सुख आले माझ्या दारी

सुख

वयाची ७३ वी गाठलेले सुरेशराव आणि ६६ वर्षं वयाच्या शालिनीताई. दोघेही सेवानिवृत्त.मुलगा लग्न होऊन त्याच्या कुटुंबासह शहरात नोकरीच्या ठिकाणी.मुलगी सुद्धा लग्न होऊन आपल्या सासरी.

एकेदिवशी कुणीतरी साहजिकच शालिनीताईंना प्रश्न केला.....

तुम्ही आता मुलाकडे कायमचं राहायला कां जात नाही? 

त्यावर शालिनीताई हसून म्हणाल्या,आणखी काही वर्ष 

त्यांना सुखात राहू दे.आणि इकडे आम्हा दोघांना....

मुलं , संसार, नोकरी यातून आता तर बाहेर निघालोयं.

आता थोडा निवांतपणा.....

शालिनीताईंचा स्वर कापरा झालेला...

प्रेमापोटी किंवा कर्तव्याच्या भावनेतून म्हातारपणी आईवडिलांनी

आपल्या जवळ राहावं असं प्रत्येक मुलाला वाटतं.

पण एकदा स्वतंत्र राहण्याची सवय झाल्यावर

आईवडिल सहजपणे मुलाच्या घरात सामावले जात नाही.

प्रत्येकाला आपापली लाईफस्टाईल प्रिय असते.

खाण्यापिण्याच्या आवडी, सवयी,उठण्या-जागण्याच्या वेळा,

टी. व्ही.वरील कार्यक्रमांची पसंती अशा अनेक बाबतीत

दोन पिढ्यांमधे फरक असतो. मग एकत्र राहूनही,

अनेक बाबतीत विभक्त असल्यासारखी परिस्थिती होते.

त्यापेक्षा वेगळं राहून मुलांकडे अधूनमधून जाता येतं.

संबंध चांगले राहून जिव्हाळाही राहतो.अशाप्रकारे

येनकेन प्रकारे जीवनाचा उर्वरित काळ सुखाने घालवणे महत्वाचे.