पारंपरिक खेळ

पारंपरिक खेळ

खेळ म्हटला की आजही आम्हाला आमचे बालपणीचे खेळ...

आठवतात. महाराष्ट्रात पारंपरिक अनेक खेळ आहेत. त्यामुळे ..

मनोरंजन तर होतेच पण आपल्या संस्कृतीचेही  दर्शन होते.

आज डिजिटल गेमिंग च्या जमान्यात अजूनही पारंपरिक खेळांचे ..

वेगळेपण जाणवते.

गोट्या , विटीदांडू ,चोरशिपाई ,भोवरा ,लेझीम , सूर पारंब्या ,

आट्या-पाट्या  ,सागरगोट्या ,तर मुलींचे भातुकली ,

आपडी - थापडी , च्याॅव - म्याॅव ,लगोरी , काचाकवड्या ,

स्रीया मंगळागौरीचे खेळ खेळत  . स्त्रियांना घराबाहेर ..

पडण्याची  परवानगी नव्हती तेव्हा या खेळाच्या निमित्ताने..

त्या सर्व जणी एकत्र येत. भातुकलीचा खेळ तर लहान मुलींना

लग्नानंतर येणार्‍या जबाबदारीची जणू तयारी करून घेत असे.


आपली जीवनशैली बदलली आणि आपण खेळ खेळायचे थांबलो.

फारसे साहित्य न लागणाऱ्या अशा खेळांमधून उत्तम व्यायाम

तयार होतोच पण आपल्यातले उपजत कला कौशल्य पणाला ..

लागते. सध्याच्या मोबाईल आणि 'कंप्यूटर गेम्स' च्या युगात

मुलांनी एकत्र येऊन असे खेळ देखील खेळले पाहिजे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू म्हणजे लोकांशी तुटत चाललेला ..

संवाद. पारंपारिक खेळांमधून व्यायाम तर होतोच पण

एकमेकांशी संवाद वाढतो, मन प्रसन्न राहते.

आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण या पिढीलासुद्धा

हे  खेळ शिकवायला हवे.