Dec 01, 2021
प्रेम

अरेंज मॅरेज…

Read Later
अरेंज मॅरेज…

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अरेंज मॅरेज…

(प्रेम, मैत्री आणि लग्न…)

 

---------------------------------------------------------------------

प्रस्तावना माझी मीच लिहिलेली

 

     अरेंज मॅरेज म्हणजे काय? हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तरीही जर कोणाला माहित नसेल तर माझ्या भाषेतून सांगायचं झालं तर, अरेंज मॅरेज म्हणजे जशी कॉलेज मध्ये तुमचे मित्र जशी तुमची आणि तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीची settings लावतात तशीच इथे तुमच्या घरचे तुमची कांदेपोहे, साखरपुडा आणि लग्न या स्वरूपात settings लावतात. जशी चित्रपटाच्या अगोदर सावधानतेची पाटी अस्तेना तशीच या ही कथेच्या अगोदर मी ही हास्यास्पद सावधानतेची पाटी टाकली आहे, ही कथा संपूर्ण काल्पनिक विचारांचा खेळ आहे, ह्या कथेचा वर्तमानात कोणताही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...????????????.

         ही कथा नवरा बायको यांच्या नात्यातील गोड प्रेम आणि सुंदर मैत्री यांची गोष्ट सांगते. आता तुम्हाला वाटत असेल की माझा या विषयाशी काय संबंध ? तसा माझा या विषयाशी अजून पर्यंत काही संबंध आलेला नाही, पण मी पाहिलेला सौंसारतील प्रेम, मैत्री आणि नाते-संबंध या सर्वांची माझ्या नजरेतून व विचारातून निर्माण केलेली ही एक पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. 

             आपल्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी कथेमधल्या दोन्ही पात्रांशी ओळख आपणास करून देतो. अ… आपण त्यांना पात्र नको बोलूया पात्र थोड ऑड वाटत, यापेक्षा व्यक्ती हे म्हणुया. तर आपल्या कथेतील पहिली व्यक्ती मंदर. मंदार बद्दल सांगायचं झालं तर हा competitive exam दिलेला एक साधा पण talented आणि updated असा मुलगा. ह्याची life खूप छान व व्यवस्थित सुरू असते. पण या उलट मेघना मात्र प्रेमा पासून झालेल्या दुःखातून नुकतीच सावरली होती. एक नवीन सुरुवात केली होती, एक नवीन आयुष्य. मेघना ही तशी प्रेमळ मुलगी आणि creative सुध्दा. या दोघांमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत. ते दोघं विचारी आहेत, दोघांना हि explore करायला आवडतं, भटकायला आवडतं म्हणजेच दोघं एकमेकांना perfect अस नाही पण दोघं गोड, आंबट व तिखट अश्या तिन्ही चविंच एक धम्माल combination आहे. 

                आता तुम्हाला अस वाटत असेल की हे combination नक्की कसं जुळल…? तर तुम्ही बोर होणार नाही अस थोडक्यात व सहज भाषेत सांगतो. जसं आपल्या कथेचं नाव आहे तसच या दोघांचं लग्न हे अरेंज मॅरेज झाल आहे. या दोघांची पहिली भेट त्यांच्या घरातले 11 East Street cafe इथे ठरवतात. स्वभावा प्रमाणे मंदार हा अगोदर पोहोचलेला असतो. मेघनाला पोहोचायला मात्र थोडा उशीर झाला असतो. मेघना जेव्हा मंदारला भेटते तेव्हा थोडी वेगळी beheve करत असते. कदाचित ती त्यांची पहिली भेट असावी म्हणून…! मात्र या उलट मंदारला ती तिच्या सर्व गुण दोषांसकट पसंत पडली असते. त्याने मनातल्या मनात हे ठरवून टाकलं असतं की "लग्न करीन तर हीच्याशीच…!" मेघनाने पहिल्या भेटीत काहीच पक्कं केलं नाही. पण तिच्या मनात मात्र मंदार साठी प्रेमाची चमक दिसते. अस काही दिवस निघून जातात साधारण दोन महिने सहज बघता बघता निघून गेले. या दोन महिन्यात त्यांच्या साधारण १५ भेटी तरी झाल्या असतील. सोबतच massages and calls तर चालूच असतात. पण तरीही दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे का नाही या बाबतीत shuar नसतात. पण प्रेम आहे ते कितीवेळ अस लपून राहणार. शेवटी ती वेळ आली जेव्हा त्या दोघांना हे कळून चुकलं की They made for each other….! त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असतो. I mean त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं पण ते त्यांनी तस व्यक्त केलेलं नाही. अहो…. म्हणजे Prapose केलेलं नसत. 

             एका महिन्याने त्यांचा साखरपुडा होतो. त्यांच्या पहिल्या भेटी नंतर सहाव्या महिन्यात त्यांच लग्न होत. पण लग्नाच्या आदल्या रात्री म्हणजे हळदीच्या रात्री मंदार मेघनाला घेऊन त्याच कॅफेमध्ये जातो जिथे ते पहिल्यांदा भेटलेले असतात. त्या कॅफेच्या इथे गेल्यावर त्यांच्यात काय संवाद होतो ते तुम्हीच बघा…. 

मेघना; "मंदार आपण इथे का आलो आहे…?"

मंदार; "अ… सांगतो…! तुला आठवतंय एकदा तू सहजच म्हणाली होतीस की तुला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने अगदी रोमँटिक style मध्ये Prapose करावं."

मेघना; "हा… मग…! एक मिनिट…don't tell me तू मला इथे आता prapose करणार आहेस."

मंदार; "हो…. But इथे नाही… आत मध्ये चल…"

मेघना; "आत मध्ये…"

मंदार; "Hm….! "

अस बोलून मंदार कॅफेचा दरवाजा उघडतो. आत मध्ये अंधार असतो. जेव्हा मंदार "surprise…!" अस म्हणतो तेव्हा लाईट on होतात. समोर दिसत असलेल दृश्य पाहून ती आश्चर्य चकित होऊन मंदारला एक घट्ट मिठी मारते. मग मंदार तिचा हात पकडुन थोडा पुढे म्हणजे decoration केल आहे त्या ठिकाणी जाऊन उभ करतो. मंदार आता prapose करायच्या position मध्ये बसतो आणि मेघनाचे दोन्ही हात पकडून तिला मन, हृदय आणि बुद्धी एकत्र करून विचारतो….

मंदार; "मेघना… I LOVE YOU….! Will you marry me….?"

मेघनाला हे पाहून आनंद आश्रु फुटतात. मान हलवून हसत हसत आपला होकार व्यक्त करते. Prapose करून झाल्यावर सगळ आटपल्यावर ते दोघे निघतात तेव्हा त्यांची गाडी ही रस्त्याच्या पलीकडे उभी असते. ते रस्ता क्रॉस करत असताना अचानक मेघना थांबते. मंदार तिला मागे वळून जेव्हा तिला विचारतो, तेव्हा ती त्याला एक खूप प्रेमळ अशी घट्ट मिठी मारते. ती त्याच्या कानात बोलते…

मेघना; "Thank You….! मला प्रेम काय असत हे नव्याने समजावण्यासाठी… आणि त्याचा अनुभव देण्यासाठी. आता काहीही झालं ना… तरी मि तुझा हा धरलेला हात कधीच सोडणार नाही…! I Love you so much….!" 

तिचे हे शब्द त्या सुमसान रस्त्याच्या मधोमध आणि अंधाऱ्या रात्रीत हा घडलेला संपूर्ण प्रसंग थंड गार वाऱ्याच्या प्रेमळ स्पर्शा सारखं होता. दुसऱ्या दिवशी अगदी थाटामाटात त्यांचं लग्न सोहोळा पार पडतो. 

त्यांच्या संसाराच्या गाडीने वर्ष आता तीन वर्ष पूर्ण केलेत. त्यांच्या या तीन वर्षांच्या संसारात आता काय छोटे - मोठे किस्से घडतात ते आपण या कथेत बघुया. Sorry बर का… मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अस म्हणालो आणि जरा जास्तच बोलो….! 

लेखक

प्रज्योत सु. भालेकर            

----------------------------------------------------------------------

Episode - 01

पहिलं प्रेम

             मेघना ऑफिस मधून थकून आल्यामुळे ती मंदारला येताना पिझ्झा आणायला सांगते. नाई कस आहे मेघना ऑफिस मधून आज खूपच थकून आली आहेना, मग जेवण बनवायला obviously कंटाळा येणारना. थोड्या वेळानं मंदार सुद्धा पिझ्झा घेऊन घरी येतो. दोघंही हातपाय धुवून डायनिंग टेबलवर पिझ्झा खायला बसतात आणि सोबत म्हणून थोडीशी बिअर सुद्धा पित असतात. पिझ्झा खातखात आजच्या दिनचर्याचा आढावा सुद्धा घेत असतात. बोलता बोलता मेघना सहज अश्विनी वहिनींच्या फोन बद्दल सांगायला सुरुवात करते, 

मेघना; "आज दुपारी अश्विनी वाहिनिंचा फोन आला होता…!"

मंदार; "hm….! मग काय… बोलत होती वहिनी…?"

मेघना; "काही नाही त्या म्हणत होत्या की परवा म्हणे प्रणवची बॅग चेक करत होत्या तर त्या मध्ये चक्क त्यांना एक लव लेटर मिळल…!????"

मंदार; "काय……?"(मंदार खाता खाता थांबतो…)

मेघना; "हो... आणि त्यांनी जेव्हा प्रणवला विचारला तर तो म्हणाला की… त्याच एक… मुलीवर... प्रेम आहे...????????????" 

मंदार; "अरे...हा कितविला आहे…! मला कळतच नाही आहे की काय बोलाव यावर...????. अरे याच वय काय आणि याच प्रेम आहे एक मुलीवर...????. मला खरंच हसायला येतय...????"

मेघना; "अरे अॅक्च्युली मला पण त्यावेळी हसायला आल…. पण मे ते कसबस कंट्रोल केलं."

मंदार; "मला एक गोष्ट कळत नाही की हा अजुन शाळेत आहे आणि ह्याला प्रेम झालंय…! अरे, त्याला प्रेमाचा अर्थ तरी माहिती आहे का…?

 

(मेघना हे ऐकुन हसत असते. त्या दोघांचं मग खाऊन होत, जेवण झाल्यानंतर मंदार भांडी घासत असतो आणि मेघना ती व्यवस्थित ठिकाणी लावत असते. बोलता बोलता त्यांचा प्रणव आणि प्रेम हा विषय चालूच असतो. तेवढ्यात त्यांच पहिल्या प्रेमावर बोलण सुरू होत.)

 

मेघना; "मंदार तुला आठवतंय का तुझ पहिल प्रेम….?"

मंदार; "कायग…! आता मध्येच हा कुठला विषय…? नाही म्हणजे या आधी कधी मला विचारलं नाहीस म्हणून…!"

मेघना; "या आधी नाही विचारलं, पण आता विचारतेय ना…! मग सांगना मला….! आय मीन मी सोडून तुझं या आधी कोणावर प्रेम होतं का….? (मंदार काही बोलत नाही तो त्याच काम करत असतो.) सांग ना….! होत ना तुझं प्रेम…?"

मंदार; "अ….! Hm….! आता तू एवढा फोर्स करतेय म्हणून सांगतो, पण माझी एक अट आहे ?"

मेघना; "अट….? कसली….?"

मंदार; "सांगतो सांगतो….! अट अशी की मी माझ्या पहिल्या प्रेमा बद्दल सांगतो आणि तू तुझ्या पहिल्या प्रेमा बद्दल सांगायचं….! Ok.?"

मेघना; "ए… चल मी नाही….!"

मंदार; "ए यार मेघना अस नाही…! मी तुला सांगतोय ना माझ्या पहिल्या प्रेमा बद्दल मग तू पण सांगायचं….!"

मेघना; "Ok….! Ok….! मी पण सांगते….!"

मंदार; "हा ! मग झाल अस की मी….!"

(मेघना तेवढ्यात त्याला थांबवते.)

मेघना; "ए……! थांब…. थांब….."

मंदार; "आता काय….?"

मेघना; "इथे नको आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी बसून बोलूया."(मग ते दोघे त्यांच्या हॉल मधल्या गॅलरीत बसतात सोबत गरमा-गरम कॉफी सुद्धा असते.)

मंदार; "now you ready….? सांगू आता….!"

मेघना; "हो... हो… सांग. आता नाही disturb करत बोल तू" 

मंदार; "hm….! तर मी त्यावेळेला ११ वी नुकतीच पास केली होती आणि माझा १२ वीचा क्लास लवकर सुरू झाला होता. म्हणजे एप्रिल महिन्यात सुरू झाला होता. आमचा क्लास लवकर सुरू झाल्यामुळे आम्हाला १५ मे ते ३० मे अशी १५ दिवसांची सट्टी दिली होती. या सुट्टीत मी माझ्या मावशी कडे गेलो होतो म्हणजे रत्नागिरीला गेलो होतो. मला अजूनही आठवतंय मला रत्नागिरी पाठवायचा यावरून घरात आई ने तांडवाच सुरू केला होता. तिचं अस म्हणणं होतं की मी रत्नागिरी ला गेल्यावर काही अभ्यास करणार नाही. पण मग बाबांनी तिला कस-बस समजावलं, मग ती तयार झाली आणि त्यानंतर मी रत्नागिरी ला पोहोचलो. रत्नागिरी…. माझी स्वप्ननगरी आहे ती….! रत्नागिरी हे माझ्या आयुष्यातील नंदनवन आहे….! त्या रात्री आम्ही खूप उशिरा पोहोचलो तिथे. खूप पाऊस ही पडत होता तिथे. मला अजूनही आठवतंय की १५ मेला रात्री पोहोचलो होतो आणि १६ मेचा दिवस अगदी नॉर्मल होता. पण मी रत्नागिरीला एकटाच नव्हतो, तिथे माझ्या मावशीची दुसरी भाची सुद्धा आली होती. 

मेघना; "दुसरी भाची….. कोण….?" 

मंदार; "अ…..! दुसरी भाची म्हणजे…. माझ्या मावशीच्या नंदेची मुलगी. तिचं नाव मानसी ताई."

मेघना; "मानसी ताई….!" 

मंदार; "हा म्हणजे तिचं नाव मानसी आहे, पण मी तिला ताई म्हणायचो. तस बघायला गेलं तर ती माझी मानलेली बहीण आहे आणि तसंही आम्ही दोघ एकमेकांना खूप चांगले ओळखत होतो. I mean…. आम्ही त्या आधी देखील मावशी कडे एकत्र राहिलो होतो, सो आमच्यात एक चांगला बोंडीग होत. Like as friend….! " 

मेघना; "म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील होतात आणि भाऊ बहीण ही. " 

मंदार; "हा….! " 

मेघना; "मग पुढे काय झालं….?" 

मंदार; "हो... हो… सांगतो…! पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी as usual मी उठलो आणि…. आणि नॉर्मल होत. त्यानंतर मावशी म्हणली की राज आणि मानसी ताई दोघे त्याच्या चुलत काका कडे जात आहेत, तर ती म्हणत होती की तूही जा त्यांच्या बरोबर. मी म्हटलं ठीक आहे जातो, घरी बसून राहण्या पेक्षा फिरून येऊ सहज. आणि मी सहजच गेलो होतो, पण मला वाटत जर मी त्या दिवशी गेलो नसतो तर ती माझ्या आयुष्यातली सर्वांत मोठा चूक ठरली असती." 

मेघना; "का….? अशी कोणती मोठी…. चूक होती ती…? " 

मंदार; "ते तुला पुढे कळेल. तर आम्ही तिघ निघालो मावशीच्या घरून राजच्या काकांकडे जायला. मला खरच माहीत नव्हत की पुढे काय होणार आहे ते. ते म्हणतात ना वादळा पूर्वीची शांतता... तस काहीस. पण हे वादळ दुःखाच्या गडद काळया ढगांचा नव्हत तर प्रेमाच्या शुभ्र निळ्या आकाशा सारखा होत. आम्ही तिघे राजच्या काकांच्या घराच्या दरवाज्या समोर येऊन उभे ठाकलो. राजने घरची बेल वाजवली. काही क्षणांचा वेळ न दवडता दरवाजा उघडला गेला…….!" 

मेघना; "हा… दरवाजा उघडला आणि मग….!"

मंदार; "मी सांगतोय जरा धीर धर मेघना. मधे मधे बोलून लिंक तोडू नकोस ग….!" 

मेघना; "ok… ok… I am sorry….! तू बोल."

 मंदार; " तर त्यांच्या घरचा दरवाजा उघडला आणि तिथेच मी तिला पहिल्यांदा पाहिलं….!

मंदार; " तर त्यांच्या घरचा दरवाजा उघडला आणि तिथेच मी तिला पहिल्यांदा पाहिलं….! आणि तसाच सर्व काही विसरून मी तिच्या कडे पाहत राहिलो. ते आहेना love at first sight तसच काहीस….!"

मेघना; "मग काय झालं…?"

मंदार; "हा. तर मग आम्ही घरात गेलो, बसलो माझी ओळख करून दिली तिच्या घरच्यांशी. मग छान जेवण केलं. त्यातही एक गंमत होती, त्यादिवशी नेमका तिच्या आईने खेकड्याच्या रस्सा केला होता आणि तुला तर माहितीच आहे खेकडे म्हणजे माझ्या आवडीची डिश. मग काय अजुनच धमाल."

मेघना; "अच्छा….! म्हणून तुला खेकडे आवडतात का…? आता माझ्या लक्षात येतंय." 

मंदार; "म्हणजे…? ए…. ए…! मेघना तस काहीही नाही आहे. मला खेकडे खरच अगोदर पासून आवडायचे."

मेघना; "ओ…. हो….! कसं आहे ना Mr. मंदार तुम्ही आता कितीही सारवासारव केली ना तरी त्याचा काहीही उपयोग नाही. कारण काय आहे मी तुमची बायको आहे कळल."

मंदार; "ए…! तू डिस्टर्ब करू नको यार लिंक तुटते मग…! जाऊ दे मी सांगतच नाही."

मेघना; "ए…..! आय एम सॉरी. लगेच चिडू नकोस."

मंदार; "मी सांगतोय पण तू परत मध्ये बोलणार नाही आहेस…?"

मेघना; "हो… रे बाबा नाही बोलणार."

मंदार; "हा…! तर मी कुठे होतो."

मेघना; "खेकड्यांवर…"

मंदार; "ए... हे बघ तू पुन्हा सुरू झालीस."

(मेघना हसत बोलते.)

मेघना; "अरे… खरच तू खेकड्यां विषयी बोलत होता…"

मंदार; "हा. तर मी जेवलो. आणि मग आम्ही सर्व जण गप्पा मारत बसलो. आम्ही म्हणजे मी, राज, मानसी ताई, ओमकार म्हणजे तिचा भाऊ आणि ती. आम्ही छान गप्पा मारल्या. मी गप्पा मारता मारता तिच्या कडे सुद्धा बघत होतो. म्हणजे मला तिच्या मध्ये खूप attraction आणि intereste दिसत होता. तशी आमची ती पहिलीच भेट होती पण तरीही मी तिला खूप वर्षां पासून ओळखत आहे असं वाटतं होत. माझ तिच्या वर प्रेम आहे का नाही हे मला त्या क्षणी माहीत नव्हतं, त्या नंतर सुद्धा बरेच दिवस मला ते समजल नव्हत. पण मला मना पासून वाटत ती माझ पाहिलं प्रेम होत.

(मेघना हे ऐकत असताना गालातल्या गालात गोड हसते. त्यानंतर मेघना मंदारला प्रेमाने विचारते)

मेघना; "इतकी आवडली होती ती तुला…?"

(मंदार तिच्या कडे पाहून गोड हसतो. त्यावर मेघना त्याला म्हणते.)

मेघना; "hm… म्हणजे ती नक्कीच खूप खास असणार. कारण माझ्या ह्या गोड नवऱ्याला एखादी व्यक्ती जर इतक्या मना पासून आवडत आहे म्हणजे नक्कीच ती व्यक्ती खूप special असणार. ए… मी काय म्हणते आपण भेटायचं का तिला….?"

(मंदार हे ऐकून जोरात हसायला लागतो त्याच्या हसण्या मागचं कारण मेघना त्याला विचारते)

मेघना; "हसायला काय झालं…?"

(मंदार हसत हसत उत्तर देतो)

मंदार; "काही नाही… काही नाही…"

मेघना; "नाही… काही तरी झालंय….? सांगना काय ते…?" 

(मंदार पुन्हा हसत हसत उत्तर देतो)

मंदार; "नाही… नॉर्मली बायका अस ऐकल्यावर रागावतात किंवा खूप चिडतात पण तू तिला भेटायचं म्हणतेस….(मंदार पुन्हा हसत सुटतो)" 

मेघना; "ए… हॅलो…! तू काय मला टिपिकल बायको समजतोस का….?"

मंदार; "नाही… नाही. मी इन जनरल म्हणालो फक्त."

मेघना; "मग ठीक आहे. पण मी मना पासून सांगतेय आपण तिला भेटायला पाहिजे. As a friend म्हणून तरी. "

मंदार; "हम…! बघू…!"

मेघना; "बघू… वगैरे काही नाही…! आपण तिला भेटायचं म्हणजे भेटायचं. तुला भेटायचं नसेल पण… मला भेटायचंय तिला….!"

मंदार; "हो…. भेटू तिला. एक मिनिट पण आता माझी वेळ संपली आणि आता तू बोलणार आहेस." 

मेघना; "हो…! मला माहित आहे. Actually मी विचार करत होते की नक्की सुरुवात कुठून करू… तस आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो पण आणि नाही पण….!" 

मंदार; "म्हणजे…?"

मेघना; "म्हणजे आम्ही दोघं तसे एकमेकांचे मित्र होतो पण जेव्हा प्रेम झाल तेव्हा नव्याने कळला तो मला."

मंदार; "ok. मग पुढे…"

मेघना; "आमची पहिली भेट ही कॉलेज मध्ये झाली होती. तिथूनच आमची मैत्री सुरू झाली आणि मग त्या मैत्रीचं प्रेम झाल. त्याने मला प्रपोज केलं होतं फर्स्ट year ला असताना. तिथूनच आमची प्रेम कहाणी सुरू झाली." 

मेघना हे सर्व मंदारला अगदी मनमोकळे पणाने सांगत होती. मंदार सुध्दा हे अगदी निर्धास्तपणे ऐकत होता. बोलता बोलता अखेर ती त्यांच्या नात्याच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचली. ती तीच्या प्रेमाची गाठ कशी पटकन तुटली ते सांगायला लागली.

मेघना; "एके दिवशी त्याने मला कॉलेजच्या जवळच असलेल्या बागेत बोलावलं. तेव्हा त्याने अचानक पणे सांगून टाकलं की त्याचं लग्न ठरलंय."

हे ऐकून मंदार थोडा शॉक होतो. मेघना ही हे बोलून जरा शांत होते. मंदार मेघना कडे बघत राहतो. थोडा वेळ बघितल्यानंतर त्याला तीच्या डोळ्यांमध्ये तिला झालेल्या दुःखाचे आसवे दिसतात. मंदार ते त्याच्या हळुवार हातांनी ते अलगद पुसतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. तीही त्याला घट्ट मिठी ठेवते. तेव्हा कोमल अश्या आवाजात तो तिच्या कानात पुटपुटतो.

मंदार; "I am sorry…! मी उगाचच तुला फोर्स केला. आपण ह्या विषयावर नको बोलायला पाहिजे होतं." 

मेघना मग त्याला सहज हसत म्हणते; 

मेघना; "ए… वेड्या गप अस काहीही नाहीय. उलट मला खूप रिलॅक्स झाल्या सारखं वाटलं, अगदी मी मोकळी झाले आणि मला मज्जा पण आली की. (मेघना आता मंदारचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते) मंदार जेव्हा मी तुझ्या सोबत असतेना तेव्हा दुःख माझ्या आजूबाजूला देखील फिरकत नाही. तू जेव्हा पहिल्यांदा मला भेटलास ना तेव्हा मला पुन्हा एकदा प्रेम काय ते कळलं तेही नव्याने. मंदार तुझ्या मुळे मला प्रेम काय ते कळलं." 

हे ऐकून मंदार गालातल्या गालात हसतो. हे सर्व बोलणं चालू असताना मेघनाने मंदारचा हात घट्ट धरलेला असतो , त्याच्या खांद्यावर डोकं पण ठेवलेलं असतं. तेवढ्यात मंदार तिला म्हणतो, 

मंदार; "मेघना प्रेम ही भावना किती स्वच्छ आणि निर्मळ आहे. पण ही आजा कालची मुल प्रेमाला girlfriend & boyfriend च्या नात्या मध्ये गुंतवून टाकतात. त्यातला आनंद , स्पर्श , सहवास , मस्ती , मैत्री हे सर्व काही त्या नात्यामध्ये शुल्लकश्या गोष्टीमुळे हरवून बसतात. आणि मग यातून जर नात तुटलं की मग त्या तुटलेल्या नात्याचे दुःखी स्टेटस व्हॉट्सॲप वर टाकतात. हे केल्यानंतर मग देवदास होतात." 

मंदार हे बोलणं ऐकून मेघना हसायला लागते. त्या दोघांच्या या गप्पा गोष्टी सुरू असताना मंदार मध्येच आपला मोबाईल बघतो आणि अवाक होऊन चटकन उभाच राहतो.

मंदार; "आयलं…..!"

मेघना; "काय झाल….?" 

मंदार; "अरे ०३.०० वाजले . मला उद्या सकाळी लवकर ऑफिसला जायचंय. मी चालो." 

अस बोलून मंदार फिरणार तेवढ्यात मेघना त्याचा हात पकडून त्याला थांबवते. मेघना थोडी लाडात येऊन त्याला म्हणते, 

मेघना; "उशीर झाला आहे ना आता खूप. मग कशाला घाई करतोयस. बस ना आपण अजून थोडा वेळ गप्पा मारू आणि मला खूप मज्जा येतेय. (मेघना केविलवाण्या स्वरात मंदार ला म्हणते) please….!"

मंदार घड्याळाकडे नजर टाकून पुन्हा मेघना कडे हसत बघतो व बोलतो, 

मंदार; "ॲक्च्युली मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ऑफिस ला पर हम तुम्हारा दिल कैसे तोड़ सकते है। " 

मग मंदार पुन्हा येऊन बसतो व ते दोघं पुन्हा एकदा गप्पा सुरुवात करतात. त्या दोघांची ती रात्र गप्पा , मस्ती and हसण्यात सहज निघून जाते.

 

Part 01 END 

To be continued…

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now