Oct 28, 2020
सामाजिक

कागदावरील अनुच्छेद १५ ( जातीवाद , धर्मनिरपेक्ष आणि वर्णभेद )

Read Later
कागदावरील अनुच्छेद १५ ( जातीवाद , धर्मनिरपेक्ष आणि वर्णभेद )

                       आज मी एका अश्या विषयाबद्दल भाष्य करणार आहे ज्या विषयावर लोक सहजा बोलायला घाबरतात. तर आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वंतत्र् झाला . त्या नंतर जवळ जवळ ३ वर्षांनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला. म्हणजेच काय ??..तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला संविधान लागू झाला. त्या संविधानाच्या पहिल्या पानावर  ' धर्मनिरपेक्ष' या शब्दाचा वापर झाला . याचा अर्थ सगळ्या धर्माचे लोक राहतात . त्या नंतर आपल्या संविधान मध्ये अनुच्छेद १५ आहे ज्यात असा लिहिलेला आहे की 

१) कोणत्याही नागरिकाच्या विरोधात केवळ धर्म , वंश , जात, लिंग , जन्मस्थान याच्या आधारावर भेद करणार नाही. 
२) कोणी नागरिक धर्म , जात , लिंग जन्मस्थान या खालील विषयावरून 
क) दुकाने , सार्वजनिक भोजनालय , हॉटेल्स आणि सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी  प्रवेश किंवा 
ख) राज्यशासनाच्या अधिकारात असलेले विहीर , तलाव,रस्त्यावर आणि सार्वजनिक कार्यक्रम  स्थानाच्या उपयोग करण्यास कोणालाही धर्म , जात , वंश , लिंग या वरून भेद करू नये .

                 ही अनुच्छेद वाचल्यावर मला पडलेला प्रश्न म्हणजे की खरच या कायद्याचा पालन होतो का???... मला आलेल्या अनुभवावरून तर वाटत की अस होत नाही.. जे वयानी मोठे असलेले लोक पहिल्यांदा कुणाला बोलत असतात तर पहिल्यांदा त्यांच्या पेहराव्याने जज करतात , जर त्यावरून कळत नसेल तर त्यांना नाव विचारतात , नाव ऐकल्यावर मग ते जज करतात की हा कोणता धर्माचा आहे .जर तो दुसऱ्या धर्माचा असेल , तर त्याला एकदम वेगळ्याच बॉडी लँग्वेज नी बोलतात. एक फिल्म आली होती ,' द वेडनसडे ' , त्यात शेवटी एक डायलॉग आहे की ,' उसने मुझे आपण नाम बताया लेकीन वो मे किसिको नही बता सकता , क्युंकी इंसान नाम सुनकर मजहब धुंड लेता है..' हीच अवस्था आहे आपल्या समाजाची... वरून कितीही आपण म्हणू ना की आपला समाज धर्मनिरपेक्ष आहे तरी काही लोकांच्या  मनात थोडा रोष असतोच . तो भेलेही चांगला माणूस असुदेत त्याच्या धर्मावरूनच त्याला आपण चांगला की वाईट हे ठरवतो. हे चुकी आपण इतिहासात पण केलेला आहे आणि आता सुद्धा करत आहोत. 

                आपल्या देशात कित्येक घटना घडत असतात. त्या घटनेमध्ये घडल्यावरून दोन मत निर्माण होतात . त्यातला एक मत म्हणजे धर्मावरून असतोच असतो. त्यावरून सोशल मीडिया वर पोस्ट केले जाते. त्या पोस्टाच्या कमेंट सेक्शन एकदा बघा . तिथे कसं धर्मावरून किती कमेंट होतात . सगळे एकमेकांना तिरस्कार करणारे कमेंट पोस्ट करत असतात. मला त्यांना विचारायचं आहे की एवढं तिरस्कार घेऊन जाणार कुठे?.. शेवटी सगळे मरणारच आहे तर एवढं तिरस्कार कशापायी??... काही नेत्यांमुळे आजचे युवापिढी वेगळ्याच रस्त्यावरून जात आहेत. सगळे तिरस्काराने एकमेकांकडे बघत असतात. त्यांना फक्त इलेक्शन मध्ये  काही मत हवं असतं म्हणून ते असले गलिच्छ राजकारण करत असतात आणि त्यात आपले युवा पिढी खेचली जाते . या युवांना गरज आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील असलेले काही विचार , ज्यात एक विचार असाही होता की स्वराज्यात सगळे धर्म एक सारखेच आहेत. काही लोकांना वाटत की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदू धर्मासाठी स्वराज्य उभे केले होते ,  अस काहीही नाही त्यांच्या सैन्यदलात मुस्लिमचे सैनिक सुद्धा होते आणि ते पण मोठे सरदाराच्या पदावर होते. फक्त काही नेत्यांच्या भाषेवरून ते सुद्धा एका धर्माचे होऊन बसले . छत्रपती शिवाजी महाराज जर आज असले असते तर म्हणाले असते त्यांना सुद्धा वाईट वाटलं असत की आजचे युवापिढी कुठल्या दिशेनी जात आहे.. आपल्या देशात असे सुद्धा काही व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांना धर्माच्या चष्म्यातून आपण कधीच बघत नाही.. ते होती डॉ. ए . पी. जे . अब्दुल कलाम , इरफान खान , अटल बिहारी वाजपेयी अजुन असे कित्येक व्यक्ती होऊन गेले. आपल्याला सुद्धा इतरांना धर्माचे चष्मा काढून बघावं लागेल . काय माहिती ते सुद्धा या व्यक्तिमत्व अर्पण केल असतील... 

           आपल्या इतिहासातून अजुन एक समस्या आपण जाणवत आहोत. ते म्हणजे जातीभेद.. पहिल्यापासून आपल्या देशात जातीभेद होत आहे आणि दुर्देवाने आज सुद्धा होत आहे.. आपल्या महाराष्ट्रात अजुन कित्येक गाव असे आहे ज्यात काही लोकांना मंदिराचे पायऱ्या सुद्धा चढू देत नाहीत. हे सगळ्यांना माहिती आहे . आपले लॉ , आपले कायदे याला गुन्हा मानतो तरी लोकांना काही फरकच पडत नाही. तो या जातीचा आणि तो त्या जातीचा आहे म्हणून आपण संबोधतो पण कायद्यांनी ते सुद्धा गुन्हाच आहे . काही वर्षांपूर्वी एक फिल्म आली होती ' सैराट ' त्या फिल्ममध्ये सगळ्यांना इंटर्वल पर्यंतच आवडतो. त्याच्या पुढे काही लोकांना आवडतच नाही .... का??.. कारण सत्य कडवट असतो आणि कडवट कुणाला आवडत नाही.. न्यूज मध्ये बघतच असता ना की प्रेमप्रकरनामुळे झाली मुलाची हत्या... कारण काय ??... तर तो दुसऱ्या जातीचा होता म्हणून... ते दोघे प्रौढ असतील तर कायदा सुद्धा त्यांना लग्न करण्यासाठी परवानगी देत. तरी लोकांची मानसिकतेमुळे त्यांना बळी जावं लागतं. अस नाही की एक दोनच केस असे होतात. कुठल्याही गावात जर गेलाय तर अस एक ना एक असे केस असतातच... ते तर सोडाच माझा एक मित्र आहे त्याचा भाऊ एका मुलीवर प्रेम करत होता. त्याची चूक एवढीच होती की ती मुलगी दुसऱ्या जातीची होती. त्याला त्याच्या घरातले त्याला दोन चॉइस दिले की तिच्याशी लग्न कर आणि गावात येऊ नकोस , नाही तर दुसरा तिला विसरून जा ... कारण काय तर गावात इज्जत त्यांची इज्जत जाते म्हणून... त्यात माझा मित्र सुद्धा अडकून फसला... तो सुद्धा याच विचाराचा आहे. तो शेवटी त्याच्या भावाला आणि तो प्रेम करत असलेल्या मुलीला वेगळं केलं. मी जर त्याच्या जागी असलो असतो तर भावाला सपोर्ट केला असता... तो तर काय करणार त्याच्या आजूबाजूला त्याच मानसिकतेचे लोक आहेत.. याच विचारामुळे कित्येक मुल आणि मुलींची हत्या केली जाते... बिहार , उत्तर प्रदेश या राज्यांत तर परिस्थिती अजुन बिकट आहे . तिथे जातीवरून दंगल , हत्या तर होतच असतात. तिथल्या पोलिसांना , गवर्नमेंटला सुद्धा माहिती आहे , तरी ते काही करू शकत नाही. का ??.. कारण तिथल्या लोकांचे मानसिकताच जातीभेद कडे  वळले आहे..... . हेच विचार या युवा पिढीला बदलाव लागेल.

               अनुच्छेद १५ या कायद्यात अजुन एक महत्त्वाचं समस्येला गुन्हा म्हणून संबोधला आहे. ते म्हणजे वर्णभेद ... तुम्ही कोणालाही त्याच्या रंगावरून भेदभाव करू शकत नाही. निसर्गाने त्या व्यक्तीला जो रंग द्यायचा होता  ते दिला आहे . मग आपण का म्हणून त्याच्यावरून भेदभाव  करू.. अस कुठल्याही पुस्तकात लिहिलेला आहे की गोरा म्हणजे महान आणि काळे लोक म्हणजे तुच्छ.. या वर्णाच्या भेदमुळेच आज कित्येक मुल मनात भीती बाळगून असतात . मुलींना लग्नासाठी गोरा मुलगा हवा असतो , तर मुलांना गोरी मुलगी हवी असते त्यामुळे कित्येक मुली आपला रंग बदलण्यासाठी काही केमिकल्स वापरत असतात. जे हानिकारक असतात. हे फक्त त्या वर्णाच्या विचारांमुळे असलेले समाजाचे विचार ... फेसक्रीम चे अड्स सुद्धा वर्णाच्या या विचारांना बढावा देत आहेत... अमेरिका आणि कित्येक युरोपीय देशात आजकाल एक आंदोलन चालू आहे , ' ब्लॅक लिव्हज मॅटरस ' हा आंदोलन वर्णभेद या विचारांच्या विरोधात चालू आहे. या आंदोलनात कित्येक हजार लोक रस्त्यावर सहभागी आहेत. इंग्लंड मध्ये तर लोक त्यांच्याकडील मोठे लोकांचे मूर्ती पाडले. ते व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन राज्य केले होते आणि त्यांचा विचार असा होता की काळे लोक म्हणजे गुलाम आहेत. ते लोक आपल्या इतिहासातले कित्येक अंश पाडत आहेत. आपण का विचार बदलू शकत नाही... हीच विचार आपल्याला बदलायच आहे. 

 यामुळेच अनुच्छेद १५ हा फक्त कागदावरील कायदा वाटतो. आपल्या समाज वरील सगळे विचार बदलायला हवं. 

********************************

तुम्हाला या विचाराबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगा. तुमचे सुद्धा विचार कमेंट करू शकता. या लेखात काही चुका असतील तर समझून घ्या प्लीज... धन्यवाद ????????????

ऋषिकेश मठपती

      

Circle Image

Mathapati Rushikesh Irayya

Student

Writing and reading are my hobbies. Mathematics is in my blood.