बोलीभाषा - वऱ्हाडी

बोलीभाषा

वऱ्हाडी ही बोली मध्य बुलढाण्यापासून उत्तरेस तापी नदी पर्यंत

पूर्वेकडे एलिचपूर  ,बालाघाट ,भंडारा, चंद्रपूरचा वायव्य भाग

वणी वाशिम जिल्हा या भागात बोलली जाते.\" अ \"वर्णाचा \" आ \" 

होते \" ओ \" वर्णाचा आ \" आ \" होणे. अशा प्रक्रिया या बोलीत घडतात.

वऱ्हाडी बोलीतील उतारा

तर नानू आजा म्हणायचा, \" तुमी काई वाटून घेऊ नका.तुमचा तरी..

काय इलाज ? जमानाच बदलला त्याले तुमी तरी कसं थोपवून..

धरचान ? तस आता माहं राह्यलयं काय म्हणा.....जगलो आस्तो

आजून दहा- बारा साल.पण मरतो आता उपासमारीने....

पण तुमाले सांगतो हे हायब्रीड तुमचंबी , हायब्रीड करंल एक..

दिवस.आरे पीक व्हते म्हनता बंद. पण त्यो नुस्ता भपका.

दिसायले देखावा. सम्द उत्पन्न खर्चातच आटून जाते ना तुमचं...

दांडातलं पाणी दांडा तच आटून जाते. वाफा कोल्डा फटांग.

हे बर्कताचं आस्तं त पैसा जाते कुठी तुमचा  ?

हायल्या कावून नाही बांधून राह्यले शेतकरी.ते त सोडाचं..

पण हे निकस खाऊ खाऊ तुमी बी निकस होऊन जासाल

हाळू हाळू  .जाणून- बुजून रसायन हे.आन् रसायन का तग धरते का

लय दिवस ? गळण धावून मरंल एक दिवस. पोटी  पिकायची


ताकदीनं उरणार नाई तिच्यात.अन् मंग तुमचं कर्ज कशाच्या माझं फेडसानं तुमी ?

हाय हाय करचान नुस्ते. शाप लागनं तुमाले या भुईचा.

आले ती दिसायले निरजीव आसली तरी जीव आस्ते तिले.

तवाच त पोटी पिकते ती. पण तिच्यावर असा अत्येचार

केल्यावर किती दिवस दम धरणार हाय ती ?


भाषांतर..

तर नानू आजोबा म्हणायचे, 'तुम्ही काही वाटून घेऊ नका'.

तुमचा तरी काय इलाज? जमानाच बदलला त्याला तुम्ही तरी

कसे थोपवून धराल ? तसे आता माझे राहीलेच काय म्हणा...

जगलो असतो अजून दहा बारा वर्ष. पण मरतो आता..

उपासमारीने... पण तुम्हाला सांगतो ते हायब्रीड ( संकरीत)

तुमचं पण हायब्रीड करेल  एक दिवस. अरे पिक होते म्हणता 

पुष्कळ. पण तो नुसता भपका. दिसायला देखावा. सगळे उत्पन्न..

खर्चातचं संपून जाते ना तुमचे. दांडातले पाणी दांडातचं आटून..

जाते. वाफा कोरडा फट्ट. ते समृद्धीचे असते तर पैसा जातो कुठे

तुमचा? हवेल्या का बांधत नाहीत शेतकरी? ते तर सोडाच.

पण हे निकृष्ट खाऊन खाऊन तुम्हीपण निकृष्ट व्हाल हळूहळू.

जाणून-बुजून रसायान हे. आणि रसायन कां तग धरते खूप दिवस?

भुई नापिक होऊन मरेल एक दिवस. पोटी पिकांची ताकदचं

उरणार नाही तिच्यात आणि मग तुमचे कर्ज कशाच्या भरोशावर

फेडालं तुम्ही ? हाय हाय कराल नुसते. शाप लागेल तुम्हांला

या जमिनीचा .' अरे ती दिसायला निर्जीव दिसत असत असली..

तरी जीव असतो तिला. तेव्हाच तर पोटी पिकते ती.

पण तिच्यावर असा अत्याचार केल्यावर किती दिवस दम 

धरणार आहे ती ? '