माझे आजोबा

माझे आजोबा

माझे आजोबा वय ८० वर्ष.पांढरे शुभ्र केस , पीळदार मिशा ,

सडसडीत बांधा , सदा प्रसन्न ,अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व.

या वयातही त्यांच्या तोंडून कधी निराशाजनक उद्गार कुणी 

ऐकले नाही. \" हे ईश्वरा कधी नेतोस रे बाबा \" असा जप काही..

वृद्ध मंडळी करीत असलेली दिसतात.पण आजोबा मात्र

 \" कां म्हणून मरायचे ? मला अजून खूप जगायचे आहे \" 

असे पॉझिटिव्ह विचार.


त्यांच्या या आनंदी , उत्साही असण्याला कारण त्यांची

तन्दुरस्ती.त्यांची प्रत्येक कृती अगदी नियमबद्ध.अगदी

न चुकता  पहाटे फिरायला जाणे  ,शरीराला झेपेल असा

व्यायाम करणे हा त्यांचा दिनक्रम.त्यांचा पेन्शनर लोकांचा

एक ग्रुप , एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे , टूरला जाणे ,

एकमेकांच्या मदतीला सदैव तत्पर .


माझ्या आजोबांना आजी विषयी म्हणजे त्यांच्या पत्नी विषयी

विशेष अभिमान. तिला ते \" अहो सरकार \" या नावानेचं हाक 

मारत . त्यांच्या तोंडून नेहमीच आजी विषयी गौरवोद्गार.

तुझ्या आजीने मला माझ्या नोकरीच्या काळात खूप साथ दिली.

आमचे संयुक्त कुटुंब.  त्या कुटुंबाचा संपूर्ण भार अगदी 

न कुरकुरीता तिने सहन केला.प्रत्येक जबाबदारी योग्यरितीने 

पार पाडली असे त्यांचे म्हणणे.


असे अत्यंत मिश्किल स्वभावाचे , सर्वांनाच जीव की प्राण

असलेले माझे आजोबा कोरोना काळात आम्हाला सोडून गेले.

अगदी कुणालाही न सांगता , अनपेक्षितपणे.आमचा तर आजही..

विश्वास बसत नाही.आजी हताशपणे शून्यात बघत असते.

असे माझे आजोबा. मृत्यूनंतरही आठवणींच्या रुपात अमर..

असलेले.परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.


  सहवास जरी सुटला

  तरी स्मृती सुगंध देत राहतील

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

आठवण तुमची येत राहील.