या पंढरीचे सुख, पाहता डोळा
उभा तो जिव्हाळा, योगियांचा..
संत एकनाथ महाराज
चोखा म्हणे देवे देखील पंढरी,
उभा भिमातीरी विटेवरी,
विठ्ठल विठ्ठल गजरी,
अवघी दुमदुमली पंढरी.
संत चोखामेळा
विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे मानतात.
संत तुकारामांनीही ' वि 'म्हणजे ज्ञान आणि ' ठोबा 'म्हणजे आकार
अर्थात ज्ञानाचा आकार म्हणजे विठोबा.
असा हा विठुराया, लेकुरवाळा विठुराया.
वारकऱ्यांच्या लाडक्या विठुरायाला लेकुरवाळा का म्हटलं असेल तर
संत जनाबाई म्हणतात...
विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी बाई यांचे थोरले पुत्र
निवृत्तीनाथ विठुरायाच्या खांद्यावर बसलेले आहे.
सोपान देवांचा विठुरायाने हात धरलेला आहे.
पुढे ज्ञानेश्वर तर मागे मुक्ताई उभी आहे.
संत चोखा, जीवा बरोबरीने चालत आहेत.
संत बंका कडेवर बसलेला आहे.
संत नामदेवांनी त्यांची करंगळी पकडली आहे.
असे सर्वांना घेऊन चालणारे लोभसरुप विठुरायाचे आहे.
म्हणून विठुरायाला लेकुरवाळा म्हटलेले आहे
कोरोना काळात सर्व मंदिरे बंद असल्यामुळे वारीही झाली नाही.
पण हाच विठुराया कोरोना काळात अनेक रूपात वावरताना
दिसत होता.
यावर्षी मात्र अगदी जल्लोषात अनेक वारकरी पंढरपुरात
पोहोचले आहे. वर्षानुवर्ष विटेवर उभा राहून देव आपल्यासाठी
वाट बघत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.
चंद्रभागेच्या तिरी...
अवघी दुमदुमली पंढरी..
विठ्ठल विठ्ठल जय हरी..
बोला पंढरीनाथ महाराज की जय