बोलीभाषा - चंदगडी बोली

बोलीभाषा

चंदगड हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील

एक डोंगराळ तालुका आहे. हा तालुका कर्नाटकातील बेळगावच्या

पश्चिमेला 15 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वेला कर्नाटक राज्य,

पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेला गोवा राज्य असे या परिसराचे

भौगोलिक स्थान आहे. या परिसरामध्ये ही चंदगडी बोली बोलली जाते.

सुंदराक्का चं नी लहू गावड्याच्या कमळीचं कशावनं त् दांडगं..

भांडान पेटलं. देवचारागत यकीमकीच्या झिंज्या उपसित,

वरबडून घित, नव्हे नव्हे तसल्या गाळ्या दून घित .

सुंदराक्काचा आप्पा मदी पडोस बगी त्यास हिंगलूस घिनात.

खलीबी आयकोन घूस तयार न्हाय.आमची म्हातारी न्हंगड्यास

पडली. आदिच तिस कानेर सन व्हन्नाय.धुंबड आयकोन तिबी..

कनेत कनेत भाइर यली. ' कशास ह्या सक्कळी सक्कळी..

व्हयमालोलल्यात.कव्वम्हेरेन यकोललोय तॉंड बंद न्हाय

दोघींचबी.डोचकं उटिवल्यानी माझं.आदिचं किरम्यान डोचकं

धरलं. त्यात ह्यंची हावूळ. त्या सुंदरीस सांग ग पारबती जरा,

त्या व्हयमालीच्या तोंडास कशा लालीसाय म्हणून.अशी म्हणीतूच

म्हातारी पडवीत गेली आणि खाटीवर पडोन भाइरली हाऊळ 

आयकेत पडली .मी बी चूलीडे यलो. दोन तुकडे कसेतरी खालो.

डालग्याबुडल्या कोंबड्या बुट्टीत घाटलो नी बाज्याराच्या वाटेस 

लालो.

शब्दार्थ

न्हंगडं - आजारपण

किरमं- सर्दी

देवचार - गावसीमेवरच्या राक्षसी देवता

कानेर - आवाज

भाषांतर

सुंदरा क्काचे आणि लहू गावडे च्या कमळीचे कोणत्यातरी..

कारणावरून मोठे भांडण सुरू झाले. त्या राक्षसासारख्या

एकमेकींच्या झिंज्या उपटीत ओरबाडत होत्या.वाईट वाईट..

शिव्या देत होत्या. सुंदर आक्काचा अप्पा त्या दोघींची समजूत

घालण्याचा प्रयत्न करीत होता.

पण त्या दोघी ही त्यास जुमानत नव्हत्या. कोणीही ऐकून घेण्यास 

तयार नव्हतं. आमची म्हातारी आजारी होती. आधीच तिला

आरडाओरडा सहन होत नव्हता. गोंधळ ऐकून ती सुद्धा कन्हत..

कन्हत बाहेर आली 'कशाला ग बेशरम्यांनो सकाळी सकाळी

नाचत आहात. कधीपासून ऐकते, तोंड बंद नाही. डोके भणभणून..

गेले. अगोदरच सर्दीने डोके धरले आहे. त्यात यांचा दंगा.

त्या सुंदरीला तरी सांग पार्वती, जरा त्या बेशरम बाईशी कां..

भांडत बसलीस. 'असे म्हणत म्हातारी खोलीत गेली.

आणि बाहेरचा गोंधळ ऐकत खाटेवर पडून राहिली.

नालायक कुठल्या ! म्हणून मी जेवणाच्या खोलीत आले.

दोन घास कसेतरी खाल्ले. डालग्याखालच्या कोंबड्या टोपलीत

घेतल्या आणि बाजाराच्या वाटेला लागले.