Login

एकच श्वास विश्वास

विश्वासार्हता


माणसाच्या नात्यामध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे. लहान

मुलदेखील जितकं आपल्या आईच्या जवळ असतं, जातं तितकं

पटकन कोणाकडेही जात नाही. कारण ते सर्वात जास्त आपल्या

आईवर विश्वासून असतं. जसजसं वय वाढेल नाती वाढतात.

मग त्यामध्ये बाकीची माणसं, आपले मित्र, कामावरचे सहकारी,

अशी अनेक जण येतात. आता ज्या लोकांशी आपलं चांगलं नात

असत त्यांच्यावर आपण थोडीफार प्रमाणात का होईना विश्वास

ठेवत असतो. आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत

असतो. आपली सुख दुःख आपली अशी गुपित जी आपण अनेकदा

आपल्या घरातील लोकांनाही सांगत नाही ती सांगतो. कोणत्या

आधारावर? तर विश्वासावर. समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेत आहे

आपल्याला समजून घेत आहे, तसचं ती आपलं गुपित कोणाला

सांगणार नाही हा विश्वास आपल्याला असतो म्हणून आपण सांगतो.

पण सर्व माणसं सारखी नसतात. समोर माणूस चांगलं वागत

असला, बोलत असला तरी ते दर वेळी खरं असतचं अस नाही.

म्हणूनच म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. असं

अनेकदा होत की आपण विश्वासाने समोरच्याला काहीतरी

सांगितलेले असत आणि तो नंतर त्याचा गैरफायदा घेतो. यातून

आपलं नुकसान होत. म्हणूनच आपल्याला कोणावर विश्वास

ठेवायचा आणि कोणावर नाही हे समजलं पाहिजे.

समोरचा माणूस कितीही चांगल्या ओळखीचा असला तरी त्याला

आपल्या आयुष्यातील गोष्टी, गुपित किती प्रमाणात सांगायची हे

माणूस पाहून आपल्याला समजलं पाहिजे. ते समजून घेण्यासाठी

काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक पहाव्या लागतात.

अस अनेकदा होताना दिसत की आपली एखाद्याशी चांगली मैत्री

असते आणि तो माणूस आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी

माणसाबद्दल सर्व काही सांगत असतो. त्यावर बोलण ही असच

असत की तिने/त्याने मला सांगितलं आहे की कोणाला सांगू नको

तरी मी तुला सांगत आहे. इथे आपण विचार केला पाहिजे जर ही

व्यक्ती दुसऱ्या कोणाचा तरी विश्वास तोडत आहे. ज्या माणसाने

काहीतरी मनापासून सांगितलेले आहे ते आपल्याला गरज नसताना

फक्त मजा म्हणून सांगत आहे ती व्यक्ती आपलं एखाद बोलणं किंवा

एखादी गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगणार नाही याला काय पुरावा

आहे? उलट ती तस वागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे

स्वतःच्या काही गोष्टी सांगताना समोरची व्यक्ती जरी आपल्याशी

चांगली असली तरी इतरांशी तिचं/त्याचं असणार वागणं किंवा

तिचा/त्याचा एकंदरीत स्वभाव पाहीला पाहिजे. तसेच जर

आपल्याला आयुष्यात कुणाचा सल्लाही घ्यायचा असेल तर तो

कुणाकडून घ्यावा हेही आपल्याला समजले पाहीजे. कारण प्रत्येक

जण आपल्या मताला समजूनच घेईल असे नाही. आणि आपल्याला

काय म्हणायचे आहे हे त्याला समजेलच असेही नाही. म्हणून

एखाद्या समस्येचे जर आपल्याला निराकरण करायचे असेल तर

योग्य त्या व्यक्ती जवळच ती समस्या मांडा. नाहीतर समस्येचे

निराकरण होण्यापेक्षा समस्या अधिक वाढेल.


प्रत्येकच समस्येमध्ये आपण समुपदेशकाकडे जात नाही. तर एका

विश्वासाने आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ ती समस्या मांडतो

यावेळी विश्वासार्हतेला खूप महत्त्व आहे. कारण समस्या मांडणाऱ्या

माणसाची मानसिक अवस्था बघून ऐकणाऱ्याने ती पूर्णपणे गुपित

ठेवली पाहिजे याचं कारण हेच आहे की सांगणारा व्यक्ती खूप

विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातील समस्या किंवा अश्या गोष्टी ज्या

तो दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही त्या सांगत असतो. अश्या

वेळी जर आपल्याला वाटणारी आपल्या विश्वासातील व्यक्ती ती

कुणीही असू शकतं मित्र-मैत्रीण, एखादा सहकारी किंवा आपल्याच

नात्यातील जवळची व्यक्ती, जर ती माहिती दुसऱ्या कोणाला सांगत

असेल तर हा पूर्णपणे विश्वासघात आहे. जर एखादी व्यक्ती

आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून एखाद्या समस्या आपल्यासमोर मांडत

असेल तर नक्कीच त्याच्या विश्वासास पात्र ठरा व जरी त्याच्या

समस्येचे निराकरण करू शकत नसाल तरी त्यावेळी त्याचा आधार

व्हा अशाने सुद्धा एकमेकांवरील विश्वास वाढत जातो आणि जो

व्यक्ती समस्येने ग्रासलेला असतो त्याला या आधारामुळे सुद्धा बराच

फायदा होतो. तो सध्या ज्या समस्येतून जातो आहे त्या समस्येशी

लढण्याचे धैर्य त्याला/ तिला प्राप्त होते. आणि कधी कधी तर असे

होते की फक्त काही शब्दांच्या आधाराने सुद्धा अनेक समस्या

सोडविल्या जाऊ शकतात जसे की मी तुझ्यासोबत आहे घाबरू

नकोस. मला असे वाटते की आपण ही असे शब्दांचे आधार देणारे बनावे.

म्हणून जर आपण कोणावर विश्वास ठेवत असू तर ती व्यक्ती आपली

माहिती किंवा काहीही दुसऱ्या कोणाला सांगत नाही ना? तेवढ्या

जवळची ती आहे ना ? हे पाहिलं पाहिजे.

कामाच्या ठिकाणी बरेच जण आपल्या प्रोजेक्ट चे डिटेल सहज

बोलता बोलता आपल्याकडून काढून घेतात, आपणही विश्वास ठेवून

बरेचदा बोलून जातो. पण याचा गैरवापर केला जातो. बरेचदा आपले

डिटेल्स अशी लोक स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. आपल्या

पर्सनल लाईफ मधल्या गोष्टींचा उपयोग आपल्या कामासाठी करून

घेतात. म्हणून सहकाऱ्यांशी मैत्री जरूर असावी पण काही ठिकाणी

मात्र आपल्याला प्रोफेशनल राहवचं लागत. तो विचार आपण केला

पाहिजे. अनेकांना इकडच्या गोष्टी तिकडे करून भांडण लावून

देण्यात मजा वाटत असते. अशा लोकांना आपण कितपत आपल्या

गोष्टी सांगायच्या हे आपल्याला समजलं पाहिजे.

आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत माणसं येतच राहणार. पण समोर

चांगला असलेला दर वेळी चांगला आणि प्रसंगी कठोर वागणारा

वाईट अस असत नाही. आपले पालक, खूप जवळचे मित्र, मैत्रीण

आपल्याकडून काही चूक झाली तर रागावतात, चूक सांगून देतात

किंवा आपण चुकीच्या मार्गावर जात असू तर ते सांगतात. याचा अर्थ

त्यांचा आपल्यावर विश्वास नसतो अस नाही. ते आपली काळजी करत असतात.
पण आपण आपल्या माणसांवर नाराज होऊन अश्या माणसांवर

विश्वास ठेवतो जे आपलाच नंतर गैरफायदा घेतात. म्हणूनच माणसं

कमी असली, मोजकी असली तरी चालतील पण ती खरचं विश्वास

ठेवण्यालायक असली पाहिजेत. कारण या विश्वासावर कुणाचा तरी

श्वास अवलंबून असतो. या जीवनात दुःख कुणाला नाहीत, समस्या

कोणाला नाहीत , पण आपले दुःख आपल्या समस्या समजून घेणारे

कुणीतरी आपले विश्वासाचे माणूस आहे हा एक आधार सुद्धा

माणसाला संपूर्ण जीवन जगण्याकरिता बळ देत असतं म्हणून

एकमेकांचा विश्वास घात करणारे बनण्यापेक्षा विश्वासाचा हात देणारे

बना जगणं खूप सुंदर आणि सोपं होईल.


🎭 Series Post

View all