' मन

मन

       जनी सर्व सुखी असा कोण आहे..

       विचारें मना तुचि शोधूनि पाहे .

समर्थ रामदासांचे हे मनाचे श्लोक.

आज माझ्या मनात भलतेसलते विचार येत आहेत ,आज..माझं 

मन अस्वस्थ आहे.वगैरे वगैरे.

नेहमीच असे वाक्यं आपण ऐकतो. खरचं मला तर असं वाटतं

की मनचं नसतं तर बरं झालं असतं.सर्व कामं तर झालीचं

असती पण डोकं मात्र शांत राहिलं असतं.कुणाच्या तरी कटू..

शब्दांने मनाला वेदना झाल्या नसत्या.

मनात भलतेसलते विचार आले नसते.

   \" मन चिंती ते वैरी न चिंती \" असे म्हणतात.क्षणात आपलं मन

कुठल्या कुठे पोहोचते.बाहेर गेलेली घरातील व्यक्ती लवकर घरी

आली नाही तर मनात भलतेसलते विचार यायला लागतात.

काय झालं असेल? कुठे असेल? वास्तविक बाहेर गेलेली व्यक्ती

सुरक्षित असते. कुणाला फोन लावला तर\"कां बरं उचलला

नसेल? काय कारण असेल?असे अनेक विचार मनात येतात.

तब्येत बिघडली तर... काय झालं असेल.. काही सिरीयस तर नसेल.

मनात विचारांचे द्वंदयुद्ध सुरू होतं.

त्यापेक्षा मनचं नसतं तर बरं झालं असतं निदान या सर्व गोष्टींतून..

सुटका तरी झाली असती.

बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे..

   मन वढाय वढाय..

    उभ्या पीकातलं ढोर..

    किती आवरा आवरा...

    फिरी येते पीकांवर..

    मन जह्यरी जह्यरी...

     याचं‌ न्यारं रे तंतर...

     अरे इचू साप बरा...

      त्याले उतारे मंतर .

मनाचा वेग विमानाच्या वेगापेक्षा जास्त असतो. अगदी एका..

क्षणात मनात अनेक विचार येतात व डोक्याचा पार भुगा

होऊन जातो.त्यापेक्षा रोबोट प्रमाणे आपल्यालाही मन नकोचं..

होतं.

पण मन नसतं ,भावना नसत्या तर निर्जीव यंत्राप्रमाणे आपण..

जगलो असतो.जगण्यातली मजा अनुभवता आली नसती हे ही..

तेवढेचं खरे.

म्हणूनच \" मन करा रे प्रसन्न...

              सर्व सिद्धीचे कारण.