंवा शिक्षिका आमच्या 

हायस्कूल मधून शिकवायला जाण्याचे ठरले. वेळ रात्रीची.

कारण रात्रीलाच मजूर वर्ग घरी असतो. पहिल्या दिवशी आम्ही संध्याकाळी सात वाजता विद्यार्थ्यांना घेऊन तिथे पोहोचलो.

परंतु तिथे शेतमजूर वर्ग जास्त असल्यामुळे त्यांचं म्हणणं पडलं की

आम्ही आताच कामावरून आलो तुमची येण्याची वेळ बदलवा.

म्हणून दुसऱ्या दिवशी आठ वाजता विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही 

निघालो पावसाळ्याचे दिवस होते जाताना तर बरोबर पोहोचलो.

पण तिथे गेल्यावर जोरात पाऊस सुरू झाला. आणि थोड्याच वेळात

नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी आसपासच्या परिसरात 

पसरले. आता घरी परत कसं जाणार? माजी विद्यार्थी साधारण 

मोठे तरी होते. पण पाचव्या सहाव्या वर्गातील मुलं लहानच ना!

तेव्हा आता सारखे मोबाईल नव्हते असेल तरी क्वचित.

सर्वत्र लँडलाईन चे फोन. विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटणे 

साहजिकच होते तेव्हा ते सर्व माझ्या मिस्टरांकडे आले.

अशा रीतीने चार-पाच पालकांना घेऊन रात्रीच्या किर्र अंधारात

सर्वांनी पुरा मधून नाला पार केला. व आमच्यापर्यंत पोहोचले.

तो प्रसंग आठवला की आजही अंगावर काटा येतो.

कारण रात्रीची वेळ ,नाल्याला पूर ,अशावेळी नाला पार करताना..

एखादा लोंढा आला असता तर....

परंतु बिचारे पालक मुलांच्या आवडीने आमच्यापर्यंत पोहोचले.

खूप वेळ वाट पाहिल्यानंतर एकदाचा पूर ओसरला. तोपर्यंत

तिथल्या लोकांनी आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना चहा नाश्ता

दिला. आणि नाल्याच्या काठापर्यंत येऊन कंदील ,टॉर्च...

दाखवत आम्हाला मदत सुद्धा केली. अशा रीतीने आम्ही सर्वजण

सुखरूप घरी पोहोचलो.

साधारणपणे नोकरदार वर्गांच्या बाबतीत 'तुमचं काय, तुम्हाला

खुर्चीतच बसून राहावं लागतं. फुकटचा पगार मिळतो.  'असं 

ऐकायला मिळतं पण 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे '

शिक्षण क्षेत्रामध्ये तर नेहमीच कधी ट्रेनिंग तर कधी मीटिंग

सुरूच असते. विशेषतः खेड्यातून बाहेरगावी जाताना तर

अडचणींना सीमाच नसते. पण नोकरी म्हटल्यानंतर

या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. इथेच खरा सहनशक्तीचा कस 

लागतो.