लहान मुलांमधील निरागसता

लहान मुलं

लहान मुलं म्हणजे सुंदर निरागसता !! लहान मुलांची ही निरागसता

अज्ञानातून आलेली नसते तर ती शुद्ध तेतून आलेली असते.

पण हीच लहान मुले कळत नकळत का होईना एखादेवेळी

खोटे बोलून जातात, चुकाही करतात पण त्या चुकांना समजून 

न घेता जेव्हा आई-वडिल मुलांवर रागवतात, मारतात तेव्हा मुले..

घाबरून ,पुन्हा खोटे बोलून स्वतःचा बचाव करून घेतात.

अनेकदा मुलांच्या खोटे बोलण्यामागे आई-वडिलांचा अवाजवी

धाक, मार खाण्याची भीती अशी कारणे असतात.

त्याचप्रमाणे कधी लोभापायी, कधी लागलेल्या सवयींमुळे खोटं

बोललं जातं. काही वेळा एखाद्या त्रासापासून स्वतःचा बचाव 

करण्यासाठी देखील खोट्याचा आधार घेतला जातो. उदा.

शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठ पूर्ण झाला नाही तर पोट दुखी,

डोकेदुखी असा बचावाचा मार्ग मुले काढतात.

कधीकधी तर स्वतःचा बचाव करण्यासाठी बोललेले खोटे

पुढे सवयीचा भाग बनतात. एक खोटं लपवण्यासाठी दुसऱ्या

खोट्याचा आधार घेतला जातो.

मुलांच्या खोटे बोलण्या मागे त्यांना घरातून मिळणाऱ्या

संस्कारांमधील उणीव आणि त्यांना लागलेली वाईट सवय 

कारणीभूत असते. म्हणून लहानपणापासूनच मुलांच्या प्रत्येक क्रिया

आणि प्रतिक्रिया याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते.

मुलांना खोटे बोलण्याची सवय लागू नये यासाठी पालकांनी

स्वतःच्या वागणुकीत तर बदल करायला हवाच पण कठोर

न वागता एक मैत्रीयुक्त शिस्त लावायला हवी.

तसेच मुलांवर विश्वास ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या

आई-वडिलांचा आपल्यावर विश्वास आहे असे जेव्हा मुलांना वाटेल

तेव्हा आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंग, कठीण समस्या

देखील ते आपल्या आई वडिलांसमोर मोकळ्या मनाने मांडू 

शकतील. त्यांना खोटे बोलण्याची गरजच पडणार नाही


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे मित्र बनून राहिले 

पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी मुलांशी नेहमी मित्रासारखे वागावे.

त्यांच्याशी मनमोकळा संवाद करावा. कधी कधी त्यांना समजावून

सांगताना कठोर होणे ही गरजेचे असते. पण ही कठोरता

बालमनावर दहशत निर्माण करणारी नक्कीच नसावी .

.