प्रेम

Dedicates to my ❤

प्रेम काय असतं ते आता मला कळलं
कारण ते तर काही दिवसांपूर्वी तुझ्यावर जडलं
दिवसा मागून दिवस गेले,आता तर आपले लग्न ही ठरले

लग्न ठरल्यापासून चार दिवसांनी तुझा कॉल मला आला
पहिल्यांदा बोलताना माझा थरकाप उडाला

फक्त बोलण्यातूनच आपलं प्रेमाचं नात जुळल
प्रेम कसं झाल ते आपल्याला नाही कळलं

खर सांगायला एकमेकांना पाहिलंही नाही आम्ही
तरी सुद्धा तु देतो प्रेम रोगाची हमी,

म्हणतात ना प्रेम झाल्यावर तहान भूक हरते.
ते तर प्रेम केल्यावरचं कळते

प्रेम किती सुंदर आहे, हे आता मला कळल,
जेव्हा ते नकळत तुझ्यावर जडल,

ईश्वराकड आहे आता एकच मागण
होऊन जाऊदे आता लवकर आपलं लग्न

प्रेमाला आपल्या कोणाची द्रिष्ट न लागावी
जन्मोजन्मासाठी ही रेशिम  गाठ जुळावी